डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

म्हैस's picture
म्हैस in जनातलं, मनातलं
5 Mar 2014 - 6:23 pm

एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .

समाजमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Mar 2014 - 6:26 pm | मुक्त विहारि

सुन्न....

सौंदाळा's picture

5 Mar 2014 - 7:06 pm | सौंदाळा

हो. वाचुन धक्का बसला होता.
अशा अनेक घटना होतात. यात डॉक्टरची चुक का हॉस्पिटलची चुक, का खरोखरीचे कॉम्प्लिकेशन हे सामान्य माणसाला कळणे अवघडच आहे.
साध्या हॉस्पिटलपासुन ते टोलेजंग मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलपर्यंत अशा घटना होतात.

ह्या बद्दल काल-परवाच वाचले होते पेपर मध्ये... खुपच भीषण प्रसंग ओढवला आहे त्यांच्या कुटुंबावर... :(

शिद's picture

5 Mar 2014 - 7:30 pm | शिद
राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Mar 2014 - 8:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Mar 2014 - 1:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
जेपी's picture

5 Mar 2014 - 7:27 pm | जेपी

नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपण काही मदत करु शकतो का ?

किडनी काढली म्हणतायत म्हणजे हे त्याहून जास्त काहीतरी मोठे प्रकरण आहे.

मृगजळाचे बांधकाम's picture

5 Mar 2014 - 7:58 pm | मृगजळाचे बांधकाम

सरकारी आणि खाजगी दवाखान्यातले काही किस्से मी प्रकाशित करणार आहे वाचून थक्क व्हाल

मृगजळाचे बांधकाम's picture

5 Mar 2014 - 8:06 pm | मृगजळाचे बांधकाम

सरकारी दवाखान्यात पैशाचे आमिष देउन अविवाहित मुलाचे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेली निदर्शनास आली होती माझ्या,मी तक्रार केली होती,पण कुणी दाद दिली नाही.

मृगजळाचे बांधकाम's picture

5 Mar 2014 - 8:07 pm | मृगजळाचे बांधकाम

साध्या सर्दीच्या रुग्णाला ct स्कॅन करायला लावणारा एक महाभाग डॉक्टर आमच्या इकडे आहे

साती's picture

6 Mar 2014 - 12:05 pm | साती

यावरही प्रतिवाद करता येऊ शकेल.
तुम्हाला जी साधी सर्दी वाटतेय त्याचं कारण क्रॉनिक सायन्यूसायटिस , नझल पॉलीप यांपैकी काही असू शकतं.
अशी शंका आल्यास सर्दीसाठीही सीटीस्कॅन करावा लागतोच.
मात्रं याचा प्रतिवाद मी करणार नाही कारण उगाच कटचे पैसे मिळावे म्हणून अननेसेसरी सिटी/ एम आर आय करणारे कित्येक प्रॅक्टिशनर पाहिले आहेत.

मृगजळाचे बांधकाम's picture

5 Mar 2014 - 8:14 pm | मृगजळाचे बांधकाम

काहीही गंभीर कारण नसताना icu मध्ये admit करून पैसे उकळणारा doctor शी माझाही सामना झाला होता.माझ्या आई ला काहीही गंभीर कारण नसताना त्याने icu मध्ये admit करून ठेवले होते.आई रोज सकाळी घरी येउन जेवण बनवी.धुणी भांडी घासून पुन्हा icu मध्ये admit व्हायला जात असे.संध्याकाळी परत जेवण बनवायला घरी येउन भांडी वगैरे घासून परत icu मध्ये admit व्हायला जात असे,किती क्रूर चेष्टा आहे हि

साती's picture

6 Mar 2014 - 1:10 am | साती

आयसीयुत जाऊ द्या पण साध्या वार्डात जरी आई आजारी अ‍ॅडमिट असेल तर तिला घरी येऊन धुणी भांडी करू न देण्याची चाड तिच्या मुलांत नसेल का याचे राहून राहून आश्चर्य वाटत आहे.
आणि इतकं जर ढळढळीत समोर दिसत असेल तर वर तोंड करून डॉक्टरला 'असे का?' असे का नाही विचारले.
की आई घरी येऊन धुणी भांडी करण्याइतकी सक्षम आहे हे तुम्ही डॉक्टरांस कळूच दिले नाही.
स्वतःच्या रूग्ण आणि रूग्णाचे नातेवाईक असल्याच्या मुळे आजाराविषयी पूर्ण जाणून घ्यायच्या हक्काबद्दल माहिती करून घ्या.

कवटी's picture

6 Mar 2014 - 1:13 pm | कवटी

हाहाहा. लै भारि पकडला!

मृगजळाचे बांधकाम's picture

9 Mar 2014 - 11:21 am | मृगजळाचे बांधकाम

पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ? हा जो प्रसंग मी सांगितला आहे त्या वेळी मी ११ वर्षाचा होतो,आणि माझी बहिण ८ वर्षाची होती,माझे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असत,आईला बारीक ताप राही,म्हणून दवाखान्यात गेली होती,आता ११ वर्षे हे वय तुम्ही जे काही चाड वगैरे महान शब्द वापरलेत ते समजण्याचे नव्हते.त्या महाभाग doctor ने नंतर खूप वेळा लोकांचा चपलेचा मार खाल्ला आजही खातोय.अवांतर सांगतो.१९९५ साली तो महाभाग doctor झाला आज त्याच्य्कडे १०० कोटी ची property आहे,२ पजेरो कार आहेत,आजही तो सर्दीच्या patient ct स्कॅन करायला लावतो,कारण ती machine त्याची स्वताची आहे,कुठलाही patient आला कि तो त्याला ६५० रुपयाच्या अनावश्यक टेस्ट करायला लावतो.त्याच्या बद्दल मी बर्याच वेळा पेपर मध्ये छापून आणले होते.पण त्याची कातडी गेंड्याची असल्याने त्याला काहीही फरक पडत नाही

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2014 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर

पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ?

