दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ५ (अंतिम भाग)

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
18 Jan 2019 - 1:54 am

शेवटी ब-याच दिवसानंतर ही लेखमाला पुर्ण झालेली आहे. रसिक दाद देतील ही अपेक्षा

–-------
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. बाजूच्या झाडावर बसलेले पक्षी तेव्हढे किलबिलाटाने शांततेचा भंग करत होते. हा भाग माझ्या घराच्या शेजारचाच होता. मात्र घरी जाण्याचा आत्ता काहीच फायदा नव्हता कारण आता ते साखरझोपेत असणार होते. वेळ जावा म्हणून मी आजूबाजूला फिरत वेळ घालावला. फिरता फिरता आमच्या नेहमीचे सलूनचे दुकान लागले. तोही नुकताच आला होता. दुकान उघडून दुकानाच्या बाहेरची बाजू तो झाडून काढत होता. मी सहज आत गेलो आणि कॅलेंडर बघितले तर कॅलेंडरवर मागचा महिना दिसत होता. त्या सलूनवाल्याचा मोबाईलही तिथेच पडला होता. मी तो उघडून बघितला तर त्यावरची तारखी दिड महिना आधीची होती. म्हणजेच माझ्या खुनाच्या तारखेपासुन मी भूतकाळात दिड महिना आधी आलो होतो.

आणि एकदम मला बाबांचे आणि इन्पेक्टर सावंताचे संभाषण आठवले की दिड महिन्यापासुन मला डुअल पर्सनॅलिटीचा आजार आहे. या तारखेचा आणि त्या आजाराचा काही संबंध असेल का या विचारात मी पडलो.

एव्हाना बराच वेळ झाला होता. मी घराकडे जायचे ठरवले. मी आणि माझा भाऊ संदिप एकाच खोलीत रहात असू. मी त्या खोलीच्या खिडकीपाशी गेलो आणि आत डोकावून पाहिले. मी जवळ जाताच खोलितले माझे शरीर उठून बसले आणि अर्थहिन बडबड करु लागले. मी आश्चर्यचकीत होऊन हा प्रकार पहात होतो. एव्हाना संदिप जागा झाला होता. माझे अर्थहिन बोलणे काही त्याला काही समजले नाही. उगाच झोपेत बडबडू नको असे दटावून तो पुन्हा झोपला. मी आता भिंतीतून आत गेलो आणि माझ्या शरीराला गदागदा हलवले. बडबड अजूनच वाढली होती. मी आता काहिसा घाबरलो. आणि जरा लांब जावून बसलो. बडबड आता कमी झाली होती.

मग मला कळाले माझा आत्मा शरीराजवळ गेला की मेंदू उत्तेजित होत होता. नेमका कुणाकडून संदेश स्विकारावेत याबाबत शरीरातील मेंदूत गोंधळ होत होता. कदाचित यालाच घरचे ड्यूअल पर्सनॅलिटी डिसअॉर्डर म्हणत होते.

माझ्यासाठी माझ्या खुन्याचा शोध घेणे अधिक महत्वाचे होते. आणि त्यासाठी गरज लागेल तर घरात येणेही आवश्यक होते. मी त्या डिसअॉर्डरकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले.

हा सगळा गोंधळ बोधलेंच्या शोधामुळे झाला होता हे तर आता कळले होते आणि माझे बाबा आणि बोधलेंचा संबंध आलेला होता हेही मला माहिती होते. तेव्हा ते दोघे एकमेकांशी कधी संपर्क करतात हे मला पहायचे होते. आणि शेवटी ८ दिवसांनी बोधलेचा फोन बाबांना आला आणि त्याला ते भेटायला निघाले. मीही सोबत निघालो.

बाबा बोधलेंच्या घरी पोहचले. घरातल्या टेबलवर ब-याच फाईल पडलेल्या होता. एकूण बोंधलेचा अव्यवस्थितपणा दिसत होता. याच फाईली इन्पेक्टरने नंतर आमच्या घरी आणून बाबांच्या हवाली केल्या होत्या.

