सामाजिक उपक्रम -२०१९

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
18 Mar 2019 - 10:47 pm

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.

उपक्रमाविषयी थोडेसे:
माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. देणग्या मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये मागविण्यात येतात. देणग्या त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा करावयाच्या असतात व संस्थेने त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती व फोटो देणे त्यांना बंधनकारक असते. त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते. थोडक्यात सांगायचं तर हा उपक्रम गरजु संस्था व देणगीदार ह्यांच्यातले एक माध्यम आहे. आम्ही स्वयंसेवक कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत नाही.

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली 8. सावली सेवा ट्रस्ट, पुणे इत्यादि...

यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.

देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, ते कोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.
काही संस्था अभारतीय चलन पण स्वीकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांशी संपर्क साधावा.
जे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

स्वयंसेवकः अतरंगी, अरुंधती, निशदे

या वर्षीच्या संस्था:
या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
१. संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय.
संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड.
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- संतोष गर्जे, +919763031020
नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed.
वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
बालग्राममध्ये खालील साहित्याची गरज आहे.
1) 10 कॉट- 30,000 ₹
2) 50 गादी- 40,000₹
3) 20 फॅन- 30,000₹
4) 25 खुर्ची- 15,000₹
5) कलर प्रिंटर 1- 11,000₹
6) स्टील रॅक 4 नग 20,000₹
7) पाणी टाकी 1 (2k लि) 11,000₹
8) स्टील बेंच 4 नग 18,000₹
9) बुक सेल्फ 2 नग 12,000₹
10) किचन रॅक 2 (ट्रॉली) 12,000₹
एकूण 1लक्ष 99 हजार ते 2 लक्ष 4 रुपये खर्च येईल

२. संस्थेचे नाव:- शबरी सेवा समिती.
संस्थेचा पत्ता:- 'Anand', Dr Phadke hospital, Kotwal Nagar, Karjat (Dist Raigad)
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
वनवासी क्षेत्रातील बालकांचे कुपोष, बालमृत्यू थांबवणे, आनंददायी शिक्षण, महिला विकास
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- प्रमोद करंदीकर Tel: (02148)-222102
नोंदणी क्रमांक :- F / 26509 (Mumbai).
वेबसाईट:- http://www.shabarisevasamiti.org/english/index.html
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-

१) सुरेश पाडवी (दिव्यांग) हात नसलेला. दुकान बांधणे खर्च: अंदाजे -३५ हजार.
Gav- सुर ग स तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार.
२) कुप नलीका - २०० फूट खोल. मोटर , पाइप इत्यादी
गाई व गुरे, माणसे सर्वांना पाणी उपलब्ध होईल. पाण्यासाठी एक हौदा.
एकूण खर्च - 60000/-
शिवाय २ मोठे प्रकल्प हाती घेत आहोत.
१) उपसा जल सिंचन.
गाव मोहीदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे.
साधारण १४०० ते १५०० मीटर ४ इंची पाइप लाइन,. ३ फूट जमिनी खालून नेणें.
अंदाजे खर्च ४ लाख ५० हजार .शेतकरी सहभाग २ लाख. व श्रमदान.
या प्रकल्पातून ७१ ते ७५ एक र जमीन सिंचनखाली येत आहे.
पुढील २० ते २५ वर्षे शेतकरी विना खर्च पिके घेतील. वीज, मोटर, डिझेल पंप असा कोणताही खर्च नाही. नैसर्गिक उतारावरून पाणी आणणार आहोत.
२) सिमेंट बंधारा.
गाव धाबा देवी पाडा, तालुका शिरपूर जिल्हा धुळे.
डोंगरातून येणाऱ्या एका ओढ्यावर हा ६० फूट लांब व ४/५ फूट उंच बंधारा बांधला जाईल. बंधारा झाले वर गावाची पाण्याची समस्या कायम स्वरुपी संपेल. ३०/४० एक र शेती सिंचन होईल.
लोक सहभाग श्रमदानतून होईल. संस्थेला साधारण ३.५ ते ४ लाख खर्च येईल.

३. संस्थेचे नाव:- स्नेहवन
संस्थेचा पत्ता:- हनुमान मंदिर, चक्रपाणी वसाहत
भोसरी, पुणे ४११०३९
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- अशोक देशमाने, +91-8796400484
नोंदणी क्रमांक :- F/46512//P
वेबसाईट:- http://www.snehwan.in
www.facebook.com/snehwan
संस्थेचे प्रकल्प:
मुलांसाठी बंक बेड्स,
RO Water purifier,
संस्थेच्या कामासाठी दुचाकी,
स्वयंपाकाचे साहित्य

४. संस्थेचे नाव:- सावली
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
सावली संस्थेकडून देवदासी,वेश्याव्यवसायातील स्त्रिया, एच आय व्ही पॉझिटिव्ह पालक, एकटे व गरीब पालक, व्यसनाधीन पालक, गरीब शेतकरी व झोपडपट्टीत राहाणार्‍या गरीब पालकांच्या वंचित मुलांना आधार देण्यात येतो. आपल्या आर्थिक मदतीतून आम्ही खालील गोष्टी करू शकलो :
# आम्ही हुजूरपागा मुलींच्या शाळेत शिकणार्‍या ज्यु. के.जी. ते बारावीपर्यंतच्या ७३ गरजू मुलींची फी भरू शकलो.
# इयत्ता आठवी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सावलीतील ७८ गरजू मुलांच्या फी आम्ही भरत आहोत.
# आम्ही मुलांना गणवेश, दप्तरे, शैक्षणिक साहित्य, सँडल्स, स्वेटर्स इत्यादी पुरवू शकलो. तसेच नूतन समर्थ विद्यालय बुधवार पेठ शाळेतील ६० मुलांची सहल संस्कृती रिसॉर्ट येथे घेऊन जाऊ शकलो.
# आमच्या १३ मुलांना आदर्श स्कूल, आगरकर स्कूल, भावे स्कूल येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेश मिळाला आहे.
# सावलीतील ७ मुले इयत्ता १०वीच्या परीक्षेसाठी बसत आहेत आणि ४ मुले बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बसत आहेत.
# आम्ही ६ मुलांसाठी वसतिगृह व भोजनाची सोय केली आहे.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- मृणालिनी भाटवडेकर
Mob-9823270310
Land line- 020-24203282
नोंदणी क्रमांक :- Reg No. E-5079 (Pune)
संस्थेचे प्रकल्प:
प्रकल्प

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१८
सामाजिक उपक्रम २०१७
सामाजिक उपक्रम २०१६
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली 8. सावली सेवा ट्रस्ट, पुणे

मागील काही वर्षातल्या कामाचा आढावा खाली वाचता येईल
सामाजिक उपक्रम २०१८- आढावा
सामाजिक उपक्रम २०१७- आढावा
सामाजिक उपक्रम २०१६- आढावा
सामाजिक उपक्रम २०१५- आढावा
सामाजिक उपक्रम २०१४- आढावा

समाजविचारलेखमदत

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

19 Mar 2019 - 7:32 am | आनन्दा

स्तुत्य उपक्रम. कळवतो.

यशोधरा's picture

19 Mar 2019 - 9:17 am | यशोधरा

शुभेच्छा!!

धन्यवाद आनन्दा व यशोधरा.
इतर मिपाकरांनाही उपक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो.