सावंतांनी एकदाचा निर्णय घेतला. बाबांना ते म्हणाले , " देशमुख साहेब यावेळी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ही सगळी कागदे इथे राहू देत. मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. काही वेगळी बातमी कळाली तर मला कळवत रहा.
पुढे काय करावे हे समजतच नव्हते. माझ्याच खोलित जावून बसलो आणि माझे संभाव्य खुनी कोण असतील ह्याचा विचार करू लागलो
पहिले होते ते प्रथमेश आणि मोहित. मी अध्यक्ष झाल्यापासून प्रथमेशच्या मनात काहिशी असूया होतीच. आता ती मला मारण्याइतपत होती का नाही हे कळण्यास मार्ग नाही.
आत्ता पोलिसांमोर आलेली एक बाजू म्हणजे पेट्रोलॉबी. मला बोधले सरांचा सहकारी समजले जाण्याची शक्यता होती. त्यातून पहिल्यांदा मला आणि पुढे बोधले सरांना मारण्यात आले असावे.
आणि एकदम एक विचार माझ्या मनात आला , माझे बाबा ! त्यांनी तर बोधलेंना शेवटचे बोलले होते. व्यवसाईक स्वार्थासाठी ते अस काही करू शकतील ?
माझ्याच विचारांची मला भिती वाटू लागली. एवढ्यात माझा लहान भाऊ - संदीप आत रुममद्दे आला. आल्याआल्या त्याने रुमचा दरवाजा लावला आणि हमसून हमसून रडू लागला. माझे दुर्देव हे की हे सगळे केवळ पाहत राहण्यापलीकडे मी काहीच करु शकत नव्हतो.
काहीवेळात त्याचा फोन वाजला. संदीपने डोळे पुसले आणि बोलू लागला ," बोल आदिती. .हो आत्ताच पोलिस निघून गेले. त्या बोधले सरांचाही मर्डर झाला आहे आता. केस सुटण्याऐवजी गुंतत चालली आहे. "
तिकडे आदिती काहीबाही बोलत राहिली. इकडे संदिपने दिर्घ श्वास घेतला आणि एक जिवघेणा प्रश्न विचारला ," आदिती , खर सांग. राहूलचा यात नक्कीच काही हात नाही ना ? "
राहूलचे नाव ऐकले आणि त्याच्यासोबतची झालेली मारमारी आठवली. ज्या दिवशी माझी असोसिएशनमद्धे निवड झाली होती त्याच रात्री हा राहूल आपल्या मित्रांना सोबत घेऊन काठ्या वगैरे घेऊन माझ्यावर धावून आला होता. माझ्या सुदैवाने बाजूलाच असलेले प्रथमेश आणि मोहित आवाज देताच धावून आले होते आणि तो प्रसंग बाचाबाचीनंतरच मिटला होता.
माझ आदितीवर असलेले प्रेम राहूलला अर्थातच मान्य नव्हत. ब-याचवेळा भेटून तो मला दम भरत होता आणि शेवटपर्यंत त्याला भिख घातली नव्हती.
तिथे आदिती संदीपला काय बोलली देव जाणे. एकीकडे भाऊ तर दुसरीकडे मी. ती बाजू तरी कोणाची घेणार ?
मी पुन्हा संदीप काय बोलतो आहे ते ऐकू लागलो , " शेवटच्या काही दिवसात त्याचा ड्यूअल पर्सनॅलिटीचा आजार खुपच वाढला होता. माझ्याशीपण ब-याचदता निरर्थक बडबड करायचा. आधी हे फक्त रात्री व्हायचं पण पुढे पुढे दिवसाही तो विचीत्र वागायचा. आम्हाला ते कधी संपतय याचिच चिंता असायची. ते सगळ आता विचित्र पद्धतीने संपल आहे.
ही ड्यूअल पर्सनॅलिटीचे नेमकी काय भानगड होती कोणास ठाऊक !
इकडे संदिपचे बोलणे झाले होते. त्याने सरण बेडवर अंग टाकले आणि पडल्यापडल्याच त्याला झोप लागली.
मी पुन्हा बाहेरच्या रुममद्दे आलो. तिथल्या टेबलवर सरांची ती फाईल आणि नोस्टस पडले होते. मी वेळ जाण्यासाठी ती फाईल उघडली आणि वाचू लागलो.