बोधले बोलू लागला ,' प्रोजेक्टला आता अंतिम रुप आला आहे सर. मी आणि माझ्या टिमने ब-यापैकी काम संपवले आहे. फाईकडे बघत बाबा रागाच्या स्वरात बोधलेला बोलले," या फाईली घरी कशा आणल्या तू ? तुला जागा दिली आहे ना काम करायला ? " सर या माझ्याच कामच्या फाईली आहेत. माझे स्वताचे नोटस आहेत. जसे सुचेल तसे लिहित जातो. मुख्य फाईली साईटवरच आहेत. तिथेही त्या लॉकरमद्दे आहेत आणि चावी केवळ माझ्याकडे आहे.

"फायनान्सच काय झाल? काही नवीन कंपन्या तयार झाल्या आहेत का ?" बाबा बोलले. फायनान्सचेही काम बोधलेकडे का असावे असा एक विचार माझ्या मनात डोकावला. पण जास्त विचार करायला वेळ नव्हता. " काही मोठ्या फार्मा कंपनी तयार आहेत यासाठी. माझ्या अोळखीवर बोलण्या झाल्या आहेत. अहो आमचे टायगर असोसिएशन कधी कामाला येणार ?" बोधले उत्तरला .

गाडीच्या कंपनीत फार्माची गूंतवणूक ? पैसे दिसले की विचार बंद पडतो असे म्हणतात ,बाबांनीहि जास्त खोलात न जाता हम्म असा एक उद्गार तेवढा काढला. नंतर ते त्यांच्या कामाचे बोलू लागले. मला आता तिथून अजून काही कळण्यासारखे नव्हते. मी परत निघालो. एकूणच आता बोधलेची कामे बघता त्याच्याकडेच लक्ष द्यावे असे ठरले. आत अजून काही दिवस गेले. पण फारसे हाती काही लागले नाही.

नंतर बाबांच्या बोलण्यातून एकादा कळाले की बोधलेच्या टिममधला कोण अॅंन्ड्यू लुईफर गायब झाला आहे. नंतर कळाले की हा गाडीच्या 'सेफ्टी इंचार्ज' म्हणून काम करत होता. बाबांनी बोधलेला घरी बोलवले. माझ्यासाठी ही एक संधी होती बोधलेच्या घरी जावून तपास करण्याची. घरी बरीच शोधाशोध केल्यावर एक चिठ्ठी कचरापेटीत मिळाली. त्यावर पुढचा मुजकुर होता," तपासणीत आपले शिल्ड सुरक्षित आढळले नाहीत. रॅडिएशनचे अंश आढळले आहेत. " एवढाच मजकूर होता.

ही चिठ्ठी त्या अॅंन्डूचीच असणार हे मी ताडले. आपले शिल्ड काम करत नाहीत हे कळाल्यावर बोधलेने त्याला गायब करण्याची पुरेपुर शक्यता होती. अॅंन्डू््यूचा त्याबाबतचा रिपोर्ट हाती लागणे आता आवश्यक बनले होते.

तेवढ्यात बोधले आत आला. मी जरा दचकलो आणि माझा धक्का लागून काही फाईली खाली पडल्या. बोधलेहि आपले सामान निरखुन बघू लागला. सामानाची हलवाहलवी झाली आहे हे त्याने अोळखले. त्याने पटकन मोहितला फोन लावला आणि घरी बोलावले. मोहित आला की बोधलेने त्याच्या कानशिलात लगावली. मोहित तर पुर्ण गोंधळून गेला होता

"तुझ्याकडच्या चावीने उघडले ना तु कुलुप ? तुला फक्त घर आवरायला चावी दिली होती. माझ्या सामानाला हात लावायला कोणी सांगितले? आधी ती चावी आण ! " मोहित अजूनही ततपप करत होता. थोड्यावेळाने त्याला धिर आला. " सर आज प्रवीणला तुम्ही तुमची गाडी द्यायला सांगितली होती. त्यालाच या घराची दुसरी चावीपण होती. ती त्याकडेच राहिली आहे. तुम्ही जाताना माझ्याकडची चावी घेऊन आलात." मोहित उत्तरला.