साती ह्यांच्या मतप्रदर्शनात कांही चुकले आहे असे मला वाटत नाही. 'आपल्या प्रतिसादात 'पूर्ण वस्तुस्थिती' मांडणे हे प्रतिसादकर्त्याचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास उपप्रतिसादकर्ता ती आजच्या घडीची परिस्थिती आहे असेच समजणार.
समजा कांही कारणाने किंवा परिणाम लक्षात न आल्याने अर्धवट परिस्थिती विशद केली असेल तर साती ह्यांच्या सारखी नैसर्गिक प्रतिक्रिया आल्यानंतर परिस्थिती विशद करण्यात नम्रता हवी. पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ? आणि ११ वर्षे हे वय तुम्ही जे काही चाड वगैरे महान शब्द वापरलेत ते समजण्याचे नव्हते सारखे ताशेरे अनावश्यक आहेत.

मृगजळाचे बांधकाम's picture

19 Mar 2014 - 7:19 pm | मृगजळाचे बांधकाम

मी जे लिहिले ती सदर लेखावरची छोटीशी प्रतिक्रिया होती;लेख नव्हे.पूर्ण वस्तुस्थिती प्रतिसादात मांडण्याची गरजच काय?मला जे सांगायचे होते ते मी पुरेश्या शब्दातच मांडले होते.त्यांना जर शंका होती तर त्यांनी मला सविस्तर विचारून नन्तर मत मांडले असते तर योग्य झाले असते नाही का?त्यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच प्रकारे मी व्यक्त केली आहे.न कमी न जास्त!

मृगजळाचे बांधकाम's picture

5 Mar 2014 - 8:18 pm | मृगजळाचे बांधकाम

विषमज्वर नसताना lab चे report बदलून १० १० दिवस admit ठेवून भरमसाठ बिल उकळणारे कितीतरी डॉक्टर्स बघितलेत मी.

साती's picture

6 Mar 2014 - 1:40 am | साती

हे मात्रं खरं आहे.
आणि त्याकरिता रिपोर्ट बदलायचीही गरज नाही.
कित्तीतरी फालतू वायरल फिवरमध्ये विषंज्वराची टेस्ट पॉजिटीव येते. आणि टायफॉईडच्या नावाखाली रूग्णाचि पिळवणूक होते.
याबद्दल मी मिपावरच टायफॉईडच्या धाग्यावर लिहिले आहे.

किसन शिंदे's picture

5 Mar 2014 - 8:27 pm | किसन शिंदे

आत्ता काही वर्षांपूर्वीचा आमच्याच चाळीतला किस्सा...

आमच्याच बाजूला राहणारी १४ वर्षांची आशा. शाळेत नववीला! सहामाही परीक्षेच्याआधी दिवसाआड ताप यायचा आणि जायचा. आई-वडीलांना वाटलं छोटासा आजार असेल, पण होती कावीळ! आधी साध्या दवाखान्यात नेलं पण काही फरक पडला नव्हता. मग ताप दिवसेंदिवस वाढतच गेला आणि डोळ्यात पिवळसर पणा आल्याचं दिसताच मग कावीळीच्या औषधांनाही सुरूवात केली. त्यातच एक दिवस ज्वर फारच भरला म्हणून रात्रीतून त्यांनी ठाण्याच्या शिवाजी हॉस्पीटलमध्ये आयसीयूत दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं 'काही नाही, एक-दोन दिवसात ठिक होईल'. त्याप्रमाणे तीन-चार दिवसांनी जरा बरं वाटल्यावर तीला घरी आणण्यात आलं, पण त्याच दिवशी दिवशी संध्याकाळी अचानकच आलेल्या प्रचंड तापाबरोबरच तिच्या पोटात उजव्या बाजूला प्रचंड प्रमाणात दुखू लागलं आणि त्यातच रात्रीतून तिची प्राणज्योत मालवली. :(

काय झालं? कसं झालं?? आई-वडीलांबरोबरच तिच्या घरातल्यांना काही कळालं नाही. पण मघ घेऊन जायच्या आधी अंघोळ घालतेवेळी तिच्या कमरेस उजव्या बाजूला टाके घातलेले दिसत होते. आणि मागाहून कळालं की तिची किडनी काढून घेतली होती आणि वेदना असह्य होवून तिचा जीव गेला होता. आम्हा सगळ्यांसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या आई-वडीलांना जास्त लढा देता आला नाही. पण तेव्हापासून मनात त्या हॉस्पीटलची मनात भिती बसलीये ती आजतागयत.

सचिन कुलकर्णी's picture

5 Mar 2014 - 8:50 pm | सचिन कुलकर्णी

केवळ भयानक..

