मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!
आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!
मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच!
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच!
सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच!
सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए!
रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो!
त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी!
आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच!
नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग!
शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे!
आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय!
**शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
प्रतिक्रिया
22 Oct 2016 - 4:41 pm | पूर्वाविवेक
+१११११११११
20 Oct 2016 - 4:18 pm | सामान्य वाचक
बायकोच्या वागण्याला पण काहीतरी कारण असेल ना हो?
तुमच्या 100 अपेक्षा आहेत, चांगलि गोष्ट आहे
अपेक्षा तिच्या पण असणार ना
तुम्ही 1 कुत्रे पाळा, तुम्ही द्याल ते खाईल, उठ म्हटले कि उठेंल , बस म्हटले कि बसेल ( बहुतेक बर का)
आणि शिवाय तुमच्या कडून काही अपेक्षा पण करणार नाही ( हे सुद्धा बहुतेक )
20 Oct 2016 - 4:36 pm | कविता१९७८
सहमत
20 Oct 2016 - 4:22 pm | मराठी कथालेखक
हे घ्या औषध..तुमच्या जगण्यातलं 'challenge' सुखकर होईल याने.
20 Oct 2016 - 4:49 pm | कविता१९७८
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
हे नवर्यानेच ठरवलंय का?
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
हे बायकोच्या बाबतीत ही होउ शकेल ना
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
तीच्या आईवडीलांकडे तीचं चांगलं नव्हतं का? आणि कशा वरुन नवर्याच्या घरात तिचं चांगलं होणारे? नवरा आणि सासु सासरेच ठरवणार का हे?
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
हे म्हणजे अगदी आमची जमीन विकुन आमच्याकडे बक्कळ पैसा येईल असे भाकीत केल्यासारखे वाटते. नवर्याचे इनकम काहीच नसेल तर ही खुपच दुर्दैवी गोष्ट आहे प्रत्येक बायकोसाठी. कमावत्या नवर्याला बायको मान देईलच पण रिकामटेकड्या नवर्यामुळे तीची अवहेलना होत असेल तर कठीण आहे. निदान बायकोने तरी नोकरी किंवा उद्योग धंदा करुन पैसे कमावेत जेणेकरुन आपल्या बेसिक गरजा भागवण्यासाठी बायकोला सासु सासर्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत.
22 Oct 2016 - 4:44 pm | पूर्वाविवेक
कश्यात ० आणि कश्यात १००?
जरा विस्तारून सांगा.
20 Oct 2016 - 5:14 pm | सस्नेह
मस्त आहे,
कलगीतुरा....
20 Oct 2016 - 6:35 pm | चित्रगुप्त
मस्त आहे, कलगीतुरा....
असेच म्हणतो. बहार आने से पहले खिजां चली आयी... असे होऊ घातलेल्या या धाग्यावर हलकीशी फुंकर आणि दोन चार काड्या पडल्यावर शेकोटी मस्त पेटलीय.... लाटणी घेऊन एकदा का अनाहिता मैदान्यात उतरल्या, की मग काय उणे ?
20 Oct 2016 - 7:07 pm | रेवती
काहीही हं चित्रगुप्तकाका,
विनोदी धाग्यावर कश्याला लाटणी घेऊन यायचे? सध्या लाटणी दिवाळीच्या कामात अडकलियेत.
20 Oct 2016 - 7:15 pm | पिलीयन रायडर
किती शतकं ह्याच चर्चा करणार रे??
बास करा ना राव.. किंवा किमान आमचा बोका गार करायला एखादी "जावयाने काय करावं आणि काय करु नये" टाईप जिल्बी तरी पाडा. काय नेहमी नेहमी मुलींच्या वागण्यावर, रहाण्यावर, सासर-माहेरावर, कपड्यांवर चर्चा?? लग्न पुरुषाचंही होतं ना? त्यालाही सासर माहेर असतं ना? जावयाने आपल्या सासु सासर्यांशी कसे वागावे ह्यावर बोला बरं. मुलांनी सतत "माझे आई बाबा आणि त्यांनी काढलेल्या खस्ता" म्हणुन कसे रडु नये हे सांगा. परवाही ती चेपुवर पोस्ट फिरत होती, म्हणे आईबापापासुन वेगळं केलं तर त्या बेसिस वर मुलगा मुलीला घटस्फोट देऊ शकतो. का बाबा, मुलीला मायबाप नाहीत का? त्यांना सोडायचं ही परंपरा. मुलानी सोडा म्हणलं मायबापाला, तर ते क्रौर्य..
