एक्सेल एक्सेल - भाग २० - कंडिशनल फॉर्मॅटिंग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
24 Feb 2017 - 11:44 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७ - भाग १८ - भाग १९ - भाग २०

माणसाचं, संगणकावरचं काम सोपं करण्यासाठीच एक्सेलचा शोध लागला आणि यात दिलेलं प्रत्येक फीचर हे याच विचाराने बनवलेलं आहे. असंच एक अतिशय उपयुक्त आणि बहुआयामी फीचर म्हणजे कंडिशनल फॉर्मॅटिंग.

एक्सेलच्या होम टॅबवरच स्टाईल्स या फीचर्सच्या उपसंचात कंडिशनल फॉरमॅटिंग चा पर्याय दिसतो. थोडक्यात सांगायचं झालं तर कंडिशनल याचा अर्थ काहीतरी कंडीशन यात आपण एक्सेलला देऊ शकतो. ती मॅथेमॅटिकल असेल किंवा लॉजिकल असेल. ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यास एक्सेलने करायचं फॉर्मॅटिंग आपण निश्चित करू शकतो. फॉर्मॅटिंगमधे सेल कलर, बॉर्डर, फाँट कलर याशिवाय इतर अनेक रेडीमेड पर्याय दिलेले आहेत जसं की इन सेल ग्राफ्स, आयकॉन सेट्स इत्यादी. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सरस असं प्रेझेंटेशन.

b

या कंडिशनल फॉर्मॅटिंगचं एक उदाहरण खालील चित्रात बघू. यात आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या पर्यायांपैकी हायलाइट सेल्स रूल्स हा पर्याय निवडू व त्यामधे लेस दॅन ही कंडिशन निवडू. आपल्याकडे असलेला डेटा काही व्यक्तींच्या नावांचा व त्यांच्या वयाचा असून त्यातील १८ वर्षाखालील व्यक्तींच्या ओळी आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरून हायलाईट करू. कंडिशनल फॉर्मॅटिंग चा पर्याय वापरताना सर्वप्रथम डेटा रेंज, ज्या रेंजवर आपल्याला ही कंडिशन लावायची आहे, ती सिलेक्ट केलेली असणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्या माउसचा कर्सर ज्या सेलमधे असेल त्या सेलवर हा नियम लावला जाईल. आता आपण आपला डेटा सिलेक्ट करून इफ सेल व्हॅल्यू इज लेस दॅन १८ देन फॉर्मॅट देम रेड विथ रेड फाँट अशा प्रकारची कंडिशन आपण निर्धारित केल्यास रिझल्ट खालील चित्राप्रमाणे दिसेल.

a

याच कंडिशनल फॉर्मॅटिंगचे आणखी अनेक पर्याय आहेत. हे अतिशय कल्पकपणे वापरता येणारं फीचर असून मोठ्या डेटामधून नेमकी हवी ती माहिती काढण्यासाठी अतिशय कामी येतं. यातील डेटा बार चा पर्याय वापरून मिळणारा परिणाम खालील चित्रात दिलेला आहे. असेच यातील निरनिराळे पर्याय आपण वापरून बघू शकता. पुढील भागात लुकअप फंक्शन्स ची माहिती घेऊ.

c

प्रतिक्रिया

हे सर्व वाचतो आहे.विंडोज मोबाइलमध्ये येणाय्रा प्रिलोडेड इक्सेलमध्ये काटछाट केलेली असते का?

स्रुजा's picture

25 Feb 2017 - 3:53 am | स्रुजा

वाचतीये.. आवडीचा विषय !

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2017 - 10:34 am | पिलीयन रायडर

वाचतेय रे! उत्तम काम करतोयस!

तुला अजिबात वेळ मिळत नसणारे इतक्या कामातून पण उगाच एक सांगितल्याशिवाय रहावत नाही. तुझा आवाज चांगला आहे. तू हेच सगळं जर व्हिडीओमधुन समजावुन सांगितलंस तर एक फार चांगलं ट्युटोरियल तयार होईल. ते जास्त वेळखाऊन काम आहे हे माहितीये. पण एखादा भाग तसाही करुन पहा जमल्यास. :)

साधा मुलगा's picture

26 Feb 2017 - 12:15 pm | साधा मुलगा

+1

सुधांशुनूलकर's picture

26 Feb 2017 - 11:16 am | सुधांशुनूलकर

एक्सेल हा अगदी जिव्हाळ्याचा विषय, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये असताना एक्सेल पुरेपूर वापरलंय. माहिती विश्लेषणासाठी या सर्व सोयीसुविधांचा किती उत्तम उपयोग होतो, व्यवस्थापकीय निर्णय घेताना या विश्लेषणांचा कसा उपयोग होतो, ते अनुभवलंय. म्हणून ही लेखमाला खूप आवडते.

अभिजीत अवलिया's picture

26 Feb 2017 - 12:19 pm | अभिजीत अवलिया

सहमत. एक्सेल हे अतिशय पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. उपयोगी पडतील हे लेख भविष्यात.

वेल्लाभट's picture

27 Feb 2017 - 2:12 pm | वेल्लाभट

सगळ्यांचे आभार,
पिरा तुझ्या सल्ल्याचा विचार करतो :)