बने बने ...भाग २

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 2:48 am

भाग १ : येथे पहा : http://www.misalpav.com/node/2920

हुश्श ! टेकूया थोडे इकडे . अगो असे काय विचारतेस ? अमेरिकेतली देशांतरितांची पंढरी ही : न्यू जर्सी ! ओक ट्री भागात काय मिळणार नाही इथे ! शोधला तर नवरा सुद्धा मिळेल तुझ्याकरता इथे (शेंबूड पूस तो आधी !) या ट्रायस्टेट भागात भेळपुरीवरच्या "तीन देवियां" वास करतात हो ! हे न्यूजर्सीवासिनी सुखदाईचे स्थान. काय म्हणालीस ? "देवळात काम नाही तर मी काय करू ?" असे भेळपुरीवर येऊन विचारतेय देवी ? भलभलते नको बोलूस ! कोप झाला तर देवळात मिळणार्‍या मिसळीच्या प्रसादातल्या तर्रीचा झटका देईल हो देवी !

आणि कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्‍या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर ! काही झाले तरी पाणी पंचगंगेचे आहे ! मुळामुठेमधले किंवा अमेरिकेतल्या पाईप्स मधले पाणी येऊन काही पातळ नाही झालेले ! बने , शेवंताभवानीने अलिकडेच तुझ्या नावाने पुन्हा या कलियुगी अवतार घेतला आहे हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! (बाकी बने , तू बिनडोक आहेस, हे शेवंताईला कसे कळले हे ती जाणे नि तू जाणे !) बाकी या तीन्ही देवता आपापसात कितीही बडबडोत , पण "तर्री तर्री आता मरणाते वारी" अशी यांची कृपा. पूर्व किनार्‍यावरच्या भेळपुरीवर आलीस नि यांचे दर्शन चुकवलेस तर यांच्या कृपाप्रसादास मुकणार हो तू !

काय म्हणतेस ? एकूण न्यूजर्सी भाग शांत वाटतो ? बरोबर आहे ! पूर्वी अटकेपार पोचलेले झेंडे इथे अटलांटिकपार पोचवणारे शनिवारवाडेकर नुकतेच आपल्या छावणीत परतले आहेत. काय म्हणालीस ? मस्तानी ला घेऊन ? छे ग ! ते आपले पुण्यातल्या तुळशीबागेतल्या मस्तान्यांच्या मागे ! अमेरिकेतल्या मस्तान्या मिळवण्याच्या बाबतीत त्यांचे बाकी पानपत झाले हो !

चल जाऊ आणखी थोडे उत्तरेला. आपण आलोत बॉस्टन भागात. इरले नीट कानावरून घे ! जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ! (अर्रर्रर्र चुकलो ! मला म्हणायचे होते, बुलंद माणसे नि जीवघेणी थंडी ! ) प्रदेश कितीहि थंड असो, माणसे ऊब देणारी हो ! ( गरम डोक्याची ? थांब हो कार्टे ! मफलर लावून तोंड बंद करतो आधी !) तर हा आहे .. भेळपुरीवरच्या सन्माननीय "बॉस्टन ब्रॅम्हिन्स" चा भाग ! काय म्हणालीस ? असे जातीयवादी विधान कसे करतो मी ? काय करणार , कुणी तर्कट बोलतो , आपण ऐकून घेतो झाले ! हे आले भेळपुरीवरील बोरीसकुमार रंगास्कीचे ठिकाण. नाव इतके भरभक्कम असले तरी माणूस साधा आहे. काय म्हणालीस ? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो ! वेडी कुठली ! फार बोलू नकोस, टाकून देतील एखादे विडंबन ! बुदबळांतल्या "रूक" सारखे सरळ हो ! (काय म्हणालीस ? रुक-श !? चल, चहाटळ मेली !)

