मागील भागः
एलियनायटीसेलिया भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १
पण अल्कोहोल त्याचं कामकरत होता; डोळे बंद होत होते, डोकंही काम करत नाही आहे असं वाटत होतं. आत्ता गादीत झोपलेले असते तर किती बरं झालं असतं असंही वाटत होतं, पण ती हलणारी आकृतीही खुणावत होती.
सकाळी जाग आली. डोकं हलल्यासारखं काही वाटत नव्हतं पण मी इथे कशी आले? रात्री काय काय झालं काही आठवत नव्हतं, जरा प्रयत्न केला. मला शेवटचं आठवत होतं तेव्हा मी आर्बोरीटममधे होते, आम्ही सगळेच एकत्र होतो आणि काहीतरी आकृत्या अंधारात हलत होत्या, लव्हेल टेलिस्कोपवर रिसीव्हरच्या फीडच्या दोन सावल्या पडल्या होत्या, एक गूढसा पांढरा प्रकाश तिकडे टेलिस्कोपवर होता आणि पुढे .... काहीही आठवत नव्हतं. काल संध्याकाळी खोली जशी होती तशीच होती. खाली गेल्यावर कोट, टोपी, बूट सगळं पसरलेलं सापडलं. सगळ्यांचेच कोट, टोप्या तिथे होतं. खाली कोणीच नव्हतं, म्हणजे एकतर आपापल्या खोल्यांत असतील किंवा तिथे आर्बोरीटममधेच असणार. पुन्हा वर आले, तोंड धुतलं आणि परत खोलीत येत होते तर खिडकीबाहेर लक्ष गेलं. बाहेर "टर्फ"च्या शेतात आता बर्फाची चादर पसरलेली होती. समोरची मातीची खाणपण आज कधी नव्हे ती सुंदर दिसत होती. सूर्य नुकताच उगवत पुन्हा ढगांआड लपत होता. मी धावत जाऊन फोटो काढला.
पण काल रात्री मी घरी कशी पोहोचले, आणि ती पण स्वतःच्या खोलीत! काही समजेचना. आणि पुन्हा विचार आला बाकी जेनी, माईक, डेव्ह वगैरेंचं काय? ते लोक कुठे गेले? तेवढ्यात माईकच्या खोलीतून दिवाणाची करकर ऐकायला आली. ते सगळेच दिवाण एवढे जुने होते ना की सगळ्या दिवाणांचा हात जरी हलवला तरी आवाज यायचा. मला पहिल्या दिवशी, खरंतर रात्री, तिथे झोपच आली नव्हती नीट, सगळ्यांचं असंच व्हायचं, म्हणे! दिवाण एवढी कुरकुर करतो याची कोणाला सवय असणार? तर माईकची खोली माझ्या शेजारीच होती. त्याला जाग आल्ये का नाही हे मला माझ्या दिवाणावर पडल्यापडल्या समजायचं आणि मी जागी आहे का ते त्याला! हं, म्हणजे माईक घरात आहे आणि आता त्यालाही जाग येत आहे हे मला वाढत्या "कुरकुरी"मुळे समजलं. त्याच्या दारावर थाप मारली. "उठलास का रे?", मी बाहेरूनच विचारलं. "हो, उठलोय, डोकं दुखतंय फार. थांब जरा, मी आलोच, बोलायचंय तुझ्याशी!", माईक उठता उठता बोलला. "चहा करू का?", मी विचारलं. "हो गरज आहे त्याची, प्लीज करच." माईकलाही कसलंतरी विचार पडला असावा असं त्याच्या बोलण्यावरून वाटलं. "ठीक आहे, खाली ये तुझं झालं की! चहा पिऊया आणि जरा बाहेर पडू या." "ओके", आणि मी खाली गेले.
