चला लेखक होउया !

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
11 Apr 2009 - 11:24 am

स्थळ :- आमचे कार्यालय

वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ?

पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी.

मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ?

आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे.

मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता. ह्या मिपावाल्यांनी 'हा विषय आधी झालाय' 'चोरलेले लेखन' आणी काय काय बडबड केली. 'व्यासांनी सगळेच उष्टे करुन ठेवलय म्हणाव.'

आम्ही :- अरे पण तु तर मराठी साहित्याचा आनंद घ्यायला म्हणुन मिपावर आलास ना ? लेखन तुझा प्रांत नाही सोन्या. तु विश्लेषण चांगले करु शकतोस, प्रतिक्रीया छान देतोस तेव्हडे बास की.

मित्र :- नाही नाही नाही ! ठरले म्हणजे ठरले, मी लेखक होणारच. तु मला मार्गदर्शन कर बस.

आम्ही :- हम्म्म्म्म आता तु ठरवलेच आहेस तर मित्र म्हणुन तुला मदत करणे आमचे कर्तव्यच आहे. सगळ्यात आधी तु काहि गोष्टींना सुरुवात कर.

१)तुझ्या सारखेच अजुन ४/५ 'दुर्लक्षीत' शोधुन काढ.

२) त्यांच्या फडतुस लेखाला, कौलाला कोणी प्रतिक्रीया देत नसतेच. ती तु द्यायला सुरुवात कर. कितीही फालतु लिहिले असले तरी 'क्या बात है =)) =)) ' 'च्यायला लै भारी' 'जुने दिवस आठवले भे****' 'सेम सेम साला आमचा मास्तर/ डॉक्टर/ बाप / भाऊ .. असाच ***** होता.' अशा भरभरुन प्रतिक्रीया चालु कर.

३)तुम्हा सगळ्या झंपुंचा मिळुन एक कंपु चालु कर.

मित्र :- अरे पण हे सगळे कशासाठी ?

आम्ही :- खुळ्या अरे असे केलेस की तुझ्या हक्काच्या ४/५ प्रतिक्रीया तर नक्की झाल्या.

मित्र :- पण ४/५ फक्त ?

आम्ही :- मुर्ख आहेस. अरे ४/५ प्रतिक्रीयांना उत्तर म्हणुन तुझ्या ४/५ प्रतिक्रीया. 'आवरा' 'बंद करा असले फुटकळ कौल' 'अरे काय फालतुपणा आहे ?' 'तात्या काहितरी करा ह्यांचे' इ.इ. आरडाओरडी करणार्‍यांच्या ६/७ प्रतिक्रीया, किती झाल्या एकुण ?

मित्र :- च्यामायला १७/१८ झाल्या की राव ! लै भारी आयडीया.

आम्ही :- मिपाकरांच्या 'तुसड्या' प्रतिक्रीया आल्या रे आल्या की तु लगेच एक 'जाउदे नसेल आवडत तर नाही लिहिणार ह्यापुढे' किंवा 'आमच्या कडे कंपु नाही, आम्हाला असेच फाट्यावर मारणार' असली काहितरी खळबळजनक, हृदयाला हात घालणारी प्रतिक्रीया बोल्ड मध्ये टाकुन दे.

मित्र :- त्यानी काय होईल ?

आम्ही :- इकडे काहि खरच 'हळवे' मिपाकर पण आहेत राजा ;) पायाला मुंगी चावली तर 'आपली निबर कातडी चावुन तिला त्रास तर झाला नसेल ना ?' असे संत एकनाथ रावांना लाजवणारे विचार आहेत ह्यांचे. ते लगेच धावत येतील बघ आणी तुला 'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' अशा प्रतिक्रीयांचा आधार देतील.

मित्र :- पशा पशा अरे २४/२५ प्रतिक्रीया कुठेच नाही गेल्या.
(आमचे मित्रवर्य आता फक्त नाचायचे बाकी राहिले होते)

आम्ही :- आणी सगळ्यात महत्वाचे, ज्या दिवशी काहि लिहिशील त्या दिवशी मिपावरुन बिल्कुल हलायचे नाही. तासाभरात लेखावर प्रतिक्रीया आली नाही तर लगेच लेखात एखाद्या दुसर्‍या शब्दाचे संपादन करुन लेख 'अद्ययावत' करायचा. तुझ्या लेखनाचा दर्जा बघता तुला शिव्या देणारी का होईना एकतरी प्रतिक्रीया पहिल्या ५ मिनिटात येणार हे नक्की. लगेच हुरळुन जायचे नाही, शांत राहायचे. लेख हळुहळु तळाला जातोय असे वाटले की त्या शिव्या देणार्‍या प्रतिक्रीयेवर 'ईट का जवाब पथ्थरसे' प्रतिक्रीया द्यायची आणी लेख वर आणायचा.