साती's picture

6 Mar 2014 - 1:33 am | साती

किडनी डोनेशन म्हणजे काय नखं कापून घेण्याईतकं सोप्पं ऑपरेशन वाटलं का तुम्हाला?
मूळात आला पेशंट , कापलं त्याला, काढली किडनी, ठेवली फ्रीजमध्ये आणि मिळाला सीआर एफ चा पेशंट की विकली त्याला असं किडनीच्या बाबत करता येत नाही.
काढलेली किडनी रूग्णाला मॅच व्हावी लागते. त्यासाठी आधीच स्क्रीनींग/ मॅचिंग करून ठेवलेला दाता असावा लागतो.
इकडे किडनी काढली की लग्गेच दुसरीकडे ओपन केलेल्या रूग्णात ती बसवावि लागते.
ऑपरेशनला तीन चार तास लागतात. गूपचूप पाच मिनिटात किनडी काढता येत नाही.
मूळात डॉक्टरला किडनी बसवून घेणार्या माणसाला रिजल्ट द्यायचे असतात कारण ऑपरेशनचे चार्जेस (काढणे / घालणे ) रिसीवर देणार असतो.
त्यामुळे निरोगी किडनिच बसवण्याचि डॉक्टरचि तयारी असते. अश्यावेळी जाणून बुजून, तापाने आजारीअसलेल्या आणी जाँडीस झालेल्या रूग्णाचि किडनि कोणी रिसीवरसाठी काढुन घेईल हे शक्य नाही.

पैसा's picture

6 Mar 2014 - 8:30 am | पैसा

एकुणात किडनी काढून घेणे याबद्दल लोकांमधे बरेच गैरसमज आहेत. पण फसवून किडनी काढल्याच्या केसेस तरीही पेपरला अधून मधून येतात. त्याची कारणे बर्‍याच प्रकारची असावीत.

साती's picture

6 Mar 2014 - 12:01 pm | साती

त्याची कारणे
१. ट्रान्सप्लाण्ट कमिटीची परवानगी न घेताच किंवा खोटी कागदपत्रे बनवून किडनी मिळवणे
२. पैसे देऊन किडनी मिळवणे . आपल्या देशात अवयवांच्या खरेदी विक्रीला एवढेच नव्हे तर रक्ताच्याही विक्रीला बंदी आहे.
तरिही योग्य डोनर पकडून त्याला पैसे देवून किनडी मिळवल्यास तो गुन्हा ठरतो.
३. डोनरशी लग्नं करून , मग तो/ ती नातेवाईक आहेअसे दाखवून किडनी मिळवणे
४. निरोगी पेशंटला उगीच आजार आहे असे भासवून मग किडनी काढून घेणे.
याकरिताही अगोदर रिसीवर शोधला जातो.

अजूनतरी किडन्या गोळा करून डॉक्टर कपाटात साठबून ठेवतोय आणि मग आला पेशंट की त्याला विकतोय अश्या प्रकारचे स्कॅम करायची पद्धत निघाली नाही.
(रक्त/ स्कीन्/कॉर्निया याबाबत हे शक्य आहे)
;)

किसन शिंदे's picture

6 Mar 2014 - 8:29 pm | किसन शिंदे

आपल्या माहीतीबद्दल धन्यवाद!

पण ही घटना खरंच घडून गेलेली आहे आणि यातला एकही शब्द उगाच काहीतरी टंकायचं म्हणून टाकलेला नाहीये. सदर घटनेला आता १०-१२ वर्षे झाली असावीत. दोन जुळ्या बहिणी...आशा आणि मनिषा!! पैकी आशाचा असा अपघाती मृत्यू झाला नि दुसरी आता लग्न होवून सासरी नांदते आहे. तिच्या भावाशी बोलून या घटनेबद्दल खात्री करता येईल.

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2014 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

किडनी डोनेशन म्हणजे काय नखं कापून घेण्याईतकं सोप्पं ऑपरेशन वाटलं का तुम्हाला?

किडनी डोनेशनची प्रक्रिया कशी असते हे सर्वसामान्यांना माहित नसते. माहिती असणे अपेक्षितही नसावे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस ते ऑपरेशन म्हणजे 'नख कापून घेण्याईतकं सोप' समजतो असा थेट आरोप करणं म्हणजे विनाकारण सर्वसामान्य माणसाच्या 'अकलेची' किव करणे आहे. तसे असता कामा नये. त्यामुळे, वरील वाक्याऐवजी 'किडणी डोनेशन प्रक्रिया फार गुंतागुंतीची असते' अशा वाक्याने सुरुवात करून ती प्रक्रिया समजावून सांगितल्यास रुग्ण आणि डॉक्टर ह्यांच्यातील समजाची दरी कमी होण्यास मदत होईल.

त्यासाठी आधीच स्क्रीनींग/ मॅचिंग करून ठेवलेला दाता असावा लागतो.
इकडे किडनी काढली की लग्गेच दुसरीकडे ओपन केलेल्या रूग्णात ती बसवावि लागते.

वरील रुग्ण ३-४ दिवस हॉस्पिटलात अ‍ॅडमिट होती असे जाणवते आहे. ह्या कालावधीत वरील प्रक्रिया शक्य नाही का? मला कल्पना नाही म्हणून विचारतो आहे.

