आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!
- नरेंद्र गोळे २०१४०५०६
प्रतिक्रिया
6 May 2014 - 11:36 am | आशु जोग
नरेन्द्र गोळे
माहितीबद्दल धन्यवाद...
6 May 2014 - 11:37 am | आशु जोग
कार्यक्रम कधी आहे हे कळले
कुठे आहे हे कळाले तर मित्रमंडळींनाही सांगेन
6 May 2014 - 12:38 pm | नरेंद्र गोळे
दृक श्राव्य सभागृह पहिला मजला, स.प. कॉलेज, टिळकपथ, पुणे येथे, १०-०५-२०१४ शनिवार संध्याकाळी १८०० वाजता हा प्रकाशन समारंभ होणार आहे.
आशू जोग, तुमच्या प्रतिसादावरून मात्र असे वाटते आहे की सोबतची निमंत्रणपत्रिका तुम्हाला दिसत नाही आहे.
काय कारण असावे? कारण मला तर ती दिसत आहे!
6 May 2014 - 12:56 pm | आशु जोग
आता दिसू लागली आहे
लिहीत होतो त्यावेळी फक्त टेक्स्टच दिसत होते
6 May 2014 - 2:54 pm | मंदार दिलीप जोशी
अक्षय जोग आपणच का?
6 May 2014 - 2:54 pm | मुक्त विहारि
अभिनंदन,
ह्यावेळी मॅजेस्टिक मधून पुस्तक खेरेदी करण्याच्या यादीत, अजुन एका पुस्तकाची भर पडली.
6 May 2014 - 2:56 pm | मंदार दिलीप जोशी
हे पुसक बुकगंगा किंवा तत्सम पुस्तके विकणार्या संकेतस्थळांवर उपलब्ध असेल का? कार्यक्रमाला उपस्थित राहू शकेन याची शंका आहे पण पुस्तक विकत नक्की घेणार.
6 May 2014 - 3:19 pm | आतिवास
'विकत घेणे' यादीत पुस्तकाची नोंद करून ठेवली आहे.
कार्यक्रमास शुभेच्छा.
6 May 2014 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीबद्दल धन्यवाद ! पुस्तक संग्राह्य दिसते आहे !!
6 May 2014 - 9:24 pm | यशोधरा
गोळेकाका, अभिनंदन!
7 May 2014 - 8:17 am | मदनबाण
अभिनंदन काका... :)
7 May 2014 - 3:16 pm | पिंगू
अभिनंदन गोळेकाका.. १० तारखेला पुण्यात असेन, तेव्हा कार्यक्रमाला नक्कीच हजेरी लावायचा प्रयत्न करेन.