(सोडू नको)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
12 May 2009 - 10:28 pm

मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;)

संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!

तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको!

केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको!

काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो?
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!

पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे
बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको!

काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला
गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

12 May 2009 - 10:43 pm | लिखाळ

हा हा हा ... :)
रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले.
-- लिखाळ.

केशवसुमार's picture

12 May 2009 - 11:09 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम जब्राट विडंबन.. चालू दे..
केशवसुमार

संदीप चित्रे's picture

12 May 2009 - 11:13 pm | संदीप चित्रे

खर्ज हे शेर विशेष आवडले रे :)

बेसनलाडू's picture

12 May 2009 - 11:14 pm | बेसनलाडू

विशेष!
(वाचक)बेसनलाडू

राघव's picture

13 May 2009 - 9:35 am | राघव

नेहमीप्रमाणेच मस्त.

काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला
गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको!
..... खरंच भारी!!

राघव

विसोबा खेचर's picture

13 May 2009 - 10:47 am | विसोबा खेचर

संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!

मस्त रे रंगा! :)

तात्या.

श्रावण मोडक's picture

13 May 2009 - 10:51 am | श्रावण मोडक

चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे
बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको!
=)) =))
लै भारी इडंबन !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पाषाणभेद's picture

13 May 2009 - 12:30 pm | पाषाणभेद

"केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको!

काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो?
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!"

बारीक निरीक्षण.
प्र. के. अत्रेंची आठवण झाली.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

दत्ता काळे's picture

13 May 2009 - 1:18 pm | दत्ता काळे

चतुरंगराव, एकदम झकास विडंबन.

माया's picture

13 May 2009 - 1:20 pm | माया

:)

कपिल काळे's picture

13 May 2009 - 1:44 pm | कपिल काळे

कोंबायचे !! आवडले.

अशा सर्व रसिकांचे आभार! :)

चतुरंग

स्मिता श्रीपाद's picture

13 May 2009 - 7:27 pm | स्मिता श्रीपाद

एक नंबर ईडंबन :-)

मज्जा आली...

मराठमोळा's picture

13 May 2009 - 7:31 pm | मराठमोळा

जबरी विडंबन.
आवडले.. =)) =D>

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मदनबाण's picture

14 May 2009 - 5:05 am | मदनबाण

झकास विडंबन... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अवलिया's picture

14 May 2009 - 6:50 am | अवलिया

मस्तच ! :)

--अवलिया

चन्द्रशेखर गोखले's picture

14 May 2009 - 7:16 am | चन्द्रशेखर गोखले

मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली .

नंदन's picture

14 May 2009 - 9:05 am | नंदन

'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्‍या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे :) [उदा. (फिरवतो हात)]

(समदु:खी गॉन-केस) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

14 May 2009 - 3:26 pm | श्रावण मोडक

गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!

मलाबी हेच आवडले !