शिकवीत वृत्त
झाला तो निवृत्त
फिरूनी प्रवृत्त
विडंबना
आणली ती लाट
सोडूनिया काठ
सारे पाठोपाठ
धावतात
'धुकट सकाळ'
कधी ती 'फुकट'
अन ती 'चिकट'
होत राही
डांबिस लेखणी
लिहूनी 'कोकणी'
जाई विडंबनी
हात धुण्या
"म्हणजे' ते काय
कोणी ते सांगावे
कितिदा लिहावे
मोज नाही..
विसरा 'खोबार'
लेखणीची धार
होऊनी सुमार
बोथट का?
ती ग्रीक कहाणी
आस्तिक होऊनी
सांगे तत्वज्ञानी
आवलिया
होता धार धार
लेखनाचा वार
आता का सुमार
मिपाकर?
मिपाचे जे धन
सशक्त लेखन
वाचण्यास मन
आतुरले
खेळ हाच रोज
विडंबने तेज
मिपावर फेज
येत राही..
प्राजू म्हणे कोणी
द्याल का उत्तर
शिंपूनी अत्तर
साहित्याचे..
- प्राजु
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 9:48 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!!!!!!!!!!!!! सुंदर. कसलं छान गुंफलंय. सिनेमाच्या नावांची गाणी असतात ना ते आठवलं.
तुझ्या शब्दामागच्या अथाशी पण पूर्ण सहमत. पण कधी कधी होतं असं. आणि ते फालतूचे कौलारू धागे, हुच्च इनोद वगैरे पेक्षा हे थोडंतरी बरं आहे गं. (समर्थन नाही करत आहे.) मंडळी जरा हसली, ताण सैलावला.
बिपिन कार्यकर्ते
4 Feb 2009 - 9:40 pm | श्रावण मोडक
हेडमास्तर किंवा हेडमास्तरणीची गरज होतीच थोडी. तुम्हीच झालात हे भारी. आता बघूया एकेक (टगे :) ) विद्यार्थी यावर काय तोड काढतात ते.
4 Feb 2009 - 9:42 pm | शितल
मजा आली वाचुन..
:)
4 Feb 2009 - 9:45 pm | शाल्मली
<<मजा आली वाचुन..<<
+१
मस्त!!
--शाल्मली.
4 Feb 2009 - 9:44 pm | नंदन
उत्तम समयोचित/प्रासंगिक कविता :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Feb 2009 - 1:39 am | भास्कर केन्डे
प्राजू तै, कविता आवडली.
आपला,
(विडंबणांच्या अतिरेकाला विटलेला) भास्कर
4 Feb 2009 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेतला आशय आवडला ! :)
या कवितेवरही विडंबन येते की काय ?
-दिलीप बिरुटे
4 Feb 2009 - 9:52 pm | आपला अभिजित
एकदम चाबूक!! प्राजु, धमालच केल्येस!
जबरी शालजोडीतले दिलेस एकेकाला!
मस्त!! त्यातून कुणीतरी धडा घ्यावा.
याचेही विडंबन येऊ नये, म्हणजे मिळवली!!
खेळ हाच रोज
विडंबने तेज
मिपावर फेज
येत राही..
प्राजू म्हणे कोणी
द्याल का उत्तर
शिंपूनी अत्तर
साहित्याचे..
या ओळी बेष्ट!!
तुझ्या त्या व्रुत्त - मात्रांचा बडगा नको दाखवू, पण
"म्हणजे' ते काय
कोणी ते सांगावे
कितिदा लिहावे
मोज नाही..
दोनदा `ते' खटकतोय इथे. दुसरे काही योजता आले असते का??
4 Feb 2009 - 10:07 pm | संदीप चित्रे
म्हणजे हेच काय प्राजुताई ? :)
4 Feb 2009 - 10:09 pm | मीनल
मजा आली . मस्तच आहे.
अश्या प्रकारच्या लेखनासाठी चांगला अभ्यास लागतो.
मीनल.
4 Feb 2009 - 10:09 pm | llपुण्याचे पेशवेll
कविता बरी वाटली.