या वेळेपर्यंत माझी बोधले सरांशी अोळख झालेली होती. जो क्लासमद्दे कार्यक्रम झाला होता त्या कामासाठीच मी सरांची गाडी घेतली होती. पण बोधलेला आता माझ्यावर संशय आला होता.

बोधले डोक्याला हात लावुन बसला. तो बडबडला "देशमुखला माझा संशय आाला आहे. म्हणून पोराला पुढे करून माहिती काढतो काय ! मी ही कच्चा नाही हे कळेल आता. मोहित आजपासुन तू माझा माणूस
म्हणून त्या प्रवीण सोबत राहायचे. त्याला मी टायगर्स असोसिएशनचा अध्यक्ष बनवतो. कामाच्या नावाखाली तूला त्यासोबत राहता येईल. कोणाला खबर लागता कामा नये." मोहितने केवळ होकारार्थी मान वळवली. बोधलेने खिशात हात घातला आणि पैशाचे बंडल काढून मोहितकडे टाकले. मान खाली करून तो बोलला ," सर डॉक्टर म्हणत होते की आईला आता अॉपरेशनशिवाय उपाय नाही. थोडे जास्त मिळाले असते तर .." बोधले पुन्हा त्याच्या कानशिलात दिली आणि त्याला हाकलून लावले.
आज इतक्या दिवसानंतर मला मोहितच्या वागण्याचा अर्थ लागत होता .

आधीच माझी एक फेरी त्या साईटवर झाली होती जिथे हे गाडीचे काम चालू होते. मी रॅडीएशनचा रिपोर्ट मिळवण्यासाठी तिथे पोहोचलो. मी कोणाला दिसणे शक्य नसल्याने सरळ आत पोहोचलो.
काही शोधाशोध केली आणि एक तिजोरीसारख एक प्रकार तिथे दिसला. मी हात आत टाकला तर हाताला कागद जाणवले. मी हात जरी आत बाहेर काढू शकत असलो तरी कागद त्या तिजोरीतून बाहेर येणे अशक्य होते. निराश होवून मी घरी परतलो.

यात कोणाची तरी मदत घेणे आता गरजेचे बनले होते. सगळा प्रकार मी एका चिठ्ठीवर लिहिला. यात माझा खुनाचा प्रसंग गाळला होता. ती चिठ्ठी संदिपच्या बेडवर ठेवली. मी बाजुलाच उभा राहिलो. अपेक्षेप्रमाणे दुसरा 'मी' बडबड करु लागला.
संदिपने चिठ्ठी वाचली. आपल्या भावाचा आत्मा बाजुला आहे या विचाराने त्याला अक्षरक्षः घाम फूटला. त्याने घाबरत मला आवाज दिला. उत्तरादाखल मी टेबलावरचा पेपरवेट हलवला. संदिप घाबरत उठला, हळूहळू त्याचा विश्वास बसू लागला. मी त्याला साईटवर नेण्यासाठी अखेरीस राजी केले.

आम्ही बोधलेच्या घरातून एक विचित्र दिसणारी चावी मिळवली आणि नंतर साईटकडे निघालो. तिथले सुरक्षारक्षक पेंगत होते. वेळ साधून आम्ही आत घुसलो. संदिपने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि आतली एकूणएक कागदपत्रे काढली. आम्ही तिथून निसटून जाण्यातही यशस्वी ठरलो.मी ती चावी पुन्हा जागच्या जागी ठेवून घरी परतलो.

मी आजची तारीख बघितली. उद्याच्याच तारखेला माझा खुन झाला असल्याचे मला आठवले. वेळ फार कमी होता. आम्ही कागदपत्रे शोधू लागलो. आणि जे मला पाहिजे होते ते शेवटी मिळाले. अॅंन्ड्यूच्या रिपोर्ट नुसार रॅडिएशनी तिव्रता अतीशय कमी होती मात्र एवढे रॅडिएशन सतत ५-६ वर्ष शरीरावर पडले तर कॅन्सरची शक्यता होती.