मित्र :- तोवर आमच्या झंपु कंपुतले कोणीना कोणी येईलच की मदतीला.

आम्ही :- भले शाब्बास ! मग आता कसली वाट बघतोयस ? होउन जाउ दे मिपावर तुझ्या टुकार लेखांचा आणी कौलांचा पाऊस.

दुसर्‍या दिवशी मिपा उघडले आणी पाहतो तर आमच्या समोर आमच्या मित्रानी प्रसवलेला पहिला वाहिला कौल 'गाढवानी तुम्हाला रस्त्यात लाथ मारली तर तुम्ही काय कराल ?'

१) गाढवाला उलटी लाथ माराल.

२) गाढवाला पायातला बुट फेकुन माराल.

३) जालींदर बाबांचे स्मरण करुन गाढवाला शाप द्याल.

४) गाढवाला गुळ खायला घालाल.

५) माणसावर बसवुन गाढवाची वरात काढाल.

६) इथे सांगता येणार नाही, नाहितर कोणीतरी मिपावालाच लाथ मारायचा.

७) इतर काही ..

धोरणविनोदमुक्तकतंत्रमौजमजाप्रतिभा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Apr 2009 - 11:29 am | अवलिया

क्या बात है!
=)) =))

;)

--अवलिया

दवबिन्दु's picture

11 Apr 2009 - 11:30 am | दवबिन्दु

प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे

प्रतिक्रिया लिवायचा कन्टाळा आला तर त्या तयार करुन
ठेवायाच्या नोटप्याड मधे उदा. +१ सहमत. फक्त कोपी - पेस्ट मारायचे.

निखिल देशपांडे's picture

11 Apr 2009 - 11:36 am | निखिल देशपांडे

" 'च्यायला लै भारी' 'जुने दिवस आठवले "
'सेम सेम साला आमचा मास्तर/ डॉक्टर/ बाप / भाऊ .. असाच ***** होता.'
काय परा अशाच प्रतिक्रिया द्यायच्या ना रे!!!!
बाकी कौलाचे उत्तर ६ वा पर्याय.
असेच तुझे लेख येवु देत रे... असेच नवलेखकांना मार्ग्दर्शन करत रहा

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

विनायक प्रभू's picture

11 Apr 2009 - 11:40 am | विनायक प्रभू

९ महीने झाले मिपावर.
पण एवढ्या भारी आईडीया कधी पोटात नाही आल्या.
प्रसुतीबद्दल धन्यवाद रे परा

टारझन's picture

11 Apr 2009 - 11:48 am | टारझन

लेख के व ळ अ प्र ति म !!! झालाय

=)) =)) =)) =))

भाड्या .. एक राहिलं की ..
काही ऑलरेडी कंपुबाज असतील किंवा ज्यांच्याकडून गाढवापेक्षा जोरात लाथ बसण्याचा संभव आहे , त्यांना "मी नवा लेख टाकलाय .. वाचा आणि हो प्रतिक्रिया द्या ... " किंवा "काही बदल /सुचणा असतील तर सुचवा " वगैरे खरडी करून किमान खवटपणा कमी तरी करता येतो... हे ज्ञान त्या मित्रास पाजळायचं विसरलास का भावा ?

असो .. माला ही तो मित्र भेटलेला .. मिपा उघडलं तर त्याचा हा कौल समोर ..

आपल्याला म्हशीणे शिंग मारलं तर काय कराल ?
१. मीपण म्हशीला शिंगाणे मारणार
२. त्या दिवशी त्या म्हशीचं १०० लिटर दुध काढणार
३. त्याच म्हशीचं शिंग कापून तिच्या ......... (णको तिच्यायला .. इथंच शिंग पडतील आता ;) )
४. म्हशीला भय्या लोकांच्या समुहात एकटी सोडणार
५. गांधीवादाप्रमाणे .... अजुन एकदा मार बाई .. असं म्हणणार
६. म्हशीच्या तोंडून गिता वदवून घेणार
७. म्हशीला शेण खायला लावणार
८. आणि हो , अजुन काही :)

हल्ली कौलाराम्ज णसल्याणे कौलांचा दुष्काळ पडलाय म्हणे

अनिल हटेला's picture

11 Apr 2009 - 12:03 pm | अनिल हटेला

मायला लैच हुष्षार आहेस !! ;-)
'गाढवानी तुम्हाला रस्त्यात लाथ मारली तर तुम्ही काय कराल ?'
---> गाढवासमोर गीता वाचणार!! ;-)

आपल्याला म्हशीणे शिंग मारलं तर काय कराल ?

