सूर्योदय

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
19 Feb 2008 - 6:16 pm

सर्वसाक्षींच्या सूर्यास्तामुळे मला ही सूर्योदयाची चित्रे टाकावीशी वाटली...
नव्या घरातून टिपलेल्या उगवत्या सूर्याच्या छटा...
(खालील चित्रप्रतिमेवर क्लीक करा आणि पिकासा अल्बममध्ये चित्रे पहा, किंवा इथे स्लाईड शो पहा)

sunrise

काही महिन्यांत किंवा वर्षांत इथेही इमारतींच्या गच्च्या क्षितीजे कुरतडायला लागतील आणि हे क्षण दुर्लभ होतील....!

वावरराहती जागाप्रतिसादमाध्यमवेधआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर

लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..!

अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :)

बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की!

तात्या.

प्राजु's picture

19 Feb 2008 - 7:04 pm | प्राजु

तात्यांशी सहमत आहे मी.

- प्राजु

केशवराव's picture

19 Feb 2008 - 10:42 pm | केशवराव

ओंकार,
सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच.
लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान.
निसर्ग वेडा ...केशवराव.