कालच ते करवाचौथ नामक प्रकरण पाहिलं. त्यातही हेच चालु आहे. ३ महिन्याचं पिणारं बाळ घेऊन उपवास केला एका महान मुलीने. का तर सासुसासरे आलेत इथे. त्यांनी "आमच्याकडे असंच असतं" म्हणुन करायला लावला. तिकडे नवरा ऑफिसच्या पार्टीत दाबुन हाणत होता. रात्री ९.३० ला धावत पळत (भरल्या पोटी) चाळणीत थोबाड दाखवायला आला. आणि ह्यात काही चुक आहे असं त्याला एक क्षणभरही वाटलं नाही. कुणी तरी आपल्यासाठी थेंबभर पाणीही न पिता बसलंय, आणि ह्याला हे "त्यात काय मग! करायलाच हवं.. आमच्याकडे असंच असतं" वाटतंय..
तुम्हीही तेच रडगाणं गाताय.. इकडची झाली.. इकडेच लक्ष द्या आणि आईबापाने कष्ट काढले.. न काय न काय.. जरा काही २०१६ ला शोभेल असं बोला..
20 Oct 2016 - 7:17 pm | पिलीयन रायडर
हुश्श.. कुणाला तरी जाम शिव्या घालायच्या होत्याच ते करवाचौथ पाहुन.. बरा धागा मिळाला..
आता कसं गार गार वाटतंय!!
वैभवभौ.. तुम्ही चालु द्या!
20 Oct 2016 - 7:34 pm | रेवती
खफवर अजूनही पुरावा आहे. स्रुजाने मला कालच कडवाचौथीबद्दल बोलायला मनाई केलिये. कामाच्या ठिकाणी गुप्ताबाई वैतागलेली होती. तशी ती नेहमीच असते पण काल जास्तच! मी काय विचारायला जात नै, तिनंच येऊन सांगितलं पण स्रुजानं त्याबद्दल काही नको म्हटलं. तुझ्या त्या अपर्णा रामतीर्थकर बाई म्हणत असतात-
१) (सुनांना उद्देश्यून) मुलींनो, आम्ही तुमच्या नवर्याला तळहाताच्या फोडासारखा जपलाय, प्रसंगी कर्ज काढून शिकवलाय.
त्याचक्षणी मला साक्षात्कार झाला की माझे शिक्षण फुकटात झाले असून, माझ्या आईवडिलांनी मला तळहाताच्या फोडासारखे जपलेले नाही व मी तशीच मोठी झाले.
२)बायांनो, आपण नवर्याआधी मरावं (अहेवपणी) अशी इच्छा धरू नका गं, तुमच्यानंतर त्या नवर्यानं कुठं जायचं? त्याला घरकामाची सवय नाही, तुम्ही काहीतरी करून घरात उपयोगी पडू शकता.
त्यावेळी पुन्हा साक्शात्कार झाला (हो, असे एकामागोमाग होत असतात) की पुरुष घरकामाला उपयोगी नाहीत कारण त्यांनी कधी हिकडची काडी तिकडे केली नाही व कोणी आधी मरायचं हे आपण ठरवू शकतो. नैतर मला आधी वाटायचं की आपलं मरण आपल्या हातात नसतं.
20 Oct 2016 - 8:09 pm | पिलीयन रायडर
नवर्याची परवानगी घेतली होती का साक्षात्कार होण्याआधी?
20 Oct 2016 - 8:35 pm | रेवती
अर्थात! अब्ला नारी असल्याने तशी ती घेणे क्रमप्राप्त आहे.
21 Oct 2016 - 12:31 pm | स्मिता चौगुले
काय चौकार- षटकार चालूएत गं तुम्हा दोघिचे.. :)
20 Oct 2016 - 9:33 pm | nanaba
योग्य आहेत.. मस्त आहेत.
22 Oct 2016 - 4:48 pm | पूर्वाविवेक
विचार रुपी तीर्थ पिऊन धन्य झाले गो.
मी तर माझ्या नवऱ्याच्या आधीच मरणार! कारण जाणून घ्यायचे असेल तर मला व्यनी करा. ;)
20 Oct 2016 - 7:45 pm | बोका-ए-आझम
आँ?
20 Oct 2016 - 8:06 pm | पिलीयन रायडर
माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल बोलतेय हो!!
20 Oct 2016 - 8:09 pm | मोदक
अपर्णाताई रामतीर्थकर आणि पिलीयनताई रायडरकर यांचा एखादा जंगी सामना आयोजीत करावा काय..? ;)
20 Oct 2016 - 8:11 pm | पिलीयन रायडर
छे!!! आपली काय कुवत बाबा!!