--->कुठलीच म्हैस अशी हिंमत करणार नाही ,आमस्नी बी शिंग हाय्ती म्हटलं. :-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आनंदयात्री's picture

11 Apr 2009 - 12:20 pm | आनंदयात्री

लेख उत्तम झाला आहे. लोकांच्या हिन आणी हिडीस प्रतिक्रियांकडे लक्ष नको देउस.
आम्च्या कंपुतले एक दुर्लक्षित बंधु पण असेच लिखाण करुन त्यांचे मार्केट अप करायचा प्रयत्न करायचे ते दिवस आठवले. असो.

क्रीया. 'आवरा' 'बंद करा असले फुटकळ कौल' 'अरे काय फालतुपणा आहे ?' 'तात्या काहितरी करा ह्यांचे' इ.इ. आरडाओरडी करणार्‍यांच्या ६/७ प्रतिक्रीया

=)) =)) =))
ह्या कंपनीची प्रचंड किव येते ... आयडेंटीटी क्रायसिस की काय तो .. असो बोलायला खुप आहे पण लगेच त्यांचे गुप्त सेवक येउन वार करतील आमच्यावर !!

दशानन's picture

11 Apr 2009 - 12:21 pm | दशानन

मला बी प्रवेश हवा !

टारझन's picture

11 Apr 2009 - 12:30 pm | टारझन

कोण आहे रे तिकडे ... राजेंची णाव णोंदणी करा "परकाया प्रवेश" साठी .... =))

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

कोण आहे रे तिकडे ... राजेंची णाव णोंदणी करा "परकाया प्रवेश" साठी ....

ते लगेच 'आसनस्थ' होतील ;)

परासुत्रा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

11 Apr 2009 - 12:41 pm | अवलिया

राजे ! भलतेच काही करु नका .... 'अडकाल '

--अवलिया

दशानन's picture

11 Apr 2009 - 12:43 pm | दशानन

=))

सेफ्टी साठी उपाय केले आहेत ;)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

सेफ्टी साठी उपाय केले आहेत

आता 'आसनस्थ' होण्याआधी 'सेफ्टी बेल्ट' बांधणार आहोत असे सांगु नका.

अवांतर :- अवांतर अवांतर खेळु नका रे =)) लेख काय प्रतिक्रीया काय.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दिपक's picture

11 Apr 2009 - 12:50 pm | दिपक

च्यायला मिपावर सगळेच दादा कोंडके :)

लेख भारीच!

टारझन's picture

11 Apr 2009 - 1:36 pm | टारझन

सगळेच ? काहीही काय बोलताय ? प्रतिक्रिया वाचून म्हणताय सगळेच दादा कोंडके .. उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे .. =)) =)) =))

असो .. आब्बे पर्‍या .. सेफ्टी मधे फक्त बेल्टंच असतो का बे ? आणि नेट वर सर्च मारला असता बिडीएसेम णावाचं काही तरी मिळालं भो .. त्यात हे पट्टे चाबूक वगैरे वापरतात म्हणे :)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2009 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे

हाती घ्याल ते तडीस न्याल! हा जालिंदर बाबांचा संदेश विसरला वाटत? सध्या जालिंदर बाबाची मिपावर कृपा आहेच. सिद्धतेच रुपांतर स्निग्धतेत करायला हा संदेश शीघ्रजतन करुन ठेवला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चिगो's picture

1 Apr 2011 - 4:38 pm | चिगो

मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे .. <<
व्वा.. मराठीत "नवशब्द-प्रसुती" ज्वोरात करतोय ब्वॉ टार्‍या...

पराशेठ, जबरा... टिव्शन आवडली तुमची..

प्रतिक्रिया येतायत न....कशा का असना...!

नंदन's picture

11 Apr 2009 - 12:27 pm | नंदन

'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 1:57 pm | नितिन थत्ते

जबरी लेख
प्रतिक्रिया मिळवण्याच्या आयडिया भन्नाटच.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठमोळा's picture

11 Apr 2009 - 2:58 pm | मराठमोळा

पराभौ,
कसं काय सुचतं असं. लै भारी...
=)) =))

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

धमाल मुलगा's picture

11 Apr 2009 - 6:09 pm | धमाल मुलगा

च्यायचं बेरकी आहे हे पर्‍या! अगदी एक नंबरचं!!!!
=)) =)) =))

दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात...
आरे मेल्या एखाद्या दिवशी सगळी विद्रोही जन्ता येऊन तुला कुटुन जाईल की बे!

