माझा धातुकोष . भाग तिसरा

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
27 Sep 2009 - 4:27 pm

पन्नास हजार रुपये फार काही टिकले नाहीत परंतू दोन महीने मनाला बाम लावल्यासारखं वाटत होतं माझ्या कोठारी कंपाउंडचा किश्शाची एलप्पानी जोरदार प्रसिध्दी केली असावी.ठाण्यातले सगळे भंगारवाले मला ओळखायला लागले होते. केमीकलवाला सेठ म्हणून सगळे ओळखायचे. रोज सकाळी चारपाच जणं सोसायटीच्या गेटवर उभे असायचे.
या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्‍यानी घराच्या कानाकोपर्‍यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.
आणि एक दिवस अशाच कोणाच्यातरी शिफारशीनी स्वामीची आणि माझी ओळख झाली.
स्वामी माझ्यासारखाच पोळलेला माणूस होता.बंगलोरला कुटुंब होतं पण हा मुंबईतच रहायचा.वय साधारणपणे साठीचं.फाडफाड इंग्रजी बोलायचा.दलाली करायचा. तामीळी समाजाच्या एका लॉजवर रहायचा.क्रेडीट संपलं की आपण होऊन व्हरांड्यात झोपायचा.पैसे आली रुममध्ये.सिगरेट-इंडीयन एक्सप्रेस आणि रात्रीच्या जेवणाचे पैसे इतकं टार्गेट रोज असायचं .
भंगारवाल्यांच्यात चांगला जम बसवून होता. कस्टम गोडाउन्समध्ये याची चांगली ओळख होती.एका लिलावात यानी एक केमीकल घेतलं होतं आणि ते विकता येत नव्हतं म्हणून माझ्याकडे आला होता.मी ऑक्शन लिस्टवाचली .सोडीयम नायट्रेट. चौदा पंधरा रुपयाचा आयटम होता. माझ्या एका नातेवाईकांना रोजच्या प्रॉडक्शनला लागणारा आयटम.स्वामीनी खरेदी सहा रुपयात केली होती.
मी स्वामीला माल साडेचौदा रुपयाच्या हिशोबानी रोखीत विकून दिला.
हातात पैसे आल्यावर स्वामीनी मला साडेचार हजार दिले.
"सेठ आप पैसे के लिये फेल है आप ले लो."
"कौन बोला आपको के मै पैसे के लिये फेल है."मी तडकून विचारलं.
स्वामीनी उत्तर द्यायची टाळाटाळ केली पण नंतर सांगीतलं की आपका वॉचमन बोला था साब.
मला बराच वेळ वाईट वाटलं पण मनाशी कबूल केलं की आपली दिवाळखोरी आता चार भिंतीत राहीलेली नाही.
त्यानंतर चार दिवसानी स्वामी मला घेऊन मरीन प्रिव्हेंटीवला घेऊन गेला.बागवे नावाचे सुपरीटेंडंट होते. त्यांनाही एका मराठी माणसाला भेटल्याचा आनंद झाला.त्यांनी माझी ओळख आमरे नावाच्या सदगृहस्थांशी करून दिली.स्वामी आता माझी पाठ सोडायला कबूल नव्हता.सकाळी नऊ वाजता घरी येऊन बसायचा. केमीकल भंगारात घेणारे सगळे भंगारी मंडाला म्हणजे गोवंडीच्या आसपास होते.
सकाळ गोवंडीत गेली की दुपार कस्टम गोडाउन.आमरे माझ्यावर खूष असावेत. त्यांनी मला जनरल कस्टम्सच्या असीस्टंट कलेक्टर दामल्यांकडे पाठवलं.
दामले साहेबांनी नव्या मुंबईत गुप्ता गोडाऊन्सला काही माल जप्त करून सील करून ठेवला होता. सायनुरीक क्लोराईड.
त्यावेळी हे केमीकल चायना वरून यायचं .भयंकर हॅझार्डस आणि करोझीव केमीकल. ड्रम उघडला की विषारी क्लोरीनच्या वाफा यायला सुरुवात व्हायची. टेक्स्टाईल डाईज बनवताना सायनो बाँडींग करायला आवश्यक .चायना खेरीज डेगुसा नावाची कंपनी पण सायनुरीक क्लोराईड बनवायची . डेगुसाचा माल महाग असायचा.हा सगळा माल डेगुसाचा होता.
