पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली.
वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.
योगा योगाने मागच्या महिन्या भराच्या अंतराने डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधील एका विवक्षीत उल्लेखाबद्दल एकच मेसेज मला दोन वेगवेगळ्या व्हॉट्स अॅप ग्रूप वरुन आला ज्यात नेहरुजींचे पान क्रमांक २११ वरील एक वाक्य क्वोट केले आहे. ज्याचा ढोबळ अर्थ "... दुसर्या बाजूला, दक्षिण भारततील काही प्रसिद्ध मंदिरातील खूप कलाकुसर आणि तपशिल मला डिस्टर्ब आणि अस्वस्थ करते. '
पण ह्याच वाक्य इंग्रजीतील मूळ उतार्यात पाहू
..I know nothing about art, eastern or western, and am not competent to say anything about it. I react to it as any untutored layman might do. Some painting or sculpture or building fills me with delight, or moves me and makes me feel a strange emotion; or it just pleases me a little; or it does not affect me at all and I pass it by almost unnoticed; or it repeis me. I cannot explain these reactions or speak learnedly about the merits or demerits of works of art. The Buddha statue at Anuradhapura in Ceylon moved me greatly and a picture of it has been my companion for many years. On the other hand some famous temples in South India, heavy with carving and detail, disturb me and fill me with unease.
मी पिडीएफ सर्चच्या माध्यमातून नेहरूजी दक्षिणेतील नेमक्या कोणत्या मंदिराचा उल्लेख करु ईच्छित असलाचा शोध घेण्याचा जरासा प्रयत्न केला पण काही विशीष्ट संदर्भ सापडू शकले नाही. कुणाला मिळाल्यास अवश्य द्यावा.
On the other hand some famous temples in South India, heavy with carving and detail, disturb me and fill me with unease.
या वाक्यातील कॉमा दरम्यानचे 'heavy with carving and detail' हे शब्द काढून टाकून वाचू
On the other hand some famous temples in South India,........., disturb me and fill me with unease.
आणि मग सहाजिकपणे पं जवाहर नेहरुंना दक्षिण भारत खुपतोय की मंदिरे कि दोन्ही असा स्वाभाविक प्रश्न कुणाला पडल्यास नवल नाही. खरे म्हणजे 'heavy with carving and detail' हे ह्यातील महत्वाचे शब्द आहेत. नेहरुंना भव्य कलाकृती आवडत, बारीक कलाकुसर आवडत नसे. भव्य कलाकृती त्यांना राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतिक वाटत तर बारीक कलाकुसर त्यांना स्थैर्य आणि संधीचा अभाव असलेल्या संस्कृतीचे प्रतिक वाटे असे माझ्या नेहरुंच्या लेखनाच्या बर्याच वर्षापूर्वीच्या वाचनावरुन आठवते, तो संदर्भ लगेच मिळाला नाही. मला मिळाल्यास मी देईन किंवा अजून कुणास ठाऊक असल्यास द्यावा.
या कारणास्त्वव unease असेल तर समजता येऊ शकते पण तरीही 'disturb me ' मधील डिस्टर्ब मी हा शब्द प्रयोग अधिक गंभीर वाटतो. ते कोणत्या मंदिराबद्दल उल्लेख करत आहेत कल्पना नाही. दक्षिणेतली एखाद दोन मंदिरे सोडली असता बाकी मी पाहिलेली नाहीत. पण नेहरुंना अपेक्षीत भव्यता बहुतेक प्रसिद्ध दक्षिणी मंदिरात असावी आणि त्यांना न आवडणारी बारीक कला कुसर दक्षिणी मंदिरात खुप असेल असे मला व्यक्तीशः कधी वाटले नाही. 'डिस्टर्ब मी' हा अधिक गंभीर शब्द प्रयोग करताना नेहरुजींनी अधिक कारण मिमांसा द्यावयास हवी होती असे वाटते.
पान २६३ वर नेहरु म्हणतात
Akbar had built so well that the edifice he had erected lasted for another 100 years in spite of inadequate successors. After almost every Mughal reign there were wars between the princes for the throne, thus weakening the central power. But the court continued to be brilliant and the fame of the Grand Mughal spread all over Asia and Europe. Beautiful buildings combining the old Indian ideals in architecture with a new simplicity and a nobility of line grew up in Agra and Delhi. This Indo-Mughal art was in marked contrast with the decadent, over-elaborate and heavily ornamented temples and other buildings of the north and south. Inspired architects and builders put up with loving hands the Taj Mahal at Agra.
म्हणजे मला कले मधले काही समजत नाही म्हणतानाच मुघलपूर्व over-elaborate and heavily ornamented temples and other buildings बद्दल नेहरुजी टिका करताना दिसतात.
पान २१०-२११ वर वापस येऊ , वर पहिल्या दिलेल्या परिच्छेदाच्या आधिचा परिच्छेद आहे हा.
