लेखनप्रकार (Writing Type)
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली.
कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले!
भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू!
नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली. अचानक पलिकडे एक बैल मरून पडलेला दिसला तसं दचकून तिनं मागं पाहिलं!
"कवर इचका खायचा?" सासूच्या शब्दांनी तिचा थरकाप उडाला!
तिला मख्ख बघून धाकलीच्या पाठीत गुद्दा बसला आणि दुसरा विळा मटणाच्या कालवणाकडे धडपडत निघाला!
(सत्यघटनेवर आधारित!)
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
कथा भेदक आहे.
आवडली कथा.
नाही!
ओह, असे आहे होय. धन्यवाद.
:'( :-(
धन्यवाद
:(
!!!!!
स्म्यायल्या...
:-( विचका म्हणजे ? धाकटी कोण
विचका...
मस्त हाय कथा
खर आहे!
निशब्द.
अस्वस्थ करणारी.
जबरदस्त लिहिलंय.
धन्यवाद...
सुन्न
दुष्काळाचे चित्र डोळ्यासमोर
+१ दुश्काळ स्थिति सुन्न
शीर्षक वाचून वाटलं
च्च…च…च…
:( कथा आवडली.
बापरे! सुन्न झालो वाचून!
हं!
अगदी
धन्यवाद
कथा आवडली आणि शीर्षक पण !
:( अस्वस्थ वाटलं, आपण केवढे
:(
बर वाटलं
अस्वस्थं करणारी कथा .
अस्वस्थ करणारी.
:(
:(
!
शशक वाचून 'बायपास' लघुपट आठवला.
शहरात 1972 चा पाणी व कडक
बरोबर
१९७२ चा दुष्काळ...
दुष्काळ कोणकोणत्या प्रांतात होता ?
महाराष्ट्र - विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा