मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!
आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!
मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच!
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच!
सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच!
सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए!
रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो!
त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी!
आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच!
नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग!
शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे!
आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय!
**शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
प्रतिक्रिया
17 Oct 2016 - 7:44 pm | टवाळ कार्टा
#वेटिंग फॉर हेलामा
17 Oct 2016 - 8:56 pm | वैभव.पुणे
हेलामा? काय असत हे!?
19 Oct 2016 - 1:16 pm | सतिश पाटील
हेला-हेमंत लाटकर.
मा-??
21 Oct 2016 - 8:03 am | आदूबाळ
माननीय.
माहेला हे नाव आधीच जयवर्धनांच्या घरात गेल्याने आधीचा मा नंतर आणून चिकटवला.
17 Oct 2016 - 7:59 pm | माणदेशी
काय आहे हे?
17 Oct 2016 - 8:55 pm | वैभव.पुणे
एका भ्रमिष्ट नवर्याची व्यथा!
17 Oct 2016 - 8:56 pm | वैभव.पुणे
आई बाप आणि बायको यांमध्ये स्वतःची चालु असलेली व्यथा!
19 Oct 2016 - 6:40 pm | अभ्या..
हे डिस्क्लेमर वाचल्यावर त्या अँगलने परत वाचले. १०० टक्के पटले.
असा गांजलेला इसम अशाच पध्दतीने विचार करणार. परफेक्ट एकदम. आवडले स्वगत टाइप लेखन.
20 Oct 2016 - 10:35 am | वैभव.पुणे
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!!
19 Oct 2016 - 8:21 pm | सही रे सई
ही व्यथा तुमच्या बायकोला पण वाचायला द्या आणि तिचे त्यावर उत्तर काय हे पण लिहायला सांगून ते तुम्ही वाचा याने तुमच्यातील ताणताणाव कमी व्हायला मदतच होईल.
20 Oct 2016 - 10:34 am | वैभव.पुणे
आमची बायको उलट्या डोक्याची आहे. हे वाचायला दिल तर अजून तण तण करणारी आहे.
तिला सांगता येत नाही म्हणूनच तर एकदा लिहिलंय.
20 Oct 2016 - 11:21 am | पैसा
तुम्हाला खातरी आहे की ती मिपावर नाही??
20 Oct 2016 - 11:25 am | किअशि
आमची पण !
17 Oct 2016 - 8:31 pm | चित्रगुप्त
ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त न.ख्य्द्ग्यु अॅर्ं़ञ्ङूङ्म उत्फ्र्ग ???
17 Oct 2016 - 8:55 pm | वैभव.पुणे
जे मनात आल, तेच लिहिलय!
17 Oct 2016 - 8:58 pm | मोदक
चित्रगुप्त सरांनी पण..!!
17 Oct 2016 - 9:21 pm | वैभव.पुणे
मंग काय तर!
19 Oct 2016 - 3:12 am | चित्रगुप्त
श्या द्यायाच्या असतील तर असलं काहीबाही टाईपतात, हे आत्ताच समजलं, आम्हाला नाही हां द्यायच्यात श्या. न समजणार्या रागसंगीताला काही लोक जशी वेडीवाकडी दाद देतात, तशी द्यायचा आमचा हा प्रयत्न होता.
'मोकलाया' चा गद्य अवतार म्हणून आम्हाला हे लिखाण प्रचंड आवडलेले आहे. यातील वाक्या-वाक्यात व्यक्त केलेली भावना समजू शकतो आहे, आणि हे लिखाण जर खरोखर वस्तुस्थितीदर्शक असेल, तर आमची सहानुभूति आहे. जीते रहो पठ्ठे, कल तुम्हारा है...
"ठेव ते वरती" .... "keep it up".
19 Oct 2016 - 8:03 am | बाजीप्रभू
20 Oct 2016 - 10:44 am | वैभव.पुणे
चित्रगुप्तां, तूच जाणलं रे या सगळ्यात माझ्या भावना. !!
19 Oct 2016 - 12:59 pm | वटवट
भाऊ.... ते जरा टाईप करताना बघा कि जरा.. वाचायला त्रास होतो राव
.. क्रुगैन
19 Oct 2016 - 4:00 pm | सिरुसेरि
लेख वाचुन "परिस्थितीने गांजलेल्या वधुपित्याचे मनोगत / वर व वधुला सांगीतलेल्या चार समजुतीच्या गोष्टी / हितोपदेश " असावे असे वाटले .
19 Oct 2016 - 4:49 pm | मोहनराव
अरे कहना क्या चाहते हो?
