(चाल : शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती)
नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..
भ्रष्ट सानिध्यात उमगली भ्रष्टाचारी रित..
खुर्चीवर जे बसवले आम्हा जडली येडी प्रित..
लाख पैसे ते चोरून नेईल अशी शक्ती या हाती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..
नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..
खुर्चीवरूनी पैस गिळावं हेच अम्हाला ठावं..
मारून घ्यावं घेऊन खावं हेच अम्हाला ठावं..
काळ्या पैशासाठी भुलवू माया ममता नाती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..
नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 1:57 pm | महासंग्राम
जमलंय जमलंय ...