मृत्यू पश्चात अवयव दान करतात त्यात किडणी दान करता येते का? तसे असेल तर स्क्रिनिंग/मॅचिंग ही क्रिया रुग्ण (दाता) जिवंत असतानाच करून ठेवायला लागते का? आणि ज्याला दान करायची तो आधीच तयार ठेवावा लागतो का? रुग्ण मेल्यानंतर किती काळात किडणी काढावी आणि ताबडतोब दुसर्‍या रुग्णाला बसवावी लागते? ज्याला मिळणार आहे तो ऑपरेशन थिएटरात बेशुद्ध करून ठेवून दुसर्‍या ऑपरेशन थिएटरात किंवा शवागारात (शवविच्छेदन करतात तिथे) मृत रुग्णाचा देह ठेवून किडणी रोपण केले जाते का? रुग्णाचा मृत्यू आणि दात्याला रोपण करून मिळणे ह्यात जास्तीतजास्त किती तासांचा अवधी असू शकतो?

मला स्वतःला देहदान आणि अवयव दान करायचे आहे म्हणून वरील शंका विचारतो आहे.

स्पंदना's picture

6 Mar 2014 - 3:36 am | स्पंदना

जाँडीस झालेल्या रुग्णाची किडनी साधारणत: घेत नाहीत. पण कुणी सांगावं, इकडेही फसवणुक अन तिकडेही फसवणुक.

साती's picture

6 Mar 2014 - 1:33 pm | साती

किसन शिंदे यांचा प्रतिसाद वाचून कळव्याच्या राजेशिवाजी हॉस्पिटलला संलग्न असलेल्या महाविद्यालयात एम बी बी एस होऊन मग पुढे नेफ्रॉलॉजिस्ट झालेल्या मित्राकडे विचारणा केली असता मूळात या हॉस्पिटलात किडनी ट्रान्सप्लाण्टची सुविधाच नाही असे कळले.
मुंबईत ज्या रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध आहे त्यांची यादी इथे पहा.
http://www.karmayog.org/kidney/kidney_11523.htm

बंडा मामा's picture

8 Mar 2014 - 8:54 am | बंडा मामा

कसल्या सुविधा आणि काय घेऊन बसलाय तुम्ही.. डॉ.अमित कुमार आणि त्यांचे गुडगाव किडनी स्कँडल ह्या विषयी वाचलेले दिसत नाही. प्लीज गुगल करुन पाहा.

आंबट चिंच's picture

6 Mar 2014 - 1:50 pm | आंबट चिंच

कमाल आहे पण त्या डॉ. ची मती गूंग होते. खरं तर आपण अ‍ॅलर्ट (दक्ष) राहायला हवे.
खरं तर असे काही करण्या पुर्वी आपल्या फॅमिली डॉ.चा सल्ला घ्यावा असे वाटते. ते सहसा फसवत नाही.
किसन देवा ही घटना माझ्याच ठाणे शहरातली आणि मला माहीत नाही? मला लिन्क द्याल काय?

मूत्रपिंड रोपण करीत असलेल्या विविध रुग्णालयात मी ११ वर्षे काम केलेले आहे. दात्याच्या शरीरातून मूत्रपिंड काढणे आणि ते ग्राहकाच्या शरीरात रोपण करणे या दोन्ही क्रिया एकाच वेळेस बाजुबाजुच्या शल्यक्रिया गृहात होत असतात. त्याअगोदर मुत्र्पिंडला एकाच रक्त वाहिनी आहे कि अनेक आहेत यासाठी रुग्णाची अन्जीयो ग्राफी करावी लागते कारण दोन (किंवा अधिक रक्तवाहिन्या असतील तर ते मूत्रपिंड रोपणासाठी चालत नाही. शिवाय मूत्रपिंड रोपण करण्यासाठी डी एन ए जुळतात कि नाही ते पाहावे लागते. यासाठीच जिवंत आणि नात्यातील दाता आवश्यक आहे. असे रस्त्यावरील कोणाचेही मूत्रपिंड घेऊन कोणालाही रोपण करता येत नाही. कावीळ असलेल्या रुग्णाचे तर नाहीच नाही. रण कावीळ बी किंवा सी प्रकारची असेल तर रुग्णाचे यकृत खराब होऊन त्याच्या जीवाला धोका संभवतो.
दाता हा पूर्णपणे निरोगी असावा लागतो चार दिवसापूर्वी अतिदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णाकडून कोणीही मूत्रपिंड घेणार नाही कारण ग्राहकाला आयुष्यभर जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते( ग्राहक तोंडाला हिरवे फडके बांधून फिरताना आपण पहिले असेल) ग्राहकाची प्रतिकार शक्ती औषधे देऊन कमी केलेली असते जेणेकरून ग्रहण केलेले मूत्रपिंड तुमचे शरीर त्याग करू नये( transplant rejection) लक्षावधी रुपये देऊन (चोरीचे असले) तरी मूत्रपिंड ग्राहकाच्या शरीराने स्वीकारणे आवश्यक आहेच.ते जर अस्वीकार झाले तर दुसर्यांदा अशी शस्त्रक्रिया करण्यास कोण तयार होईल.
आपली माहिती अर्धवट किंवा/ आणि ऐकीव असावी.

किसन शिंदे's picture

8 Mar 2014 - 8:45 pm | किसन शिंदे

माहीतीबद्दल धन्यवाद सर!

जेपी's picture

5 Mar 2014 - 8:54 pm | जेपी

भयानक

लेखक डॉक्टर श्रीराम गीत यांचे हे पुस्तक या क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर चांगला प्रकाश पाडते,आणि काही मार्गही सुचवते.

