हापिस

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 10:55 pm

रात्री ऊशिरापर्यंत मी कपाटाशेजारी वाट बघत बसलो. टाईमपास म्हणुन दोन चार वडापाव हाणले. सगळी सामसुम झाल्यावर सावधपणे अंदाज घेत बाहेर आलो. टकल्या अजुन कंप्यूटरवर रिपोर्ट करत बसला होता. एकतर यानं अप्रायजल मध्ये काशी केलेली. आणि आज हा महाडांबिस माणुस मी चार दिवस राबराबुन बनवलेली एक्सेल शीट स्वत:ची म्हणुन वरती पाठवत होता. त्याखाली एक पेशल नोट टाकुन, "Lower order is not working fine, but I am working hard to get report on time. sorry for late. thanks" (मला सीसी मध्येपण ठिवलं न्हाय)

मग मी एक लांबसडक लोखंडी बांबू हातात घेतला. (हो, हेच बनतं आमच्या कंपनीत). हळुच मागनं जाऊन त्याचं टक्कालचं फोडलं. साल्याला कळ्ळं पण न्हाय कुणी फोडलं. डेस्कटॉपला प्रणाम करत तसाच निवर्तला.
आवाज कसला आला बघायला संगिता धावत आली. च्यायला हीपण थांबलीय वाटतं. (नक्कीच दोघांच झेंगाट असणार) परवा मला म्हणाली " अरे या अमक्या ढमक्या कंपनीत अशी अशी एक रिक्वायरमेंट आहे, बघ ट्राय करुन, काय हरकत आहे. शेवटी सेल्फ ग्रोथ इज अल्सो इंपॉरटंट"
मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग मीटींगला हा टकल्या मला म्हणाला " जॉब करायचा नसेल तर तसं सरळ सांगा, संगिताला का बघायला सांगताय?" ह्या बिलंदर बाईलापण संपवलचं पाहीजे. बु..ख्ख..! तोंडातच बांबू घातला. कायमचचं बंद केलं. जाग्यावरचं खपली.
हुश्श्यं...! बऱ्याचं दिवसांच आत साठलेलं शेवटी बाहेर काढलं. ईकडं तिकडं बघितलं, कुणीच न्हवतं. बाहेर बरीच धावपळ चाललेली. शिक्युरीटीवाले मामा लोक्स. यांना भुलवायला किती वेळ लागतोय. मग मी पुन्हा कपाटाशेजारी बसुन पुढच्या प्लँनिंगचा विचार सुरु केला. वरच्या मजल्यावरचा प्रोजेक्ट हेड, शॉप फ्लोअरवरचा प्रोडक्शन इंचार्ज, सगळ्यात महत्वाचा एच. आर. आणि....(आता एके-४७ च काढावी लागणार)
तंद्रीत असतानाच एक जाडजुड वॉचमन माझ्याकडे बेधडक चालत आला. चवड्यावर बसुन माझे खांदे हलवत हळुच म्हणाला " अहो, ऊठा की, किती ऊशीर झोपलाय, आज कामावर जायचं न्हाय का?"

कथाराहणीप्रकटनअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

5 Oct 2015 - 11:25 pm | कविता१९७८

हा हा हा , तुमचा अनुभव का हा?

जव्हेरगंज's picture

5 Oct 2015 - 11:49 pm | जव्हेरगंज

Crying and sniffling

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 1:15 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

स्रुजा's picture

6 Oct 2015 - 2:19 am | स्रुजा

हीहीही

अजया's picture

6 Oct 2015 - 7:22 am | अजया

=))

नीलमोहर's picture

6 Oct 2015 - 10:24 am | नीलमोहर

काय काय स्वप्नं जागवलीत मनात..

पण ते जाग्यावर खलास मध्ये मजा नाही,
मग आपण सहन केलेला त्रास, छळ त्याचं काय ??

जशाला तसं - हाल हाल करून, तडपा तडपा के, फुल टॉर्चरच पाहिजे अशा लोकांना.

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 7:46 pm | जव्हेरगंज

हाल हाल करताना त्यांची दया वगैरे यायची शक्यता,
तस्मात, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी!!!

अनुप ढेरे's picture

6 Oct 2015 - 10:42 am | अनुप ढेरे

:)
छान!

सस्नेह's picture

6 Oct 2015 - 11:12 am | सस्नेह

'मुंगी उडाली आकाशी' आठवलं.

नाखु's picture

6 Oct 2015 - 11:26 am | नाखु

सपनोमें मिलती है !!!!

सपनोमें मिलती है !!!

सिर्फ सजा .

स्वप्नकथा आवडली

बाबा योगिराज's picture

6 Oct 2015 - 11:52 am | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या

मनीषा's picture

6 Oct 2015 - 2:20 pm | मनीषा

हा हा हा :)

मस्तं

बॅटमॅन's picture

6 Oct 2015 - 3:18 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =))

शंतनु _०३१'s picture

6 Oct 2015 - 4:21 pm | शंतनु _०३१
सानिकास्वप्निल's picture

6 Oct 2015 - 4:24 pm | सानिकास्वप्निल

=)) =))

समीर_happy go lucky's picture

6 Oct 2015 - 11:07 pm | समीर_happy go lucky

हाहाहाहाहा

जव्हेरगंज's picture

7 Oct 2015 - 6:47 pm | जव्हेरगंज

Thanks Sign

रातराणी's picture

8 Oct 2015 - 1:10 am | रातराणी

:)

मदनबाण's picture

8 Oct 2015 - 3:10 am | मदनबाण

हा.हा.हा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

काय आजकाल उठसुठ सगळेच एच आर ला शिव्या देतात..
कसच वाटत हो ...........

अभिजीत अवलिया's picture

27 Nov 2015 - 9:17 am | अभिजीत अवलिया

सत्य कथा आहे का ?

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 10:51 am | नाव आडनाव

:)

मी चार दिवस राबराबुन बनवलेली एक्सेल शीट स्वत:ची म्हणुन वरती पाठवत होता
आयला, आमचे मॅनिंजर साहेब तर अख्खी इमेल ड्राफ्ट करूनंच मागतात. मी रिगार्ड्स नंतर त्यांचं नाव सुद्धा लिहून पाठवतो. मग साहेब जसंच्या तसं कापी पेस्ट करून स्वतःच्या नावावर खपवतात.