असो! चालुद्या धुमाकुळ :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आंबोळी's picture

11 Apr 2009 - 11:43 pm | आंबोळी

दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात...
तुमच्याकडूनच प्रेरणा घेतली आहे त्यानी.... दिसली नडगी की फोड ....दिसली नडगी की फोड ....
बाकी पर्‍या... जबर्‍या लिवलयस....(बघ हं ... तुझ्या लेखाला प्रतिक्रीया दिली आहे... आता तु माझा एका प्रतिक्रीयेचा देणेकरी आहेस हे लक्षात ठेव...)

आंबोळी

धमाल मुलगा's picture

13 Apr 2009 - 4:44 pm | धमाल मुलगा

च्यायला, तुमच्याकडं तो डेंजर कंदील आहे म्हणुन आम्ही गप्प बसतो ह्याचा कृपया गैरअर्थ काढू नये.
लै दिवसात कुणाच्या नडग्या नाही फोडल्या....लै खाज सुटलीये हाताला...आधी कंदील फोडू आणि मग नडग्या ;)

अवांतरः आंबोळीसर, बर्‍याच दिवसांत तुमच्या शिद्दहस्त लेखनाची मेजवानी नाही मिळाली..कधी काढताय मुहुर्त?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

च्यायचं बेरकी आहे हे पर्‍या! अगदी एक नंबरचं!!!!

पटलं ना.....तरी मी अदुगरपासूनच सांगत हुतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2009 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिक्रिया मोजत बसू नका ! :)

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 8:42 pm | नितिन थत्ते

लिहित रहा असे नाही 'लिहिते व्हा' असे म्हणावे.
खराटा
(रंग माझा वेगळा)

सँडी's picture

11 Apr 2009 - 7:33 pm | सँडी

लै भारी!
पुढ्चा भाग येउ देत लवकर... =))

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

भडकमकर मास्तर's picture

11 Apr 2009 - 10:43 pm | भडकमकर मास्तर

लेख छान...
अशा जालीय ट्रिक्स पराभौ नवनवीन मित्रांना शिकवतात , यामुळेच मिपाकरांना सुंदर सुंदर नाविन्यपूर्ण कौल पहायला मिळतात हे समजले.
..
=))

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2009 - 6:18 am | बिपिन कार्यकर्ते

च्यामारी.... एक ओळींचे धागे, अतिकल्पक कौल इ.इ. चे उगमस्थान इथेच आहे हे माहित नव्हते.

संपादकहो, आधी या परावर कडक ऍक्शन घेण्यात यावी अशी माझी डिमांड आहे.

अवांतर: लेख छान. पण फार विचारपुर्ण वगैरे नसल्याने प्रतिक्रिया काय देऊ असा विचार पडला आहे.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

12 Apr 2009 - 9:51 am | प्राजु

म्हंटलं तर.. सणसणीत शाल जोडित मारलेला आहे.. म्हंटलं तर निखळ विनोडी आहे लेख.
आवडला. खरडवह्यांचाही अभ्यास खूप गाढा असल्याचे दिसले. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

12 Apr 2009 - 1:39 pm | चंद्रशेखर महामुनी

परा.....
फार फार हसलो रे.......
क्या बात है !!

शितल's picture

12 Apr 2009 - 6:42 pm | शितल

परा,
मिपावर जर आता कोणी कौल, एक- दोन ओळीचे धागे काढले तर पहिला तुझा शेकणार मग धागा काढणार्‍याला. ;)
तुझा लेख वर बोलण्या पेक्षा हसणे योग्य आहे..त्यामुळे..=)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2009 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

झेल्या's picture

13 Apr 2009 - 1:42 pm | झेल्या

प्रतिसादांची संख्या वाढवण्यात लेखकाच्या या अशा आभार प्रदर्शनाच्या आत्मप्रतिक्रियेचा देखील खारीचा वाटा असंतोच म्हणा...! ;)

प्रत्येक प्रतिसादाला आभाराचा प्रति-प्रतिसाद चिटकवून द्यावा...

अवांतरः लेख आवडला...! :)

-झेल्या

Suhas Narane's picture

13 Apr 2009 - 2:24 pm | Suhas Narane

च्गल ल्हेले अहे. अव्दले

सूहास's picture

13 Apr 2009 - 3:52 pm | सूहास (not verified)

सणसणीत शाल जोडित मारलेला आहे..

असेच म्हणतो..

सहमत..

सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

क्रान्ति's picture

13 Apr 2009 - 8:36 pm | क्रान्ति

परा, तू कमाल आहेस! भन्नाट लिहिलंस रे! =)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

सुहास..'s picture

29 Mar 2011 - 12:46 pm | सुहास..

=))
हा हा हा !!

पुर्नवाचनात ही मजा आली

अभिज्ञ's picture

30 Mar 2011 - 10:14 am | अभिज्ञ

आम्ही :- मिपाकरांच्या 'तुसड्या' प्रतिक्रीया आल्या रे आल्या की तु लगेच एक 'जाउदे नसेल आवडत तर नाही लिहिणार ह्यापुढे' किंवा 'आमच्या कडे कंपु नाही, आम्हाला असेच फाट्यावर मारणार' असली काहितरी खळबळजनक, हृदयाला हात घालणारी प्रतिक्रीया बोल्ड मध्ये टाकुन दे.

मित्र :- त्यानी काय होईल ?

आम्ही :- इकडे काहि खरच 'हळवे' मिपाकर पण आहेत राजा पायाला मुंगी चावली तर 'आपली निबर कातडी चावुन तिला त्रास तर झाला नसेल ना ?' असे संत एकनाथ रावांना लाजवणारे विचार आहेत ह्यांचे. ते लगेच धावत येतील बघ आणी तुला 'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' अशा प्रतिक्रीयांचा आधार देतील.

हॅ हॅ हॅ..

अगदी अगदी...
;)

अभिज्ञ.

हा हा हा

पर्या जियो..
लय भारी लिहिलयेस बे

प्रास's picture

30 Mar 2011 - 10:12 am | प्रास

पराभौ,

शॉल्लिड लिवलंयत बगा..... लई मज्जा आयली..... :-)

असे जुने सोने वर काढणार्‍याला शतशः धन्यवाद!

VINODBANKHELE's picture

30 Mar 2011 - 1:40 pm | VINODBANKHELE

परा

रपारपा पेटलास रे भौ...................

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2011 - 1:17 am | अप्पा जोगळेकर

भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे आणि अत्यंत खुमासदार पद्धतीने लिहिलंय.

अवांतर - लेखकाकडे रिकामटेकडा वेळ ओसंडून वाहात असतो हेही यानिमित्ताने समजले. :)

स्पंदना's picture

31 Mar 2011 - 8:32 am | स्पंदना

चुटचुटटीत लेख!!

अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु होतय हे महत्वाच!!

व्वा परा व्व्वा!

बक्षिस म्हणुन पुढच्या रंगपंचमीला रंग आमच्या कडुन , तु फक्त बादली भर पाणी आण!

अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु होतय हे महत्वाच!!

आहेच आमचा परा त्रिकालदर्षी. ;)
परा म्हणजे परिकथेतील राजकुमार, राजा नव्हे.

स्पंदना's picture

31 Mar 2011 - 2:59 pm | स्पंदना

माहिती आहे ओ गणाभाउ!!

म्हणुन तर पुढच्या वर्षाच रम्गात लिहिलय.

मी आणी राजात कश्याला इंटरेस्ट दाखवु? राजकुमारच बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा!

प्राजक्ता पवार's picture

31 Mar 2011 - 1:59 pm | प्राजक्ता पवार

एकदम झक्कास लेख .
मजा आली :)

विनायक बेलापुरे's picture

31 Mar 2011 - 3:57 pm | विनायक बेलापुरे

च्या बना......... हे असं आहे होय सगळे ?

क्या बात है!

=)) =))

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 12:19 pm | नरेशकुमार

अ‍ॅक्चुली, ह्यो लेख वाचुनच ल्हिवायला हात घातल्या गेल्याला आहे.
नंतर (स्वतःचे) थोबाड बडवुन आनि (स्वतःचे) डोके फोडुन घेन्यात आलेल्या आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Apr 2011 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll

पुढचा भाग लिहा लवकर. हा भागही छान जमला आहे.

असुर's picture

1 Apr 2011 - 4:39 pm | असुर

+१
जमतंय की! अजून पुढले भाग येऊ द्या, पण कृपया अंतर असू द्या! ;-)

--असुर

किचेन's picture

16 Nov 2011 - 2:47 pm | किचेन

धन्यवाद!मी इथे नवीन अल्यालायाच आपला हा अतिशय अभ्यासू,मार्गदर्शक लेख वाचावयास मिळाला.
जणू काही हा माझ्यासाठीच लिहून ठेवला आहे.
ह्या लेखासाठी मी तुम्चीआजन्म ऋणी राहील.
ऋण फेडायचं एक प्रयत्न म्हणून आपल्यासाठी थोड गोड धोड इथे पाठवलं आहे.