बोधले एवढा धुर्त होता की मुळात त्याला याबद्दल माहिती होती. भारतीय सरकार एवढ्या खोल जावून संशोधन न करता गाडी पास करतील असा त्याचा कसाय होता. जवळपास ब-याच सरकारी परवानग्या मिळवल्याही होत्या.मात्र त्याचवेळी अॅन्डयूचा रिपोर्ट वापरून तो फार्मा कंपनिकडे गेला आणि आपले गाडीचे ग्राहक हे तुमचे पुढचे कॅन्सरकचे ग्राहक असतील हे त्यांना पटवून दिले आणि तिथुनही पैसे कमवले.

हा सगळा प्रकार मी संदिपला लिहून समजावला. दुस-या दिवशी मी त्याला १ वाजता बाबांना घेऊन प्रशमेशच्या घरी यायला सांगितले. पण खरा धक्का नंतर बसला. संदिपने सांगितले की बाबा परगावी गेले आहेत. आता पुढे त्यानेच एकट्याने काय करायचे हे मी त्याला सांगितले.

सगळे कागद त्याला बाबांच्या खोलित ठेवायला सांगितले. दुस-या दिवशी बोधलेलाच मारायचे मी ठरवले. नंतर बोधलेकडच्या घरातील फाईली कशाही करुन मिळवण्याबद्दल मी बजावले जेणेकरून पुरावा काहिच राहणार नाही. नंतर ज्या अधिका-यांनी फारसे कष्ट न घेता गाडीला परवानग्या दिल्या त्यांच्यावर दबाव टाकणे आणि बोधलेचा अपघात दाखवून केस बंद करून टाकणे. संदिपने सगळे समजावून घेतले आणि बाबांना फोन केला. पण ब-याचवेळा लावूनही तो काही लागला नाही.शेवटी कंटाळून संदिप झोपी गेला.

संदिप झोपल्यावर मी पुन्हा बोधलेच्या घरी आलो. बोधले डोक्याला हात लावून बसला होता. मधल्या वेळेत बोधले साईटवर जावून आला होता. कागदपत्रे चोरीला गेली आहेत हे त्याला समजले होते.मोहितच यामागे आहे अशी त्याची ठाम समजून झाली होती.
एवढ्यात त्याला प्रशमेशचा फोन आला ," सर उद्या सकाळी मी , मोहित आणि प्रवीण माझ्या घरी मिटींग करत आहोत. काही पुढचे अपडेट दिले तर बरे होईल." नंतर बोधलेचे डोळे चमकले आणि त्याने लागणारी माहिती प्रथमेशला दिली.

दुस-या दिवशी सकाळपासूनच मी प्रशमेशच्या घरापाशी जावुन थांबलो. तिथे अपेक्षेप्रमाणे बोधले घरावर नजर ठेवून होता. मी जर बाहेर थाबलो असतो तर माझा खुन नेमका बोधले केला की कुणी दुस-याने केला हे मला कळालेच नसते म्हणून मी घरात दुस-या खोलीत जावून बसलो. वेळ जवळ येत चालली होती. अखेर प्रथमेश आणि मोहित दोघे बाहेर गेले.

लगेच बोधले सुरा घेऊन आत आला.मीही त्याच खोलीत आलो. दुसरा "मी" आता अर्थहीन बडबड करत होता. खरेतर बोधले मी आणि प्रथमेश बाहेर गेलो असा समज करुन घेऊन मोहितला मारायला आला होता. पण मला पाहून तो दचकला. त्यातही माझे ते रुप तो पुर्ण गोंधळून गेला. मला मारण्यासाठी हातात घेतलेला सुरा हातातच राहिला. बोधले मला मारणार नाही हे समजून मी काहीच हालचाल केली नाही. दुसरा "मी" काहीच हालचाल न करता केवळ बडबड करत होता.