20 Oct 2016 - 10:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
मला एकदम रिचर्ड डॉकिन्स विरुद्ध त्यो अल जझीरा वाला बाबा ह्यांच्यातील "वादविवाद" आठवला =))
20 Oct 2016 - 9:20 pm | बोका-ए-आझम
म्हणजे तुमच्या मनीचा बोका! (ह.घ्या.)
22 Oct 2016 - 5:27 pm | बॅटमॅन
तो सीट ओरखडणारा बोका तोच काय?
22 Oct 2016 - 6:53 pm | पिलीयन रायडर
=))
तोच!!! आणि बोकाभौ ह्या सगळ्यांचे आझम!
20 Oct 2016 - 8:51 pm | स्रुजा
काय तीच तीच चर्चा रे बाबा ! प्रतिसाद वाचुन च नेहमीसारखं मनोरंजन झालं.
वैभव भाऊ, गुडलक हो ( तुम्हाला नाही हो, तुमच्या बायको ला गुडलक) !
रेवाक्का , मला काय माहिती तुझ्या पोतडीतुन वर्मीणबाईची ईष्टुरी निघणार आहे. म्हणुन नक्को म्हणलं गो.. पण तू ये बघु खफ वर.. सांग वर्मीणबाईंच्या सुरस कथा
20 Oct 2016 - 8:55 pm | सामान्य वाचक
2 मुलानीच एकमेकांशी लग्न करावे
आणि एकमेकांच्या आई वडिलांचा आणि एकमेकांचा आदर करावा
दोघेही पुरुष असल्याने अर्थातच समजूतदार, जबाबदार इ इ असणार
पालकांनी कसे खस्ता खाल्ल्या , हे दोघांनाही चांगले माहित असणार
बायकांसारखे ते असमजूतदार, बेजबाबदार इ इ नसणार
त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद होणार
20 Oct 2016 - 9:00 pm | पिशी अबोली
ख्यी ख्यी ख्यी! आवडलंय हे आपल्याला. जमतंय का बघा हो गांजलेले नव-नवरे धागाकर्ते..
20 Oct 2016 - 9:12 pm | पिलीयन रायडर
पण मग ते वंशाला दिवा द्यायचं कसं जमावं?!!
20 Oct 2016 - 9:18 pm | पिशी अबोली
लै डोसकं खाजवलं पण ह्ये काई सुचंना बगा.. बिच्चारे पुरुष..
20 Oct 2016 - 9:26 pm | पिलीयन रायडर
अस्स कस्सं! द होल पॉईंट ऑफ लग्न इज "आमच्या घराण्याचे नाव पुढे गेले पाहिजे".
बरं आणि ते दोन दोन पुरुष असतील तर नक्की कुणाच्या घराण्याचं नाव पुढे नेणार? कोणती जात न धर्म मुलाला लावणार?
म्हणुन स्त्री सोबत लग्न सोप्पंय. तिला आपल्या घरात आणायचं. तिचंच नाव बदलायचं. तिचे आईवडील सोडायला लावायचे, आपले पुजायला लावायचे. जमल्यास ह्यासाठी आपणच तिच्याकडुन हुंडा घ्यायचा. लेकराला सुद्धा आपलंच नाव, आपलीच जात..आपलाच धर्म.. आणि वर परत "नीट समजुन वागत नाही" असे लेख पण लिहायचे! मज्जाच मज्जा!
20 Oct 2016 - 9:39 pm | संदीप डांगे
तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या व्यथा,
आवडतीशी लग्न होत नाही, करता येत नाही
आईबापाने बघितलं तिच्याशी मुकाट सौंसार करायचा
बायकोला फिरायला घेऊन गेलो तर आईबाप हिरमुस्तात
आईबापाचे ऐकले तर बायको फुरगुंटून बसते
बायकोची बाजू घेतली तर बायकोचा बैल म्हणतात
पालकांची बाजू घेतली तर भक्त प्रल्हाद म्हणतात
एवढे आईबाप प्रिय तर मग लग्न कशाला केलं म्हणतात
बायकोचे लाड केले तर चार दिवसात नादी लावलं पोराला असं म्हणतात
आलेला हुंडा कुठे जातो ते माहित नाही
पोर झालं नाही की सासरचे संशयाने पाहतात
सोबत राहायचे तर डोक्याची मंडई
वेगळे राहायचे तर कृतघनपणाचे आरोप
सोपं नाही हो नवरा होणे! मज्जा कुठे आहे तेच शोधत आहेत बरेच अभागी बिचारे!