कविता थोडीशी सामाजिक जाणीव दाखवत असल्याने ठीक म्हटले आहे, तसेच कविता रोमँटिक असेल तर ती आत्मकेंद्री असते पण ही कविता तशी नसल्याने हा निकष इथे गैरलागू होतो म्हणून ठीक नाहीतर फुटकळ म्हटले असते. परंतु सामाजिक जाणीव ही मिपा पुरती मर्यादित वाटत असल्याने कविता आत्मकेंद्री होईल अशी मला भिती वाटते. त्यामुळे कवितेतील सामाजिक जाणीवेचा विस्तार करून ती सर्व समाजाला लागू करावी.('मिपा' हा शब्द फाइंड आणि रिप्लेस करून तिथे 'समाज' शब्द टाकावा)
त्याच प्रमाणे कविता साधी, सरळ, वृत्तबद्ध असल्याने सर्वसामान्याना पटकन कळते व ती साधारण कविता होते. तिला जर अभिजात करायचे असेल तर ती थोडी दुर्बोध करावी लागते. त्याची कविता लिहीताना काळजी घ्यावी.
कवयित्रीचा प्रयत्न छान आहे पण अजून प्रगल्भता अपेक्षित आहे.
( प्राजु, कविता छान आहे. यशस्वी समिक्षा कशी करावी याची शिकवणी सध्या मी प्रा. तिळवे, प्रा. राजापुरे यांच्याकडे लावली आहे. त्यामुळे वरील परिच्छेद समिक्षेच्या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कविता छान आहे मला आवडलीही पण समिक्षेच्या परीक्षेत एखाद्या कवितेवर टीका केल्याशिवाय पास करत नाहीत ना! तसेच कुठल्याही कवितेला एकदम छान म्हणून टाकायचे नाही असा समिक्षेचा नियम आहे म्हणून बरी आहे असे म्हटले आहे ,छान असूनही. )
(फुटकळ समिक्षक)
प्रा. पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
4 Feb 2009 - 11:07 pm | Dhananjay Borgaonkar
तुमच शिक्शन काय पेशवे..तुम्हि बोलता काय?
आनि प्रतिक्रिया काय देता.
आपल्याला कविते मधल कहिच कलत नाही हे अशी फालतु प्रतिक्रिया देउन का सगल्याना दाखवता??
जेवध कलत तेवधच बोलाव
4 Feb 2009 - 11:27 pm | llपुण्याचे पेशवेll
>>तुमच शिक्शन काय पेशवे
आम्चे शिक्शन L.L.M.P.(लटकत लटकत मॅट्रीक पास)
>>आनि प्रतिक्रिया काय देता.
प्र्तिक्रिया काय द्लिइ आहे ते वरति वाचा.
>>आपल्याला कविते मधल कहिच कलत नाही
आपल्याला कविते मधल कहिच कलत नाही. हरकत नाही समिक्षा करत जा. :)
>>अशी फालतु प्रतिक्रिया देउन का सगल्याना दाखवता?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना मिपावर.
>>जेवध कलत तेवधच बोलाव
एकूण प्रतिसादावरून समिक्शक म्हणून नाव काढाल असे वाटते. (अंमळ हलकेच घ्या हो)
प्रा.पुण्याचे पेशवे (L.L.M.P.)
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
5 Feb 2009 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेशवे, आपली ही प्रतिक्रिया पाहून एकच आठवलं, 'मज्यशि मयत रि करल क?' ;-) आपल्या दोन्ही प्रतिक्रिया मस्तच.
प्राजू, समयोचित कविता. :-)
विडंबनांना झोडल्यावर, एका ओळीचे, अर्थहीन, फुटकळ काथ्याकूट आणि कौल यांना काहीही बडगा दाखवला नाहीस याचं थोडं वाईटही वाटलं.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
4 Feb 2009 - 11:26 pm | पिवळा डांबिस
अगो तुमी सगळ्या साळकायांनी काय ठरवलांसां काय?
हे असले हाफ व्हॉली देवंन माकां माझी पैज मोडूक लावचां?:)
आधी ती शीतल झाली, आता तू!!!!!
तुमी सगळ्यांनी काय यशोधरेशी हातमिळवणी केल्यानीत की काय!!!!:)
"यशोच्या पैजेचा
कोण करी केवा
येथला हा मेवा
कोण सोडी?"
:)
असो.
