आमची पी.एम.टी.

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
16 Aug 2008 - 7:53 pm

पी.एम.टी.

डिस्क्लेमर : खालील लेखात प्रत्येक ऊल्लेख हा केवळ पी.एम.टी. शी संबंधित आहे. नोंद घ्यावी.

काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ? अहो नामकरन झालं ना? पी.एम.टी आणि पी.सी.एम.टी. विलीनीकरण झालंरे टार्‍या... "अर्रे होन दे रे भई... अप्पन तो ईसको मरते दम तक पी.एम.टी. इच बोलेंगा !"
हुह्ह! काही दिवसांपुर्वी ख.फ. वरील चर्चेत पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली. हा लेख म्हणजे काही पी.एम.टी.चा इतिहास नाही.माझ्या वाटेला पी.एम.टी.चे जे पराक्रम अनुभवले ते लिहीतोय. अजुनही माहित नाही की काय लेखात लिहिणार आणि काय ऊतरणार... संभालके लो भिडू लोग.

जवळपास १२-१५ वर्षापुर्वीचं आठवतंय, तेंव्हा मी नगररोड वरच्या कोरेगाव भिमा आणि वाघोलीच्या मधलं एक छोटसं गाव लोणीकंदला रहात असे. बाकी नातेवाईक पुण्यात रहात असल्याने दर सुट्ट्यांमधे पुण्यात यायचा योग येत असे. अशा वेळी एकमेव साधन म्हणजे पी.एम.टी.,कॉपिटीशन ला फक्त कमांडर(जिबडं) ही प्रायव्हेट वाहतुक.आतासारख्या डुगडुग(?!?) सारख्या ६(ऍक्चुअली १२) आसनी डुकरांचा त्याकाळी वावर नव्हता. पण पी.एम.टी. सगळे निमशहरी आणी खेडी-पाडी पुण्याला जोडण्याचं काम केलय. असो .. बालपणचा सुट्ट्यांमधला प्रवास, नंतर मोठा झाल्यावर कॉलेजला जातानाचा रोजचाच पी.एम.टी. प्रवास. पी.एम.टी. प्रत्येक पुणेकराच्या मनात एक धृव स्थान तयार करून आहे.
पण काय हो ? कशी आहे पी.एम.टी. सेवा? तिचे कर्मचारी कसे वागतात प्रवाशांशी ? गाड्यांची कंडिशन कशी असते? तिला वेळेचं काही धरबंधन आहे का ?
सगळ्यांची ऊत्तरे नकारात्मक मिळतात. आहाहा काय ते पी.एम.टी वाहक आणि चालक.
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता खालील प्रमाणे :-
१) आपल्याला कमीत कमी शब्दात प्रवाशाचा कारण नसताना जास्तित जास्त अपमान करता आला पाहिजे.
२) आपल्या तोंडावर माईक टायसन सारखी मगृरी+घमेंड्+*डमस्ती असली पाहिजे.
३) आपल्यात पैसे खाऊ गिरी कुटून कुटून भरलेली असली पाहिजे.
४) बाई बद्दल थोडा सॉफ्टकॉर्नर असणे आवश्य. (वासूगिरी का काय ते)
५) थोबाड हे संवादासाठी नव्हे तर गुटखा किंवा तंबाखू साठवण्याचं कोठार आहे हे समजलं पाहिजे.
६) दृष्टीदोष असणे आवश्यक, तो बसस्टॉप १०० मिटर मागे किंवा पुढे आणि बहुतदा दिसलाच नाही पाहीजे या साठी.
७)आपण अशोक सराफ चे जबरदस्त फॅन असले पाहीजे, शर्टच्या पहिल्या ३ गुंड्या फक्त भरतकामाच्या आहेत हे कळल पाहीजे.
८) डोळ्यात एक प्रकारची लाली हवी.
९) नवख्या पॅसेंजरचा पोपट करण्याची कुशलता हवी.
१०) ५० पैशाचा क्षुद्र रक्कम न समजता, त्या लेव्हलचा भ्रष्टाचार करता यायला हवा.

या पात्रता असल्या तरच तुम्ही मग १० पास/नापास आहात का ? बेरीज-वजाबाकी जमते का? लिहीता वाचता येतं का ? या गौन गोष्टी विचारात घेतल्या जातात.

असे असतात पी.एम.टी. चालक :
चालक लोक हे सुरूवातीचं आणि शेवटचं स्टेशन फक्त मजबूरी म्हणून बस थांबवतात.फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर ऊपकार म्हणून थांबवतात (ऊरनारी माणसं गलका करतील, हे एक अजुन छोटंस कारण). बस मोकळी नेली तरी यांच्या तिर्थरूपांच काहीही जात नसतं. पी.एम.टी.चे ब्रेक्स एक तर अति टाईट नाही तर अति वाईट असावेत (अरे दृष्टीदोष असने ही पात्रता आहे नाही का ?) कारण क्वचितच बस योग्य ठिकाणी थांबते. आणि चालक प्रवाशांना कसं पळवलं याचा असुरी आनंद घेऊन मनात हसतो. हा, कोणी बाई कुठे दिसली की लग्गेच काच्च कन् बस तिच्या पायाजवळ थांबते बरका !! आज्जी-अजोबांना बस मधून ऊतरण्यास वेळ लागला म्हणून चालकाच्या बायकोची डिलेव्हरी हुकली अशा रागाने त्यांना २ शब्द बोलण्याचे अधिकार परमेश्वरानेच बहाल केले असावेत. कोणालाही बस मधे सहजा-सहजी प्रवेश मिळू नये, कारण यामुळे प्रवाशांना कोणतीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्याची जिद्द तयार होईल असा नेक हेतु या मागे असावा. चालक(पायलट) लोक पुण्याच्या अति खड्डेमुक्त रोड( हवाईपट्टी)वरून ही बस (विमान) फार शिताफीने चालवतात(उडवतात). जबरा. काही चालक तर ईतक्या जोरात गाडी हाणतात जणू काही त्यांना 'जोराची' लागलेली आहे .. कधी एकदा थेवटचा स्टॉप येतो आणि कधी मी 'सुलभ' मोकळा होतो असे त्यांना होत असावे
यांना चालत्या गाडीतुन साइड विंडोतुन तोंडामृत थुंकण्याचे जबरदस्त स्किल असते. स्टेरिंग सोडून तंबाखु मळण्यात यांचा हात कोणीच चोळू शकत नाही. आणि कोण आडवा गेला की हे लोक ऊभी शिवी देऊन आई-बहिणींचे पावित्र्य काढतात. घरी खाण्याचे हाल असोत पण एकदा का सिट वर बसलो की सबंध जगाला चालवण्याची ताकद आपल्यात आली असं हे लोक दाखवतात. बस मधे कोणी ओळखीचा चढला की त्याला खास चालक महाराजांशेजारी "इंजिनासनावर" बसण्याचा मान मिळतो, मग हे लोक वैश्विक विषयांवर भारी-भारी चर्चा करतात, ते ऐकण्याचं भाग्य फार थोर. चालकांना छोट्या गाड्यांना कट मारणे, दुचाकीवाल्यांना दाबून रोडखाली ऊतरवणे,एखाद्याच्या पार जवळ जाऊन बसं थांबवून त्याला चादरीसारखं पांढरं करणे या लिलांपासून एक स्वर्गिय आनंद मिळत असावा.
अशाच सौजन्यमुर्तीचा एक किस्सा :
एक इसम मुंबैहुन पुण्यात प्रथमच आलेले. भोसरी स्टॉपवर बस थांबलेली. चालक महाराज रेडीएटर मधे पाणी भरत होते. भोसरीची बहुतेक बस नाशिक फाट्याहूनच जाते(पिंपरी-चिंचवड कडे जाणार्‍या गाड्या सोडल्या तर). त्या इसमाने चालकाला विचारलं "बस नाशिक-फाट्याहुन जाईल काहो ? " , चालक (अत्यंत मंजूळ आवाजात्,ज्या आवाजात आपण कुत्र्याला हाकलतो) "नाय नाय .. बस आळे-फाट्यावरून जाते..." ... मी आणि आमचा ग्रुप मागेच बसलेलो .. "तिथे काय तुझी बायको व्याली आहे का रे लब्बाडा ? " --बाईच्या आवाजात अस्मादिक.आणि पुर्ण बस हास्यझटक्याने हालली. (ड्रायव्हरला थोडी अक्कल असल्याने बिचारा गुपचुप निघुन गेला. नडला असता तर पुर्ण भोसरी-मनपा त्याला नको नको ते ऐकावे लागले असते. आम्ही पी.एम.टी कर्मचार्‍यांविरूद्ध पुकारलेले हे बंड होते). त्याइसमाला सांगितलं बाबा बस तिकडूनच जाते बसा तुम्ही.. पण बाबांचा त्या चालकावर विश्वास, परत ४ लोकांना विचारून चौकशी करत होते. असो ..
असाच एक विनोद आठवला , एक माणूस रोज कामाला जाण्यासाठी सकाळी ९च्या बस ची वाट पाहत असे. एक बस चालक हटकुन थोडी पुढे बस थांबवत असे. आणि माणुस चढायच्या आत पुण्हा बस चालू करून जात असे. एकदा माणसाला बस पकडण्यात यश आलं. तो ड्रायव्हर ला म्हणाला , ही बस काय तुमची आई आहे का हो ? चालक - "नाही", माणूस- "मग बहीण ? " चालक - "नाही", मग बायको असेल, चालक म्हणाला नाही बुआ ...
माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "

असे असतात पी.एम.टी.चे वाहक :
वाहक हे चालकाला बरोबर कॉप्लिमेंट देत असतात. यांचा पॅसेंजर्स शी जास्त संबंध येतो. हे लोक तोंडात मध घेऊनच असतात. बाई बरोबर कशी वासूगिरी करावी यात एकदम निष्णात. आणि कोणी कॉलेजचा पोर्‍यादिसला रे की त्यांचा टोनच बदलतो. म्हणूनच आम्ही असे वाहक फाट्यावर मारलेत (लिट्रली). यांना पैशाचं फार मोल असतं. ५० पैसे देखिल हे लोक खाण्याच सोडत नाहीत. प्रवाशाने टिकीट मागणे म्हणजे आपला अपमान आहे आणि उरलेले सुट्टे मागणे म्हणजे या बाप्पूला त्याची २ एकर बागायतीच मागितली असं वाटतें.आपण पी.एम.टीचे मालक आणि प्रवाशी आपले कर्जदार आहेत अशी वाहकाची समजूत असते. कोणी दरवाज्यात उभा राहीला की यांना मिरची का लागते कळत नाही. स्वतः तिथेच ऊभे राहतील मग. सकाळी सकाळी १००-५००ची नोट काढणार्‍याची हे लोक भारी आरती करतात. प्रवाशाला बस मधे घेऊन आपण फार ऊपकार केलेत अशी यांची धारणा असते.कोणी यांना अमुक ठिकाण आले की सांगा हो असं विचारलं की हमखास माणूस २ स्टेशनं पुढे ऊतरून पुण्हा रिटर्न येतोच.बाकीच्या पैशांसाठी हे लोक प्रवाशाला शेवटच्या स्टॉप पर्यंत रखडवतात.बिचार्‍या प्रवाशाचा जिव हरणीच पाडस व्याघ्रिये धरीयेले सारख्या हरणी सारख होतं ...आणि शेवटी जर काही घोळ झाला तर हे लोक "बेनिफिट ऑफ डाऊट" स्वता:ला घेतात. प्रवाशी काहीही करो .. पैसे मिळत नाहीत. काही वाहक हे बाजिराव असतात. त्यांनी प्रवाशाकडे येण्या पेक्षा प्रवाशाने त्यांच्या कडे जाऊन टिकीटासाठी भिक मागावी असे त्यांना अपेक्षित असते. अशा कंडक्टर्स कडे आम्ही कधीही जात नाही. आपसूकमग रागारागाने मागे येऊन टिकीट देताना त्याचं तोंड बघताना आम्हाला पण एक असूरी आनंद होतो.चालक -पॅसेंजर्स चे भांडण पी.एम.टी. मधे फार कॉमन आहे. आणि हे झाले की सगळे लोक अगदी सापा-मुंगसाची लढाई बघावी तसे कौतुकाने बघतात. आणि मधुनच येणार्‍या कमेंट्स फारच भारी असतात.एकदा टिपीकल बामन बाईचं सुट्ट्या पैशावरून कंडक्टर शी वाजलं. कंडक्टर आपण पैसे दिलेत या भुमिकेवर (नेहमीप्रमाणे) ठाम होता. पण बाईच पण बामनी रक्त होतं .. कडाक्कड भांडणाला सुरूवात झाली.. कंडक्टर नी अतिऍग्रेसिव्ह भुमिका घेत.."पैशे धिलेत आं.. बोलायच काम न्हाय सांगुन ठीवतो..च्यायला हेवडंच आसल तर सुट्ट काढायचं (आमच्या ग्रुप मधुन एक बायल्या आवाज ',काय काढायचं हो ?' )जास टरंमटरंम करायच काम नाय". बाई "काय पण हा निर्लज्जपणा ? ३ रुपयांसाठी कसे बोलताय ? तुम्हाला काही रित आहे की नाही...माझे ३ रुपये द्या नाही तर गाडी पोलिसस्टेशनात घ्या ". समोरचा जेवढं शुद्ध मराठी बोलेल त्याच्या १० पट वाहकाची मराठी खालवते. शेजारची बाई लगेच त्या बाईंच्या मदतीला धाऊन आली "होना! कित्ती निर्लज्ज असतात ही लोकं, मेले.." वाक्य तोडत वाहक " ए शेंगदाणे .. तुला काय करायचंय गं?" "तिला कुट घालायचाय"-पुन्हा ग्रुप मधुन एक बायल्या आवाज" भांडण पेटत पेटत जातं शेवटचं स्टॉप येतं .. बाई शेवटचे (बस मधले शवटचे,ती दिवसभर याला ३ लाख शिव्याशाप देणार हे नक्की.) ऊद्धारोद्गार काढून ऊतरतात. वाहक अगदीच काही झालं नाही असं दाखवून बेल मारतो.