तो शांत , स्थिर प्रकाश पाहिलास ? भेळपुरीला बोज आणून देणारे निवास हेच ते. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? अगं , अगं अशी चिडू नकोस. अमेरिकेत राहून भारतातल्या परिस्थितीबद्दल ताशेरे ओढण्याचा हक्क याना कुणी दिला नसला , तरी माणूस लाख हो ! याच भागात रहातो , भेळपुरीचा बच्चन ! च्, च् , बोलबच्चन नव्हे गं ! ते वेगळे ! हा म्हणजे फक्त उंचीला बच्चन ! एरवी तोंडातून एक शब्द फुटेल तर शपथ ! मात्र गातो बाकी चांगला हां ! एक ट्रीप ठाण्याला मारून येईल तर गानगंधर्व होऊन जाईल !

चला, पुरे झाली अमेरिका ! ठेवले काय आहे इथे माती नि दगड ! चल पकडू विमान लवकरच आपल्या देशाकडे. वाटेत लागतील एखाद-दोन भेळपुरीवाले त्यांचीही खबर घेऊच. चला, गुंडाळू आपला गाशा नि काय !

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2008 - 2:55 am | बिपिन कार्यकर्ते

* * * * * (५ स्टार).

जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी
"तर्री तर्री आता मरणाते वारी"

आणि बोरिसकुमार रंगास्कीचा रुक पण मस्त... आता लवकर मायदेशाची सफर येऊ द्या...

बिपिन.

सर्किट's picture

8 Aug 2008 - 2:57 am | सर्किट (not verified)

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??

काय करणार , कुणी तर्कट बोलतो , आपण ऐकून घेतो झाले !

विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते !

खो खो खो !!!

- सर्किट

विकास's picture

10 Aug 2008 - 9:46 pm | विकास

:S

काका मला वाचवा !
:$

कोलबेर's picture

8 Aug 2008 - 3:00 am | कोलबेर

प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ?

:D

मस्त चाललीय बनीची सफर!
चालू द्या!!

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 3:01 am | चतुरंग

'तीन देवियां', एकदम जबराट! हाण रे!!
'बोरिसकुमार रंगास्की' काय? भेळपुरीचा बच्चन काय? मुक्तराव अहो किती धुवाल?

(स्वगत - मुक्तरावांच्या शंभर अपराधांचा घडा भरला की एक विडंबन टाकावे लागेल असे दिसते! ;)

चतुरंग

धनंजय's picture

8 Aug 2008 - 3:01 am | धनंजय

सरळ मनाच्या सन्मित्रांचेही वास्तव्य आहे. "त्याचे आपल्याला काय?", "अगग! असे म्हणू नकोस, बने!" त्यांचे आखीव-रेखीव घर नसले तर राहाशील कुठे?

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2008 - 3:03 am | मुक्तसुनीत

सन्मित्राच्या "निवासा"ला बनीने भेट दिली आहे , मृत्यंजया ! :-)

सर्किट's picture

8 Aug 2008 - 3:04 am | सर्किट (not verified)

घराचा रंग मात्र भगव्याकडे झुकणारा आहे.

(आता मार खावा लागणार, पळतो.)

- सर्किट

चित्रा's picture

10 Aug 2008 - 9:33 am | चित्रा

भविष्य पहायला प्रकाशकाकांकडे गेला होता वाटते :-)

केशवसुमार's picture

8 Aug 2008 - 3:04 am | केशवसुमार

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??
वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो
विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते !

खो खो खो !!!

मुक्तीशेठ.. उत्तम चालू आहे चालू द्या..
(हसरा) केशवसुमार
वेड्यासारखी स्वतःशी बडबड : पर्वाच्या कट्याला केलेल्या तर्रीत काही तरी घातले होते का? :W

छोटा डॉन's picture

8 Aug 2008 - 3:11 am | छोटा डॉन

एकदम डेंजर हाणलाय ?
अजुन काय वर्णावे ?
वाचुन हसुन हसुन पुरेवाट झाली, आमचे झोपलेले पार्टनर उठुन बघाय लागले काय झाले ते ?