कोणीतरी राँग डिक्लरेशन करून माल आणला होता. दामल्यांनी तो जप्त केला. कोर्टानी महीन्याभरात विल्हेवाट लावायला सांगीतली होती पण शेवटचा आठवडा शिल्लक असतानाही माल जागचा हलला नव्हता.दामल्यांनी मला मालाची हलवाहलव करायचं काम दिलं .
माल हाज बंदरपर्यंत न्यायला ट्रकवाले तयार नव्हते.
स्वामीला मी सांगीतलं " बाबा रे हे आपलं काम नाही ."
स्वामी जाम चिक्कट माणूस. मला म्हणाला "साब आप सिर्फ दामले साब को बोलो की दो ऑफीसर साथ दे दो और बमटोलेवालेको तय्यार रखो."
मी म्हटलं "स्वामीजी, लेबर कहांसे लाओगे. "
"मै लाता लेबर .आप अ‍ॅडव्हान्स उठाव.दुसर्‍या दिवशी दामल्यांनी पस्तीस हजार हातात ठेवले.
स्वामी मला आत्ता येतो असं सांगून धारावीत गेला.
रात्रीचे आठ वाजले तरी पत्ता नाही. मनात यायला लागलं की दामल्यांकडे जाउन पैसे परत द्यावेत आणि घरी जावं.
साडेआठ वाजता स्वामी आणि चार माणसं येताना दिसली. "साब ये तुराब ."मी नमस्ते म्हटलं .
तुराब मला सलाम म्हणाला. "साब ये कल लेबर लेके आयेगा. मै अभी धारावी जाता हूं. ड्रम गोणीमे डालके लायेंगे. चारसो ड्रम है .मै चारसो गोणी लेके आता हूं."
मी विचारात पडलो. एका रात्रीत चारशे गोण्या शिवून आणायच्या. कसं शक्य आहे.
माझ्या मनातला प्रश्न स्वामीनी ओळखला असावा.मला म्हणाला" सेठ आपने धारावी नही देखा है. कल सुब्बुमे पोचो आप."
सकाळी आठ वाजता मी आणि दामले साहेब गुप्ता गोडाउनवर हजर.
नऊ वाजता एका टेंपोतून स्वामी आणि विस माणसं चारशे गोण्यांसकट हजर.
दहा वाजता ट्रक वाले हजर.स्वामीची मंडालातली ओळख कामाला येत होती.
साडेदहा वाजता शटर वर गेलं .दहा मिनीटं डोळ्यासमोर काही दिसेना. डोळे चुरचुरायला लागले.वाफांनी खोकला यायला लागला. काही ड्रम सडून फूटल्याचा परीणाम होता. अर्ध्या तासानी वाफा बंद झाल्या.
माणसं कामाला लागली.एकेका गोणीत एकेक ड्रम जायला सुरुवात झाली. एक ट्रक भरला.दामले कामाचा वेग बघून थक्क झाले.
मला फक्त एक गोष्ट कळत नव्हती की या सगळ्याचं क्रेडीट स्वामीला मिळायला हवं होतं पण स्वामी मलाच पुढे करत होता.
दामले दुपारी दोन वाजता त्यांच्या ऑफीसला निघून गेले.ते गेल्यावर त्यांचे दोन ऑफीसर पण जेवायला गेले.
साडेचार वाजता फायर ब्रिगेडचे जवान बमटोला घेऊन हजर झाले.
सव्वातीनशे ड्रम भरून झाले आणि खरा ड्रामा सुरु झाला.
एक नवीन टेंपो येऊन उभा राहीला. त्यातून सायनुरीक सारखे दिसणारे सत्तर पंचाहत्तर ड्रम बाहेअर पडले. स्वामीनी मला खूण करून बाजूला घेतलं .
"अभी आप आंख बंद कर लेना ."
मी म्हटलं "क्यू भाई "
स्वामी मला म्हणाला "ये कस्टम का काम है साब . दामले साब ने अ‍ॅडवाण्स दिया. बाकीका पेमेंट आनेमे पुरा साल निकल जायेगा. तब तक क्या मंजीरा बजानेका ?"
मी म्हटलं "तो आप क्या बोलते है?"
"सत्तर ड्रम रीप्लेस करता हूं."
मी म्हटलं "स्वामी साब मेरेको मरवाओगे. हाज बंदरमे गिनती होगी "
"होने दो. सायनुरीक क्लोराएड्का ड्रम खोलके देखनेकी हिम्मत कोई नही करेगा."
