बने बने ...पाहिलास का स्टुडीओ ?

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
6 Aug 2008 - 11:16 am

(दिवाकरांची क्षमा मागून ....)

बने, बने , अग , कुठे काय म्हणतेस ? भेळपुरीला जातोय ना आपण. अग असे काय करतेस ? अलकापुरी , जगन्नाथपुरी तशी ही भेळपुरी हो ! नाहीतर तुझे म्हणजे जाऊ तेथे खाऊ असते !

हा पाह्यलास का ? हा अमेरिकेचा प्रसिद्ध पश्चिम किनारा हो ! काय म्हणालीस ? "बिग सर" म्हणजे जॉर्जसारखे "मोठे शिक्षक" ? अगं असे काय म्हणतेस ? बिग सर हा इथला प्रसिद्ध भाग हो ! हां इथे ते मोठे लेखक रहातात मात्र. आपल्या हालीवूडाजवळ! काय म्हणालीस ? म्हणूनच इथून जवळच्या पार्काला "यलोस्टोन" नाव दिलेय ? छे गं ! दगड नि डांबिस यातला फरक नाही समजत तुला ? कमाल झाली हो !
असे थोडे पुढे येऊ या भागात आपण. येतेय का ऐकायला काही ? नाही ना ? नाहीच यायचे. कल्याणकारी राजांच्या राजवटीमधे जशी "भीषण शांतता" नांदायची तशी या सान्डीऍगो मधे काही भीषण शांत लोक रहातात हो ! भूकंप होवो नाहीतर आगी लागोत (अगं कुठे काय ? क्यालिफोर्नियामधे गं ! "भेळपुरी"वर अधून मधून होणारे भूकंप ते वेगळे !) , पण इथल्या नंदनवनात नेहमी शांतता ! फार ज्ञानी पुरुष रहातात हो इकडे !

ये , अशी उत्तरेकडे माझ्याबरोबर. काय म्हणतेस ? भीती वाटते ? कसली ? "बिग वन" च्या केंद्रापाशी येत चाललो आपण म्हणून? अगं घाबरू नकोस ! इथल्या प्लेट्स हलतात तसे इथले भूकंपसुद्धा अचानक जागे होतात. जागे होतात तसे झोपतात सुद्धा ! काय म्हणतेस ? सध्याच्या भूकंपाचे हादरे थांबत नाहीत ? अगं असे काय करतेस ? तो काय कॅलीफोर्नियाचा भूकंप नव्हे ! इथे होणार्‍या साहित्यसंमेलनाचे आतापासून वाजणारे नगारे हो हे ! काय म्हणतेस ? तर्कट आणि हिरवा वात्रट ही काही खरीखुरी नावे नव्हेत काही ! या झाल्या प्रवृत्ती ! काय म्हणतेस ? कॅलीफोर्नियाचे कोकण झाल्यासारखे वाटते ? अगं , एकूण किती कोकणी तिरकसपणा केला तरी काही माणसे "घाटावरची" हो ! उगाच दिसला भट म्हणजे कोकणचा , असे नसते ! काय म्हणालीस ? "घटं भिद्यात् , पटं छिद्यात् " अशी प्रसिद्धी मिळवतात ही उत्तर क्यालीफोर्नियाची तर्कट माणसे ? अगो ! जिभेला हाड काही तुझ्या ? कुणीतरी म्हण्टलेय ना , " यू हॅव नो डीसेन्सी ! गेट ओव्हर इट !"

हळूहळू आपल्याला आपली गुडचापी गुंडाळून या महान देशाच्या पूर्व किनार्‍याकडे जायला हवे.. काय म्हणालीस ? एष्टीसारखे विमान लागते का ? काहीतरीच काय ? पोटातले पाणीसुद्धा हलायचे नाही !
आस्सं. चला होऊ पायउतार ! हे टेनेसी हो ! इथून जवळच्याच राज्यात भेळपुरीचे प्रसिद्ध फोटो काढणारे पर्जन्यराज रहातात . जपून बोल बरे का ! लिहून टाकतील एक फर्माससे चित्रपटपरीक्षण. नाही नाही , तसे "काळेबेरे" काही नाही यांच्या मनात. यांचा मुघलकालीन इतिहासावरील चित्रपटांचा अभ्यास दांडगा हो ! काय म्हणतेस ? भेळपुरीच्या मंत्रिमंडळाची जुनी मळकी टोपी अजून यांच्या क्लोझेट मधे आहे अजून ? हम्म. कापे गेली तरी भोके रहातात म्हणतात ना !

ये असे थोडे उत्तरेला जाऊ. ही आली अमेरिकेची राजधानी ! काय म्हणतेस ? चोरांच्या आळंदीसारखे "संभावितांचे " डीसी ? छे गं ! इथे काय दोन दोन डीसी नाही आहेत ! (विल्मिंग्टन खूप आहेत बाकी ! क्यारोलिनात एक, डेलावेअरात एक ! काय म्हणतेस ? चोरांचे विल्मिंग्टन !? गप्प बैस ! कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न्यायची लायकी नाही तुझी. जास्त बोललीस तर ते काका बंगीत टाकून भारतात पाठवून देतील हो टपाल तुझे ! गप्प बैस पाहू! ) तर सांगत काय होतो ? डीसी एकच हो इकडे. तो कारखाना कसला म्हणतेस ? अगं , असे काय करतेस ? तस्त बनवण्याचा कारखाना हो तो ! आख्ख्या कारखान्याचा माल एक माणूस वापरतो म्हणे ! फार चौकशा नको करूस , लिहून टाकेल तुझ्यावर एखादा अग्रलेख ! आणि इथूनच जवळ हे बाल्टीमोर ! काय म्हणालीस ? कोण हे म्हणून विचारतेस ? कुठल्याही विषयावर काहीही गहन विचारा, खरे, समतोल , नि अगदी सहज उत्तर मिळणार ! सुपरम्यान ? छे छे , सुपर नाही , म्यानच हो हा ! अंडरप्यांटसुद्धा प्यांटवर नाही घालत ! सुपरम्यान कसा असेल ? आदराने मान लवते ना ? हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे !

थोडी विश्रांती घेऊ म्हणतेस ? बराय. थांबू आपण इथेच आज. अजून अमेरिकेतली मोठी मोठी तीर्थक्षेत्रे आणि तिकडचे खंडोबा नि अंबाबाई व्हायच्यात अजून ! अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय ! बास आता.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

6 Aug 2008 - 11:29 am | आनंदयात्री

>>छे गं ! दगड नि डांबिस यातला फरक नाही समजत तुला ? कमाल झाली हो !
>>या सान्डीऍगो मधे काही भीषण शांत लोक रहातात हो !
>>काय कॅलीफोर्नियाचा भूकंप नव्हे ! इथे होणार्‍या साहित्यसंमेलनाचे आतापासून वाजणारे नगारे हो हे ! का
>>"काळेबेरे" काही नाही यांच्या मनात. यांचा मुघलकालीन इतिहासावरील चित्रपटांचा अभ्यास दांडगा हो
>>हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे !
>>मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय ! बास आता.

धडाम्धुम्म ... नुसता तोफखाना चालवलाय बनीबरोबर ... मॅक भाय .. सल्लाम !

बर मेन सिनेमाचे फक्त अरबी समुद्रापारच "ठाण" का ? शनवार वाड्यात काही फायटींग नाय का ?

मेघना भुस्कुटे's picture

6 Aug 2008 - 11:41 am | मेघना भुस्कुटे

पुण्यनगरीवर म्हेरबानी का आपली?

धमाल मुलगा's picture

6 Aug 2008 - 12:23 pm | धमाल मुलगा

च्यायला,
ह्या आठवड्यात मिपावर काय दिवाळी चालु झालीए की काय?
नुसते ऍटमबॉम्ब फुटताहेत !!!

तर्कट आणि हिरवा वात्रट ही काही खरीखुरी नावे नव्हेत काही ! या झाल्या प्रवृत्ती ! काय म्हणतेस ?

एकूण किती कोकणी तिरकसपणा केला तरी काही माणसे "घाटावरची" हो ! उगाच दिसला भट म्हणजे कोकणचा , असे नसते

भेळपुरीच्या मंत्रिमंडळाची जुनी मळकी टोपी अजून यांच्या क्लोझेट मधे आहे अजून ? हम्म. कापे गेली तरी भोके रहातात म्हणतात ना !

चोरांचे विल्मिंग्टन !?

जास्त बोललीस तर ते काका बंगीत टाकून भारतात पाठवून देतील हो टपाल तुझे !

तस्त बनवण्याचा कारखाना हो तो ! आख्ख्या कारखान्याचा माल एक माणूस वापरतो म्हणे !

=))
ज...ह..ब..ह..र्‍या !

हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे !

+++१

अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय !

वा! ह्याला म्हणतात स्ट्रेट ड्राईव्ह वर तुफानी सिक्सर !!!

मुक्तसुनित....
नुसता दणका आहे! धडाकाच लावलेला दिसतोय.

(स्वगतः धम्या, चड्डी सांभाळ रे बाबा, ह्यांची गाडी अरबी समुद्र पार करायला निघाली आहे. हळुच पुण्यापर्यंत पोचली की तुझं काही खरं नाही!)

सहज's picture

6 Aug 2008 - 11:29 am | सहज

वाह! मुक्तसुनित राव लई भारी फेरी घडवलीत तुम्ही बनी ची

तुमच्यासारखा गाईड परत होणे नाही!

लवकरात लवकर परत सातासमुद्रापार फिरवुन आणा बनीला.

मिपाच्या इतिहासात ह्या नाट्यछटेला नक्की स्वतंत्र स्थान मिळणार.

बबलु's picture

6 Aug 2008 - 11:35 am | बबलु

लगे रहो... मुक्तसुनीत.

" घटं भिद्यात् , पटं छिद्यात् " अशी प्रसिद्धी मिळवतात ही उत्तर क्यालीफोर्नियाची तर्कट माणसे ? "
जबराट !!

.. (उत्तर क्यालीफोर्नियातला एक तर्कट) बबलु-अमेरिकन

जनोबा रेगे's picture

6 Aug 2008 - 11:37 am | जनोबा रेगे

नअमस्कर,
मि पहिल्या॑दच मराथी व तेहि मिसल्पववर लिहित अहे, माफ करा. लेख आवदला

स्वाती दिनेश's picture

6 Aug 2008 - 11:56 am | स्वाती दिनेश

सुनीतराव,
भन्नाट! भेळपुरी एकदम टेस्टी आहे.
स्वाती

बेसनलाडू's picture

6 Aug 2008 - 11:00 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

6 Aug 2008 - 12:30 pm | घाटावरचे भट

लैच भारी हो सुनीतराव, कोणालाही सोडलं नाही...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

केशवसुमार's picture

6 Aug 2008 - 12:48 pm | केशवसुमार

अरे काय चालंय काय.. ना होळी ना दिवाळी.. सगळे नुसते सुसाट सुटलेत..
मुक्तीशेठ,
_/\_.. एकदम खतरा लेख.. आवडेश..चालु द्या.. =))
संपुर्ण चित्रपट लवकर येऊ दे..
(हहपुवा)केशवसुमार
स्वगतः च्या मारी हा क्रमश: चा किडा मुक्तीशेठला पण चावला की कायः :W

नीलकांत's picture

6 Aug 2008 - 1:52 pm | नीलकांत

मुक्तसर,

आपल्याला जाम आवडला बाकी हा लेख.

संपुर्ण चित्रपट लवकर येऊ दे..

नीलकांत

छोटा डॉन's picture

6 Aug 2008 - 10:55 pm | छोटा डॉन

बाकीच्यांच्या प्रतिक्रीयांपेक्षा वेगळे काय लिहणार ?
भारी आहे जे आहे ते ...

लिहा अजुन ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकाश घाटपांडे's picture

6 Aug 2008 - 12:49 pm | प्रकाश घाटपांडे


अजून अमेरिकेतली मोठी मोठी तीर्थक्षेत्रे आणि तिकडचे खंडोबा नि अंबाबाई व्हायच्यात अजून ! अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय


मेन पिच्चर पघायला उत्सुक आहोत ट्रेलर च लई भारी त मंग पिच्चर पघितलाच पाहिजे.
आमच्याकं कुत्र्याला पाय लावला कि डाफरत्यात , म्हन्त्यात खंडुबाला पाय लाव्ती नाई.
तिकल्ड्या खंडुबाला पाय लावत्यात का?
प्रकाश घाटपांडे

नंदन's picture

6 Aug 2008 - 12:55 pm | नंदन

लिहिले आहे. भीषण शांतता, गेट ओव्हर इट, काळेबेरे, मृत्युंजय, अग्रलेख इ. विशेष :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

6 Aug 2008 - 1:46 pm | भडकमकर मास्तर

अमेरिकावारी मस्त...
बनीला आता मेन सिनेमा दाखवाच... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2008 - 2:06 pm | ब्रिटिश टिंग्या

२०-२० चा हंगाम सुरु झाला वाट्टं......
सगळीकडेच तुफान फटकेबाजी चाललीये....

लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे!

असो, पुढचा पार्ट येउ देत लवकर! :)

मनस्वी's picture

6 Aug 2008 - 2:08 pm | मनस्वी

नाव काढू नका त्या २०-२० चे!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

चतुरंग's picture

6 Aug 2008 - 4:12 pm | चतुरंग

नाट्यछटेची सुरुवात भन्नाट झालीये!
मुक्तराव, तुमच्या गानछटा आम्ही परवाच ऐकल्या पण तुमची ही 'छटा' आम्हाला नवीन आहे! ;)
तुमची बनी अजून कोणाकोणाला बनवते ह्याची ओढ लागून राहिली आहे.

(स्वगत - ह्म्म्म ...हा मुक्तसुनीत माणूस वाटतो तेव्हढा साधा नाही हो रंगा, कधी छाटी काढून घेईल समजणार नाही तुला अंमळ सावधच रहा! :SS :B )

चतुरंग

अविनाश ओगले's picture

6 Aug 2008 - 5:46 pm | अविनाश ओगले

आता मेन सिनुमा लवकर दाखवा..

शितल's picture

6 Aug 2008 - 6:09 pm | शितल

प्रत्येक शब्दानिक विकेट उडवली आहे. :)
सह्ही....
:)
ट्रेलर एवढा खतरा आहे तर पिक्कचर कसा असेल :?

भाग्यश्री's picture

6 Aug 2008 - 10:11 pm | भाग्यश्री

खरंच विकेट उडवलीये! मस्तच झालाय लेख!! खूप आवडला!! हेहे...
सुरवातच कॅलिफॉर्नियापासुन?? कॅल मधे लोकोत्तर पुरुष(आणि स्त्रीया ) राहतात असं दिसतंय!! :)

अवलिया's picture

6 Aug 2008 - 7:07 pm | अवलिया

मला तुमच्या पिक्चर मधे रोल नका देवु

मजा आली/आला (?) (शुद्ध काय हो?)

नाना

चतुरंग's picture

6 Aug 2008 - 7:09 pm | चतुरंग

'मजा आले' हे शुद्ध! बाकी 'बे'शुद्ध! ;)

चतुरंग

अवलिया's picture

6 Aug 2008 - 7:12 pm | अवलिया

वा

नाना

प्राजु's picture

6 Aug 2008 - 7:09 pm | प्राजु

मुक्तराव,
अतिशय खुमासदार.... एकदम बिनधास्त....
चालूद्या. पुढचा पूर्ण शिणुमा कधी येणार??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2008 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय खुमासदार.... एकदम बिनधास्त....
चालूद्या. पुढचा पूर्ण शिणुमा कधी येणार??

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Aug 2008 - 7:38 pm | डॉ.प्रसाद दाढे

सुनीतराव, लेख मस्तच आहे.. अजुन येऊ द्या!

सुनील's picture

6 Aug 2008 - 7:50 pm | सुनील

मिसळ दिवसेंदिवस अधिकाधिक मसालेदार होत चालली आहे! तिकडे सर्किटराव अन् इकडे तुम्ही. चांगली फटकेबाजी चाललीय.

चालू द्या. आम्ही मजा घेतोय!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कोलबेर's picture

6 Aug 2008 - 8:01 pm | कोलबेर

च्यामारी वेस्ट कोस्ट वरच्या धक्क्यांमधुन अमेरिका सावरायच्या आधीच इस्ट कोस्टवर धक्के ... तीव्रता दक्षीणेतील राज्यांपर्यंत :D

(मळकी टोपीवाले) कोलबेर

स्वगत : मुक्तराव ऑलराऊंडर आहेत ह्याची आम्हाला पुर्वीपासुनच खात्री होती! इतके दिवस स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राइव्ह मारत होते आज एकदम डाउन द विकेट येउन उत्तुंग षटकार..

लंबूटांग's picture

6 Aug 2008 - 9:07 pm | लंबूटांग

=)) मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय.. हे लई भारी..

डाउन द विकेट येउन डायरेक्ट इस्ट कोस्ट हून वेस्ट कोस्ट पर्यंत षटकार मारलात

धनंजय's picture

6 Aug 2008 - 9:01 pm | धनंजय

" यू हॅव नो डीसेन्सी ! गेट ओव्हर इट !"

हहपुवा

थ्यांकू, थ्यांकू.

याआधी पहिले बनीची विडंबनसहल आमच्या भाईकाकांनी घडवली होती, हे शीर्षकातच (गुप्तपणे) सांगितलेत...

(जुन्या काळी टपालातून टपल्या मिळालेला)
सदस्य क्रमांक १२

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2008 - 10:32 pm | पिवळा डांबिस

इतक्या जवळ आलांत, जरा घरी तरी यायचं!
निदान कोकमसरबत (तुम्हाला!), सोड्याची खिचडी आणि सुरमई (बनीला!!) खिलवली असती!!
;)

सर्किट's picture

6 Aug 2008 - 10:56 pm | सर्किट (not verified)

सुनीतराव,

दिवाकरांनी वरून पुष्पवृष्टी करावी, अशी सुरुवात !

क्या बात है !

बिगसर, यलोस्टोन, पर्जन्यराज, मृत्युंजय, सगळे फस्क्लास !!!

येऊ द्या.

दरम्यानःhttp://dusaradivakar.blogspot.com/2008/07/blog-post.html

इथे एक प्रतिस्पर्धी आहे ;-)

- हिरवा वात्रट (?)

विकास's picture

6 Aug 2008 - 11:05 pm | विकास

एकदम सही! =))

मिपावर विडंबन काव्यांपाठोपाठ विडंबन लेख आणि लेखक वाढायला लागलेले दिसतात. :D

संदीप चित्रे's picture

7 Aug 2008 - 1:16 am | संदीप चित्रे

मुक्त सुनीत ...

फार वर्षांनी नाट्यछटांच्या आठवणी जागवल्यात ... एकदम मनापासून धन्स :)

--------------------------
www.atakmatak.blogspot.com

रेवती's picture

7 Aug 2008 - 1:18 am | रेवती

बनी ला सध्या बरेच काम आहे तर! अख्खी अमेरिका पालथी घालताना बिचारी दमून गेलीये.
असो, लेख छान झालाय. एकदम झोकदार!

रेवती

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 4:19 am | विसोबा खेचर

लै लै लै भारी! वाचून निखळ मौज वाटली! :)

मुक्तराव, नाट्यछटा जोरदारच! येऊ द्या अजूनही...

तात्या.

वेदनयन's picture

7 Aug 2008 - 5:40 am | वेदनयन

बरे झाले सियाटल पर्यंत चढला नाही.