साती's picture

6 Mar 2014 - 12:54 pm | साती

आता वर लेखात आलेल्या केसबद्दल.
त्यापूर्वी हे सांगू इच्छिते की माझा महाराष्ट्रातल्या मेडिककल प्रॅक्टिसशी सध्या काहिही संबंध नाही.
मी कर्नाटकात एका दुर्गम गावात प्रॅक्टीस करते.
;)

सदर केसचि टाईमलाईन अभ्यासली असता पेशंट पायोजनिक हायड्रोनेफ्रॉसिसने अ‍ॅडमिट झाला होता.
त्याला अँटिबायोटिक्स देऊन जंतूसंसर्ग कमी करायचा प्रयत्न केला गेला.(ग्रिडी डॉक्टर्स असते तर आणला की कापला असे वागले असते)
मग सर्जरि करिता घेऊन गेले.
अश्या केसेसमध्ये सर्जरी करताना सगळी काँप्लिकेशन्स इन्क्ल्यूडींग रिस्क ऑफ हिमरेज आणी डेथ रूग्णाच्या नातेवाईकांना समजावून त्यांची सही घेण्यात येते.

या केसमध्ये झालेले इंटर्नल ब्लिडींग हे वन ऑफ द नोन काँप्लिकेशन आहे.
याबाबतीत मी त्या डॉक्टरना अपयशि समजेन पण गुन्हेगार नाही.
मूळात कोणताच डॉक्टर रूग्णाला मुद्दामुन हार्म पोहोचवेल हे शक्य नाही.

पिलीयन रायडर's picture

6 Mar 2014 - 1:00 pm | पिलीयन रायडर

तुम्ही छान प्रतिसाद देत आहात.. त्यामुळे बरेच गैर्समज दुर होत आहेत..
मेडिकल क्षेत्रातील कॉम्प्लिकेशन्स निटसे न समजुन घेता बर्‍याचदा डॉक्टरांवर आरोप होतात.. अशा वेळी एका डोक्टरनी लिहीणं फार महत्वाच आहे..

मूळात कोणताच डॉक्टर रूग्णाला मुद्दामुन हार्म पोहोचवेल हे शक्य नाही.

बरोबर आहे.. मुद्दाम कुणी का कुणाचा जीव घेईल? पण हलगर्जीपणा होऊ शकतो ना? ह्या केस मध्ये तसच चित्र उभं केलं आहे.. जसं की अ‍ॅम्ब्युलन्स नसणे वगैरे.. ह्याला हॉस्पिटललाच जवाबदार ठरवाव लागेल ना?

साती's picture

6 Mar 2014 - 1:20 pm | साती

अँब्युलन्स आणि ब्लड बँक असणे हे हॉस्पिटल एस्टॅब्लिशमेंटसाठी नेसेसरी नाही.
माझ्या हॉस्पिटललाही स्वतःची अँब्युलन्स नाही.
इतकेच नव्हे आमच्या पूर्ण जिल्ह्यात मिळून एक ब्लड बँक (सरकारी) आहे.
तिथेही होल ब्लडशिवाय इतर कोणतेही रक्तघटक अ‍ॅवेलेबल नाहीत.

पैसा's picture

6 Mar 2014 - 2:06 pm | पैसा

चांगले प्रतिसाद देत आहेस! म्हणजे या केसमधे जीव वाचवण्यासाठी किडनी काढण्याची शस्त्रक्रिया झाली पण "किडनी काढून घेतली" असा डॉक्टरवर आरोप झाला. सतत असं झालं तर सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टरसुद्धा जराही रिस्क घ्यायला नकार देतील. अ‍ॅम्ब्युलन्स फार कमी खाजगी हॉस्पिटल्सकडे असतात. गोव्यात १०८ नंबरला फोन करून अ‍ॅम्ब्युलन्स ताबडतोब मागवता येते. मुंबईत तशी काही सोय नाही का?

साती's picture

6 Mar 2014 - 2:47 pm | साती

धन्यवाद गं!
आमच्याइथे पण १०८ आहे.
तिचे ड्रायवर हि सेवा फुकट असतानाही रूग्णं आणि ज्या हॉस्पिटलात नेतात ते या दोघांकडून विनाकारण पैसे वसूल करतात.

बाकी ' सेवाभावी' म्हणशील तर ज्यावेळी आमच्या एस्टॅब्लिशमेंटना शॉप अ‍ॅक्ट आणि कन्ज्युमर अ‍ॅक्ट लावला तेव्हाच संपला.
आता आम्ही सेवादाते आहोत आणि तुम्ही ग्राहक.
मात्रं प्रत्येक धंद्याप्रमाणे इथे सचोटीची गरज आहे.
प्रत्येक धंद्याप्रमाणे इथेहि खूप फ्रॉड, अनकाँपिटंट डॉक्टर्स आहेतच .
पण प्रत्येकच डॉक्टर फ्रॉड नाही हे लोकांना समजले पाहिजे.
मूळात एखादे मिसहॅप झाले तर अर्धवट माहितीवर लोकांना भडकवण्याचे काम होऊ नये.
जसे वर कळव्याला त्या मुलीच्या पोटातली किडनी काढून घेतलि म्हणतायत.
ही शुद्ध अफवा आहे.