...Indian art is so intimatly associated with Indian religion and philosophy that it is difficult to appreciate it fully unless one has some knowledge of the ideals that governed the Indian mind. In art, as in music, there is a gulf which separates eastern from western conceptions. Probably the great artists and builders of the middle ages in Europe would have felt more in tune with Indian art and sculpture than modern European artists who derive part of their inspiration at least from the Renaissance period and after. For in Indian art there is always a religious urge, a looking beyond, such as probably inspired the builders of the great cathedrals of Europe. Beauty is conceived as subjective, not objective; it is a thing of the spirit, though it may also take lovely shape in form or matter. The Greeks loved beauty for its own sake and found not only joy but truth in it; the ancient Indians loved beauty also but always they sought to put some deeper significance in their work, some vision of the inner truth as they saw it. In the supreme examples of their creative work they extort admiration, even though one may not understand what they were aiming at or the ideas that governed them. In lesser example::, this lack of understanding, of not being in tune with the artist's mind, becomes a bar to appreciation. There is a vague feeling of discomfort, even of irritation, at something one cannot grasp, and this leads to the conclusion that the artist did not know his job and has failed. Sometimes there is even a feeling of repulsion. ...
something one cannot grasp वरुन आपल्या अपूर्णत्वाची जाणीव होऊन, lack of understanding मुळे येणारी vague feeling of discomfort एक वेळ समजता येते ; यात irritation वाटावे एवढे काय आहे हे कळतच नाही. कोणतीही सविस्तर कारण मिमांसा न देता Sometimes there is even a feeling of repulsion हे जरा अती वाटते खरे.
तर एकुण भव्य कलाकृती आवडत, बारीक कलाकुसर आवडत नसणे वर म्हटल्या प्रमाणे मलाही बर्याचदा वाटते पण feeling of disturbance अथवा repulsion हि गंभीर शब्द योजना सविस्तर कारण मिमांसा उपलब्ध न करता नेहरुजींसारख्या जबाबदार नेत्याने केली असणे संभ्रमात टाकते प्रशस्त वाटत नाही.
वैध कारण उपलब्ध नसेल तर हि शब्द योजना अकारण फोबीआच्या जवळ जाणारी असहिष्णूतेच्या आधीची पायरी ठरते का, हा प्रश्न निर्माण होतो. या उल्लेखांबद्दल नेहरुंच्या समकालीनांनी त्यांना प्रश्न विचारले का आणि नेहरुंनी काही उत्तर दिले असल्यास मला कल्पना नाही. नेहरुं बद्दलचा माझा एवढा ही सविस्तर अभ्यास नाही.
नेहरुंनी विशीष्ट कारण मिमांसा समकालिनांपुढे स्पष्ट केलेलि नसल्यास , भारतीय परंपरावाद्यांना नेहरुंचे feeling of disturbance अथवा repulsion हे उल्लेख नेहरुंच्या भूमिका खटकत असल्यास, नाराजी वाटत असल्यास नवल नसावे. लेट अस होप की नेहरुंनी विशीष्ट कारण मिमांसा समकालिनांपुढे स्पष्ट केलेली असल्यास ती नेहरुप्रेमींकडून पुढे येईल. मला नेहरूंना अशी संधी का द्याविशी वाटते ? कारण त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडीया , भारताच्या सांस्कृतिक विवीधतेत आढळणारे एकतेचे तत्व हिरहिरीने मांडते.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यास
प्रतिक्रिया
14 Jun 2018 - 7:03 pm | सप्तरंगी
In the supreme examples of their creative work they extort admiration, even though one may not understand what they were aiming at or the ideas that governed them. In lesser example::, this lack of understanding, of not being in tune with the artist's mind, becomes a bar to appreciation. There is a vague feeling of discomfort, even of irritation, at something one cannot grasp, and this leads to the conclusion that the artist did not know his job and has failed. Sometimes there is even a feeling of repulsion. ...
I can not explain but still feel this feeling:))..तुमचा मागचा लेखपण उत्तम त्या लेखातील पण भाषा (मला) समजण्यासाठी अवघड आहे, परत शांतपणे वाचावा लागणार.
14 Jun 2018 - 7:24 pm | माहितगार
मला अमुक तमुक व्यक्ती / समुहाची दिसणे, वैशिष्ट्ये , वेषभूषा , वर्तन desturbing आणि repulsive वाटते असे नेहरू म्हणाले असते त्याचे समर्थन त्यांनी .I can not explain but still feel this feeling असे केले असते तर त्यांच्या उर्वरीत राजकिय भूमिकेला साजले असते का ?
सर्वसामान्य व्यक्तीची अशी भूमिका समजता येऊ शकते. किंवा टोकाच्या (वांशिक/धार्मिक/भाषिक/राजकीय) भूमिका घेणारेही असे म्हणताना आढळू शकतात. (राजकीय दृष्ट्या) सेंटर ऑफ स्पेक्ट्रम तटस्थ भूमिकेची मांडणी करणार्या व्यक्तीने भूमिकेची कारण मिमांसा व्यवस्थित मांडावयस हवी असे माझे मत. असो मनमोकळी चर्चा आणि प्रतिसादासाठी आभार.
