फिटनेस सोपी गोष्ट आहे

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
11 Jul 2023 - 5:58 pm

फिटनेस ५० आणि फिटनेस १००

कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम

सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं. त्यातला पहिला भाग म्हणजे व्यायामाच्या कोणत्याही प्रकाराची गोडी लागणं व त्याचा थोडा स्वाद घेणं. हे एकदा कळाल्यानंतर पुढचा टप्पा अजून सोपा होत जातो. हे अनेकांना कळलेलं असतं तरीही गॅप पडते आणि फिटनेस लांब जातो. अशा गोष्टींचा व कारणांचा विचार करून एक उपक्रम सुरू करत आहे.

फिटनेसचा व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा काही जण सोबत येऊन केला तर जास्त सोपं जातं आणि आनंदही जास्त मिळतो. फिटनेसची सुरूवात म्हणून अगदी कुटुंबामधले आबालवृद्ध एकत्र करू शकतील अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू करत आहे.

एकत्रित अर्धशतक- ५० किमी/ ५० मिनिटे

ह्यामध्ये कुटुंबातले सगळे जण एकत्र मिळून ५० किमी इतकं‌ अंतर पूर्ण करू शकतात. किंवा जे इन्डोअर व्यायाम करू इच्छितात ते त्यात ५० मिनिटांचा सहभाग घेऊ शकतात. जितके जण सहभागी असतील त्यानुसार ५० किमी हे टारगेट कसं पूर्ण करायचं हे ठरवता येईल. समजा ५ जण ह्यात सहभागी असतील तर प्रत्येकी १० किलोमीटर चालून हे अंतर पूर्ण होईल. एका दिवसात कठिण वाटत असेल तर दोन दिवस ५ किलोमीटर चालूनही हे अंतर पूर्ण होऊ शकेल. किंवा काही अंतर काही जण सायकलिंग करू शकतात आणि इतर जण वॉक करू शकतात. जे आउटडोअर व्यायाम करू इच्छित नाहीत ते ५० मिनिट कोणताही इन्डोअर व्यायाम करू शकतात. आणि जर कुटुंब मोठं असेल किंवा कुटुंबाचा फिटनेस चांगला असेल तर १०० किलोमीटर व १०० इनडोअर मिनिट असंही टारगेट ठेवता येऊ शकेल.

(माझे सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग असे अनुभव माझ्या ब्लॉगवर वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/07/fitness-50-and-fitness-100.html फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचं आयोजन. निरंजन वेलणकर 09422108376.)


.

.

एकत्र निसर्गात फिरण्याचा आनंद

ह्यामध्ये फिटनेसबरोबर एकत्र फिरताही येईल आणि निसर्गातील प्रसन्नताही अनुभवता येईल. अगदी ४ वर्षांच्या मुलापासून ८५ वर्षांच्या आजी- आजोबांपर्यंत सगळे जण ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांची त्यांची आवड व प्रकृती ह्यानुसार चालणं, धावणं, सायकल राईड, ट्रेक, स्विमिंग असे आउटडोअर व्यायाम किंवा योगाभ्यास, नृत्य, पाय-या चढ उतार, दोरीवरच्या उड्या, मल्लखांब, जिमचे व्यायाम, इतर वर्क आउट असे कोणतेही आवडते व्यायाम घरामध्ये करूनही ह्यात सहभागी होता येईल.

हा उपक्रम एक किंवा दोन दिवसांचा फिटनेसची सुरूवात म्हणून आहे. फिटनेसमध्ये सुधारणा हवी असेल तर किमान तीन महिने सातत्य म्हणजे महिन्यातून किमान २०- २२ दिवस तरी रोज ४५ मिनिट व्यायाम असं सातत्य हवं. पण अनेकांना एकदम अशी सुरूवात करता येत नाही. त्यासाठी सुरूवातीचा सोपा टप्पा म्हणून हे सहजपणे करता येऊ शकतं.

कधी, कसं, कुठे, कोणासोबत?

हे सगळं आपण व आपले कुटुंबिय- फ्रेंडस मिळून ठरवू शकता. आपण निवडाल तो व्यायाम आपण कुठेही करू शकता. काही जण दुस-या ठिकाणावरूनही त्या दिवशी व त्या वेळी व्यायाम करून सोबत राहू शकतात. इनडोअरचेही भरपूर पर्याय आहेत. अतिशय व्यस्त असूनही ५० मिनिट काढणं इतकंही काही कठीण नसतं. आपण ज्या ठिकाणी राहता, त्यानुसार आपल्याला कोणत्या ठिकाणी हा व्यायाम करता येईल, प्रकृती- जीवनशैली ह्यानुसार किती अंतराचा व कसा वॉक योग्य राहील, वॉर्म अप कसं करावं लागेल असे प्रश्न आपल्या मनात आले असतील. त्याबद्दल आपण माझ्याशी संपर्क करू शकता. आपल्या गटाचं स्वरूप, आपली आवड, प्रकृती, आपण राहता ते ठिकाण, आपल्याला सोयीची वेळ ह्यानुसार आपण कशा प्रकारे एकत्र मिळून हे अर्धशतक किंवा शतक करू शकता हे मी आपल्याला सुचवेन. त्या बाबतीत माझ्या अनुभवानुसार आपल्याला मदत करेन. नियोजनासाठी मदत करेन. आपल्या गटाच्या सोयीने कोणत्याही दिवशी आपण हे करू शकता आणि ही आपल्या फिटनेससाठी नवीन सुरूवात ठरू शकते.

फिटनेससाठी माझं हे मार्गदर्शन सशुल्क असेल. त्यासाठी आपल्याला वाजवी सहभाग शुल्क द्यावं लागेल. आणि त्याचाही उपयोग आहे. कोणतीही गोष्ट जर फुकट असेल तर आपला इंटरेस्ट कमी होतो. त्याउलट जिथे आपण पैसे देतो तिथे आपला इंटरेस्ट टिकून राहतो आणि ती गोष्ट आपण जास्त मनावर घेतो. त्याबरोबर फिटनेससाठी आपण पैसे खर्च केले आहेत, ही आपल्यासाठीसुद्धा फिटनेसमधली इनव्हेस्टमेंट राहते. ती पुढेही आपल्याला फिटनेसची आठवण करून देईल. आळस- कंटाळा- वेळेचं चुकीचं नियोजन अशा शत्रूंवर मात करण्यासाठी आपली ही इनव्हेस्टमेंट आपली मदत करेल.

ही पोस्ट आपल्या जवळच्यांसोबत नक्की शेअर करू शकता. आपला जसा गट होत असेल त्यानुसार आपल्याला योग्य पर्याय सुचवेन. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. सर्वांना happy fitness. धन्यवाद.

- निरंजन वेलणकर 09422108376.

आरोग्यक्रीडालेखअनुभव

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:10 am | रंगीला रतन

एक नंबर!

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:10 am | रंगीला रतन

एक नंबर!

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:10 am | रंगीला रतन

एक नंबर!

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:11 am | रंगीला रतन

एक नंबर!