अर्ध्या एक पाने वाचून झाली असतील आणि मला लाल रंगांनी लिहिलेली पाने दिसू लागली. सरांची ही सवय मला माहिती झाली होती की महत्वाचे मुद्दे ते लाल रंगाच्या पेनाने लिहित असत.
आईस्टाईनचे ते जगप्रसिद्ध ई=एम*सी२ वर भाष्य करण्यात आले होते. वस्तुमान आणि ऊर्जा यांचे परस्परात रुपांतर करता येते असे तो म्हणत असे. प्रत्यक्षात मात्र ते आजपर्यंत कोणालाहि सिद्ध करता आले नव्हते. बोधलेंनी त्यात काही मुद्दे नव्याने सांगितले होते त्यांच्या मते वस्तुमानाला प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणे शक्य नव्हते. केवळ ऊर्जाच प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकते. जेव्हाजेव्हा ऊर्जा प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक गती प्राप्त करेल तेव्हाच ती भूतकाळात जाऊ शकेल. खाली कदाचित गमतीने बोधलेंनी लिहिले होते की ' माणूस जिवंतपणी तरी भुतकाळात जाणे शक्य नाही. '
ते वाक्य मी पुन्हापुन्हा वाचू लागलो. काय म्हणायचे असेल बोधलेंना नेमक ? जिवंतपणी जाऊ शकत नाही म्हणजे मेल्यावर भुतकाळात जाऊ शकेल का ? आणि एकदम माझ्या डोक्यातली टयूब पेटली. सद्धा मी मेलेलोच आहे म्हणजेच आत्म्याच्या रुपात आहे. आत्मा म्हणजेच ऊर्जाच झाली की. याचाच अर्थ मी ठरवले तर भूतकाळात जाऊ शकतो. माझा खून्याचा शोधही घेऊ शकतो आणि कदाचित त्याला रोखूही शकतो.
मी डायरी खाडकन बंद केली आणि घराबाहेर आलो. बाहेर वा-याला आता उधाण आल होत. मी रस्त्यावर आलो आाणि तुफान वेगाने पळण्यास सुरवात केली. कोणतीही वस्तू मला अडविण्यास अर्थात असमर्थ होती. काही वेगातच मी अतिवेग धारण केला मला आजुबाजूचे काहिस दिसनासे झाले , आजूबाजूला अंधार दाटून आला आणि अचानक आजूबाजूला प्रकाश दिसू लागला. रात्रीच्या वेळी हा प्रकाश कुठून आला हे पाहण्यासाठी मी थांबले. आता चक्क पहाट झालेली होती.
याचाच अर्थ मी भूतकाळात पोहचलो होतो.
क्रमशः
टिप - पुढील भाग अंतीम भाग असेल. वाचकांनी कळ सोसल्याबद्दल धन्यावाद. आपला अपेक्षित गुन्हेगार कोण हे जाणून घ्यायला आवडेल. अर्थात कोणी बरोबर उत्तर दिले ते अंतीम भागानंतरच कळेल.
प्रतिक्रिया
15 Aug 2018 - 8:39 pm | कविता१९७८
बोधले खुनी असण्याची शक्यता आहे.
15 Aug 2018 - 10:22 pm | सोमनाथ खांदवे
सगळ्या वाचकांची उत्कंठा शिगेला पोहचवली आपण , छान लिहलय . फक्त पुढचा भाग सावकाश येऊद्या हो , एव्हढे लागोपाठ पटापट भाग टाकल्या नंतर आम्ही वाचणार कसे ? पहिला वाचतोय तोपर्यंत तुमचा दुसरा भाग आलेला असतो .
19 Aug 2018 - 3:40 pm | टर्मीनेटर
प्रथमेश आणि मोहित दोघे खुनी असावेत. बोधले सरांची बॉडी सापडलेली जागाही प्रथमेशच्या घरापासून जवळ असल्याने तिचं शक्यता जास्त वाटत्ये. पात्रांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने आणि पार्श्वभूमीही फारशी सांगितली गेली नसल्याने जर ह्या ५-६ पात्रांपेक्षा खुनी कोणी वेगळा निघाला तर ते कथेचे वातावरण निर्मितीतले अपयशच ठरेल.