मी पाणी किटलीत ओतलं आणि तेवढ्यात बाहेरच जो जुना तबेला होता तिथे काहीतरी खसफस ऐकू आली. ससा एवढा आवाज नाही काढू शकत, माझी ठाम खात्री होती. कोट चढवून बाहेर येईपर्यंत सगळं शांत झालं. पुन्हा आत आले. आता मात्र वर जाऊन पहिले कॅमेरा हातात घेतला, पायात बूट चढवून ठेवले आणि माईक खाली आला तेव्हा त्यालाही सज्ज व्हायला सांगितलं. पटापट चहा प्यायला, दोन बिस्किटं तोंडात कोंबली आणि निघालो. अजूनही मी घरात कशी आले याचं कोडं मला उलगडलं नव्हतं. "काय रे माईक, आपण काल घरी कसे आलो? मला आठवतंय ती शनीची पाटी आहे ना आर्बोरीटमधे, तिथे आपण होतो, कोणाचीतरी आकृती अंधारात दिसत होती, लव्हेल टेलिस्कोपवरच्या त्या विचित्र सावल्या .... मला त्यानंतर आठवतंय मी माझ्या बेडवर होते, पक्षी किलबिलाट करत होते आणि ती ही आजची सकाळ!", मला आता या गोष्टीचा उलगडा करून घ्यायचाच होता. "तरी सांगत होती तुला जेनी पहिल्यांदा एवढी घेऊ नकोस, आणि घेतलीस तर उगाच फार विचार करू नकोस. वाईन, बीअर, व्हिस्की, सगळंच मजा म्हणून पितात. वाट्टेल त्या वेळेला प्रयोग केले की असंच होतं," माझ्या डोक्यावर टपली मारून तो पुढे चालायला लागला. "म्हणजे, मला नाही समजलं!", माईकच्या तगड्या अनुभवातून काही शहाणपण मिळालं तर बरं, असा विचार मी केला. "म्हणजे असं की आपल्याला त्या आकृती दिसायला लागल्या तेव्हा तुलाही त्यांच्याबद्दल फारच कुतूहल होतं. पण वाईननी तिचं काम केलं होतं. तू जोरजोरात बोलत होतीस म्हणून मी तुझा तोंडावर हात ठेवून तुला गप्प केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. काही दिसेनासं झालं आणि आपण घरी आपापल्या पायांनी चालत आलो. सगळ्यांनीच कोट-टोप्या भिरकावून दिल्या घरात आल्यावर, तू ही तेच केलंस आणि मोठ्या प्रयत्नांनी स्वतःहून स्वतःच्या खोलीत जाऊन झोपलीस. आणि झोपेपर्यंत जोरजोरात जेनी आणि मला त्या आकृत्यांबद्दल विचारत होतीस," माईकनी सगळा उलगडा केला. "अच्छा, अच्छा," दबत्या आवाजातलं संभाषणाचा विषय आता त्या आकृत्यांकडे वळला. "तुला काय वाटतं काय असेल ते?", "माहित नाही रे, आत्ता चहा करताना मला काऊ-शेडमधे आवाज आला, बाहेर जाईपर्यंत आवाज कमी झाला आणि पायात मी घरातल्या चपला घातल्या होत्या म्हणून मी फार पुढे नाही गेले." "ठीक आहे, चल आता शोधूया. काही फार मोठा भाग नाही धुंडाळायचा आपल्याला!" आणि आम्ही शांतपणे कानोसा घेत चालायला लागलो.
