खरं तर मी कधीच चहा पीत नाही, बनवत तर त्याहून नाही. पण एकदा चुकून पहाटे उठलो. मस्त थंडी होती. गरम चहाचा मूड आला. अर्धवट झोपेत एक कप चहात ४-५ चमचे साखर पडली. पहिल्या घोटातच झोप उतरली. मग बराच वेळ तो कप तसाच ठेवला होता. पुढचा घोट घ्यायची हिंमत होत नव्हती . तेवढ्यात चहासाखरेचे डबे वर कपाटात ठेवताना कपाला धक्का लागून तो कलंडला, तो चिकट चहा ओट्यावरून ओघळला आणि मी संकटातून वाचलो. तर त्या स्मृती प्रीत्यर्थ:
***
किती साखर पडली चहात हे बघितले
आणि पोटात अगदी ढवळून आले
गुर्हाळातली काकवी तसा हा चहा
कसा करावा हा कप रिकामा रिकामा?
*
तेवढ्यात उलथला कप, जन्माला घालून
ओट्यावरून उतरलेला चहाचा घट्ट चिकट ओघळ
जणू अशक्य असं दालीचं गूढ घड्याळ
"असला चहा आपण पिणार होतो?"
नुसत्या कल्पनेनेच हादरलो मी
***
णम्र विनंति: मला मात्रांचा वगैरे छंद नाही, गंध तर त्याहून नाही. त्यामुळे माझ्या अतिशय आवडत्या अशा 'मुक्तछंदा'मधे ही रचना गुंफली आहे. आणि रचना अतिशय भिकार आहे हे मला माहित आहे त्यामुळे काय हाणायचे ते हाणून घ्या. आगाऊ धन्यवाद.
प्रेरणा: धनंजयमास्तरांची धुकट सकाळ
वाचने
5965
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी रे
तूच राहिला होतास
१+
In reply to तूच राहिला होतास by संदीप चित्रे
बिपिनदा...
भारी अनुभव!
बिपीनदा, कव
बिपिनभाऊ.......
ईईईईईईईईई
सही!
+१
चिकट
तुमच्या
In reply to चिकट by प्रकाश घाटपांडे
अपन को
In reply to तुमच्या by ब्रिटिश
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
दाउ टू
लय भारी
असेच म्हणतो
In reply to लय भारी by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमंत्रण?
In reply to असेच म्हणतो by आनंदयात्री
आता...
धन्यवाद
मास्तरची
In reply to धन्यवाद by बिपिन कार्यकर्ते
एकूणच
पेशव्या!!!!!!!!
In reply to एकूणच by llपुण्याचे पेशवेll
आता कसं
In reply to एकूणच by llपुण्याचे पेशवेll
खल्लास...
In reply to एकूणच by llपुण्याचे पेशवेll