माझं सगळंच स्वामीच्या हातात. आता मला कळलं की स्वामी मला का पुढे करत होता ते.
मी असहाय होतो. स्वामीच्या एका हाकेवर लेबर काम सोडून निघून गेलं असतं.
अर्ध्या तासानी दामलेंचे ऑफीसर परत येण्यापूर्वी सत्तर ड्रम नाहीसे झाले होते.
"स्वामी ये सत्तर ड्रम कहा रखोगे ?"
स्वामी हसला. "साब आपको अब्बीच सब पत्ता कैसा खोलके बताऊ?"
"चलो फिरभी बता देता हूं आपका विश्वास तो हो जाये?"
स्वामीनी दिवसभरातला शेवटचा धक्का दिला.
"साब ,गुप्ता सेठ अपने साथ है."
सत्तर ड्रम गुप्ताच्या जवळच असलेल्या दुसर्‍या गोदामात जमा झाले होते.
सायनुरीकचा भाव तेव्हा सव्वादोनशे रुपये किलो होता.
सात वाजता गुप्ता आला. स्वामीच्या हातात एक प्लॅस्टीकची थैली दिली.
समोर बमटोल्याची गाडी .मागे आमचे दोन ट्रक. मागच्या टेंपोत लेबर .टॅक्सीत ऑफीसर.शेवटच्या गाडीत मी आणि स्वामी.
रात्री नऊ वाजता अम्ही हाज बंदरला पोहचलो.
पहाटे गाड्या रिकाम्या झाल्या.डोळे जळजळत होते.अंगाला क्लोरीनमुळे मुंग्या चावल्यासारखं वाटत होतं.केसात प्रचंड आग होत होती.
हाज बंदरच्या म्युनीसीपालीटीच्या बाथरुममध्ये आम्ही सगळ्यांनी आंघोळी केल्या.
माझी सुलभ शौचालयातली पहीली आंघोळ.
तेच कपडे परत घातले.
स्वामीनी माझ्या हातात पंचवीस हजार ठेवले."ये आपका हिस्सा."
"मै दुपरको मिलेगा .फिर दामले साब को मिलेंगे."
माझ्याकडे दामल्यांच्या अ‍ॅडवान्सचे बारा हजार शिल्ल्क होते.
एकूण सदतीस हजार खिशात आले होते.
भंगारी म्हणून माझा इंडक्शन प्रोग्राम पूर्ण झाला होता.
-----------------------------------------------------------------------
घरी आल्यावर मला फर अपराधी वाटत होतं. हातचलाखीचे धंदे शेअरबाजारचा धंदा बंद केला होता तेव्हापासून बंद केले होते.
पण सगळीकडे माणसं लाचखोरी आणि चोरीच्या फ्रींज बेनीफीटवरच धंदा करत होती.
नॉन टॅक्सेबल फ्रींज बेनीफीट.
स्वामीनी मला पुढे करून असलं काम माझ्या हातून करून घ्यावं याचं फारच वाईट वाटत होतं.
दुपारी ठरल्याप्रमाणे मी दामल्यांच्या केबीन बाहेर बाकावर बसून होतो.
दामल्यांनी आपल्यावर विश्वास टाकावा आणि आपण चोरी करावी याचं मनापासून वाईट वाट होतं.
एव्हढ्यात दामले साहेब येताना दिसले.
मी उठून उभा राहीलो.त्यांच्या हातात हाज बंदरला माल जमा केल्याची पावती दिली.
त्यांच्या कडे बघण्याची माझ्या डोळ्यात हिम्मत नव्हती.खरं बोलणं परवडणारं नव्हत.
दामल्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली.
"गूड जॉब यंग मॅन .आता लवकर बिल द्या .मी इथे असेपर्यंत सेटल व्हायला पाहीजे."
माझ्या तोंडातून शब्द फुटेना.
मी म्हटलं "सर्..सर..
दामले मला म्हणाले "काय झालं ? "
"आय हॅड टोल्ड स्वामी टू टेक गूड केअर ऑफ यु."
आरंच्यू हॅपी ?"
माझं डोकं एकदम हलकं झालं.
मी हसताना बघून दामले म्हणाले "आपल्याला नेहेमी विन -विन सिच्युएशन आवडते बाबा.तुम्ही काय म्हणता."
दामले सात मजली हसत बाहेर पडले.
मी मटकन बाकावर बसलो.

