प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर.
लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या
ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले
चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना
स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा
यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ?
आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहीले
आठवणि तुझ्याच त्या त्यांच्या न राहील्या
पोकळ आसमंत मागे राहीले, ना सखे ना सोबती
जायचे इथे तिथे, कुठे कुठे कोरड्या कल्पना
मिथकात मिथक होऊनी फुकाच्या वल्गना
व्यर्थवेळ मोक्षाचे भोक मोजतो कुठे ?
आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला
लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या
आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला
प्रतिक्रिया
28 Nov 2015 - 6:23 pm | जव्हेरगंज
डायरेक चार कविता!
_/\_
28 Nov 2015 - 6:25 pm | मांत्रिक
क्लासच!
28 Nov 2015 - 8:29 pm | मोगा
मला वाटले नथुरामावर कविता लिहिली की काय !
28 Nov 2015 - 10:52 pm | एक एकटा एकटाच
ढिशक्याव.....
Bull's eye
28 Nov 2015 - 11:28 pm | शिव कन्या
अर्थासहित व्यवस्थित.
28 Nov 2015 - 11:40 pm | प्रसाद गोडबोले
श्या :
काहीही यमके जुळवली आहेत , अज्जिबात अवडली नाहि कविता !
आपण आमच्या बुवांकडुन एकदा यमकनारायण पुजा घालुन घ्या साग्र संगीत ... कृपा आनि शुरु हि जायेगी =))))
29 Nov 2015 - 1:45 am | एस
:-) छाण आहे हो काव्य! आवडेश.
29 Nov 2015 - 9:02 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्तच आहे , आवडली
पैजाराबुवा,
29 Nov 2015 - 9:24 am | दमामि
__/\__
30 Nov 2015 - 2:41 pm | बॅटमॅन
हा हा हा, एकच नंबर =)) जरा यमकात मार खाल्ली, पण बाकी उत्तम आहे.
तदुपरि-
वृत्ताधिकारमुक्त चर्चेत या काव्यकूटाचा उल्लेख करण्याबद्दल इथे विनंती करण्यात येत आहे.