दारातून संदिप आता आला होता. बोधले मला मारत आहे असा त्याचा समज झाला असावा. हातातला रॉड त्याने बोधलेला मारला. पण बोधले सावध होता. मागून कोणी तरी आल्याची जाणीव त्याला झाली असावी. तो मला ढकलून बाजूला सरकला, आणि तो रॉड माझ्याच डोक्याला लागला.

हा प्रसंग एवढ्याकमी वेळात घडला की मला काहीच करता आले नाही. एक कळ माझ्याही डोक्यात जाणवली आणि मीही खाली पडलो. बोधले सुरा तिथेच टाकून पळाला आणि इथे संदिप रागाने वेडापिसा झाला होता. डोक्यात रक्त उतरले होते तो पळत बोधलेच्या मागे गेला.

माझी शुद्ध हरपत चालली होती. माझे शरीर तर केव्हाच बेशुद्द पडले होते...

समाप्त.
भाग १

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

18 Jan 2019 - 3:27 pm | आनन्दा

छान आहे..

पण उपसंहार नसल्यामुळे तो दिलेला धक्का पचण्यापूर्वीच कथा संपते, आणि अपेक्षित परिणाम साधला जात नाही..

आणि काही प्रश्न देखील अनुत्तरित आहेत (आता ते मुद्दाम आहेत असे म्हणू नका).

थोडक्यात, अजून एक भाग असता तर चालले असते.. विशेषतः सरांचा खून कोणी केला, त्या डीलचं काय झालं वगैरे, आणि पोलिसांनी का म्हणून ती फाईल क्लोज केली हे समजून घ्यायला.

बाकी मस्त.

शब्दानुज's picture

18 Jan 2019 - 5:02 pm | शब्दानुज

संपुर्ण कथा सांगणारा प्रथमपुरषी एकवचनी आहे. शेवटपर्यंत तेच ठेवणे मला भाग आहे.

तुम्ही बारकाईने शेवट बघितला तर त्यात प्रवीणचा आत्मा आणि शरीर दोन्ही बेशुद्द पडले आहेत आणि पहिल्या भागाची सुरवात आत्म्याला शुद्ध येण्यापासुनची आहे.

थोडक्यात प्रवीणचा खून ते प्रविणच्या आत्मा जाग्रुत होणे याच काळात तो आत्मा फिरत राहिला आहे. (टाईम लूपसारखे दाखवण्याचा प्रयत्न आहे.) आत्माच आत्मकथन करत असल्याने ही गोष्ट याच कालखंडापुरती आहे.

आपण विचारलेले प्रश्न विचारलेले त्या घटनांवर आधारित आहेत जो या पुढचा कालखंड आहे जिथे प्रवीणचा आत्मा पोहचू शकलेला नाही. त्यामुळे कथाही तिथपर्यंत पोहचत नाही.

आता पुढे काय झाले असावे याचा अंदाज येण्यासाठी आधी काही दुवे दिले आहेत. आता कथाविस्तार व्यवस्थित नसल्याने ते दुर्बीण घेऊन शोधावे लागतात.

हा परिच्छेत वाचा.

"..हा सगळा प्रकार मी संदिपला लिहून समजावला. दुस-या दिवशी मी त्याला १ वाजता बाबांना घेऊन प्रशमेशच्या घरी यायला सांगितले. पण खरा धक्का नंतर बसला. संदिपने सांगितले की बाबा परगावी गेले आहेत. आता पुढे त्यानेच एकट्याने काय करायचे हे मी त्याला सांगितले. सगळे कागद त्याला बाबांच्या खोलित ठेवायला सांगितले. दुस-या दिवशी बोधलेलाच मारायचे मी ठरवले. नंतर बोधलेकडच्या घरातील फाईली कशाही करुन मिळवण्याबद्दल मी बजावले जेणेकरून पुरावा काहिच राहणार नाही. नंतर ज्या अधिका-यांनी फारसे कष्ट न घेता गाडीला परवानग्या दिल्या त्यांच्यावर दबाव टाकणे आणि बोधलेचा अपघात दाखवून केस बंद करून टाकणे. संदिपने सगळे समजावून घेतले... "

मूळची योजना ही होती की बोधलेला मारणे आणि प्रवीणला सुरक्षित वाचवणे. नंतर प्रवीणच्या वडिलांच्या मदतीने अपघाताचा बनाव रचणे. मूळ संशोधकच मेल्याने आणि त्याचे कागद गायब झाल्याने पुढे प्रोजेक्ट आपोआपच बंद पडणार होता.

गाडीला वेगवेगळे परवाने सरकारी संस्थांकडून देण्यात आलेले होते. तेथील वरिष्ट अधिका-यांनी हलगर्जीपणा दाखवत परवानग्या दिल्या होत्या. पुढे या गोष्टी बाहेर आल्या असत्या तर त्या संस्थांवर आणि परिणामी सरकारवर आरोप लागले असते.

हे टाळण्यासाठी देशमूख आपले वजन वापरुन सरकारला याची माहिती देतील आणि सरकारही आपली बदनामी वाचवण्यासाठी ह्या फाईल बंद करण्यासाठी दबाव आणतील हा प्रवीणचा अंदाज होता.

नंतर पोलिसांकडून बोधलेच्या घरातील डाय-याही देशमुख स्वताःकडे घेतील आणि राहिलेला पुरावा नष्ट करतील.

आता प्रत्यक्षात देशमुख घरात नसल्याने हा सगळा कारभार करण्याची जबाबदारी या मुलांनी घेतली पण ऐनवेळी घात होवून प्रवीण जायचा तो गेलाच.

नंतर हा परिच्छेद वाचा
"...बोधले सुरा तिथेच टाकून पळाला आणि इथे संदिप रागाने वेडापिसा झाला होता. डोक्यात रक्त उतरले होते तो पळत बोधलेच्या मागे गेला..."

"...बोधले सुरा तिथेच टाकून पळाला आणि इथे संदिप रागाने वेडापिसा झाला होता. डोक्यात रक्त उतरले होते तो पळत बोधलेच्या मागे गेला..."

आपल्या भावाचा खून आपल्याच हातातून झाल्याने संदीप वेडापिसा झाला आणि बोधलेच्या मागे धावला. अर्थात त्यानेच बोधलेला रागाच्या भरात मारले.

आधी ठरल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी झाल्या. बाबांना संदीपने सगळाप्रकार सांगितला. इनस्पेक्टर घरी आलेले असताना देखमुखांनी डाय-या हस्तगत केल्या (याचा उल्लेख भाग ३ मद्दे आहे)

नंतर बाबांनी पेट्रोल लॉबीची थाप पोलिसासमोर मारली. जर ह्या केसचा तपास पोलिसांनी केला असता तर संदीप अडकण्याचीही शक्यता होती. आणि झालेला आत्म्याचा प्रकार कोर्टात टिकण्याचीही शक्यता नव्हती. म्हणून देशमुखांनी प्रवीण आणि बोधले यांच्या खुनांचे खापर पेट्रोल लॉबीसारख्या न सापडणा-या लोकांवर फोडले.

कारण जर खरेच जग प्रोजेक्ट लिक झाला होता तर प्रवीण समोर त्याचा उल्लेख व्हायला हवा होता. तसा उल्लेख न झाल्याने ती थापच होति (याचा उल्लेख मात्र माझ्याकडून राहिला आहे)

शेवटी सरकारी दबावापुढे झुकून पोलिसांनी पेट्रोल लॉबीला जबाबदार धरून केस बंद केली.

पुढे देशमुखांनी कागदेहि त्याच पेट्रोल लॉबीने पळवली असा आरोप केला. त्यांनी तसे बाकी पैसे लावणा-या कंपन्यांना सांगितले आणि प्रोजक्ट बंद झाला.