विडंबनांच्या बॅटिंग ऑर्डरमधे आमचो नंबर ४ डाऊन आसां. आमच्या आधी भलेभले बॅट्समन आसंत. तेंव्हा आमी आमचो नंबर येवंची शान्तपणान वाट बघतोंव.
तुझो,
डांबिसकाका
निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा
5 Feb 2009 - 1:46 am | शितल
काका ,
तुका उमगुक नाय, यशोन माका एक मोठी कॅडबरी देता म्हणुन सांगितल्यान हो, तुझ्यावर वॉच ठेवुक.
पण जल्ली कॅडबरी मका तिन देऊक नाय बघ :)
5 Feb 2009 - 1:50 am | बिपिन कार्यकर्ते
शितल, यशोधरा चाकलिटा दुसर्याला देणार? वाट बघ. सगळी तीनेच खाल्ली असतील. ;)
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 1:59 am | यशोधरा
छान हां छान!
=))
4 Feb 2009 - 11:26 pm | अनामिक
मिपाचे जे धन
सशक्त लेखन
वाचण्यास मन
आतुरले
अगदी हेच म्हणतो.
(वाचक) अनामिक
4 Feb 2009 - 11:44 pm | यशोधरा
प्राजू, मस्तच गो! :)
5 Feb 2009 - 12:04 am | चतुरंग
सकस लेखन यायलाच हवे त्यात शंका नाहीच पण दर्जेदार विडंबने सुद्धा वाचनीय आणि करमणूक करणारी असतात ह्यात वाद नसावा.
कच्चा माल पुरवल्याबद्दल विशेष धन्यवाद! ;) (ह.घे.)
चतुरंग
5 Feb 2009 - 12:06 am | अवलिया
सहमत.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
5 Feb 2009 - 12:09 am | बिपिन कार्यकर्ते
सहमत...
पण बहुतेक प्राजूला असं म्हणायचं असेल की या विडंबन वगैरेच्या गर्दीत सकस लेखन गायबच होऊ नये.
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 12:10 am | प्राजु
आंबट लोणचं चवीपुरतंच हवं. अति झालं तर त्याचं अजिर्ण व्हायला वेळ लागत नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Feb 2009 - 12:16 am | बिपिन कार्यकर्ते
बडीशेप जेवण झाल्यावर एक - दोन चिमूट. जेवताना मात्र पहिला वरण भात, भाजी पोळी चटणी कोशिंबिर लोणचं पापड सांडगे कुर्डया आणि मग मागचा ताकभातच पाहिजे. काय?
अवांतरः हे असलं उदाहरण दिल्याबद्दल क्षमस्व. रोज मॅगी खावी लागली की जागेपणी पण असली स्वप्नं पडतात. :(
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 12:25 am | विसोबा खेचर
सकस लेखन यायलाच हवे त्यात शंका नाहीच पण दर्जेदार विडंबने सुद्धा वाचनीय आणि करमणूक करणारी असतात ह्यात वाद नसावा.
बाझवला..!
सकस लेखन?? ते काय असतं रे रंगा? :)
तात्या.
5 Feb 2009 - 12:30 am | चतुरंग
म्हणजे दोन ओळीचे कौलारु धागे, उगीचच ढोमणभर पाडलेल्या कविता, करायची म्हणून केलेली विडंबनं, काहीच्या बाही लिहायचं म्हणून उपस्थित केलेले वाद असलं सोडून बाकी सगळं असं असावं बहुदा..
चतुरंग
5 Feb 2009 - 12:39 am | विसोबा खेचर
असं होय! बरं बरं!
ठीक आहे, मग मिपावर सकस लेखन येत नाही असं आपण म्हणू! कोई बात नाही. चालेल तितके दिवस चालेल नायतर आपोआपच बंद पडेल तिच्यायला! साला, फिकिर कोण करतो? दमड्या पण खर्च करा, फिकिर पण करा! सांगितलंय कुणी?! :)
तात्या.
5 Feb 2009 - 12:11 am | विसोबा खेचर
प्राजू म्हणे कोणी
द्याल का उत्तर
शिंपूनी अत्तर
साहित्याचे..
हा हा हा! साहित्याचं वगैरे कुठलंही गुलाबपाणी शिंपण्याचा मिपाला हव्यास नाही. जे आहे, जसं आहे ते सर्वांसमोर आहे! :)
बाकी, काव्य नेहमीप्रमाणेच झकास...
