चांद्रयान ३

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
9 Aug 2023 - 10:45 am

चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा
चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा
स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले
चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले

चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी....
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा
कसे म्हणू मी.....

आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन
एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी
कसे म्हणू मी.....
......
......
होईल वर्षाव लाटण्यांचा.

जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले
अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले
यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले....

ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन
पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून
झेपावतील का लाटा,करतील का कवने?
पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र यान तीन ने.

वैज्ञानिक व समस्त सहकार्यानां कडक सॅल्युट.

उकळीकविता माझीघे भरारीदेशभक्तिकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Aug 2023 - 7:40 pm | प्रचेतस

=)) हाहा, ह्यावरून शुक्र आठवला, व्हीनस, रोमन सौंदर्यादेवता, प्रत्यक्षात शुक्र मात्र त्याच्या अगदी उलट.

मदनबाण's picture

9 Aug 2023 - 9:01 pm | मदनबाण

मस्त !
चंद्रयान-३ चा इसरो कडुन रिलीज झालेला व्हिडियो नक्की पहा :- Chandrayaan-3 Mission: The Moon, as viewed by Chandrayaan-3 during Lunar Orbit Insertion
जाहिरात करण्याची आयती संधी मिळाली आहे ती साधुन घेतो. :)
कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन)
पुन्हा एकदा चंद्र दर्शन...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jain - Makeba (Official Video)

कर्नलतपस्वी's picture

10 Aug 2023 - 6:45 am | कर्नलतपस्वी

विवीध छटांची प्रकाश चित्रे घ्यायला मला पण खुप आवडतात.

एकदा तर झाडाच्या आडून घेतलेल्या पुर्ण चंद्रावर हरीण उभे आहे असे दिसत आहे. फांद्यां अशा काही कोनात चंद्र आणी मोबाईल मधे आल्या व ग्रहणा सारखी सावली हरीण वाटते.

प्रतिसादाबद्दल मनापासून आपले व प्रचेतस चे आभार.

कुमार१'s picture

10 Aug 2023 - 7:22 am | कुमार१

छान आहे.

रंगीला रतन's picture

21 Aug 2023 - 10:39 pm | रंगीला रतन

वा वा छान. बघू काय होते

रंगीला रतन's picture

21 Aug 2023 - 11:18 pm | रंगीला रतन

मस्त

श्री कर्नलतपस्वी, पोचले यान चंद्रावर. आता पुढची कविता येऊद्यात. एकदम कडक पाहीजे.

कर्नलतपस्वी's picture

24 Aug 2023 - 8:15 am | कर्नलतपस्वी

दिल बाग बाग हो गया
जब विक्रम चांद के पास गया....

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 11:38 am | मुक्त विहारि

मस्तच