19 Oct 2016 - 5:54 pm | अंतरा आनंद
हे वाचल्यावर भरून आले आणि पुढचे वाचवले नाही. तरीही नेटाने वाचावे म्हटले तर भारीच असुद्दलेखन. असूद्या.
20 Oct 2016 - 10:30 am | वैभव.पुणे
काय वाचवल नाही?
जरा आमच्या नवर्याच्या बाजूने विचार करून बघा.
20 Oct 2016 - 11:54 am | टवाळ कार्टा
तुम्हाला नवरा आहे?
20 Oct 2016 - 12:04 pm | पैसा
=))
20 Oct 2016 - 2:52 pm | पाटीलभाऊ
आजकाल काही सांगता नाही येत बुवा...!
whose what & whose what (कोणाचं काय तर कोणाचं काय :P)
20 Oct 2016 - 4:26 pm | नाखु
पहिल्यापासून चौकस आहे खरा !!!!
निरिक्षक नाखु
20 Oct 2016 - 4:44 pm | सस्नेह
आणि 'विनोदी' पण !! =))
20 Oct 2016 - 5:17 pm | पाटीलभाऊ
आणि 'संशयी' सुद्धा... :P
20 Oct 2016 - 5:27 pm | सस्नेह
तुम्हाला विनोद समजत नाही !
19 Oct 2016 - 7:04 pm | चित्रगुप्त
हे वाचल्यावर भरून येऊन पुढचे वाचवले नसल्याचे काय कारण आहे हे समजले नाही. सासरी आल्यावर प्रायोरिटी सासरी देण्यात गैर काय आहे, हेही विशद करावे.
20 Oct 2016 - 10:32 am | वैभव.पुणे
सासरी प्रायोरिटी यामुळे कि, सासरी येऊन सुद्धा मुलगी माहेरच्याच गोष्टीना भाव देणे जास्तच चालू ठेवलं तर मग नवर्याला व सासरी मुलीचा राग ईणारच.
20 Oct 2016 - 12:13 pm | गंम्बा
मुळात मुलीने मुलाकडे रहयला येणेच चुक आहे.
दोघांनी वेगळे रहावे म्हणजे असल्या विकतच्या समस्या येणार नाहीत.
किंवा मुलानी मुलीकडे रहायला जावे.
20 Oct 2016 - 6:00 pm | अंतरा आनंद
हेच म्हणते
20 Oct 2016 - 6:47 pm | सही रे सई
हाहाहा .. भारी
20 Oct 2016 - 9:33 pm | वैभव.पुणे
पटलं ! कोणालाच ताण नको !
19 Oct 2016 - 8:13 pm | संदीप डांगे
टिपिकल...!!!
वेटिंग फॉर फेमिनाझी!!! ;)
20 Oct 2016 - 10:33 am | अजया
:)
लेख फार फार आवडला.संसारात सर्व चुकांची जबाबदारी एकदा का बायको/सुनेवर ढकलली की आपल्याला लेख लिहायला मोकलाया दाही दिशा! किती कारणं संवादाने एलिमिनेट केली हे कधीच कळत नाही!
अर्थात प्रत्येक घरात वेगळी परिस्थिती असू शकते हे मान्य आहे.प्रायाॅरिटी ही सासरी माहेरी परिस्थितीप्रमाणे मुलीने ठेवावी.आणि जावयानेही! फक्त मुलीनेच प्रायाॅरिटी सासरची ठेवावी का?
यावर अजून लिहिलेले वाचायला नक्की आवडेल.तेवढं सुद्दलेकनाचं बघून घ्यावा!
20 Oct 2016 - 10:37 am | पैसा
मिपावर सुद्द लिहायला साक्षात तात्यानी बंदी घातली होती. क्काय समजलेत!
या मॅडमचे बाकी सल्ले ऐकू नका हो वैभवराव. चांगली मजा येतीय वाचायला.
20 Oct 2016 - 10:39 am | वैभव.पुणे
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!!
पण कसं आहे कि, मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली आहे, सध्याच्या परिस्थितीचा तिच्यावर परिणाम च होत नाही.
असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील?
सवयीमुळे नवऱ्याचा चार चौघात किती वाचक्की होते याला लिमिट च नाही.
20 Oct 2016 - 10:43 am | संदीप डांगे
असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील?
^^^
टिपिकल म्हणत होतो ते हेच!!
20 Oct 2016 - 10:44 am | अजया
किती वर्ष झाली हो लग्नाला?