18 Jun 2018 - 8:30 pm | सप्तरंगी
(राजकीय दृष्ट्या) सेंटर ऑफ स्पेक्ट्रम तटस्थ भूमिकेची मांडणी करणार्या व्यक्तीने भूमिकेची कारण मिमांसा व्यवस्थित मांडावयस हवी असे माझे मत
पूर्णपणे मान्य. तुमचा लेख वाचून परवा पान २११ वाचले. त्यांनी कोणतेही कारण किंवा त्याचा अर्थ लावता येईल असे काहीच लिहिले नाहीये. थँक्स तुमच्यामुळे वाचण्याची इच्छा झाली त्यासाठी.
14 Jun 2018 - 7:37 pm | माहितगार
ज्यांनी कोणी प्राचीन भारतीय (मंदिरातील) कलाकृती बनवल्या ते नेहरुंच्या काही शतके आधी 'वर' पोहोचले. नेहरूंचे किंवा इतर कुणाचे admiration extort करण्यासाठी वापस कसे येऊ शकतील ? आणि कलाकृतीचे स्वतःचे म्हणावे तर कलाकृती स्वतः अबोल असते ती तर admiration extortition करू शकत नाही, इथे नेहरु admiration करत पण नाहीत मनमोकळी टिका करताहेत मग admiration extortit केले जाते हे कोणत्या आधारावर म्हणताहेत ते स्पष्ट करावयास नको का ?
14 Jun 2018 - 7:39 pm | माहितगार
* ते 'त्यांनी' (नेहरूंनी) स्पष्ट करावयास नको का ?
14 Jun 2018 - 8:47 pm | शेखरमोघे
"कला" हे क्षेत्रच असे आहे की ज्यात प्रत्येकाची आवडच नव्हे तर "समजण्याची कुवत" ही सम्पूर्णपणे वेगळी असू शकेल. तसेच "Indian art" नक्की कशाला म्हणावे (की ज्यात नेहरूना "always a religious urge" दिसते): अगदी विजापूरचा गोल घुमट किन्वा आग्र्याचा ताज महाल ही जर "कला" मानली (आणि ती कला आहे असे मला वाटते, तसेच "Indian art" नक्की वाटते) तर त्यात कुठे आणि कशी "religious urge" आली? पिकासो किन्वा डाली (नाव बहुतेक बरोबर लिहिले) यान्च्या बाबतीत "lack of understanding, of not being in tune with the artist's mind, becomes a bar to appreciation" मला वाटते पण म्हणून त्यान्चे (जगाला वाटणारे) मोठेपण कमी होत नाही.
It is all very subjective.
14 Jun 2018 - 9:52 pm | माहितगार
सहमत आहे. मी धागा लेखातच म्हटलय subjective आहे discomfort किंवा अस्वस्थ वाटणे समजता येते. एखाद्याला भारतीय शास्त्रीय संगीत discomfort किंवा अस्वस्थ करणारे वाटेल एखाद्याला वेस्टर्न क्लासीकल discomfort किंवा अस्वस्थ करणारे वाटेल . अगदी ठिक , परफेक्टली ओके . पण feeling of disturbance अथवा repulsion म्हणजे दुसर्याच्या आवडीचे अस्तीत्व नाकारण्याच्या आधीची हि कट्टरतावादी भूमीकेच्या जवळ जाणारी केवळ एक पायरी अलिक डे असलेली स्टेज आहे.
डिस्कव्हरी ऑफ ईंडियातच हिटलरचा नाझी कट्टरवाद नेहरु आग्रहाने नाकारतात. हिटलर ला ज्यू discomfort किंवा अस्वस्थ करणारे वाटले तर ओके. discomfort तर discomfort पण त्यांच्या सोबत जर्मनीत रहावे लागेल. पण तेच एक जर्मन ज्यूंमुळे feeling of disturbance अथवा repulsion म्हणतो तेव्हा तो नाझीवादाकडे बौद्धीक प्रवास सुरु करतो का ? कारण feeling of disturbance अथवा repulsion नंतरची स्टेज सहसा अगदिच नकोशी वाटणारी गोष्टीचे अस्तित्व नाहिसे करण्याचा असतो. नेहरु इथे तसे म्हणताना दिसत नाहीत पण त्यांचे शब्द प्रयोग केवळ एक पायरी आधीचे नाहीत किंवा कसे. या मुळे नेहरुम्च्या स्वतःच्या नाझी विरोधी भूमिका घेण्याचा नैतिक अधिकार अल्पसा का होईना लोप पावताना किंवा विरोधाभासी दिसतो असे वाटते आहे . असो.
15 Jun 2018 - 5:52 am | आनन्दा
नेहरूंना नग्न चित्रण किंवा संभोगस्थितीतील शिल्पांबद्दल तर आक्षेप नसेल ना?
15 Jun 2018 - 9:27 am | माहितगार
एक तर दक्षिणेतील मंदिरात ओरीसातील मंदिरा एवढा हा विषय प्रॉमिनंट नसावा (चुभूदेघे). दुसरे तसे असते तर त्यांनी पाश्चात्य
चित्रकलेवरही या मुद्द्या वरुन टिका केली असती तसे दिसत नाही त्या शिवाय डिस्कव्हरी ऑफ इंडीयात खालील परिच्छेद येतात