एक्सेल एक्सेल - भाग १६ - ड्रॅग अँड ड्रॉप

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
6 Dec 2016 - 9:17 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६

पिव्हट टेबलच्या परिचयात आपण बघितलं की पिव्हट या शब्दाचा अर्थ टू टर्न ऑर ट्विस्ट. आता आपण नेमकं हेच करून बघू. आपण मागच्या भागात बनवलेल्या पिव्हटला आपण आता वेगळ्या प्रकारे बघू. मागील टेबलमधे आपण महिन्यानुसार प्रत्येक सेल्समनच्या विक्रीचं टेबल बनवलं. आता आपण त्या टेबलमधे खालील बदल करू. ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने आपण टेबलची फील्ड्स बदलू.

a

१. कॉलम लेबल्स मधील सेल्समन हे फील्ड ड्रॅग करून मूळ फील्ड लिस्ट मधे नेऊ. याने ते टेबलमधून नाहीसं होईल. हे करताना माऊसच्या कर्सरजवळ एक फुली चं चिन्ह दिसेल. आता फील्ड लिस्टमधील प्रॉडक्ट हे फील्ड त्या जागी म्हणजेच कॉलम लेबल्समधे आणू. या टेबलमधे महिन्यानुसार वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची झालेली विक्री अभ्यासता येईल.

v3

२. रो लेबल्स मधे असलेले ऑर्डर डेट हे फील्ड ड्रॅग करून मूळ फील्ड लिस्ट मधे नेऊ (म्हणजेच टेबलमधून ते काढून टाकू) आणि फील्ड लिस्ट मधील सेल्समन हे फील्ड रो लेबल्स मधे आणू. या टेबलमधून प्रत्येक सेल्समन ने केलेली विविध प्रॉडक्टची विक्री अभ्यासता येईल.

4

३. आता रो लेबल्समधे सेल्समन ऐवजी रीजन हे फील्ड आणू. या टेबलद्वारे विविध प्रभागांमधील प्रोडक्ट्सची विक्री अभ्यासता येईल.

6

४. आता प्रॉडक्ट हे फील्ड कॉलम लेबल्स मधून रो लेबल्स मधे आणू आणि रीजन हे फील्ड कॉलम लेबल्स मधे आणू. शिवाय व्हॅल्यू फील्ड्स मधे टोटल सोबतच युनिट्स हे ही फील्ड आणू. आता विविध प्रॉडक्ट्सची प्रभागानुसार झालेली विक्री, नग व मूल्य या दोनही मापकांत दिसेल.

पिव्हट टेबलच्या याच लवचिकतेमुळे त्याचा वापर प्रचंड होतो. आपण चार्ट व टेबल्स यांच्याबाबतीत बघितलेला डिझाईन टॅब हा पिव्हट टेबलसाठीही आपल्याला उपलब्ध होतो. पिव्हट टेबलवर कुठेही क्लिक केलं असता मुख्य टूलबारवर उजवीकडे डिझाईन चा टॅब दिसायला लागतो. हा टॅब आपल्याला कुठली फीचर्स उपलब्ध करून देतो ते खालील चित्रात दिसेल.

dsn

लेआउट - यात आपल्याला पिव्हट टेबलमधील टोटल्स, सब-टोटल्स नियंत्रित करता येतात. जेंव्हा एकापेक्षा अधिक फील्ड्स रो लेबल्स मधे असतात तेंव्हा सबटोटल्स असाव्यात की नसाव्यात, असल्या तर त्या ग्रूपच्या सुरुवातीला असाव्यात की शेवट असाव्यात हे आपण ठरवू शकतो. ग्रँड टोटल्स, म्हणजेच रो किंवा कॉलम लेबल्स मधील सर्व फील्ड्स च्या टोटल्सही आपण ग्रँड टोटल्सच्या मेनूतून निर्धारित करू शकतो. टेबल मधील कुठलं फील्ड महत्वाचं आहे, त्यानुसार हे आपण ठरवायचं. रिपोर्ट ले आउटचे काँपॅक्ट, आउटलाईन, व टॅब्युलर हे तीन प्रकार आपल्याला उपलब्ध असून संबंधित मेनूमधून आपण ते निवडू शकतो. तसंच, प्रत्येक सबटोटल नंतर एक रिकामी ओळ असावी की नसावी हे ही ठरवता येतं.

स्टाईल ऑप्शन्स -
रो हेडर्स - यात सबटोटल केलेल्या किंवा रो लेबल्स मधील सर्वात पहिल्या फील्डला बोल्ड अक्षरात व रंगीत बॉर्डरमधे दाखवता येतं.
कॉलम हेडर्स - यात कॉलम हेडर्स चा रंग इतर डेटापेक्षा वेगळा व ठळक दिसण्याची सोय आहे.
बँडेड रोज / कॉलम्स - यात एक सोडून एक रो किंवा कॉलम हा वेगळ्या रंगात दिसतो.

पिव्हट टेबल स्टाईल्स - यात अनेक रेडीमेड रंगसंगतीनुसार आपलं पिव्हट टेबल आपल्याला दाखवता येतं. स्टाईल ऑप्शन्स हे मुळात टेबलच्या प्रेझेंटेशन च्या दॄष्टीने असल्याने त्यांनी डेटा मधे काहीही बदल होत नाही. डेटामधे बदल करण्यासाठी डिझाईनच्या बाजूलाच ऑप्शन्स नावाचा टॅब आहे. त्याबद्दल पुढच्या भागात.

aaa

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

9 Jan 2017 - 11:13 am | प्रशांत

उपयुक्त माहिती