उत्तम चालु आहे, चालु द्यात असेच म्हणतो ...

स्वगत : शेठ इकडं भारतात आल्यावर कुणाकुणाच्या धोतराला हात घालणार आहेत देव जाणे !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बेसनलाडू's picture

8 Aug 2008 - 3:59 am | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू

मेघना भुस्कुटे's picture

8 Aug 2008 - 6:28 am | मेघना भुस्कुटे

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??

=))
फुल्ल सुटलेत मुक्तसुनीत... काय हो मुक्तसुनीत, तुमची बनी परदेशात असताना इतका आगाऊपणा करतेय. मायदेशी आल्यावर काय दिवे लावील कार्टी? आवरा तिला...

पिवळा डांबिस's picture

8 Aug 2008 - 3:21 am | पिवळा डांबिस

या ट्रायस्टेट भागात भेळपुरीवरच्या "तीन देवियां" वास करतात हो !
विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते !
हा, हा, हा!!!!

वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो !
अरे हा तर "स्वगतवाला भगत!" अहो तसा चांगला आहे हो तो....
:)

अनामिक's picture

8 Aug 2008 - 3:28 am | अनामिक

मुक्तराव.. मी नवखा असलो तरी कळलेत हो संदर्भ!
भन्नाट लेख!!
पु. ले. अपेक्षेत..

(नवखा) अनामिक.

घाटावरचे भट's picture

8 Aug 2008 - 3:48 am | घाटावरचे भट

सुनीतराव,
जबर्‍या लेख लिवलाय...बनीच्या भारतवारीच्या प्रतीक्षेत आहोत...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भेळपुरीचा बच्चन's picture

8 Aug 2008 - 5:00 am | भेळपुरीचा बच्चन

=))

वा मुक्तसुनीत जी||हम आपके बहुत शुक्रगुजार है के आपने आप की पिक्चर मे हमारा उल्लेख किया| हम आपके बहुत शुक्रगुजार है| आप भारत मे आयेंगे तो आपको जुहू चौपाटी पर बिना 'प्रतिक्षा' के भेलपुरी खिलायेंगे| बॉस्टन मे आजाइये, घर के पास कार्लसन बीच पर 'जलसा' करेंगे |

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 8:41 am | विसोबा खेचर

मुक्ताकाका,

बनीची सफर केवळ झकास! तीन देवीया लै भारी...!

इरले नीट कानावरून घे ! जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ! (अर्रर्रर्र चुकलो ! मला म्हणायचे होते, बुलंद माणसे नि जीवघेणी थंडी ! )

हे तर किल्लासच! :)

आणि पण येऊ द्या बॉस...

तात्या.

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2008 - 8:45 am | मुक्तसुनीत

बाकी काही म्हणा , तेव्हढे "काका" नका म्हणू बॉ ! फट म्हणता आमची बोलती कायमची बंद व्हायची इथून ! ;-)

बाकी सर्वाना आमची चार वेडीवाकुडी अक्षरे आवडत आहेत. यासाठी केला सारा अट्टाहास :-)

केशवसुमार's picture

8 Aug 2008 - 8:49 am | केशवसुमार

काका ही नवी शिवी दिसते... :?
(|: केशवसुमार I)

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 10:11 am | प्रकाश घाटपांडे

तरी म्हन्ल अदुगर दादा म्हननार्‍या पोरि यकदम काका कशा काय म्हनायला लाग्ल्या.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

8 Aug 2008 - 9:18 am | प्राजु

चांगलंच घेतलं आहे की धारेवर तीन देवीयाँना...

कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्‍या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर ! काही झाले तरी पाणी पंचगंगेचे आहे ! मुळामुठेमधले किंवा अमेरिकेतल्या पाईप्स मधले पाणी येऊन काही पातळ नाही झालेले ! बने , शेवंताभवानीने अलिकडेच तुझ्या नावाने पुन्हा या कलियुगी अवतार घेतला आहे हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! (बाकी बने , तू बिनडोक आहेस, हे शेवंताईला कसे कळले हे ती जाणे नि तू जाणे !) बाकी या तीन्ही देवता आपापसात कितीही बडबडोत , पण "तर्री तर्री आता मरणाते वारी" अशी यांची कृपा. पूर्व किनार्‍यावरच्या भेळपुरीवर आलीस नि यांचे दर्शन चुकवलेस तर यांच्या कृपाप्रसादास मुकणार हो तू !

बरं बरं.... तुमचे १०० अपराध भरत आले बरं. :)
शीतल, बघ बाई अस्सल कोल्हापूरी मिसळ इतक्या दिवसांनी रंग दाखवायला लागली आहे यक्षनगरीच्या राजधानीत.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

10 Aug 2008 - 11:25 pm | शितल

>>>शीतल, बघ बाई अस्सल कोल्हापूरी मिसळ इतक्या दिवसांनी रंग दाखवायला लागली आहे यक्षनगरीच्या राजधानीत..
प्राजु,
तरी कवाच्यान तुला सांगतेया लई जाळ नग करूस मिसळ, घे आता , बघ पथ्य्याला पडली ना मिसळ आपल्याच :)

बाकी बनीची सफरीने हसुन हसुन पुरेवाट झाली.

चोप राजला एकदा डी.सी.ची सफर घडवायची म्हणते :)

प्रमोद देव's picture

8 Aug 2008 - 9:20 am | प्रमोद देव

काका ही नवी शिवी दिसते

=)) =)) =))

सुनीतसेठ मस्त चाललाय बनीचा फेरफटका!
मजा येतेय. सगळेच संदर्भ चटकन लागत नाहीयेत; पण हळूहळू लागतील अशी आशा आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2008 - 9:28 am | मुक्तसुनीत

चाचा झिंदाबाद ! :-)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Aug 2008 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे


ते. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??


सोशालिस्टांचा ईकास होनं गरजेच हाय ! अहो माकडाचा बी मानुस झालाच उत्क्रांतीत ! आता मान्सांचाबी द्राक्षासवाने माकड व्हतयं. मंग आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ! मंग कोन्ला दंश करन काय सांगता येत न्हाई . अगागागागा .....

प्रकाश घाटपांडे

धमाल मुलगा's picture

8 Aug 2008 - 9:53 am | धमाल मुलगा

कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्‍या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर !

एकदम जोरकस !!!
चोप-राज तर एकदम ज..ह..ब..ह..र्‍या !!!!

"तर्री तर्री आता मरणाते वारी"

:)

(शेंबूड पूस तो आधी !)

आँ??? बने अजुनही त्रास होतोच आहे का? :D

ते आपले पुण्यातल्या तुळशीबागेतल्या मस्तान्यांच्या मागे !

=))
खफचाही बराच अभ्यास दिसतोय मुक्तशेठ :)

बोरीसकुमार रंगास्कीचे ठिकाण. नाव इतके भरभक्कम असले तरी माणूस साधा आहे. काय म्हणालीस ? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो

रंगास्की !!!
=))

डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??

+++१

चल पकडू विमान लवकरच आपल्या देशाकडे.