तात्या.
5 Feb 2009 - 12:25 am | बेसनलाडू
मार्मिक टिप्पणी! पण मिपावरील एकंदर विडंबने 'सशक्त' नाहीत / 'सशक्त' साहित्याची उणीव आजकाल जाणवते आहे, असा काहीसा सूर आढळतो. मिपावरील विडंबकांनी / जालसाहित्यिकांनी यात लक्ष घालावे काय, असे वाटते ;)
(मार्मिक)बेसनलाडू
5 Feb 2009 - 12:42 am | प्राजु
विडंबने सशक्त नाहीत असे मी कुठेही म्हंटलेले नाही..
पण या विडंबनाच्या गर्दित बाकी चांगले लेखन मागे पडते आहे.
आणि जेव्हा एकाच कवितेवर ३-४ विडंबने येतात.. तेव्हा मूळ कविताही मागेच रहाते. हे कुठेतरी थांबावं असं वाटलं. काल मुखपृष्ठावर काव्य विभागात ३-४ कंसामध्ये केवळ विडंबनेच पाहिली.
अगदी नावेच घेऊन लिहायचे तर, आपण स्वत: बेला, अवलिया, अनिरूद्ध अभ्यंकर, चतुरंग.. तुमच्या सर्वांच्या लेखणीतून उत्तमोत्तम कविता वाचलेल्या आहेत.
तुम्हा सर्वांकडून चांगल्या लेखनाची अपेक्षा केली तर यात काही गैर नसावे असे वाटते. आणि त्यासाठीच हा प्रपंच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Feb 2009 - 12:35 am | विसोबा खेचर
मिपा उथळ आहे, मिपा असंच आहे, मिपा तसंच आहे असल्या कॉमेन्ट्सचा मध्येच एक काळ येतो अन् जातो. सध्या तो काळ आला आहे असं वाटतं! चालायचंच..! :)
आपला,
(बेफिकीर) तात्या.
5 Feb 2009 - 3:23 am | जयेश माधव
खुपच छान प्राजु,
होता धार धार
लेखनाचा वार
आता का सुमार
मिपाकर?
मिपाचे जे धन
सशक्त लेखन
वाचण्यास मन
आतुरले
वरील ओळीतुन मला वाट्ते मिपा वरच्या आत्ताच्या लेखनाविषयी तुझ्या मनात नक्कीच कहीतरी ख॑त आहे.सशक्त लेखन हे मिपाचे धन आहे आणि ते वाचण्यास तु आतुर झाली आहेस असच॑ तुला म्हणा॑यच॑ आहे ना!आणि तस॑ जर असेल तर सर्व मिपा लेखकानी याकडे लक्ष देणे खुप जरुरी आहे.
जयेश माधव
5 Feb 2009 - 5:12 am | घाटावरचे भट
गरीब बिचारे
विडंबक सारे
हास्याचे फवारे
उडविती
ऐसी हाफ व्हॉली
पडता समोर
जागे तेंडुलकर
तयांमधे
आम्हीही हाणिले
तयां एकवेळ
आता मात्र काळ
बदलला
कोणी पुढे कोणी
मधले खेळाडू
बारावे खेळाडू
आम्ही खास ;)
कवितांचा 'माल'
नावातले 'कंस'
यात 'मालकंस'
जाणियेला!!!
जातसे स्वर्गात
विडंबनवेलू
काय आणि बोलू
सत्य काही?
5 Feb 2009 - 7:24 am | छोटा डॉन
मस्त कविता प्राजुताई, मज्जा आली एकदम ...
योग्य तो संदेश पोहचला आणि म्हटलं तर "कच्चा माल" ही मिळाला, पण आता लिहावे का नाही ह्या संभ्रमात ...!
पुणेरी शालजोडीतले म्हणतात ते कदाचित हेच असावेत, झकास.
पण विडंबनाच्या भाऊगर्दीमुळे मुळे कविता मागे पडुन तिच्यावर अन्याय वगैरे होतो अथवा त्यामुळे सकस साहित्य प्रसवले जात नाही अथवा त्याला प्रतिसाद न आल्याने प्रोत्साहन मिळत नाही व ते मागे पडात जाते असे जर मत असेल तर आम्ही "असहमत" आहोत.
