Diwali Anka 2013
दिवाळी अंक २०१३
निवळशंख डोळे
निवळशंख डोळे
म्हैसूरपाक
साहित्यः
दीड वाट्या बेसन
दोन वाट्या साखर
१/२ वाटी पाणी
२ वाट्या तूप
वेलचीदाणे
पाकृ:
साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा.
दुसर्या भांड्यात तूप कडकडीत गरम करायला ठेवावे.
दिवाळी
मिटवुनी रात्र काळी, झळके पहा दिवाळी
ओल्या नव्या सकाळी, आली पहा दिवाळी
पसरे नभी झळाळी, उठवे पहा दिवाळी
झाकोळुनी नव्हाळी, नटते पहा दिवाळी
कोवळी कळी डहाळी, उमले पहा दिवाळी
शोभुनी दारी रांगोळी, सजते पहा दिवाळी
ज्योत ज्योत पिवळी, उजळे पहा दिवाळी
आतशबाजी आभाळी, चमके पहा दिवाळी
गोडधोड फराळी, खुणावते पहा दिवाळी
नातीगोती कोवळी, जपते पहा दिवाळी
शांती, सुख ओंजळी, घालते पहा दिवाळी
सुचवुनी चार ओळी, बोलते पहा दिवाळी
अशी ही मराठमोळी, सुखावते पहा दिवाळी.
मीनल गद्रे.
तमसो मा ज्योतिर्गमय
दीपावली. दिवाळी. सणांचा जणू राजा. भारतीय संस्कृतीमधल्या उत्सवप्रियतेचा जणू कळस.
सण प्रकाशाचा, रोषणाईचा, आतषबाजीचा.
सण गोडाधोडाचा, अभ्यंगस्नानाचा, सुवासाचा, सडा घातलेल्या अंगणातल्या सुंदर रांगोळीचा, तुळशीवृंदावनाबरोबर जपल्या जाणार्या पावित्र्याचा.
थोडा दिनविशेषांचा विचार करुया.
मिपाकरांचे मंगळावर संमेलन
मंगळावरील पहिले संमेलन आणि तेसुद्धा मिपाचे!
गेले काही दिवस श्री. प्रमोद देर्देकर ह्यांनी मिपाचे एक जागतिक संमेलन व्हावे, असा विचार मांडला. बराच ऊहापोह चालू होता. (गदारोळ हा शब्द मुद्दाम टाळला आहे. जुन्या, जाणत्या आणि नेणत्या मिपाकरांना माहीत आहे की मिपावर बर्याचदा गदारोळच होतो.) थोडीफार चर्चाही होतीच चालू. मीही दोनतीन ठिकाणांना अनुमोदन दिले. आपल्या पिताश्रींचे काय जाते, असे म्हणून गप्प बसलो होतो.
जाग
जाग
उसळती काळोखाच्या बहु लाटा अंबरात
किनार शुभ्र रुपेरी खुलते कृष्णमेघात ॥
तम गर्द दाटलेले काजळी दशदिशात ॥
शुक्र चांदणी एकली लखलखे निमिषात ॥
रजनी विसावलेली धरेवरी शांत शांत
चाहूल असे तिजला हलके येई प्रभात ॥
मधुगंधी गार वारा वाहतो शीळ घालीत
डोलतात वृक्षवेली अंगांग भिजे दवात ॥
गवताच्या सान पाती लवलवती तालात
फुले फुले उमलुनी बहरला आसमंत ॥
उडती गाती ते पक्षी विहरती आनंदात
जागी होत वसुंधरा नाहतसे सोन्यात ॥
-- मनीषा
काजूची फुले
साहित्यः
काजूगर एक वाटी
साखर अर्धी वाटी
पाणी अर्धी वाटी
खाण्याचे रंग.
समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास
प्रास्ताविक : या लेखातली सर्व माहिती मी केवळ कुतूहलाने केलेल्या आतापर्यंतच्या ‘संदर्भ-उत्खननाचा’ परिणाम आहे. माझा या विषयातला अभ्यास सखोल किंवा परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही. तसेच सतत चाललेल्या नवीन संशोधनातून अधिकाधिक विश्वासू पुरावे जसजसे बाहेर येतील, तसतसा आता माहीत असलेल्या इतिहासात भर किंवा बदलही संभवतो. या कारणानेच या प्रकरणाचा प्राचीन मानवाच्या प्रवासासंबंधीच्या लेखमालिकेत अंतर्भाव केला नव्हता. तरीही आतापर्यंत कळलेला हा मानवाचा रोचक जलप्रवास सांगायचा मोहही आवरत नव्हता. त्यामुळे यात काही माहिती थोडक्यात, तर काही तुटकपणे आहे.