गोंद्या येतोय रे......
सगळ्यांनी आपापले सोगे कासोटे घट्ट बांधून घ्या ;)

आनंदयात्री's picture

8 Aug 2008 - 10:07 am | आनंदयात्री

कासोटा बांधला भो !
बाकी लेख आवडला .. मार्मिक अन निखळ आहे.
नाहितर लोक अश्या टिका लिहतांना ४ प्रतिसाद मिळाले ली मारुतीच्या शेपटासारखे आपले वाढवतच रहातात, मग लाउन द्यावी लागते आग रिळांना. ;)

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??
सोश्यालिस्ट = स्पेश्यालिस्ट :)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 11:40 am | स्वाती दिनेश

तीन देवीया,"तर्री तर्री आता मरणाते वारी" , बोरीसकुमार रंगास्की, जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ,काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? ,भेळपुरीचा बच्चन !
भन्नाट... बनीचे विमान भारतात कधी पोहोचते त्याची वाट पाहत आहे,
स्वाती

सहज's picture

8 Aug 2008 - 11:42 am | सहज

>बनीचे विमान भारतात कधी पोहोचते त्याची वाट पाहत आहे

व्हाया जर्मनी जाणार आहे बर का! :-)

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश

व्हाया 'राणीचा देश' पण जाता येईल हो..

हा जर तुम्ही जर्मनीत येउच नका म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. :-)

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 12:02 pm | स्वाती दिनेश

म्या एकली नाय हो इथं,बनीला मी काय नाही म्हणेन? इथे केसु आहेत,लिखाळ आहेत, :)

केशवसुमार's picture

8 Aug 2008 - 12:19 pm | केशवसुमार

स्वातीताई,
हे म्हणजे चोरून पोळी दिली तर बोंबलून तुप मागण्यागत झाले.. #o
बनी गप चाल्ली होती भारतात....
अता कुठे लपू? :SS
(बनीला घाबरेला)केशवसुमार #:S

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 12:21 pm | स्वाती दिनेश

बनी आणि गप जाणार भारतात? ते ही जर्मनीतल्या केसुंना न भेटता? कसं शक्य आहे ?

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 7:35 pm | चतुरंग

असं घाबरुन कसं चालेल?
बनीचं पाणी पंचगंगेचं आणि तुमचं कृष्णेचं, दोन्ही नद्यांचा पुढे संगम होतोच ना! B)

(स्वगत - कुठे लपू विचारताहेत, लपा एखाद्या विडंबनामागे म्हणावं! :P :B )

चतुरंग

सुनील's picture

8 Aug 2008 - 12:40 pm | सुनील

छान जमलयं. आता परत जाताना थोडं युरोपमार्गे जा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Aug 2008 - 3:23 pm | ब्रिटिश टिंग्या

बॅक टु बॅक सिक्सर्स......
आता हॅट्रिक होउन जाउ देत!

तीन देवियां, कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या, तर्कट, बोरीसकुमार रंगास्की, भेळपुरीचा बच्चन.......लै भारी!

पुढिल मॅचच्या प्रतिक्षेत!

- टिंग्या

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 7:38 pm | चतुरंग

लॉर्ड्सवर सुद्धा आहे षटकारांची बरसात तेव्हा पाहूया किती फिल्डिंग लावतोस ते?

(स्वगत - सारखं सारखं स्वगत नको म्हणायला! ~X( )

चतुरंग

विकास's picture

10 Aug 2008 - 9:47 am | विकास

मस्त! एकदम आवडले! :H

"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा" असे उगाच म्हणावेसे वाटले. ;)

स्वगतः येथे बरेच लोकं हसलेले दिसताहेत पण नक्की कोण का आणि काय समजून हसले हे मात्र गुढच रहाणार आहे असे दिसते! असो. चालूंदेत! अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आता समजले :SS

मुक्तसुनीत's picture

10 Aug 2008 - 9:59 am | मुक्तसुनीत

तुम्ही हे स्पोर्टींगली घ्याल याची खात्री होती. म्हणूनच तुम्हावर(ही) असे थोडे गमतीने लिहीले आहे :-)

ऋषिकेश's picture

10 Aug 2008 - 11:47 am | ऋषिकेश

मुक्तराव,
जबरा!!! अशक्य!!!!!!!! आता भारतवारीची वाट पाहतोय

-('मिसळ'लेला) ऋषिकेश