अशी असते पी.एम.टी बस :
आहाहा ! आमच्या सारखे क्षुद्र काय ये वर्णन करणार या महान वस्तुचं ? पी.एम.टी.ला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला धुण्यात येतं (जाहिराती रंगवायच्या असल्यास तो अपवाद) ... ३६३ दिवस त्यावर हवा,पाणी, धुळ या गोष्टींचा परिणाम होऊन एक सुरक्षाकवच तयार झालेल असतं.एका धुळीने मळलेल्या बस वर कोणीतरी "आता तरी पुसा" अशी सुचना लिहीली होती. बर्‍याच सिटच्या मागे तुम्हाला पुण्याच्या मजनुने आपल्या लैलेच नाव लिहीलेलं आठळेल, किंवा आमका कसा *डवा किंवा *दर*द आहे. आमुक सर कोण्या मॅडमवर डोरे टाकतो, ई. गोपणीय माहीती पी.एम.टी. च्या सीट मागे मुद्रित असते. काही ठिकाणी सुचनांचे काने-मात्रे काढून त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याचा पुणेरीपण आपले पुणेरी पॅसेंजर्स करतात. तुम्ही कधी पी.एम.टी. च्या मागे बाईक चालवली आहे का हो ? कीतीही स्वच्छ रोड असू देत,पी.एम.टी मागे एक धूराळा ऊडवत चालते, जेने करून मागच्यांना त्रास व्हावा. जेंम्स बॉंड चित्रपटांत असाच फंडा त्याच्या गाडीसाठी इंप्लिमेंट केला होता. पी.एम.टी. ची अजुन एक खासियत म्हणजे, अशी एकही पी.एम.टी नाही, जिला कुठूनतरी एखादी खोच लागलेली नाही (हे नजर लागू नये म्हणून असावे) तिच्या अनेक खिडक्यांपैकी किमान एक तरी खिडकी निखळलेली असतेच. जिच्या सर्व खिडक्या शाबूत ती पी.एम.टी. नव्हेच. पी.एम.टी.चा गियर दांडू पाहिलाय का आपण ? तो एक मिटर व्यासाच्या वर्तुळाकार परिघात घुमत असतो. पी.एम.टी प्रवाशांच्या कंफर्ट चा फार विचार करते. म्हणूनच की काय ती एक चालते फिरते मसाज सेंटर आहे. त्यात बसलं की त्या व्हायब्रेशन्स ने तुमचा पुर्ण बॉडी मसाज होऊन तुम्हाला दिवस ऊत्साहात जाईल किंवा दिवसाचा थकवा निघेल.
पी.एम.टी. तुम्हाला संयम कसा ठेवावा हे शिकवते. बसची वाट पाहून पाहून तुमच्या संयमाला एक नविन ऊंची प्राप्त होते. आपल्या राहुल द्रविडच्या संयमाचं हे एक गुपित आहे. तोही पी.एम.टी. ची वाट पाहून पाहूनच शिकला असावा.
वेळेवर बस आली की तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला पाहीजे. आणि चालकाचा जाहिर सत्कार पण. पी.एम.टी एवढी मजबुत असते(दिसते) की काय सांगू... बहुतांश वेळा डाव्या बाजुला पुर्ण वाकलेली पी.एम.टी. पाहीली की पुणेकराने तिच्यावर किती बलाक्तार केला आहे असा विचार येवुन डोळे पाणवतात. काहींना पी.एम.टी. म्हणजे एक स्वर्गाचे दार वाटते. दर महिना एक बळी या हिशोबाने पी.एम.टी. यमराजाचं काम फुकट करते.

पण मला काही गुणांचं कौतुक करावसं वाटतं... हे चालक लोक कमालीचे डोंबारी आहेत. शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्यावरन दुचाकी चालवनं ही एक कौशल्याचं काम आहेत. आजुबाजुलाच बसलेले ओलं खोबरं,आलं,कोथंबीर विकणारे भाजीवाले, फेरीवाले, आणि पुण्याचे अतिशिस्तप्रिय वाटसरू लोक, आणि जेमतेम बसच्याच रुंदीचे रस्ते... यातुन आपला चालक शिताफीने वाट काढतो. वृद्ध व्यक्तींना चढण्या-उतरण्यास मदत करणारे वाहक आणि जरा जास्त वेळ बस थांबवुन "नीट ऊतरा हो मावशी, बस थांबलेली आहे, घाई करू नका!" असे म्हणनारे चालक ही आहेत पी.एम.टी. मधे.
वाकडे तोंड न करता अगदी ७ रुपयांच्या टिकीटासाठी १००ची मोड देणारे वाहक ईथे विरळच.सगळ्या प्रवाशांशी नम्र पणे हसत खेळत प्रवास करवणारे वाहक " मधले पुढे चला, गर्दी करू नका , ऊतरणारे पुढच्या दाराने ऊतरा " एका विशिष्ट तालीत म्हणतात तेंव्हा मजाच वाटते. गणपती, दसरा,दिवाळी ला आपल्या बसला चालक-वाहक मस्त सजवतात. जणु आपल्याला रोजी-रोटी दिल्याबद्दल एक छोटीशी परतफेड. सगळे चांगले-वाईट अनुभव घेऊन पण मला माझ्या पी.एम.टी.चा अभिमान आहे. तिच स्थान प्रत्येक पुणेकराच्या मनात अढळ आहे. म्हणूनच कोणी तरी म्हंटलं च आहे...

वाट पाहीन ... पण पी.एम.टी. नेच जाईन..

---------------------------------------------------------------------------------------------------टारझन (१६-०८-०८)

राहती जागाप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

16 Aug 2008 - 8:38 pm | सखाराम_गटणे™

मी आताशी अनुभव घेतोय. ६ महीन्यापुर्वीच प्रथम पुण्यात आलोय.

पी.एम.टी. मात्र जबरा आहे, पुण्यातील लोक हे विनातक्रार स्विकारतात हे पण नवलच आहे.
पी.एम.टी. सारखीच टी.एम.टी. आहे.

सखाराम गटणे

मदनबाण's picture

18 Aug 2008 - 9:14 am | मदनबाण

अगदी योग्य वर्णन केल आहेस...
पी.एम.टी. सारखीच टी.एम.टी. आहे.