पैसा's picture

6 Mar 2014 - 3:09 pm | पैसा

आमच्या एस्टॅब्लिशमेंटना शॉप अ‍ॅक्ट आणि कन्ज्युमर अ‍ॅक्ट लावला

तरीही रुग्णाच्या जिवाशी थेट संबंध येत असल्यामुळे जर रुग्णाचा आणि नातेवाईकांचा विश्वास असेल तरच डॉक्टर काही प्रमाणात जबाबदारी घेऊ शकतात. मात्र वरच्या केससारखी कुप्रसिद्धी, मानहानी आणि आरोप यांची जास्त शक्यता असेल तर मग प्रत्येक वेळीच सरळ "केस माझ्या हाताबाहेर आहे, सरकारी रुग्णालयात हलवा" असं सांगणं सुरू होईल.

अर्थात डॉक्टर्स १००% वेळा बरोबर असतात किंवा प्रामाणिक असतात असे नव्हे पण निदान प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणार्‍याला अशा प्रसंगात त्रास होऊ नये. मिडियाची भूमिका बहुतेकवेळी सवंग बातम्या तयार करणे एवढीच दिसते. अशा खोट्या बातम्या पसरवणार्‍या पेपर्स आणि चॅनेल्सवर नियंत्रण आणले गेले पाहिजे.

स्पंदना's picture

7 Mar 2014 - 7:27 am | स्पंदना

नाही हं साती. किसन देव सांगताहेत तो प्रकार मी माझ्या गावात पाहिला आहे.
आठव इचलकरंजी रॅकेट.
गावात शेतावर काम करणार्‍या कुटुंबातली १५-१६ची मुलगी. काय म्हणे पोटात दुखतय. बहुतेकदा कोल्हापुअरात नेउन दाखवणे वगैरे प्रकार आमच्या कडुन होतात. कधी घरच्या हॉस्पिटलात, कधी गरज असेल तशी स्पेशालिस्ट. घरच्या हॉस्पिटलचे पैसे लावत नाहीत. पण येथे काय झालं, त्या घरातला तिचा काका इचलकरंजीत युनिअन लिडर. तो म्हणाला नाही मी इचलकरंजीत दाखवणार. नेली. परत आली मी ऐकतेय फार मोठ ऑपरेशन झालय, हे ते. मग एक दिवस गेले बघायला. म्हंटल कसल ऑपरेशन? तर अपेंडिक्स काढला. म्हंटल बघु. ते तर दोन टाक्याच होतय हल्ली. तिने ब्लाउज वर केला. कमरेच्या या साईड पासुन त्या साईड पर्यंत कट. अराउंड दहा ते बारा टाके. काऽऽही बोलले नाही. उठुन आले.

मी अगोदर वाचले नाहीय.
लिंक आहे का?
बाकी इचलकरंजीत किडनी काढून दुसर्‍याला बसवायची सोय असेल हे अतर्क्य वाटतंय.

कपिलमुनी's picture

18 Mar 2014 - 5:58 pm | कपिलमुनी

सलमान खान ला पण गाडी चालवताना अपयश आला हो .. तो गुन्हेगार नाहीये..

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 6:18 pm | मंदार दिलीप जोशी

*LOL* *blum3*

सुबोध खरे's picture

19 Mar 2014 - 6:37 pm | सुबोध खरे

जेंव्हा डॉक्टर च्या हातून एखादी चूक होते आणि रुग्णाला इजा /मृत्यू होतो तेंव्हा काही गोष्टी पाहणे आवश्यक आहे.
१)genuine error of judgement
२)mistake -चूक
३) act of omission
४)act of commission
५)criminal negligence

जोवर पहिल्या दोन गोष्टी होतात तोवर डॉक्टरला गुन्हेगार मानणे चूक आहे. उदा. एखादा शल्य चिकित्सक सर्व निदान कर्करोग पसरला नाही असे दाखवत असताना पोटाची शल्यक्रिया करतो आणि पोट उघडल्यावर असे जाणवते कि कर्करोग महत्त्वाच्या अवयवात पसरला आहे तेंव्हा त्याला १)genuine error of judgement म्हणता येते (यात सुद्धा नातेवाईक बोंब मारताना पहिले आहेत).
किंवा एखादि शल्यक्रिया करताना दुसर्या अगदी जवळच्या अवयवाला इजा पोहोचणे शक्य आहे. उदा. गर्भाशय काढून टाकताना मुत्र्नालीकेला इजा होऊ शकते. हि एक क्षम्य अशी चूक(mistake) आहे आणि जगातल्या १०० % डॉक्टरच्या हातून असे होतेच.
यापुढची कोणतीही पायरी म्हणजे रुग्णाची वेळेत शस्त्रक्रिया न करणे ( act of omission ), किंवा गरज नसताना शल्यक्रिया करणे (act of commission मुद्दाम केलेली क्रिया) आणि अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाकडे दुर्लक्ष (मुद्दाम/ बेपर्वाईने) केल्याने त्याचा मृत्यू झाल्यास त्याला अक्षम्य हेळसांड (criminal negligence) म्हणता येईल.
यात सलमान खान कुठे बसतो?दारू पिउन गाडी चालवून पदपथावर निजलेल्या काही गरीब माणसाना चिरडले आणि त्याची केस अजून बांद्रा कोर्टातून पुढे गेलेली नाही. आणि अशीच अलीस्तीर परेरा च्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयात निकालही लागला.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Salmans-2002-accident-cas...
"लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात"