जिथे सूर्यप्रकाश पडला होता तिथला बर्फ आता वितळायला सुरुवात झाली होती. पण तिथे सगळीकडे भरपूर प्रमाणात आणि उंच झाडं असल्यामुळे बर्याच ठिकाणी बर्फ दिसत होता. त्या बर्फात काही ठिकाणी छोटे छोटे बूट उमटलेले दिसत होते. आम्ही दोघं ते बूट कोणाचे असतील याचा विचार करायला लागलो. बर्फतर काल संध्याकाळी पडला होता आणि त्यानंतर बाहेरच्या लोकांनी बघण्याची वेळ संपली होती. म्हणजे हे कोणा आतल्याचेच असणार, पण कोणाचे? मीच सगळ्यात बुटकी, माझा पायपण त्या पायांपेक्षा बर्यापैकी मोठा होता आणि माझ्याकडे त्या प्रकारचा तळवा असलेले बूटच नव्हते. बरं एवढ्या रात्री कोण तिथे भटकत असणार? "त्या कालच्या काळ्या आकृत्या रे?", मी माईककडे पाहिलं, "हो, मलाही तसंच वाटतं", मी माईककडे पहातच होते. त्याच्या साडेसहाफूट उंचीमुळे मला आकाशातच बघायला लागत होतं. तेवढ्यात आकाशात त्याच्या मागे काहितरी तरंगतंय असं वाटलं, "माईक, ते रे बघ काय आहे, इथे सपाट भागात कोण ग्लायडींग करतं?". "चल गं, टेकड्या इकडनं वीसेक किलोमीटरवर आहेत, इथे कोण येणार ग्लायडर्स? तुला हँगओव्हर ...", पाठी वळून पहाताना माईकनी सुरू केलेलं वाक्य त्याच्या तोंडातच अडकलं. दिवसाच्या लख्ख उजेडात, अंमली पदार्थांची काही नशा नसताना काहीतरी वेगळं दिसत होतं हे नक्की! "चल चल लवकर, या बर्फासारखा थिजू नकोस; धाव थोडा आतातरी!", मी तेवढ्यातपण त्याला सोडलं नाही, एकदा बोलून घेतलंच! "हो चल, बहुतेक तो त्या उत्तरेच्या कोपर्यात, तिथे पाईनची खूप झाडं आहे बघ तिकडे गेलाय, अडकलं त्याचं ग्लायडर तर फसेल बिचारा कोण आहे तो!", माईक आणि मी त्या बर्फाची, चिखलाची पर्वा न करता धावत सुटलो.
फार वेळ धावायला लागलं नाहीच, आणि पाईनची ती गर्दी संपवल्यावर लगेचच गवताचा मोठा भाग होता, त्याच्या एका टोकाला ते ग्लायडर दिसलं, त्यातून धूर येत आहे असं आम्हाला वाटलं. "बापरे या ग्लायडरला एवढ्या थंडीत कशामुळॅ आग लागली असेल, तुला काय वाटतं?", "मला काय रे माहित, मी ना कधी एवढी थंडी पाहिली आहे ना कधी ग्लायडरमधे बसले आहे! चल तिकडे जवळ जाऊन पाहू या." आणि त्यातून एक छोटू बाहेर आला. तो दिसायला थोडा विचित्रच होता. माझ्यापेक्षा या जगात कोणी बुटकं असू शकतं यावर माईकचा विश्वास नव्हता, पण तो आता नक्की बसेल असं माझ्या मनात आलं. पण या माणसाचा चेहरा थोड वेगळाच वाटत होता, म्हणजे कॉकेशन आणि हवाईयन आईवडिलांची मुलं कशी दिसतील तसा काहीसा असं मला वाटलं. "आर यू ऑलराईट?", माईक पुढे झाला. त्या माणसाच्या चेहर्यावर थोडे विचित्र भाव पसरले. त्यानी त्याच्या कानात काहीतरी घातलं तसा माईक पुन्हा म्हणाला, "आर यू ऑलराईट? आय होप यू आर नॉट हर्ट. वॉज देअर एनी ऍक्सिडंट?" त्या माणसानी आता उत्तरादाखल तोंड उघडलं आणि तो कायतरी दोन शब्द पुटपुटला आणि थांबला, डोकं हलवलं चूक झाली असं दाखवत आणि मग बोलायला लागला. "हो, मी ठीक आहे. तुम्ही नका काळजी करु. माझ्याकडचं पाणी संपल्याचं मला उशीरा समजलं म्हणून मला असं मधेच उतरायला लागलं." त्याचे इंग्लिशचे उच्चारही कायतरी विचित्रच होते. माईकच्या चेहर्यावरुनही ते