(तिफण गोफण)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
27 Apr 2016 - 3:08 pm

मुळाक्षरे १
येते ऊबळ अधून -मधून ,
खाजर्या धाग्याची ,
टाळ्याखाऊ हर्षाची ,
तुझ्या कुजक्या शेर्यांची ,
अन त्यावर केलेल्या फेर्याची …

येते सणक अधून -मधून ,
खुसपटी लिखाणाची ,
निसटलेल्या अर्थाची ,
तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची ,
अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची ….

येते सुरसुरी अधून -सुरसुरी
रतीबाच्या गवळ्याची ,
लागो झकाझकींची ,
तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची ,
अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची ……
====================================
मुळाक्षरे २

ज्या लिखाणाला
ऊंडारायचे(च) असते
वाहवायचे असते
ते पाहत नाही
अनुमान किती खंग्री
धाग्यात आर्तता किती
अर्थाची काही शक्यता
वा माहीतीचा कणसूरपणा
ते खफत ठेच्काळत
अवांतराच्या फटीत
निर्लज्ज चिकाटीने उभारते
अस्तित्वाची दखल जागल्या
धाग्याला घ्यायला लावते

मोकळे शी.डी.
खत्म जोड काव्यनिग्रह
================================================
मुळाक्षरे ३

पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते,
ही पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते!

रसना गुंतुनी जातेय जी पुढच्या अर्थी निःसत्वसा
त्याने दोस्तांनाही कापायचे मला भय वाटते!

कुंथीत माझे जाहले आहेत उदर काचांतुनी
मी खाउ जाता त्या (दोंद) सुटायाचे मला भय वाटते!!
हा दाटला प्रतिबंध माझ्या भोवती चोहीकडे
घुसमटला वारा सुटायाचे मला भय वाटते!!
आहे नेहमीचा सोडा(वाला) अजुनी कितीतरी दूरसा
अन ओळखीच्या नजरा, भेटायाचे मला भय वाटते!!

-घणरेघ

टीप- ही गजाल नाही. गजाल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा (लिंबूपाणी मुद्दाम) बाजूला ठेवून वाचावी ही नम्र विनंती.

dive aagarआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलअद्भुतरसमुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 3:22 pm | विजय पुरोहित

मस्तच नाखुकाका!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Apr 2016 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

हायला एका दगडात तीन पक्षी?
भारीच.....आवडले
पैजाराबुवा,

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2016 - 3:35 pm | टवाळ कार्टा

भूछत्र, कोडाई कनाल आणि गरम पाण्याचे कुंड विसरलात???

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 3:37 pm | विजय पुरोहित

या तीन्हीचा अर्थ काय नक्की? नव्या माणसाला पण सांगा की राव?

Dive aagar हा नवीन रस निर्माण केल्याबद्दल नाखुकाकांचा पिंचित सत्कार करावा काब्रे?

प्रचेतस's picture

27 Apr 2016 - 10:46 pm | प्रचेतस

हाहा.
अगदी अगदी. =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2016 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

नाखू(न) असरदार!

सॉरी नाखुकाका.
नाही समजले :(

नाखु's picture

29 Apr 2016 - 12:40 pm | नाखु

यावं म्हनून असा घामटा का काढतोस?

बाकी व्यनीत