20 Oct 2016 - 10:45 am | संदीप डांगे
सहा महिने, =))
20 Oct 2016 - 10:46 am | वैभव.पुणे
अहो आताशिक तर सुरुवात हाये !!!१
20 Oct 2016 - 11:56 am | अजया
मग लगेच लेबल का लावत आहात?
वेळ लागतो मुलींना. पंचवीस वर्ष माहेरी काढल्यानंतर अचानक एका महिन्यात / वर्षात तुमच्या घरच्या रीतीप्रमाणे तिने कसे वागावे? तिच्या घरचे किती रीतिरिवाज तुम्हाला माहित आहेत?
20 Oct 2016 - 6:53 pm | सुबोध खरे
आमच्या लग्नाला आता २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसापूर्वी आमची बायको म्हणाली "आमच्याकडे" (माहेरी) असं नसतं. यावर मी तिला म्हणालो कि आता तू माहेरापेक्षा माझ्या बरोबर जास्त दिवस काढले आहेस. तरी पहिल्या २३ वर्षातील साडेपाच वर्षे वैद्यकीय शिक्षणाची हॉस्टेल वरची काढून टाकली तर अजूनच जास्त.
पण बाई साठीची झाली तरी "आमच्याकडे असंच असतं' म्हणून माहेरची भलावण करणारच. एवढं लक्षात घ्या.
20 Oct 2016 - 7:10 pm | रेवती
हा हा हा.
20 Oct 2016 - 9:35 pm | वैभव.पुणे
लेबल नाही लावत आहे.
आधीच् लेबल चुकीचं छापल्या गेलाय असं वाटत कधी कधी !
20 Oct 2016 - 12:14 pm | गंम्बा
त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे घरचेच का नाही स्वताच्या सवयी आणि विचार बदलत?
20 Oct 2016 - 9:36 pm | वैभव.पुणे
एस बॉस ! नक्कीच प्रयत्न चालू आहेत यावर पण.
20 Oct 2016 - 12:54 pm | कविता१९७८
वैभव.पुणे -
ज्याच्या किंवा जिच्या बरोबर आयुष्य काढायचे तिची किंवा त्याची अशी राजरोस पणे बदनामी करु नये. पटत असेल तर एकत्र राहायचे नाही तर वेगळे पर्याय आहेतच. पण "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना" असं असेल तर उगाच तक्रार करण्यात काही अर्थ नाही.
20 Oct 2016 - 9:36 pm | वैभव.पुणे
नाहि हो ताइ. तस काहि नाहिये.
20 Oct 2016 - 7:00 pm | बोका-ए-आझम
णव्या लोक्सना थुमच्यासारखे लोक्स प्रोस्ताहाण देत नसल्यामुळे सगळा गुंता होऊन बसलेलाहे! ते काही नाही. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
- आपला णम्र बबन.
20 Oct 2016 - 7:01 pm | धर्मराजमुटके
णव्या लोक्सना बापये माणसांनी प्रोस्ताहाण द्यायचे की बायकामाण्सांनी ??
21 Oct 2016 - 8:54 am | अजया
प्रोस्ता हाणु का रे बाळ बबण?
20 Oct 2016 - 10:43 am | अजया
ओ ताई, सुद्दलेकन कर्ने कायीच अवघड नाहि.
घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)
20 Oct 2016 - 10:44 am | संदीप डांगे
=))
20 Oct 2016 - 10:46 am | वैभव.पुणे
हा हा हा !!!
20 Oct 2016 - 10:46 am | पैसा
मणोरंजनासाठी कायपन! लेखाचे टॅग्ज बघा. त्यात "मौजमजा" पण आहे.
बाकी सूद्दलेखन कर्ने माला तरी फारच औघड जाते आहे ब्वा. त्यात तो मेला मोबल्याचा ऑटोकरेक्ट एकसारखा ड्वाले वटारत आहे.
22 Oct 2016 - 4:36 pm | पूर्वाविवेक
हल्ली कायप्पावरील विनोद पाहून बायकोबद्दल लिहिणं हे मौजमजेचा प्रकार झालेला दिसतोय. ती फ्याशन आता मिपात पण आली वाटत.
20 Oct 2016 - 10:48 am | वैभव.पुणे
जाम भारी "घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)"
20 Oct 2016 - 10:54 am | वैभव.पुणे
अहो हि मौज मज्जा नाहीये हो. खरी व्यथा आहे. पण आता मिपा कारणांमुळे अशा अशा गोष्टी येतायेत ना, हा मुद्दा विसरून मलाच मौज मजा येतीये !!!