टी.एम.टी ची तर कथाच न्यारी आहे..मध्यंतरी एका बसची मागची चाकेच निखळली होती असे वाचनात आले आहे..
माझेही असेच दिव्य अनुभव आहेत टी.एम.टी. बद्दल, कधी सवडीने सांगीन म्हणतो..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मैत्र's picture

16 Aug 2008 - 8:45 pm | मैत्र

टारझन भाऊ,
एक नंबर... त्या पी एम टी च्या दिव्य दिवसांची ... एका दहा फुटी खांबाला ती एक ठराविक छोटीशी पिवळी पाटी इतकीच आयडेंटिटी असणार्‍या स्टॉपवर भर पावसात बसची आणि ती सुमारे दहा वीस फुटात तरी कुठे तरी थांबण्याची योगसाधना आठवली...
बेष्ट परफेक्ट वर्णन.. झकास लिहिलं आहेस...
आणि शेवटही बरोबर आहे.. जिथून बाइक काढताना घाम फुटतो अशा गर्दीतून आणि अरूंद रस्ते, मान्यवर पुणेकर वाहन चालक, पुणेरी फुलनदेवी यातून कोणालाही धक्का न लावता ती एका बाजूला कललेली पी एम टी, क्लच नावाची कुठलीही गोष्ट न वापरता ज्या कौशल्याने हाकतात त्याबद्द्ल त्यांना पद्मश्री मिळायला पाहिजे नाहीतर अशोक चक्र तरी... (कालच वाचलं की हे शांतता काळातलं सर्वोच्च पदक आहे)...
इंजिनिअरिंग मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी शिकलो होतो... पी एम टी आणि मुंबई लोकल साठी काय वापरला असेल काही कल्पना नाही...
पण ते लिमिट क्ष टेन्ड्स टू इन्फिनिटी तसा काही प्रकार असावा... नाही तर पहिल्याच दिवशी असा विलक्षण जनभार घेऊन स्वारगेट कर्वे रस्ता हडपसर सिंहगड रस्ता निगडी असल्या मार्गावर धावताना बसने ताबडतोब मान टाकली असती...
त्या धुळीने भरलेल्या काचेतला तो नंबरचा बोर्ड... रात्री झीरो पेक्षाही कमी वॉटचा एक दिवा तो बोर्ड वाचण्याचा प्रयत्न करून जनतेची मोफत नेत्र तपासणी व्हावी म्हणून लावण्यात यायचा...
दहा पंधरा वर्षापूर्वी काही बसेस होत्या त्या तेव्हा सुमारे पंधरा वर्ष जनसेवा करून थकल्या होत्या.. १११/ १२ वगैर कॉलेज तरूणी सारख्या बसेस पुढे या ५५/५६ या शनिपार च्या बसेस नऊवारीतल्या हळू चालणार्‍या आजीबाईंसारख्या वाटायच्या ... आणि का कुणास ठाऊक .. थोड्या तशाच प्रेमळही...
पी एम पी एल करून का होइना पी एम टी टिकून आहे हाच आनंद...
जादू काही होत नसते.. पण काही तरी मार्गाने पी एम टी जर खरंच सुधारली आणि पुण्यातल्या दुचाकी त्यामुळे कमी झाल्या तर पी एम टी ची इतक्या वर्षांची जनसेवा सत्कारणी लागेल...
अजून लिही रे टार्‍या...

अस्सल पुणेकर... :)

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Aug 2008 - 9:01 pm | ब्रिटिश टिंग्या

लेख चांगलाय!

असो, पी.एम्.टी बद्दल बोलणे हे आमचे राखीव कुरण आहे. त्यामुळे तुर्तास इतकेच!

(बस क्र. ५४ चा बर्राच जुना प्रेमी) टिंग्या

आनंदयात्री's picture

16 Aug 2008 - 11:41 pm | आनंदयात्री

=))
कुबड्याच्या लेखाचे तर आपण फ्यान झालो बॉ !!

(बस क्र. २६ अन बस क्र. २ चा बर्राच जुना अन कट्टर दुश्मन) टिंग्या

टारझन's picture

16 Aug 2008 - 9:34 pm | टारझन

हे पहा आमचे पी.एम.टी. चालक - कशी काय गाडी काढतात तेच जाणोत.

जुन्या गाड्या -- आहाहा ! सो सेक्सी .. इजंट इट ?

आताच्या नविन गाड्या ... वाव ... पण १ वर्षात हिचं रुपांतर वरच्या बस सारख होणार हे निश्चित

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2008 - 12:02 am | भडकमकर मास्तर

टार्‍या, भारी लेख...
..
२७ नंबर भारतीच्या बसमध्ये एक ९६ ९७ साली एक ड्रायव्हर होता तो महाभयंकर वेगाने गाडी चालवत असे, मी बसमध्ये असताना एकदा त्याने रस्त्यावरच्या एका म्हातार्‍याला पाडले होते ( वाचला तो, नशीब त्याचे)... त्याच ड्रायव्हरवरती टिळक रोडवर एका चौकात थांबलेल्या पी एम टीच्या काही अधिकार्‍यांनी बेशिस्त चालक म्हणून काही कारवाई केल्याचे आठवते.

आणि शेवटी चार शब्द चांगल्या कंडक्टर + ड्रायव्हरबद्दल लिहिलेस तेही उत्तम...
....
हे सारे असले तरी आपल्याला पी एम टी आवडते.

वाट पाहीन पण पी एमटीनेच जाईन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

Pain's picture

20 May 2010 - 1:51 pm | Pain

२७ नाही २८ नंबर ची बस...भारती विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ.
अधुन मधुन दांड्या असायच्या... बाकी अनुभव ठीक.

प्रमोद्_पुणे's picture

20 May 2010 - 2:38 pm | प्रमोद्_पुणे

२७ नंबर पण आहे की शिवाजीनगर ते भा. वि. ही साहीत्य परिषदेवरून जाते . स.प., बेहेरे, पुरंदरे क्लासचे बरेच पब्लीक यात असते.

अमोल केळकर's picture

17 Aug 2008 - 10:03 am | अमोल केळकर

पी.एम्.टी चे मस्त वर्णन

कालच पुण्यात पी.एम टी ने प्रवास केला. स्वारगेट ते विठ्ठल वाडी ( सिंहगड रोड ) रिक्षाभाडे ४० रु. तेथे पी.एम टी भाडे फक्त ३ रु?
बहुतेक वाहक तिकिट द्यायला चुकला असेल .

(पुण्यातील थंडीने गारठलेला मुंबईकर ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

देवदत्त's picture

17 Aug 2008 - 11:29 am | देवदत्त

स्वारगेट ते विठ्ठल वाडी ( सिंहगड रोड ) रिक्षाभाडे ४० रु. तेथे पी.एम टी भाडे फक्त ३ रु?
बसचे भाडे कमी की रिक्षाचे जास्त? नाहीतरी रिक्षावाल्यांची मनमानीही चालतेच की तिकडे. अर्थात ३ रू हे भाडे कमीच आहेत आजकाल.

सहज's picture

17 Aug 2008 - 10:05 am | सहज

मस्त लिहले आहे रे!!!

फोटो भारी. :-)

और भी लिख्खो!!

पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता मुद्दे वाचून व वरती आद्यमास्तरांचे नाव वाचुन आठवले की पुण्यातील एक रावसाहेब नक्की ह्याचे "क्लासेस" काढू शकतील :D

घाटावरचे भट's picture

17 Aug 2008 - 10:32 am | घाटावरचे भट

मस्त लेख लिवलाय रे टार्‍या....आपली पीएमटी कशी पन असली तरी लै भारी है...

