विषय

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 3:07 pm

इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले,
पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले,
हे शिकून तरी काय कळले,
आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले,
ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले.

भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण,
विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण,
ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन,
त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून.

विज्ञानाच्या तासाला,न्यूटनचे नियम सतत रटत गेलो,
प्रत्येकाच्या क्रियेला,सडेतोड प्रतिक्रिया आयुष्यभर देत गेलो,
शब्दांच्या जाळ्यात स्वतःला खोल फसवत गेलो,
विचारु कुणाल, दुरावस्थेला माझ्या
मीच जबाबदार बनत गेलो.
मग न्यूटनच म्हणाला
नियम माझे गतीचे
पदार्थांनाच फक्त लावायचे
मार्कांपुरतेच रटायचे
नियम हे आयुष्याचे
स्वानुभवानेच बनवायचे
प्रसंग कसे हाताळायचे
विवेकानेच ठरवायचे
काम तुझ्याच मतीचे.

मराठीच्या तासाला का शिकवतात असे व्याकरण,
बरोबर विरुद्ध चूक,
आयुष्यात तर आपापल्या जागी,
असतो दोघेही बरोबर,
किंवा ब-याच अंशी,
असतो दोघेही चूक !!!

कवितेतले विषय जाऊ द्या
आशय मनाला भिडू द्या
तुमच्यातलाही कवी जागा होईल
देवाशप्पथ, नाव माझे लिहून घ्या

फ्री स्टाइलमुक्त कविताकविताविडंबन

प्रतिक्रिया

नवकवींनो, सावध व्हा भो. मिपा विडंबन स्पर्धा सुरु होतेय.