तो लिहलेला प्रॉब्लेम च विसरल्या सारख्या वाटायलाय !!! :)
आभारी आहे सगळ्यांचा !
20 Oct 2016 - 11:00 am | प्रभाकर पेठकर
मुलं-बाळं नसतील तर वेळीच काडीमोड घ्या. दोघेही सुखी व्हाल. कारण स्वभावावर (दोघांच्याही) औषध नसतं.
20 Oct 2016 - 11:03 am | संदीप डांगे
सरळ एक घाव दोन तुकडे??
20 Oct 2016 - 11:06 am | वैभव.पुणे
अहो ! हे काय भलतंच !
20 Oct 2016 - 11:07 am | वैभव.पुणे
आम्ही व्यथा मांडली तर तुमचा वेगळंच !
20 Oct 2016 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर
वेळेवर केल्या तर गोस्टी 'भलत्याच' ठरत नाहीत. मुलं झाल्यावर हाच विचार 'भलताच' ठरतो. एकमेकांचे पटत नसेल तर काडीमोड मुळे कोणावरही अन्याय होत नाही. पण एकादा का निष्पाप जीवांना ह्या जगात आणलेत तर त्यांच्यावर नक्कीच १०० टक्के अन्याय होतो.
विचार करा. अजून वेळ हातची गेलेली नाही. अडखळत अडखळत तिन पायांची शर्यत चालायची की स्वतःच्या ताकदीवर वेगळी वाट निवडायची.
सल्ला पसंत नसेल तर तक्रार न करता जगायला शिका. तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
20 Oct 2016 - 1:29 pm | असंका
+१..
20 Oct 2016 - 8:00 pm | चित्रगुप्त
अहो मग कलगीतुरा कसा रंगणार दादा ? सार्वजनिक घाटावरची मौज कशी बघायला मिळणार ? आता तर खुद्द लेखकालाच मौज वाटू लागलीय.
20 Oct 2016 - 9:39 pm | वैभव.पुणे
+१११
22 Oct 2016 - 4:37 pm | पूर्वाविवेक
+१११११
20 Oct 2016 - 12:39 pm | अप्पा जोगळेकर
सहमत.
जर मुलं बाळ झाली असतील तर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष द्या, नोकरी-व्यवसायाकडे लक्ष द्या, वेगळ्या बिछान्यावर झोपा, जोडीदाराची दखलच घेऊ नका, घटस्फोट सुद्धा देऊ नका. बाहेर भानगड केलीत तर पुरावे मागे ठेवू नका.
एक दिवस जोडीदार स्वतःच कंटाळून निघून जाईल.
चुकुनही मारहाण करु नका किंवा स्वतःहून घटस्फोट मागू नका. तसे केले तर पोटगी द्यावी लागेल. शिवाय ते अमानवी आहे.
- (प्रेरणा - आपली अडचण उषाताईंचा सल्ला)
20 Oct 2016 - 11:07 am | संदीप डांगे
हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी
मिपा, बक्ष दो (सुद्दालेकन कि) खता हो गयी
:)
20 Oct 2016 - 11:15 am | पैसा
हमारा इरादा तो कुछ भी न था
तुम्हारी खता खुद सजा हो गयी!
=))
20 Oct 2016 - 12:43 pm | बाजीप्रभू
एक जुनी गुजराती म्हण आहे, तिचा अर्थ सांगितल्यावर बरेच जण तुटून पडतील तरी देखील सांगतो.
"ઘરમાં આવતા બિલાડી.... "घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं"
हे ज्यांना जमत नसेल त्यांनी बायकोने डोक्यावर मिऱ्या वाटल्यास त्रागा करू नये.
20 Oct 2016 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर
घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं
आणि घरात येणारा उंदीर आणि नवा जावई ह्यांचे काय करावे?
20 Oct 2016 - 1:42 pm | अजया
पाळायचे असेल!
20 Oct 2016 - 4:30 pm | नाखु
कामी येतो
22 Oct 2016 - 4:40 pm | पूर्वाविवेक
आणि जावयाला?
20 Oct 2016 - 12:48 pm | अजया
_/\_
साष्टांग बरं का.
20 Oct 2016 - 1:22 pm | अप्पा जोगळेकर
घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं
आवरा.
20 Oct 2016 - 1:51 pm | nanaba
हेच बरं .. एका भयानक विचाऱ्याच्या नवऱ्यापासून वेळीच सुटका होईल बायकोची!