(बस क्र. १०० मनपा-हिंजवडी चा एकेकाळचा नियमित प्रवासी) भटोबा
(कारण कंपनीची बस नेहेमी चुकायची ना उशिरा उठल्यामुळे...)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Aug 2008 - 11:20 am | डॉ.प्रसाद दाढे

मस्त वर्णन!
आणखी काही निरिक्षणे:
१) कुठल्याच पीएमटीचा हॉर्न वाजताना मी ऐकला नाहीये.. कुठल्याही गाडीच्या मागे उभे राहिले की इ॑जीनचा ढर्राम ढर्राम आवाज करून भेडसावतात
२) मड फ्लॅपचा शोध पीएमटीला अजून लागला नाहिये, त्यामुळे पुणेरी धुळीची पुरेपुर चव मागून जाणार्‍याला लाभते
३) बसमधील प्यासि॑जरही थु॑कण्यात माहिर आहेत, त्यामुळे ओव्हरटेक करता॑ना कुणी बाबा खिडकीतून पि॑क टाकण्याच्या पोझमध्ये नाहीना ते पाहावे लागते. एकदा परिक्षेला जाताना एकाने माझा शर्ट र॑गविला होता, मी त्याचे कानशिल र॑गविले!
४) ब्रेक लाईटस, वळण्याचे इ॑डिकेटर वगैरे क्षुद्र एक्सेसरीज गरीब पीएमटीला परवडत नाहीत. त्यामुळे अमुक बस पुढे जाणार , था॑बणार का वळणार हे मागच्या चालका॑नी अ॑तर्ज्ञानानेच जाणून घ्यायचे असते.
५) अनेक पीएमटी ब॑द (स्विच ऑफ) केल्या तर पुन्हा चालूच होत नाहीत ह्या सबबीखाली रात्रभर चालूच ठेवतात म्हणे!
६) पीयूसी, प्रदूषणमुक्त वाहन वगैरे गोष्टी॑चा त्या॑चा काहीच स॑ब॑ध नाही. ट्रॅफिकवाले मामा पीएमटीला कधीच अडवत नाहीत (कमाई काय?)
६) सर्व स्टॉप (सध्याचे बीआरटी सोडले तर) रस्त्याच्या डावीकडेच असता॑ना, पीएमटी कायम दुभाजकाला चिकटून (म्हणजे उजव्या जलद लेनमधूनच) चालवतात. व स्टॉप जवळ आला की खस्सकन डावीकडे घेतात. मग त्यात बसच्या डावीकडून शा॑तपणे चाललेला एखादा गाफील पुणेकर जीव गमावतो :( अर्थात श॑भर कोटी॑च्या देशात माणसाच्या जिवाला काय कि॑मत म्हणा. तेव्हढीच लोकस॑ख्या कमी होते
७) महिन्याला नाही पण आठवड्याला एक तरी बळी मिळवितात! ( आमची पीएमटी कुटू॑बनियोजनाला अफलातून पर्याय आहे)

टारझन's picture

17 Aug 2008 - 11:43 am | टारझन

जबरा आणि अचुक पंचनामा....
=))

१) कुठल्याच पीएमटीचा हॉर्न वाजताना मी ऐकला नाहीये..
आहो गरजच काय ? एवढा १०,०००-१२,०००सीसी चा मोठा हॉर्न असताना....एक नाममात्र हॉर्न असतो, जो पाववल्याच्या सायकल ला पण असतो, पण तो फक्त ड्रायव्हरलाच ऐकु येतो... =))

४) ब्रेक लाईटस, वळण्याचे इ॑डिकेटर वगैरे क्षुद्र एक्सेसरीज गरीब पीएमटीला परवडत नाहीत. त्यामुळे अमुक बस पुढे जाणार , था॑बणार का वळणार हे मागच्या चालका॑नी अ॑तर्ज्ञानानेच जाणून घ्यायचे असते.
नेमकं हेरलंत डॉक्टर .... पूण्यातला अनुभवी माणुस पी.एम.टी.च्या कधीही डाव्याबाजुने चालत नाही. आणि काय ते इंडीकेटर्स हो... छे... अपमान आहे तो पी.एम.टी. चा.
५) अनेक पीएमटी ब॑द (स्विच ऑफ) केल्या तर पुन्हा चालूच होत नाहीत ह्या सबबीखाली रात्रभर चालूच ठेवतात म्हणे!
सहमत, पण रात्री नाही... दिवसा.. ह्या गाड्या सकाळी ५-६ ला चालु झाल्या की डायरेक्ट रात्री लास्ट फेरी नंतर बंद होतात.

७ही मुद्दे सहमत...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

देवदत्त's picture

17 Aug 2008 - 11:33 am | देवदत्त

वर्ष २००० मध्ये पी एम टी चा प्रवास केला होता. जवळपास २ महिने, शनिवार व रविवार.
आता किती बदल झाला माहित नाही. आणि सध्या पुण्यात बसकरीता वेगळा रस्ता ठेवणार होते त्याचे काय झाले?

टारझन's picture

18 Aug 2008 - 9:25 am | टारझन

आता किती बदल झाला माहित नाही.
आता ४ नव्या व्होल्वो गाड्या (बी.आर.टी){स्वारगेट-हडपसर बहुतेक} आणि बर्‍याच नव्या गाड्या आल्यात. पण चालक-वाहक लोक पी.एम.टी.ची क्वालिटी राखुन आहेत. :)

आणि सध्या पुण्यात बसकरीता वेगळा रस्ता ठेवणार होते त्याचे काय झाले?
=)) तो एक लै भारी जोक झालाय. त्याने बाकी ट्राफिकचा बोर्‍याच वाजवला आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

देवदत्त's picture

18 Aug 2008 - 10:49 pm | देवदत्त

आता ४ नव्या व्होल्वो गाड्या (बी.आर.टी){स्वारगेट-हडपसर बहुतेक} आणि बर्‍याच नव्या गाड्या आल्यात
ह्म्म्म मागील वर्षी पुण्यात होतो तेव्हा पाहिली होती एक. पण प्रवास करण्याची हिंमत नाही केली ;)
आमची दुचाकी किंवा मग रिक्षाच...

बी आर टी साठी ठेवणार होते .....
करदात्यांचे ६५ कोटी रुपये फुकले गेले त्यात .....

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Aug 2008 - 11:48 am | डॉ.प्रसाद दाढे

मीतरी जे॑व्हा दुचाकीवर असतो ते॑व्हा दूरून जरी पीएमटी दिसली तरी रस्त्याच्या कडेला था॑बतो व ती पूर्ण दिसेनाशी झाली की गाडी चालू करतो ! हो, अजून जगायच॑य ना :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2008 - 5:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉक्टरसाहेब,

मी पण तंतोतंत असंच करते, सहकुटुंब (नवरापण हेच करतो)!

यमी

रामदास's picture

17 Aug 2008 - 11:51 am | रामदास

सुंदर लिहीलं आहे.घर दूर असल्यावर जास्त जवळ येत जातं.

विनायक प्रभू's picture

17 Aug 2008 - 5:15 pm | विनायक प्रभू

कधी न होणार्या कोन्स्टीपेशन चा त्रास झाला त्यावर पी.एम्.टी चा प्रवास हा उपाय पुणेकरानेच सुचवला होता.
विनायक प्रभु

ऋषिकेश's picture

17 Aug 2008 - 7:47 pm | ऋषिकेश

टारोबा!
लई झ्याक! मजा आली वाचताना..
पीएम्टीच्या चालक, वाहक, बस वगैरे बरोबरच केवळ पीएमटीचे असे जे प्रवासी आहेत तेही याचा अविभाज्य भाग आहेत. आणि तेही बाकी घटकां इतकेच मजेशीर (!) असतात :)
त्या पीयम्टी-पाशिंजराबद्दलही तुझ्या शैलीत वाचायला आवडेल

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु's picture

18 Aug 2008 - 2:39 am | प्राजु

पी.एम. टि बद्दल बराच अभ्यास आहे रे खविसा तुझा!
मला आलेला अनुभव माहीती आहे.. का? खरंतर समस्त सिटीबस सिस्टीमशी माझं काहीतरी वाकडंच आहे. म्हणजे असं की, मी बस स्टोप वर उभी असले की हमखास बस उशिरा येते किंवा कधी कधी नाहीच येत. कोल्हापूर असो.. पूणे असो की अगदी चक्क हार्टफर्ड असो. मी बसला उभी असले की, बस येणारच नाही. माझ्यामुळे बाकीच्यांच्या बसेस चुकतात. कारण मी स्टोप वर उभी माझ्यासोबत आणखी २-३ जण आणि बस मात्र येत नाही आणि आलीच तर किमान ३५ मिनिटे उशिरा.
पण पुण्यात १-२ वेळा मला बस मिळाली . म्हणजे मी बस स्टॉपवर उभी नव्हते. कोणती रिक्षा करावी असा विचार करत असताना समोर कोथरूड डेपोची बस दिसते आणि चक्क मी पळत जाई पर्यंत कंडक्टर बस थांबवून ठेवतो बस. किती नशिबवान ना मी!!
पण तसा बस या वाहनाशी संबंध कमीच आला. त्यामुळे तू लिहिलेला लेख मनापासून आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

20 May 2010 - 6:48 pm | संदीप चित्रे

तुझ्या घरून परत येताना माझ्या बसला छोटासा अपघात झाला असावा का :?
-----------
लेख आवडला रे टार्‍या.
खूप वर्षांपूर्वी पी.एम.टी. ने केलेल्या प्रवासाचे व्रण अजूनही ताजे आहेत.

भाग्यश्री's picture

18 Aug 2008 - 5:46 am | भाग्यश्री

टारझना, लेख खूप आवडला.. मला पीएमटीचा विशेष अनुभव नाही..(स्कार्फ लावून दहशतवादी) स्कूटी झिंदाबाद! :) पण ४-५ वेळा गेले तेव्हा दर वेळेला इतक्या कमी पैशात आपण इथून तिथे जाऊ शकतो (मोस्ट ऑफ द टाईम्स सेफली!) याचं खूप आश्चर्य वाटलं होतं.. खूप चांगली सोय आहे ती.. केव्हढी ती जबाबदारी असते ड्रायव्हरवर, कशी चालवतात बस त्यांनाच ठाऊक! जरी खूप वेळा प्रवास नसला झाला तरी गर्दी नसेल तर बसने जाणे केव्हाही उत्तम.. बसेसना ठराविक पॅसेंजर्स वगैरे लिमिट का नसतं कोण जाणे, कारण बसने न जाण्याचे मेन कारण अतोनात गर्दी हेच असायचे.. असो.. लेख आवडला!

अनिल हटेला's picture

18 Aug 2008 - 9:54 am | अनिल हटेला

@ लेखक महोदय !!!

छान लिहीलये !!!!

नेहेमी प्रमाणे अगदी खवीस टच आहे !!

+१ ~~~~~~

पन ह्याच पी एम टी चा एक चालक १५ वर्षापासुन एकही अप्घात न करता सर्वीस करतोये...
नाव आठवत नाही...पण पुणे शहरात हे तरी अशक्य आहे ...

शिवाय वयस्कर लोकाना मदत करणारे ,
प्रवासी आया बहिनी साठी रोड रोमीयो च्या कानपूरामाग जळगाव काढनारे सुद्धा
वाहक -चालक ही पाहिलेत मी....

तु लिहीलेल जितक खर आहे ,
तितकच हे सुद्धा खर आहे की वाहक चालक ही मानस आहेत, राव....

आणी खर सांगु तर बदलतीये रे पी एम टी.....

असो ...

( एके काळी ४२ नं चा प्रवासी )

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरद's picture

18 Aug 2008 - 10:11 am | वरद

>>> फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर ऊपकार म्हणून थांबवतात...... ११०% सहमत रे....
( अरे मायकल शुमाकरने पी.एम.टी मध्ये प्रशिक्षण घेतले असावे )

“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”

पी.एम.टी. , टी. एम. टी. ( ठाण्याची) , के. डी. एम.टी. ( कल्याण्-डोंबिवलीची) , एन. एम.एम.टी. ( नवी मुंबईची).....
सगळ्या एम. ट्या. सारख्याच आहेत रे भौ ....

मृगनयनी's picture

18 Aug 2008 - 12:50 pm | मृगनयनी

टार्या... तुझा पी.एम. टी. बद्दल चा हा व्यासंग पाहून मन भरून आलं.......

थोडक्यात.... पी.एम. टी. चा "भूत/ वर्तमान/ भविष्य " "काळ" तू कोळून प्यायलायेस.........
तू त्यावर पी. एच. डी करायला समर्थ आहेस.........
आणि हे मनावर घेऊन जर चुकुन्-माकुन तू पी. एच. डी केलीस, तर तुझी पात्रता 'नोबेल' पेक्षा कमी असुच शकत नाही......
एकाच वेळी तु भारत आनि आफ्रिका या दोन्ही देशांची मान उंचावशील्.(जिराफासारखी..)

:)

>> --टार्या... तुझा पी.एम. टी. बद्दल चा हा व्यासंग पाहून मन भरून आलं.......

मागे एकदा मी पद्मश्री शरद जोशींचं "भारतीय रेल" वरचं कथाकथन दूरदर्शन वर पाहिलं होतं ... त्याची आठवण झाली...

त्यांचा कथाविषयाचा व्यासंग अफाटच असायचा ... #:S

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2008 - 5:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टारूबाळ, चांगला नाही, लय भारी लिहिलं आहेस (स्वगतः जळ्ळं तुला कोणी चांगलं लिहिण्यापासून अडवत नाही आहे). मी तुझीही फ्यान झाले आहे.

सायबाच्या देशात राहून प्रत्येक abbreaviation चा उच्चार करण्याची सवय लागली, GMRT चं ग्रम्ट झालं, तसं मला PMPML ला पंपंल (हा ल पूर्ण म्हणायचा) असं फार वेळा वाटतं.

चतुरंग's picture

18 Aug 2008 - 9:38 pm | चतुरंग

'पीएमटी' ची एकदम टकाटक वाजवली आहेस की!

मी पीएमटीने फार प्रवास केलेला नाही पण जो काही थोडाफार मला (माझ्या गतजन्मीच्या पुण्यामुळे असेल) अनुभवायला मिळालाय तो मी कधीही विसरु शकणार नाही!
एक खराखुरा किस्सा -
दातांना मिश्री-बिश्री लावलेली, डोक्यावरुन पदर असलेली, एक नऊवारी आज्जीबाई दोन्ही हातात पिशव्या घेऊन पीएमटित चढते. बसायला जागा नसतेच. एक पिशवी खाली ठेऊन दुसर्‍या हाताने वरचा बार धरुन आज्जी उभी. अशा रीतीने तिचे दोन्ही हात अडकलेले.
वाहक : आज्जे, कुटं जायाचं?
आज्जी : इंदिरानगर द्ये बाबा एक.
वाहक : (तिकिट देत) आज्जे, हे घे, आन साडेचार रुपये, सुटं दे काय?
आज्जी : आरं माजं हात गुतलं हाइत रं मागुन देते.
वाहक : आता, मागुन कधी? चल लवकर दे दे!
आज्जी : आता मग तू आसं कर, माज्या हातातली पिशी तरी धर नायतर मग माजा हात तरी धर त्याबिगर मी पैशे रं कसं दिऊ?
आज्जीचे हे खणखणीत बोल ऐकून सगळ्या बसमधे हसण्याचे फवारे उडाले. वाहकसुद्धा हसायला लागला.
शेवटी एकेठिकाणी बसायला जागा मिळाल्यावर आज्जीनी त्याचे पैसे दिले.
(अपघात सोडले तर पीएमटीचा प्रवास ही एक धमाल असते हे बाकी बर्‍याचवेळा खरे आहे. एकदा अनुभवून बघाच. समाज चहू अंगांनी जिवंत असल्याचे हे लक्षण आहे असे मला वाटते!)

चतुरंग

रेवती's picture

19 Aug 2008 - 7:18 am | रेवती

छानच लिहीतोस तू! पी. एम. टी ची विनातिकिट फेरी छान झाली.

समाज चहू अंगांनी जिवंत असल्याचे हे लक्षण आहे असे मला वाटते
चतुरंग, हाच जिवंत समाज गर्दीचा फायदा चहू अंगाने कसा घेतो ते पोरीबाळींना बरोब्बर माहितीये!

रेवती

शितल's picture

19 Aug 2008 - 8:41 am | शितल

पी.एम्.टी. भारी चालवली आहे मिपा गावी. :)
एक वाचलेली का का ऐकिव पी.एम्.टी. ची गंमत सांगते.
एका पॅसेन्जरने १०० रू. ची नोट वाहकाला दिली , सकाळची ऑफिसची वेळ, गर्दी अशी नेहमीची जत्रा चालु होती.
तर ती नोट वार्‍याने उडाली आणि खिडकीतुन बाहेर गेली, वाहक आणि पॅसेन्जरची शाब्दिक जुंपली.
मग बस थांबवली, बाकीच्य पॅसेन्जरस वेळ होत होता म्हणुन ओरडु लागले, मग बस मधील इतर पॅसेन्जर पैसे गोळा करून त्याला दिले, आणि मग गाडी रस्त्याला लागली :)

मनस्वी's picture

19 Aug 2008 - 12:54 pm | मनस्वी

छान लिहिलंएस टार्‍या!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

गीतांजली's picture

19 Aug 2008 - 3:22 pm | गीतांजली

पी.एम्.टी. ला आम्ही "पळणारा मोडका टेम्पो" म्हणत असू.

सरकार's picture

19 Aug 2008 - 7:36 pm | सरकार

टारझना, जबरी !!

मलाही सुदैवाने एक साक्षात्कार झालाय....तो असा....
एकदा VIT कॉलेज हुन स्वारगेट ला निघालो होतो आमच्या 13 नं. ने.पद्मावती स्टॉप सोडुन बस निघाली आणि तोच "पी.एम.टी.चा गियर दांडू" बदलताना तो जो अडकला तो हलेचना ! Driver साहेबानी खूप प्रयत्न केला पण व्यर्थ !! शेवटी महाराजानी ऊठून जो का लाथ घातली 'त्या गियर' च्या कंबरड्यात,तो साला अगदी सरळ झाला आणि बस स्वारगेट ला पोहचेस्तोवर अशी गेली जणू काही झालेच नाही....!!

- सरकार

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Aug 2008 - 7:54 am | llपुण्याचे पेशवेll

टारझन भाऊने तर लईच भारी लिहीले आहे. पण अजून एक...
प्र. बाई चालवत ४चाकी गाडी आणि पी. एम. टी. मधे काय साम्य आहे?
उ. वरील पैकी कोणतीही एक गोष्ट रस्त्यावरून जात असेल तर कंसाचा रथ रस्त्यातून जात असताना मथुरेतील प्रजाजन जसे रस्त्यावरून बाजूला होण्यासाठी सैरावैरा पळत सुटत तसे पुणेकर रस्त्यावरून बाजूला होतात. असा हा पी. एम. टी महीमा अगाध आहे.
मागे एकदा फातिमानगराच्या आसपास कुठेतरी पी. एम. टी. एका दुचाकीला धडक दिली आणी त्यात ३ माणसे मेली. कारण दुचाकीवरून ३ जण चाल्ले होते. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत होते. तरीही संतप्त जमावाने पी. एम. टी. फोडली आणि चालकालाच मारहाण केली. हा पी. एम. टी. वर अन्याय नाही काय?

पुण्याचे पेशवे

झकासराव's picture

21 Aug 2008 - 2:45 pm | झकासराव

टारझना
लई भारी रे.
जबरा जमलाय लेख. :)
पात्रता निकष ग्रेट :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

फारतर नेने's picture

25 Sep 2008 - 8:35 pm | फारतर नेने

टारु भाऊ,
मस्त लिहिलय बरं का.

पी.एम.टि. चे चित्रच डोळ्यासमोर ऊभे राहिले.

>> माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "
लै भारि... :-)

पी.एम.टि. चा क्वचित प्रवासी.
फारतर नेने

baba's picture

26 Sep 2008 - 2:58 am | baba

मस्त जमलाय.....

मी पी.एम.टि. ने जास्त प्रवास नाहि केला परन्तु ती डायवर मन्डळी (वाहन चालक) ज्या प्रकारे गाडी चालवतात त्या मधे त्यान्चा काहि दोष नाहि असे वाटते, रोड वरील ट्राफीक बघता...

प्रत्येक पी.एम.टी वाहक आणि चालक त्यान्च्या प्रमाणे चान्गली सेवा देत असेल.. आपले एक्स्पेक्टेशन्स वाढलेत तर त्यानी काय करावे?

बाकि लेख मस्तच... " मग मला चढून का देत नाही ? " हे तर साहिच !!

(बेस्ट आणि एस. टी. ने प्रवास केलेला) बाबा

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2008 - 1:28 pm | सखाराम_गटणे™

पी.एम.टि. चा वक्तशीर पणा बघुन मी स्वता:च्या गाडीचा विचार करतोय.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

टारझन's picture

2 Oct 2008 - 12:04 am | टारझन

पटकन् घे लेका ... आज काल गाडी (चारचाकी) असणे बर्‍याच दृष्टींनी महत्वाचे आहे ...
काळ्या काचा आणि हायड्रॉलिक्स पण बसव कळलं का ?