"सकस साहित्य" हे सकसच असते, त्याला कुणा "दुसर्याच्या पावतीची" अथवा "बाकीच्यांनी लेख न प्रकाशित करुन हे सकस साहित्य पहिल्या पानावर राहु देण्यास स्पेस उपलब्ध करुन देण्याची" अजिबात गरज नसते. आपल्या क्वालिटीने ते आपोआप वर येत राहते, इनफॅक्ट जर वाचणारे तेवढे आग्रही असतील तर हे "सकस साहित्य" आपोआप वर यायलाच हवे, मग त्याबरोबर ४ विडंबने येवोत अथवा ४० विडंबने येवोत. त्यामुळे "सकस साहित्याचा धागा मागे" पडण्याचा मुद्दा गॄहीत धरण्यास मी असहमत आहे.
बाकी "मुळ कवितेच्या" तुलनेत जास्ती प्रशंसा, कौतुक अगर प्रतिसाद ह्या बाबी गॄहीत धरल्या तर त्यात विडंबनाचा दोष नाही.
ह्या गोष्टी "क्वालिटीशी" निगडीत नसुन " लोकांच्या आवडीशी अथवा इंटरेस्टशी" निगडीत आहे असे मी मानतो.
उदा : सध्याचा धडाकेबाज फलंदाज धोनी व तंत्रशुद्ध द्रविड यांचे तुलना करा, इथे सर्व समजेल.
मुळ कवितेच्या तुलनेत जर विडंबन गाजले तर त्याच्या अर्थ ते मुळ कवितेपेक्षा भारी आहे असा कधीही होत नाही, मात्र ते जास्त "आवडले" असा नक्की होऊ शकतो. आता कुणाला काय आवडावे ह्यासाठी आपण सर्वसमावेशक नियम अथवा कायदा तर बनवु शकत नाही ना, ते आपण त्यांच्यावरच सोडु.
+१, रंगाशेठशी १०० % सहमत.
ह्या २ भिन्न बाबी आहेत, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
+१, हे ही पटले.
ह्यासाठीही आमच्या शुभेच्छा ...!
अवांतर : हे मी "विडंबनाच्या बाजुने" लिहलेले नाही पण सकस साहित्यावर काही काळासाठी येणार्या विवीध लाटांचा काहीही परिणाम होत नाही हे सध्याच्या विडंबनाच्या लाटेच्या निमीत्ताने पटावुन द्यायचा प्रयत्न ...
------
( अंमळ गोंधळलेला व पहिल्या विडंबनानंतरच "करियर" संपलेला ) छोटा डॉन
5 Feb 2009 - 8:27 am | प्राजु
गौण आहे.
माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी म्हंटलेले आहे पुन्हा एकदा सांगते, "जेवताना, आंबट लोणचे चवीसाठी हवेच.. पण तेच जास्ती खाणे झाले तर अजिर्ण नक्कीच होतं." विडंबन हवंच. नक्कीच हवं.. पण रोज मरे त्याला कोण रडे.. या प्रमाणे सारखीच विडंबने आली तर त्यातला रस नक्कीच कमी होतो.
माझीच कालची गोष्ट.. मिपा उघडल्या वर मी काव्यप्रकारात गेले तर..... वरून ओळीने ३-४ विडंबनेच पाहिली. आणि एकदम वाटलं की, सगळ्यांनी विडंबनेच लिहिण्याचे ठरवले असावे आणि त्या उद्वेगातून वरील काव्य जन्मले. मनाला जे वाटले ते लिहिले.
कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि कधीही नसेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Feb 2009 - 1:26 pm | जयवी
प्राजु...... क्या बात है रे !!
5 Feb 2009 - 2:04 pm | पुष्कर
"विसरा 'खोबार'
लेखणीची धार
होऊनी सुमार
बोथट क""
हे आवडले. विडंबनांचं काय! ती चालयचीच! सशक्त लिखाणाला कधीही मरण नाही. त्या विडंबनांमुळे मूळची कविता अजिबात मागे पडली नाही. उलट मी आधी विडंबन वाचल्यामुळे मागे जाऊन मूळ कविता शोधून काढली.
5 Feb 2009 - 2:18 pm | मनीषा
मिपाचे जे धन
सशक्त लेखन
वाचण्यास मन
आतुरले .......छानच