आता डॉक्टर आणि सलमान खान यांना एकाच मापात तोलणारया माणसाना काय समजवावे?
मग ते हलके घ्या म्हणतात तेंव्हा हसून साजरे करा.
असो

आनंदी गोपाळ's picture

20 Mar 2014 - 11:27 pm | आनंदी गोपाळ

तुमच्या आकलनाची कीव करावी तेवढी थोडी!
तुम्ही म्हणता,
"
अपयशी की गुन्हेगार ?
कपिलमुनी - Tue, 18/03/2014 - 17:58
नवीन

सलमान खान ला पण गाडी चालवताना अपयश आला हो .. तो गुन्हेगार नाहीये..
"
साहेब,
१.सल्मान खानला गाडी तुम्ही विकत घेऊन दिली नाहित.
२.त्याला गाडी चालवायला कुणी शिकवली, की त्याने आरटीओला दोन पाचशे रुपये लाच देऊन लायसन घेतले, याची तुम्हाला माहिती नाही.
३.त्याच्या रस्त्यात तुम्ही झोपायला स्वतःहून गेला नाहीत.
४.त्याला तुमची गाडी चालवायला तुम्ही सांगीतले नाहीत

आता,
१. ज्या डॉक्टरने तुमच्यावर उपचार केले, तो तुम्हाला घरी बोलवायल आला नाही, की भाऊ, माझ्याकडे ये, अन उपचार घे.
२. त्याने शरिरे दुरुस्त करण्याचे योग्य शिक्षण विकत घेतले आहे. ते शिक्षण समाज व सरकारमान्य शाळेत घेतलेले आहे, व ते दुरुस्त करण्याची योग्य परवानगी व अवजारे त्याने मिळवली आहेत.
३.तुम्ही हे सगळे जाणून बुजून एका कागदावर सही करून, तुमच्या वतीने तुमचे शरीर दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्याची परवानगी त्याला दिलेली आहे.

^^हे वाचून तुमच्या आकलनात उजेड पडला का?

तुमच्या प्रतिसादाखाली जे लोळताहेत ना, मंदार जोशी? त्यांच्या 'आकलनात' अनेकदा फरक पडावा म्हणून मी इतरत्र प्रय्त्न केलेले आहेत. ते अजूनही लोळतातच आहेत असे दिसते.

आनंदी गोपाळ's picture

20 Mar 2014 - 11:30 pm | आनंदी गोपाळ

नेक्स्ट टाईम,
आजारी पडाल तेव्हा डाक्टरची पायरी चढू नकाच.
अनेकदा मला वाटते, की शॉप अ‍ॅक्टचे लायसन लावलेय ना फ्रेम करून वेटींग रूम मधे? तर दुकानदार सांगतात ना? 'तेरे कू नहि बेचनेका. दुसरी दुकान मे जा' असे सांगावे एकदा तरी.
तुम्हाला तुमच्या डॉक्टरने हे सांगावे, अशी 'शुभेच्छा' व्यक्त करतो.
धन्यवाद!

कपिलमुनी's picture

21 Mar 2014 - 2:51 pm | कपिलमुनी

भाउ , पैसे घेतोच ना डॉक्टर ?? फुकत तर विकत नाही ज्ञान ?

ठीक आहे .. सलमान चे उदाहरणात शब्द्च्छल करता येइल ..पण बस किंवा कोणत्याही प्रवासी वाहनाचा अपघात होतो तेव्हा पोलिस चालकाला दोषी धरतात ..
१.तेव्हा चालक येत नाहीत ,भाऊ, माझ्याकडे ये, अन माझ्या गाडीत बसा ..
२. त्याने गाडी चालवाय्चे शिक्षण घेतले अहे आणि परवाना पण आहे
३.अणि तुम्ही गाडीत बसता तेव्हा होणार्‍या संभाव्य अपघाताचे अंदाज तुम्हाला असतातच ..

तरीही पोलिस अपघाताला ड्रायव्हर लाच कारणीभूत धरतात..आणि गुन्हेगार ठरवतात ..
डॉक्टर किंवा ड्रायव्हर कोणीही मुद्दाम हे करत नाही.. त्यांचा प्रयत्न सर्वोच्च सेवा देण्याचा असतो असे माझे मत आहे ..
पण आपल्या पेशा मधे निष्काळजी पणा करणे हा गुन्हाच आहे ..ते अप यश नव्हे ..

साती यांनी वरती जे लिहिले आहे .. मि त्यांना अपयशी समजेन गुन्हेगार नव्हे.. ते नक्कीच चुकिचे आहे

साती's picture

21 Mar 2014 - 8:59 pm | साती

पोलिस चालकालाच दोषी धरतात हे खरे आहे मात्र न्यायव्यवस्था सगळ्या बाजू तपासल्यानंतर चालकाला शिक्षा ठोठावतेच असे नाही.
कित्येकदा चालकही निर्दोष ठरतो कारण अपघात केवळ परिस्थितीजन्य असतो.
मात्र बर्याचदा रस्त्यावरचे बघे केवळ चालकालाच दोषी ठरवून तेही मोठ्या गाडीच्या चालकाला दोषी ठरवून बदडतात.
तसेच मृत्यूपश्चात बरेच नातेवाईक डॉक्टरला दोषी ठरवून बदडतात.
एखाद्याला चौकशीसाठी नेणे म्हणजे तो दोषी असेच नव्हे.