लेख आवडलेल्या / न आवडलेल्या आणि प्रतिक्रिया दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार .. जरा उशीरच झाला .. पण असो .. उत्तम आहे ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 12:50 am | सखाराम_गटणे™

>>काळ्या काचा आणि हायड्रॉलिक्स पण बसव कळलं का ?
त्या साठी घर आहे, चांगला सागवानी पंलग घेईन ना..
मला अधिक्रुत मध्येच रस आहे.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

म्हणजे पाय कायमच सुरक्षित ठिकाणी ठेवले जातील! ;)

चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 12:51 am | सखाराम_गटणे™

हो, पाय नसतील तर भविष्य अंधारमय आहे.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

चाफा's picture

26 Oct 2008 - 12:10 am | चाफा

मला अनुभव नाही पी.एम.टी. चा खास ! पण एकंदर जबरी लिहीलेय टारझन राव तुम्ही :)

जेन's picture

26 Oct 2008 - 2:29 am | जेन

झका आ आ आ आ आ आ आ आ आ आ स.............
काय लिहीलेस रे टार्‍या........
पूण्यात राहण्याचा अनुभव नाही झाला आतापर्यंत पण ही गोष्ट वाचून असा वाटला की जणू मी पूण्यातच किती वर्षाने राहते.....
मला तर खूपच आवडला.....
बारिक द्र्ष्टीने १ एक वर्णन केले आहे.....
आमची बेस्ट पण अशीच आहे.....
एक दमच लै भारि...
असेच लिहीत रहा......

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 2:17 pm | सखाराम_गटणे™

पुणे पिमटी खटारा आहे.
कालच पीएम बरोबर बोलताना, सगळ्या माहीत असलेल्या शिव्या दिल्या.
बेस्ट चा हात कोणी धरु शकत नाही.
--

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

टारझन's picture

26 Oct 2008 - 2:54 pm | टारझन

पुणे पिमटी खटारा आहे.
सहमत

कालच पीएम बरोबर बोलताना, सगळ्या माहीत असलेल्या शिव्या दिल्या.
डोळे झाकून सहमत ... पीएम आणि लोक ऑफिसात काय काम करतात ते कळालं

बेस्ट चा हात कोणी धरु शकत नाही.
सहमत . बेस्टला हात असतो ही माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .. पी.एम.टी. बेस्टचा हात धरायला मुंबैला जाणार नाही असे ढोबळ विचार करता वाटते ...

एकूण सहमत सहमत सहमत, बेस्ट मधे बाल-विवाह किंवा बोळे-काढणे सल्ला केंद्र सुरू करावे असा धागा काढण्याचा विचार आहे ..

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 3:11 pm | सखाराम_गटणे™

>> पीएम आणि लोक ऑफिसात काय काम करतात ते कळालं
कुठे तरी सराव करावाच लागतो ना.
नाही तर मुख्य सामन्याच्या वेळी काय करणार आम्ही चापेल कडुन शिकलो आहे.

>> बेस्ट मधे बाल-विवाह किंवा बोळे-काढणे सल्ला केंद्र सुरू करावे असा धागा काढण्याचा विचार आहे ..
तो, तुमचा प्रश्न आहे.

----

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

टारझन's picture

26 Oct 2008 - 3:21 pm | टारझन

कुठे तरी सराव करावाच लागतो ना.नाही तर मुख्य सामन्याच्या वेळी काय करणार आम्ही चापेल कडुन शिकलो आहे.
अजुन शिकाऊ आहात ... करा करा सराव करा ... बेस्ट लक ..

तो, तुमचा प्रश्न आहे.
आम्ही आमचाच विचार बोलून दाखवला ... धावतं गाढव ओढून घ्यायचा सवयीला नाइलाज आहे ..

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 3:27 pm | सखाराम_गटणे™

>>अजुन शिकाऊ आहात ... करा करा सराव करा ... बेस्ट लक ..
अनावश्यक सल्ला.

>> धावतं गाढव ओढून घ्यायचा सवयीला नाइलाज आहे ..
तुम्ही आमच्या प्रतिसादावर हे लिहीले होते म्हणुन, उत्तर द्यावे लागले.
बाकी गाढव ओझ्याला चांगले असते.

--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

simplyatin's picture

13 Dec 2008 - 2:51 pm | simplyatin

Hi tarjhan,

soorekh lekh, tasa me 142 cha joona PANKHA ahe.

ani ho, asach kahi ST baddal lihishil ka??

jasa tumha punekaranna PMT baddal BheetiYukta aadar, prem watta toch bhav, Mumbait, BEST baddal.

tasa amha paamranna bahergavi kiva Trek la jatanna ST var avlambun rahava laagtach pan amhi te Vina Takrar karto ! ;)

Vaat pahin pan PMT/PCMT/BEST/ST nechh jaain !

simplyatin.

ताल भास्कर's picture

20 May 2010 - 2:49 pm | ताल भास्कर

फार छान लेख टारझन. ..अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या...

ऐखाद्या मार्गावर जर रोज नेहमीचेच चालक आणि वाहक असतील तर त्यांच्यातील 'सुसंवाद' ऐकण्यासारखा असतो. एकदा सिग्नलला बस उभी असताना वाहकाने डबल बेल दिली. त्यानंतर चालकाने ज्या प्रेमळ शब्दात "तुला कसली रे एवढी घाई असते $&*$!! " असे वाहकाला विचारले ते अजून आठवते. सगळे प्रवाशी खो खो हसत सुटले होते.

लहानपणी शाळेत जाण्यासाठी ठरलेली बस आणि विशिष्ठ वेळ असायची. तेव्हा घरी दुचाकीसंदर्भात चर्चा व्हायची आणि एव्हरेज वैगेरे शब्द कानी पडत. मी आमच्या चालकाला आपल्या बसचे एव्हरेज किती असते असे विचारले. त्याला प्रश्न कळला नाही का मी अश्या गोष्टी समजायला खूप लहान वाटलो माहित नाही पण त्याने "आम्ही गाडी सकाळी चालू केली कि रात्रीच बंद करतो" असे उत्तर दिले. अजूनपर्यंत एव्हरेजचा काही मला थांगपत्ता लागला नाही..:)

सवाई गंधर्व महोत्सव, जत्रा, गणपती अश्या अनेक वेळेस पी.म.टी रात्री उशिरापर्यंत गाड्या सोडते, तेव्हा नक्कीच त्याचा खूप फायदा होतो आणि पी.म.टी चा खरा आधार वाटतो.

स॑दीप's picture

20 May 2010 - 5:03 pm | स॑दीप


फर पूर्वि पी.एम.टी. मध्ये बस्लो होतो कही हाड॑ हरवली !
पी.एम.टी. च्या ५०० मी परीघात आपली दुचकी नेउनये!

गारुडी,

- पी.एम.टी. च्या ५०० हात दूर राहाणारा