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2019 - 6:51 pm | टवाळ कार्टा

लय भारी....अज्जून लिहा

शब्दानुज's picture

19 Jan 2019 - 10:36 pm | शब्दानुज

मिपापुस्तकाला ही लेखमाला जोडावी हि सासं ना विनंती.

जेम्स वांड's picture

25 Jan 2019 - 12:33 pm | जेम्स वांड

अनुभव असल्यामुळे कॉमेंट्स केल्या नव्हत्या पूर्वीच्या भागांवर. पहिले प्रथम तुमचे खूप अभिनंदनं, एक वेगळ्या प्रकारची विज्ञान-गुन्हे-थरार कथा पेश केल्याबद्दल.

स्वतः अल्पस्वल्प ललित लिहिल्यामुळे काही सल्ले देतोय तितके गोड मानून घ्या.
१. लेखनाचे नीट संस्करण करा (पॅराफ्रेजिंग) करा. खासकरून गुन्हे संबंधित कथा वाचताना वाचकाला पूर्ण सेटप, पात्रे वगैरे कायम डोक्यात ठेऊन वाचावे लागते, संस्करणामुळेत्यातील श्रम कमी होऊन वाचनगती वाढते आणि वाचनात रस वाढतो

२. शुद्धलेखनावर भर द्यायला हवात

३. डोक्यात प्लॉट्स झपाट्याने येत असतात त्यांना प्रामाणिक राहून आपण लेखन करतोच. फक्त तो प्लॉट उस्फूर्तपणे आला की जशास तसा टाईप न करता थोडा वेळ देऊन कथाबीज अजून विकसित करता येईल, मला तुमची कथा प्रचंड आवडली पण एकूणएक भाग फारच त्रोटक वाटला. थोडं कथाबीज विकसित केले असते तर वाचन करायला अजून मजा आली असती. विकसित करणे म्हणजे काय? तर एक उदाहरण म्हणजे परिसराचे वर्णन, प्रवीणचा खून प्रथमेशच्या घरी झालाय, तो क्राईम सीन आहे, त्याला अजून विकसित करून मांडता आले असते. म्हणजे प्रथमेशचं घर गावाच्या कुठल्या भागात आहे? एकंदरीत रचना कशी आहे, आजूबाजूला गजबजाट आहे का एकलकोंडे घर आहे इत्यादींची डिटेल्स भरली तर कथानक वेगवान होते, वाचायला पण भारदस्त होते आणि नीट लांबीत फिट बसते.

आगाऊपणा वाटला तर क्षमस्व, पण प्रामाणिकपणे जे जाणवलं ते मांडतोय.

-वांडो.

शब्दानुज's picture

26 Jan 2019 - 4:29 pm | शब्दानुज

वांडसाहेब आपल्याच काय कोणाच्याही प्रतिक्रिया मी गोडच मानूनच घेतो. आपणच काय बहुतेक मिपाकर हे माझ्याहून वयाने आणि अनुभवाने मोठे असल्याने भेटलेले सल्ले नेहमीच स्विकारतो. यात मला काहीही आगाऊपणा वाटत नाही. उलट मिपावर लेखन सुरु करण्याचा उद्देशच वाचकांकडच्या प्रतिक्रियेप्रमाणे माझे लेखन सुधारणे हा होता. पण बहुतेक मिपाकरांच्या भलत्याच धाग्यावर असणा-या अनावश्यक प्रतिक्रिया पाहून हिरेमोड होते. वाचकांना स्वारस्य नसताना मग उगाच फापटपसारा का वाढवावा म्हणून गरजेपुरतेच लिहिले जाते.

आणि त्यातून मी मोबाईल मधून टायपिंग करत असल्याने ते अजूनच कंटाळवाणे होऊन जाते. कथाविस्तार नीट होत नाहीये हे कळत असूनही म्हणून मग केवळ आपली कथा एकदाची उरकणे हेच मनात राहते. असो.

तरीही आपल्या सुचनांवर मी नक्कीच अंमल करेन आणि पुढची लेखमालाही तुमच्या पसंतीस उतरेल ही अपेक्षा.