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

सहज's picture

27 Sep 2009 - 4:41 pm | सहज

सुंदर!!!!!! दसर्‍याची भेट दिलीत सर!

पण सगळीकडे माणसं लाचखोरी आणि चोरीच्या फ्रींज बेनीफीटवरच धंदा करत होती.
नॉन टॅक्सेबल फ्रींज बेनीफीट.

:-(

प्रसन्न केसकर's picture

27 Sep 2009 - 4:49 pm | प्रसन्न केसकर

बरेच नवीन कळतंय. अन वाचायला पण मजा येतेय.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

अवलिया's picture

27 Sep 2009 - 4:55 pm | अवलिया

पण सगळीकडे माणसं लाचखोरी आणि चोरीच्या फ्रींज बेनीफीटवरच धंदा करत होती. नॉन टॅक्सेबल फ्रींज बेनीफीट.

बेष्ट!!!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2009 - 4:59 pm | बिपिन कार्यकर्ते

लवकर लवकर टाकताय त्यामुळे मजा येते आहे.

या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्‍यानी घराच्या कानाकोपर्‍यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.

भारी.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

28 Sep 2009 - 5:33 am | गणपा

पार वेगळ जग आहे हे.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

नंदन's picture

27 Sep 2009 - 5:23 pm | नंदन

वाचतो आहे. हा भाग पुढच्या खळबळजनक भागाआधी रोखलेल्या श्वासासारखा वाटला.

या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्‍यानी घराच्या कानाकोपर्‍यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.

भारी.

- असेच म्हणतो. अमेरिकन ब्यूटीतल्या ह्या सीनची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

27 Sep 2009 - 9:26 pm | ऋषिकेश

हा भाग पुढच्या खळबळजनक भागाआधी रोखलेल्या श्वासासारखा वाटला

अगदीऑ अगदी!.. हेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ९ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "वासुद्येवाची ऐका वानीऽऽ...."

चेतन's picture

27 Sep 2009 - 6:43 pm | चेतन

वाचायला मजा येतेयं.

भंगारी म्हणून माझा इंडक्शन प्रोग्राम पूर्ण झाला होता.

इथल्या एकाची भंगारी ते वेदांता मालक ही कथा ऐकुन मी पहिल्यांदा थक्कच पडलो होतो.

चेतन

स्वाती२'s picture

27 Sep 2009 - 6:56 pm | स्वाती२

बापरे! केवढं वेगळं जग.
>>प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्‍यानी घराच्या कानाकोपर्‍यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.
क्या बात है!

रेवती's picture

27 Sep 2009 - 9:07 pm | रेवती

अगदी असेच म्हणते.
रेवती

चकली's picture

27 Sep 2009 - 8:28 pm | चकली

वाचतेय्. छान लिहले आहे सगळे भाग
चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

27 Sep 2009 - 9:45 pm | मदनबाण

ए वन !!! :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

लवंगी's picture

28 Sep 2009 - 4:38 am | लवंगी

असच म्हणते

मी-सौरभ's picture

27 Sep 2009 - 11:10 pm | मी-सौरभ

climax छानच होता

सौरभ

घाटावरचे भट's picture

27 Sep 2009 - 11:25 pm | घाटावरचे भट

महान!!

सुनील's picture

28 Sep 2009 - 7:30 am | सुनील

फारशा माहित नसलेल्या जगातील हे एक अत्यंत सुरेख चित्रण. रामदासजी लगे रहो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2009 - 5:23 pm | स्वाती दिनेश

फारशा माहित नसलेल्या जगातील हे एक अत्यंत सुरेख चित्रण. रामदासजी लगे रहो!
सुनीलभाऊंसारखेच म्हणते.
स्वाती

श्रावण मोडक's picture

28 Sep 2009 - 8:12 am | श्रावण मोडक

वाचतो आहे. सुरेखच.

JAGOMOHANPYARE's picture

28 Sep 2009 - 8:42 am | JAGOMOHANPYARE

याचं पुस्तक लिहा नंतर....... छान लिहिले आहे.

अरुण मनोहर's picture

28 Sep 2009 - 10:46 am | अरुण मनोहर

रामदासबुवा की जय हो. उत्तरोत्तर असेच समृद्ध लिखाण करा.

धमाल मुलगा's picture

28 Sep 2009 - 1:25 pm | धमाल मुलगा

:|
काय बोलायचं?

नविन दुनियेची सफर करवता आहात बोटाला धरुन. एकेक धक्का खात तुमच्यासोबत पाहतोय नजरेआडची दुनिया.