;)
20 Oct 2016 - 9:41 pm | पिलीयन रायडर
डोळे भरुन आलो हो.. थांबा.. विषण्ण झालेलं मन आधी थार्यावर येऊ देत, मग सांत्वनपर प्रतिसाद लिहीते..
20 Oct 2016 - 9:49 pm | वैभव.पुणे
20 Oct 2016 - 11:37 pm | अप्पा जोगळेकर
बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात राहू शकतात.
पण बायकोने दर ४ महिन्यांनी निदान ८ दिवस तरी माहेरी जावे. यासाठी एखादा मंत्र किंवा अंगारा असेल तर कळवा.
21 Oct 2016 - 10:54 am | वैभव.पुणे
22 Oct 2016 - 7:00 pm | chitraa
बघा.. एक संभाळता येईना आणि दोन बायका संभाळलेल्या बाबासाहेबांबद्दल अद्वात्द्वा बोलत होता.
आमच्या बायकूचं टायमटेबल ..
जूनमध्ये येणे
ऑगस्टला गणपतीला जाणे
पुन्हा येऊन पुन्हा दिवाळीला जाणे
पुन्हा येऊन पुन्हा ख्रिस्मस न्ञु इअरला जाणे
पुन्हा येऊन पुन्हा मार्च एप्रिलला गेले की पुढच्या वर्षी जून
येण्याजाण्याचा टी ए डी ए बापाकडून घे , असे बोलल्यावर जरा फेर्या कमी झाल्या.
22 Oct 2016 - 4:51 pm | पूर्वाविवेक
एक दुरुस्ती :
भक्त प्रल्हाद नाही श्रावण बाळ
23 Oct 2016 - 12:05 am | संदीप डांगे
आय माय स्वारी बरंका!
20 Oct 2016 - 9:13 pm | स्रुजा
लोल... हे फार च भारीये.
20 Oct 2016 - 9:34 pm | nanaba
जबराच!
20 Oct 2016 - 9:55 pm | चित्रगुप्त
हा हंत हंत.... शंभरावर प्रतिसाद गेले उलटून, तरी या धाग्याचे साहित्यमूल्य कोणीच असे जाणले नाही ?? कुणी लिहीणार का यावर ? की आम्हालाच कळफलक बडवावा लागणार त्यासाठी ??
20 Oct 2016 - 10:33 pm | वैभव.पुणे
चित्रगुप्ता, आपणच पुढाकार घेऊन योग्य ते लिहा बुवा आता.
20 Oct 2016 - 9:53 pm | वैभव.पुणे
सर्व बंधू भगिनींनो, हा माझा मुद्दा खेळचट वाटला असेल तर क्षमस्व. पण तुम्हा सर्वांमुळे, काय चांगले काय वाईट जाणून मनाला फार हलके वाटली.
जे जे चांगले ते ते नीट करण्याचा प्रयत्न यातून नक्कीच करणार.
स्वतःच्या ज्या ज्या चुका समजल्या, त्या त्या नक्कीच शिकून कमीत कमी मनाच्या चुका होतील याचा पण प्रयत्न करणार !!
आभार !!
20 Oct 2016 - 10:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
हा थोर धागा मिस झाल्याबद्दल मी २ सेकंदांचे मौन पाळून प्रायश्चित घेणार आहे
20 Oct 2016 - 10:18 pm | सामान्य वाचक
आता बोला
20 Oct 2016 - 11:13 pm | चित्रगुप्त
कालपासून या धाग्यासाठी मिपाला चिकटून राहिल्यामुळे आमची ही पण आता तन तन करू लागली आहे, तस्मात आता पळतो.
21 Oct 2016 - 10:51 am | वैभव.पुणे
21 Oct 2016 - 12:03 am | संदीप डांगे
अशुद्धलेखन करण्याचं काही विशेष कारण???
21 Oct 2016 - 1:04 am | स्रुजा
नेहमीचंच आपलं. प्रतिसादात विसरलेत ते आणि पूर्वजन्मीच्या सवयीने शुद्ध लिहायला लागले ;)
21 Oct 2016 - 1:14 am | पिलीयन रायडर
लेख परत नीट वाचुन पहा किती कष्ट घेतलेत. ते नाही दिसत तुम्हाला. प्रतिसाद तेवढे दिसतात.
केला तुम्ही विचार त्या कष्टांचा? नाही... तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार
21 Oct 2016 - 10:51 am | वैभव.पुणे
23 Oct 2016 - 12:25 am | एस
भगोलं???