20 Oct 2016 - 3:29 pm | संदीप डांगे
ऑन या सिरीयस नोट,
लग्नाला महिना झालाय फक्त, लग्न हि एक मोठी घटना असते आयुष्यातली, मुलीच्या साठी मुलापेक्षा कैक पटीने.
स्थानांतर, भूमिका, आयुष्य, जबाबदाऱ्या एका रात्रीतून बदलतात. मुलाचं किन्वा त्याच्या कुटुंबाचे तसे नसते, एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो.
आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. जगावेगळ्या अपेक्षा नाही तर नेहमीच्याच. अगदी तिने उठून सर्वांसाठी चहा करावा. पारंपरिक अपेक्षा, लै न्हाई मागणं छाप वाटतील पण मुलीच्या बाजूने बघितलं तर... तिने कायम आईच्या हातचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात केलेली असेल तर? आजकाल 70च्या दशकातल्या मुली नाहीत, त्या शिकतात, जॉब करतात, आई त्यांची मुलासारखी काळजी घेते, काही अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुली आजकाल फक्त घरकाम करतात. लग्नही उशिरा म्हणजे 23 च्या पुढे होतायत, एव्हाना आयुष्याची घडी बसलेली असते. ती पूर्ण मोडून नवी घडी, नव्या घरात, नवीन माणसांसोबत बसवायची तर वेळ लागणार, मनस्ताप होणार शिवाय सून म्हणून, बायको म्हणून अपेक्षा आहेतच,
वरच्या लेखात आलेली टिपिकल मानसिकता हीच कि सुनेने आदर्श सुनेसारखे वागावे, गंगाधर टिपरेच्या शुभांगीसारखे. पण आपण स्वतः कसे वागतो हे कधी बघणार?
आयुष्य सुखी हवे असेल तर कोणाकडून त्याच्या मर्जीशिवाय कोणत्याही अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा ठेवू नये.
मुलगी माहेरी जास्त संबंध ठेऊन असतात, असणारच, असं लगेच एक पारंबी सोडून दुसरीवर झेप घ्यायला ती काही टार्जन नाही. माहेर हे महत्त्वाचं आहेच, सासर शी तुलना करायला जाऊ नये.
आईबापनी कष्ट करून संसार केला त्याचे कौतुक काय? म्हणजे कायम पलंगावर लोळत संसार केला तर काय लाथा झाडाव्या. आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे.
मुद्दा काय आहे की एका स्त्रीचे कन्या ते पत्नी/स्नुषा हे रूपांतर समजून घेणे आवश्यक. लगेच जजमेंटल होऊ नये. पूर्वग्रहानुसार लोक होऊन बसतात आणि मग झालेले गैरसमज आयुष्यभर मिटत नाहीत.
बाकी स्वभाव पटत नसेल तर थोडा वेळ द्यावा, समजून घेण्याची पात्रता आहे का हे बघावं, स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे. जुळवून घ्यायची इच्छा नसेल तर काडीमोड घ्यावा पण त्यानंतर चे त्रास लक्षात असू द्यावे,
कोणाच्या पोटात शिरून काही माहिती काढू शकत नाही, पण सरळ जजमेंटल होणे गैर तसेच स्वतःची गैरसोय करून दुसऱ्याला सहन करणेही. जे सुवर्णमाध्य काढतात ते सुखी होतात,
वत्सा, तुजप्रत कल्याण असो!
- संसारानंद स्वामी संदीपबाबामहाराज
20 Oct 2016 - 3:53 pm | सानझरी
प्रतिसाद खूप आवडला..
20 Oct 2016 - 4:30 pm | राजाभाउ
+१
एक नंबर. (अर्थात नेहमीप्रमाणेच)
20 Oct 2016 - 5:07 pm | अप्पा जोगळेकर
एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो.
हे कैच्या कैच आहे.
उगाच मुली किती गरीब बिचार्या छाप प्रतिसाद वाटला.
आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात.
तुम्ही अंमळ जुन्या काळातले दिसता. त्यामुळे नविन हुंडापद्धत तुम्हास ठाऊक नसेल.
20 Oct 2016 - 5:20 pm | संदीप डांगे
आप्पा साहेब, थोडं थांबा, दुसरी बाजूही टंकणार आहे,
आणि तसं बघितलं तर वरचा प्रतिसाद केवळ मुलींची बाजू घेत नै आहे
20 Oct 2016 - 9:46 pm | वैभव.पुणे
पूर्ण उत्तर अगदी आवडले. मनापासून धन्यवाद !!
सडेतोड !