गणपा's picture

28 Sep 2009 - 9:29 pm | गणपा

नविन दुनियेची सफर करवता आहात बोटाला धरुन. एकेक धक्का खात तुमच्यासोबत पाहतोय नजरेआडची दुनिया.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश

मेघना भुस्कुटे's picture

28 Sep 2009 - 2:13 pm | मेघना भुस्कुटे

हा भाग आधीच्या दोन भागांइतका नाही आवडला. काहीसा अर्धवट वाटला.
पण रामदासांचं लिखाण 'फारसं आवडलं नाही' तरी उतरून उतरून किती उतरणार? पुढचा भाग लवकर येऊ द्या, असं बसल्या जागी ऑर्डर सोडून सांगणं सोपं आहे.
तरी हाव सुटत नाहीच. शक्य तितक्या लवकर लिहा.

इथून तिथून सगळेच हपापलेले! पापभिरु माणसाची ससेहोलपट!
पुढच्या भागाची वाट पहातोय .. इलाज नाही...

चतुरंग

संदीप चित्रे's picture

28 Sep 2009 - 10:01 pm | संदीप चित्रे

जग, ज्याच्याशी आपला कधी संबंध येत नाही त्यात इतक्या उलथापालथी होत असतात ? !!

प्लॅस्टिकच्या पिशवीचं वाक्यं तर एकदम 'जियो' अशी दाद घेणारं.

वाट बघतोय पुढच्या भागाची.

http://atakmatak.blogspot.com

क्रान्ति's picture

29 Sep 2009 - 8:28 am | क्रान्ति

>>>या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्‍यानी घराच्या कानाकोपर्‍यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.

दंडवत!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

शैलेन्द्र's picture

29 Sep 2009 - 8:45 am | शैलेन्द्र

छान लेख, नेहमीप्रमानेच..

__________________________________________________

आम्ही प्रतिसादाचे विरजण लावलेय, दही खायचं असेल तर दूध टाका.

प्राजु's picture

29 Sep 2009 - 8:48 am | प्राजु

धक्क्यावर धक्के!! शेवटचा जास्तीच जोरात..
पुढचा भाग कधी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पाषाणभेद's picture

29 Sep 2009 - 9:56 am | पाषाणभेद

लई भारी लेख लिवलाय. आजून बिगीबीगी येवूंद्या.

आन एक सांगायाच राहिलयं, मागल्या भागांच्या साखळ्या पन द्या ना राव. नाय मी सगळ्या साखळ्या वाचल्यात पन कोनी नविन मानुस आला तर त्याला सोईच जाईल नव्ह का?
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

संदीप चित्रे's picture

30 Sep 2009 - 1:25 am | संदीप चित्रे

>> आन एक सांगायाच राहिलयं, मागल्या भागांच्या साखळ्या पन द्या ना राव. नाय मी सगळ्या साखळ्या वाचल्यात पन कोनी नविन मानुस आला तर त्याला सोईच जाईल नव्ह का?

असेच म्हणतो

समंजस's picture

29 Sep 2009 - 11:40 am | समंजस

सुंदर लिखाण!!
पुढिल भागांची प्रतिक्षा आहेच!!

भोचक's picture

29 Sep 2009 - 1:39 pm | भोचक

एखाद्या थरारक चित्रपटासारखं वाटतंय. प्रत्येक भागात काही तरी नवीन पहायला, अनुभवायला मिळतंय. तुमचं आयुष्य म्हणजे खरोखरच एखादा थरारक चित्रपटासारखंच असावं असं वाटतंय. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय बोलायचं. त्याचे मासले अनेकांनी वर दिलेच आहेत. पुनरूक्ती नको. क्लास !!!

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

भोचक's picture

29 Sep 2009 - 1:40 pm | भोचक

एखाद्या थरारक चित्रपटासारखं वाटतंय. प्रत्येक भागात काही तरी नवीन पहायला, अनुभवायला मिळतंय. तुमचं आयुष्य म्हणजे खरोखरच एखादा थरारक चित्रपटासारखंच असावं असं वाटतंय. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय बोलायचं. त्याचे मासले अनेकांनी वर दिलेच आहेत. पुनरूक्ती नको. क्लास !!!

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

मोहन's picture

29 Sep 2009 - 3:59 pm | मोहन

सुंदर लेख.

मोहन

दिपक's picture

30 Sep 2009 - 1:34 pm | दिपक

मस्त... येउद्यात असेच अप्रतिम लिखाण :)

धनंजय's picture

1 Oct 2009 - 3:46 am | धनंजय

आणि आता भराभरही येत आहेत भाग.

अश्विनि३३७९'s picture

3 Oct 2009 - 1:10 pm | अश्विनि३३७९

अश्विनि ....