डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

म्हैस's picture
म्हैस in जनातलं, मनातलं
5 Mar 2014 - 6:23 pm

एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .

समाजमाहिती

प्रतिक्रिया

मैत्र's picture

28 Apr 2014 - 11:56 am | मैत्र

मृत व्यक्ती - व्हेंटिलेटरवर सुद्धा राहण्यासाठि तरी जिवंत असायला पाहिजे.
जर आधीच श्वास थांबला असेल तर नुसते व्हेंटिलेटर वर ठेवून कसे शक्य होईल?
किमान हार्ट रेट तर दाखवला पाहिजे ना मशीन वर?
शरीर इतके दिवस टिकणार नाही..
बातमी अपूर्ण वाटते आहे..