समजत होतं की त्यालाही ते समजायला त्रास होत होता. "पण पाणि संपलं म्हणून तुम्ही इथे इथे उतरलात?" माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिह्न प्रत्येक क्षणाला मोठं होत होतं. "हो, इथे बर्फ पडलाय ना, थोडा गोळा करून जातो मी!" मी आणि माईक एकमेकांकडे आणि त्याच्याकडे आळीपाळीनी बघत होतो. आम्हाला काही समजत नव्हतं या माणसाचं काय सुरु आहे ते! त्याला ते लक्षात आलं असावं, "हो, हे छोटं ग्लायडर पाण्यावर चालतं!" त्याचा इंग्लीशचा ऍक्सेंट नक्की कोणता आहे त्याच्या विचारातूण बाहेर येत मी एकदम पटकन विचारलं, "तुम्ही नक्की ठीक आहात ना?". "का तुमच्याकडे पाण्यातल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं विघटन करून त्यावर वहानं नाही चालवत?". "मला नाही माहीत, मी ब्रिटीश नाही", मी माईककडे वळले, "काय रे, तू सांग ना उत्तर, तू इथलाच ना?". आता मात्र दचकायची वेळ माईकवर होती, "तुला जसं काही माहितच नाही इथलं असं बोलू नकोस", माझ्याकडून त्या माणसाकडे मोहरा वळवून माईक म्हणला, "तुमच्याकडे म्हणजे? तुम्ही कुठले? तुम्ही काय इंग्लीश खाडी पार करून फ्रान्समधून आलात का नेदरलंड्समधून?". तो माणूस त्याच्या तुटक्या-फुटक्या इंग्लीशमधे म्हणाला, "नाही, मी ना फ्रान्सचा, ना नेदरलंड्सवरून आलोय. मी इथला नाही, म्हणजे या ग्रहावरचाच नाही."
क्रमशः
प्रतिक्रिया
4 Oct 2008 - 11:34 pm | सहज
पुढच्या भागाची उत्सुकता.
ग्लायडरवरुन छोटू??????
:-)
4 Oct 2008 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते
बाप रे... काय सॉलिड दचकला असाल ना तुम्ही? मजा आली वाचायला.
बिपिन.
4 Oct 2008 - 11:35 pm | ब्रिटिश टिंग्या
आला एकदाचा एलियन!
अब आयेगा मजा!
असो, लेख आवडला हे वे सां न ल!
- टिंग्या
5 Oct 2008 - 6:34 pm | इनोबा म्हणे
आला एकदाचा एलियन!
अब आयेगा मजा!
मस्त चालू आहे. आता येऊ दे भराभर!!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
4 Oct 2008 - 11:41 pm | प्राजु
येस्स! जा------------------------------------------दू---------- अखेर एलियन आला एकदाचा.
लय भारी... आदिती, अगं आताच पुढचा भाग टाक बघू. झोपू नको त्या शिवाय. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Oct 2008 - 11:58 pm | शितल
आदिती,
आता मात्र उत्सुकता खुप वाढली आहे.
लवकर लिहि पुढील भाग. :)
5 Oct 2008 - 12:03 am | टारझन
आयला वेंट्री मधेच त्याला फुटकी का व्हैना भाषा आली ? जबरा .. आणि तबकडीतुन न येता डायरेक्ट ग्लायडर मधून ..? अफलातुन एलियन आवडला... पण पुर्ण वाचायच्या आत आज्जींनीच चाटवर एंड सांगितल्यामुळे त्याना वाढदिवसाच्या आनखिन पोतंभर शुभेच्छा
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
5 Oct 2008 - 12:05 am | ऋषिकेश
हे !!!! ढंकर-टकर ... ढंकर-टकर !!! आला रे आला .. एलियन आला.. ढंकर-टकर!!!!! :)))
अब आयेगा असली मजा.. हा भाग खूपच रंगतदार झालाय
बाकी एलियननेच स्वतः एलियन असल्याचे जाहिर केल्याने नवा सस्पेंस काय असेल या विचारात आहे
अवांतरः
फोटोतील झाडांमधे पांढरा ठिपका/पुंजका काय आहे?
