✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चांद्रयान ३

क — कर्नलतपस्वी, Wed, 08/09/2023 - 10:45
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी.... क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा कसे म्हणू मी..... आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी कसे म्हणू मी..... ...... ...... होईल वर्षाव लाटण्यांचा. जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले.... ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून झेपावतील का लाटा,करतील का कवने? पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र यान तीन ने. वैज्ञानिक व समस्त सहकार्यानां कडक सॅल्युट.

प्रतिक्रिया द्या
6869 वाचन

💬 प्रतिसाद (10)

=)) हाहा, ह्यावरून शुक्र

प्रचेतस
Wed, 08/09/2023 - 19:40 नवीन
=)) हाहा, ह्यावरून शुक्र आठवला, व्हीनस, रोमन सौंदर्यादेवता, प्रत्यक्षात शुक्र मात्र त्याच्या अगदी उलट.
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Wed, 08/09/2023 - 21:01 नवीन
मस्त ! चंद्रयान-३ चा इसरो कडुन रिलीज झालेला व्हिडियो नक्की पहा :- Chandrayaan-3 Mission: The Moon, as viewed by Chandrayaan-3 during Lunar Orbit Insertion जाहिरात करण्याची आयती संधी मिळाली आहे ती साधुन घेतो. :) कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन) पुन्हा एकदा चंद्र दर्शन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jain - Makeba (Official Video)
  • Log in or register to post comments

चंद्राच्या....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/10/2023 - 06:45 नवीन
विवीध छटांची प्रकाश चित्रे घ्यायला मला पण खुप आवडतात. एकदा तर झाडाच्या आडून घेतलेल्या पुर्ण चंद्रावर हरीण उभे आहे असे दिसत आहे. फांद्यां अशा काही कोनात चंद्र आणी मोबाईल मधे आल्या व ग्रहणा सारखी सावली हरीण वाटते. प्रतिसादाबद्दल मनापासून आपले व प्रचेतस चे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 08/10/2023 - 07:22 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

वा वा छान. बघू काय होते

रंगीला रतन
Mon, 08/21/2023 - 22:39 नवीन
वा वा छान. बघू काय होते
  • Log in or register to post comments

मस्त

रंगीला रतन
Mon, 08/21/2023 - 23:18 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

आता पुढची कविता येऊद्यात. एकदम कडक पाहीजे.

Trump
Wed, 08/23/2023 - 19:16 नवीन
श्री कर्नलतपस्वी, पोचले यान चंद्रावर. आता पुढची कविता येऊद्यात. एकदम कडक पाहीजे.
  • Log in or register to post comments

@ट्रम्प भौ.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/24/2023 - 08:15 नवीन
दिल बाग बाग हो गया जब विक्रम चांद के पास गया....
  • Log in or register to post comments

चांद्रयान तीन स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/24/2023 - 09:09 नवीन
चांद्रयान तीन स्वप्न पूर्णजाहले
  • Log in or register to post comments

मस्तच

मुक्त विहारि
गुरुवार, 08/24/2023 - 11:38 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा