अडगळ

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
3 May 2016 - 6:18 pm

'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा.
तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता. पण दाद्याच्या शिव्या म्हंजे अमृताचा शिडकावा मानून ओंजळीतून तिर्थप्रसाद पिऊन डोक्यावर हात फिरवून स्वताला कृतकृत्य म्हणतात का काय ते करवून घेऊन पोरं प्रोत्साहीत होऊन नेटानं वायरी हालवत होते.

तर हा प्रोग्रॅम होता म्हारवड्यात. तिथली सगळी चिलीपिली टिवीम्होरं ठाण मांडून बसलेली. स्क्रिनवर थोड्याजरी मुंग्या आल्या तरी "आलं, आलं, चित्तार आलं" म्हणून कालवा करायची.
शेवटी एकदाचं ते चित्तार आलं. आन सगळी गपगार झाली. पहिला शीन सुरु झाला. तुरुंगातल्या कुठल्याशा रेड्याला पोलीस पकडून नेत होते. त्याच्या उठ्याबैठका बघून पोरं गांगरुन गेली.
मग रविना टंडन आली. जेलमधून फिरायला लागली. जेलमधल्या सैपाकघरात जेव्हा चारजणं तिला पकडून बलात्कार करायला सज्ज झाली तेव्हा सगळ्यांच्या कपाळातच गेल्या.
पण जेव्हा इंटरनॅशनल म्युझिकवर अॅक्शन घेत सुनील शेट्टीनं एंट्री घेतली तवा सगळी "रेवन्या आला, रेवन्या आला " म्हणून गोंधळ घालायला लागली लागली. मला कळेना, की हा रेवन्या कोण?

रेपसीन बघण्यात गुतून गेलेल्या एका दोस्ताला विचारलं की हा रेवन्या कोण? त्यानं उठून हिकडंतिकडं नजर मारुन खाली बसत म्हणला, आल्यावर दाखवतो तुला.
मग पिच्चर पुढे सरकत गेला. सुनील शेट्टीच्या बहिणीवर जबरी रेप झाला. मग त्या चौघा रेपिस्टांची सुनील शेट्टीनं पार आयमाय झ** काढली. अक्षयनं एंट्री घेतली. नसिरनं एंट्री घेतली. पार पिच्चर मस्त मस्त चीजपर्यंत येऊन धडकला.

पोरं पेंगुळलेली. वातावरण गंभीर. दाद्या गावठी मारुन एका दुकानाच्या कठड्यावर आडवा पडलेला. डोळ्यात झोप घेऊन माणसं आलीया भोगासी म्हणत पिच्चर बघत होती. तेवढ्यात बनियन (उच्चारी बनेल) आन पँन्ट घातलेला एकजण ढेरीवरनं हात फिरवत सहज हवापालटाला आल्यासारखा तिथे हिंडत फिरत आला. मग आमचा दोस्त मला म्हणाला, "तो बग तो रेवन्या"
म्या त्याला नीट निरखून बघितला. चेहरा सुनील शेट्टीच्या सुजलेल्या तोंडासारखा दिसत होता. बस, एवढेच काय ते साम्य. बाकी ढेरीबिरी सुटलेला तो एक आळसावलेला सांड होता. नंतर दोस्तानं मला माहिती पुरवली की तो टिवीपण त्याचाच हाय.

म्हणजे एका रातीपुरता टिवी दिल्यामुळं आन चेहरापट्टी सुनील शेट्टीशी मिळतीजुळती असल्यानं सगळा प्रोग्रॅम दाद्यानं मॅनेज करुन पण आख्खं क्रेडीट रेवन्या घेऊन गेला होता.

त्यादिवशी रेवन्या मला दिसला तो पहिल्यांदाच आणि शेवटचापण. त्या रात्रीनं खरंतर रेवन्याच्या जिवनात होऊ घातलेल्या बऱ्याच घडामोडींची पायाभरणी केली होती. त्याच्या कडूझार आयुष्याची सुरुवात इथूनच तर झाली.

क्रमश:

कथासमाजजीवनमानप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 6:22 pm | विजय पुरोहित

उत्सुकता वाढलेली आहे...
बाकी लेखन झकासच!

अभ्या..'s picture

3 May 2016 - 6:27 pm | अभ्या..

हायला. भारीच
येउदे येउदे रेवन्याला.

बाबा योगिराज's picture

3 May 2016 - 6:42 pm | बाबा योगिराज

क्या बात. मस्त सुरुवात केलीत. जरा मोठे मोठे भाग टाकलात तर ब्रे होईल.

पुलेशु, पुभाप्र.

निशांत_खाडे's picture

4 May 2016 - 12:58 am | निशांत_खाडे

जरा मोठे मोठे भाग टाकलात तर ब्रे होईल.

+1

प्राची अश्विनी's picture

3 May 2016 - 6:55 pm | प्राची अश्विनी

जब्बरदस्त! पुढचे भाग लवकर टाका.

अनिरुद्ध प्रभू's picture

3 May 2016 - 10:23 pm | अनिरुद्ध प्रभू

पुभाप्र.

चांदणे संदीप's picture

4 May 2016 - 5:11 am | चांदणे संदीप

येऊद्या लवकर!

Sandy

उगा काहितरीच's picture

4 May 2016 - 6:14 am | उगा काहितरीच

अधिक एक...

यशोधरा's picture

4 May 2016 - 5:29 am | यशोधरा

वाचतेय..

जव्हेरगंज's picture

4 May 2016 - 12:27 pm | जव्हेरगंज

आभारी आहे

तुषार काळभोर's picture

4 May 2016 - 12:55 pm | तुषार काळभोर

जव्हेरगंज... हवा का ठंडा झोंका...! :D

नाखु's picture

4 May 2016 - 3:45 pm | नाखु

जित्राबांच्या गर्दीत इकडं ध्यान दिलं नाही.मापी असावी.

====
वडाखालचा नाखु

जव्हेरगंज's picture

4 May 2016 - 4:19 pm | जव्हेरगंज

;);:));:);

संजय पाटिल's picture

4 May 2016 - 6:51 pm | संजय पाटिल

हौर आंदे!!"

एक एकटा एकटाच's picture

4 May 2016 - 9:40 pm | एक एकटा एकटाच

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

राजाभाउ's picture

5 May 2016 - 10:42 am | राजाभाउ

छान सुरुवात. पुभाप्र.

अजया's picture

5 May 2016 - 10:55 am | अजया

पुभाप्र

शि बि आय's picture

6 May 2016 - 2:39 pm | शि बि आय

वा... पुभाप्र.

गहिवरल्या गेले आहे. बाकी कथा जव्हेरगंज ष्टैल उत्सुकता वाढवणारी आहे. पुभाप्र!
ता.क. - मोहरा मध्ये सुनील शेट्टीच्या बहिणीवर नव्हे, त्याच्या बायकोच्या बहिणीवर रेप होतो.

कविता१९७८'s picture

6 May 2016 - 6:14 pm | कविता१९७८

बायकोवर होतो ना

शित्रेउमेश's picture

20 Feb 2017 - 9:11 am | शित्रेउमेश

पुढचा भाग येवुदेत कि.......