-(एलियनच्या आगमनाने आनंदित) ऋषिकेश
5 Oct 2008 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटोतील झाडांमधे पांढरा ठिपका/पुंजका काय आहे?
अरे तो फोटो कॅमेरा खिडकीच्या काचेला टेकवून घेतला आहे. एवढा बर्फ पडलेला असताना काच उघडण्याची हिंमत माझ्याततरी नव्हती. त्यामुळे तो पांढरा ठिपका हा काचेवर बाहेरच्या बाजूनी असलेला थेंब असावा. त्या ठिपक्याच्याच बरोबर खालच्या बाजूला, वईच्या लगेचच खाली, पुन्हा एक धूसरसा पॅच दिसत आहे, फारच कष्ट केल्यावर दिसतो तो! ती खिडकी बाहेरच्या बाजूनी त्या घराच्या आयुष्यात कधीही स्वच्छ केलेली नसणार.
अदिती
5 Oct 2008 - 12:10 am | मृदुला
आला एकदाचा! :-)
ते कानातलं यंत्र घेऊन आला ते बरं झालं.
5 Oct 2008 - 4:27 am | मदनबाण
मी इथला नाही, म्हणजे या ग्रहावरचाच नाही."
परग्रहवासी आला..पुढचा भाग लवकर येऊ दे.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
5 Oct 2008 - 9:11 am | रेवती
थांबलीस एवढ्यात? पण आला बाई एकदाचा तो एलियन!
रेवती
5 Oct 2008 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढे काय च्या प्रतिक्षेत.
5 Oct 2008 - 11:47 am | आनंद
आता आणखीन मजा येइल.
छोटूचाही फोटु टाकणार का?
5 Oct 2008 - 2:03 pm | अवलिया
संहिताजी,
उत्तम भाग!!
चला! अखेरीस येणार येणार म्हणुन ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पहात होतो ते परग्रहवासी एकदाचे आले. पण तेही हायड्रोजनला हायड्रोजन व ऑक्सिजनला ऑक्सिजनच म्हणतात हे पाहुन नवल वाटले. तसेच अतिशय बुद्धीमान वाटले कारण अजुनही भारताखेरीज इतर लोक गंगेला गैंगस म्हणतात व सिंधुला इंडस म्हणतात. या तुलनेत तुमचा एलियन मात्र समाजाशी मिळुन मिसळणारा वाटला. प्रचलित नावांचाच त्याने जाणीवपुर्वक वापर केला. असो.
आता पुढल्या भागात असे नका सांगु की तो त्या भागात रहाणाराच एक व्रात्य मुलगा होता .. व त्यादिवशी १ एप्रिल तारीख होती..व त्याने तुम्हाला व तुम्ही आम्हाला गंडवले...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
नाना
5 Oct 2008 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नानासाहेब, एप्रिल महिन्यात मँचेस्टरमधे बर्फ नाय हो पडत!
बाकी भाषेचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याचा विचार आधीच केलेला आहे मी.
6 Oct 2008 - 12:03 pm | अवलिया
आता मी कधी भोकरवाडीच्या बाहेर गेलो नाही त्यामुळे केव्हा कुठे काय पडते मला काय माहीत...
5 Oct 2008 - 6:39 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
जादूच्या जादू पुढ्च्या भागात का?
5 Oct 2008 - 10:26 pm | मेघना भुस्कुटे
जबरा भाग. आला एकदाचा तो 'येणार येणार...' म्हणून गाजलेला परग्रहवासी. आता खरी मजा येणारेय. मस्त...
5 Oct 2008 - 11:27 pm | अनिरुध्द
पुढचा भाग लवकर. फार उत्सुकता ताणू नकोस. एकदम सही.
6 Oct 2008 - 12:36 am | धनंजय
... गूढ संगीत ...
आता मजा.
6 Oct 2008 - 8:34 am | ऋचा
आला रे आला!!!!
:)
लै भारी लिहिल आहेस !!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
6 Oct 2008 - 9:22 am | राघव
वा वा... टपकला एकदाचा.. :D
बाकी तुमचा एलियन अगदी फास्ट फॉरवर्ड आहे बुवा! आल्या आल्या विंग्रजी बोलुन विकेट घेतली की :)
फोटोमधील पुंजक्याबद्द्ल मलाही ऋषीकेश सारखाच प्रश्न पडला होता.. तुमच्या प्रतिसादातून उलगडा झाला आणि हसु आलं.. जणु सगळीकडे एलियनच शोधतोय आम्ही!!!
ऑक्सीजन आणि हायड्रोजन चे विघटन.. गुड.. चांगलं चाललंय!! पुढच्या भागाची वाट पाहतोय, येऊ द्यात लवकर.
मुमुक्षु
6 Oct 2008 - 10:48 am | आनंदयात्री
उत्तम लिखाण झालेय या भागाचे, शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली, थोडाफार थरार अनुभवायला मिळाला.
सर्वसाधारण विज्ञानकथांमधे क्लिशे असणार्या गोष्टी जसे त्याचे डोके मोठे होते किंवा कान बाहेर होते कींवा तो अजब भाषा बोलत होता या कल्पना न वापरणे हे मी कथालेखिकेचे आजवरच्या लिखाणातले यश समजतो. अभिनंदन !!
(त्याचे भाषांतर यंत्र कोणत्या मेकचे होते ? माझ्याकडे एक मंगळ अँड श्रीस्थानक मेडचे आहे, जुने झाले ते आता !!)
6 Oct 2008 - 12:06 pm | भाग्यश्री
मस्तच!!!
6 Oct 2008 - 2:19 pm | मनस्वी
छान झालाय हा भाग.
पुढचा भाग लवकर टाक!
मनस्वी
6 Oct 2008 - 3:16 pm | स्वाती दिनेश
ए,मस्त झालाय हा भाग सुध्दा.. आता मात्र जास्त वेळ काढू नको हां मध्ये मध्ये...
स्वाती
6 Oct 2008 - 5:42 pm | भडकमकर मास्तर
मस्त झालीय गोष्ट... चालूंदेत... लक्ष ठेवून आहे त्या एलियनवर... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Oct 2008 - 9:21 pm | झकासराव
कोइ मिल गया.......... :)
मस्त चाललय.
अवांतर : एलियनी कधी येणारेत??? ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
7 Oct 2008 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर : एलियनी कधी येणारेत???
आलेली आहे. बर्यापैकी लिहून झालं की टाकते इथे नवा भाग.
पण तिचं जास्तीचं वर्णन मागू नये. ;-)
7 Oct 2008 - 5:17 pm | अवलिया
पण तिचं जास्तीचं वर्णन मागू नये
फोटो टाका
बाकी आम्ही पाहुन घेवु
7 Oct 2008 - 5:18 pm | जैनाचं कार्ट (not verified)
हेच म्हणतो !
तु टाक फोटो !
* मिपावर अनेक जण अविवाहीत आहे... ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
7 Oct 2008 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच म्हणतो ! तु टाक फोटो !
पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा!
* मिपावर अनेक जण अविवाहीत आहे...
त्यांच्यासाठी लेख येतातच लिहून! ;-)
7 Oct 2008 - 5:14 pm | जैनाचं कार्ट (not verified)
आला एकदाचा एलियन!
अब आयेगा मजा!
मस्त चालू आहे. आता येऊ दे भराभर!!
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
9 Oct 2008 - 8:28 pm | सुनील
भाग ७ आणि ८ आज एकदमच वाचले. आलेले एलियन काय काय करामती करतात ते पहायचे!
कथा झानटॅमॅटिकली चालू आहे. तशीच राहू दे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.