डॉक्टरांची चुक आणि नंतर ती लपवण्याचा आटापीटा, अश्या कथानकावर बेतलेला 'अंकुर अरोरा मर्डर केस' नावाचा एक छान चित्रपट गेल्यावर्षी येऊन गेला.
इच्छुकांनी नक्की पहावा. (असे चांगले चित्रपट केव्हा येतात अन जातात कळतही नाही.)
http://www.imdb.com/title/tt2912578/

अवांतरा बद्दल क्षमस्व.

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 7:06 pm | आनंदी गोपाळ

अशा प्रकारचे सिनेमे नाटकं येतच असतात.
बातम्याही लोकांना कळत नाहीत कुठे काय झालं त्याच्या!

खरंतर डॉक्टर लोक फार मातलेत आजकाल.
परवाच कानपूरच्या मेडिकल स्टुडंट्सना मस्त होस्टेलचं गेट बंद करून मारहाण केली तिथल्या पोलीस एसपी अन समाजवादी पार्टीचा आमदार मिळून. चांगला ६०० लोकांचा ताफा नेला होता.
२ मुलांना ३र्‍या मजल्यावरून फेकून दिलं खाली. ५-६ मुलांची हाडं तोडलीत काठ्या मारून मस्तपैकी. अहो व्हिडिओ आहेत यूट्यूबवर.
बघा:
१. https://www.youtube.com/watch?v=OKRVnoOwof8
२. https://www.youtube.com/watch?v=2NXl7Xk5JSs
३. https://www.youtube.com/results?search_query=kanpur+medical+students
अजून बरेच आहेत.

खरंच असंच तुडवायला हवं डॉक्टर्सना.
रूलिंग एमेलेच्या उभ्या गाडीचे दार आतून कुणी उघडल्याने या पैकी दोन मेडीकल स्टूडंट्सची मोटारसायकल त्या दाराला धडकली हे निमित्त झालं होतं. चकाचक गोळीबार केला एम्पीच्या अंगरक्षकांनी आधी.
अन पहाटे मस्तपैकी धुतलेत यांना.

!@!#@%$#@$ चे डॉक्टर बनून काय उपकार करतात का हे आमच्यावर?

सत्तेच्या नि ताकदीच्या बळावर हाणामारी करणारांचा निषेध पण म्हणून ते मेडीकल स्टुडण्ट आहेत म्हणून मारलं असं आपलं म्हणणं असेल तर 'मोठे व्हा'!

बाळ सप्रे's picture

7 Mar 2014 - 12:48 pm | बाळ सप्रे

+११११११

साती's picture

6 Mar 2014 - 7:16 pm | साती

सहमत!
;)

साती's picture

6 Mar 2014 - 7:17 pm | साती

सहमती आनंदी गोपाळयांच्या प्रतिसादाला आहे, प्यारेजींच्या नाही.

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 3:35 pm | मंदार दिलीप जोशी

:D

राजकारणी नेते, त्यांचे पित्ते आणि विकला गेलेला पोलिस फोर्स यांच्या अरेरावीला इतका पाठिंबा देण्याचा निषेध.

आनंदी गोपाळांचा प्रतिसाद औपरोधिक होता असे वाटतेय.

या धाग्यावर येत असलेले डॉक्टरांचे प्रतिसाद माहितीत भर घालणारे आणि गैरसमज दुर करणारे आहेत.
सातीताई आणि खरे साहेब धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 7:12 pm | आनंदी गोपाळ

तुमचा वरचा 'डॉक्टरचीच चूक व दडपण्याचा प्रयत्न'वाल्या सिनेमाचा प्रतिसाद मात्र गैरसमज वाढविणारा होता, हेच खेदाने नमूद करतो.

वरच्या प्रतिसादात अवांतर आहे असं म्हटलंच होतं. त्या प्रतिसादातुन डॉक्टर मंडळी कशी नेहमी चुकीचच वागतात असं मला अजिबात म्हणायचं नव्हतं, तो निष्कर्ष तुम्ही काढुन मोकळे झालात आणि त्यावर उपहासात्म्क प्रतिक्रिया दिली.
धाग्याचा विषय डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल होता आणि त्यावरुन तो चित्रपट आठवला, 'जो' मला आवडला होता. म्हणुन त्याची लिंक दिली इतकच.

असो.
पुर्वग्रह करुन घेतला आहेच त्यामुळे अधिक काही बोलत नाही.

सुबोध खरे's picture

6 Mar 2014 - 3:10 pm | सुबोध खरे

अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .

हे विधान अज्ञान जनक आहे. मग सामान्य माणसाने काय करायचे? पंच तारांकित रुग्णालयात जायचे कि सरकारी?
मुंबईत १२२ रक्तपेढ्या आहेत यापैकी फक्त चार खाजगी रुग्णालयात रक्तपेढ्या असून (पुण्यात एकही नाही) बाकी सर्व मोठ्या सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात किंवा सेवाभावी संस्था यांच्या आहेत (ज्यांचा रुग्णालयाशी संपर्क असतो सम्बंध नाही) .
दुवा पाहावा http://www.joyfest.in/blood_bank.pdf
आपल्या विधानाप्रमाणे मुंबईतील लोकांनी फक्त या चार रुग्णालयात जावे किंवा सरकारी रुग्नालाय्त जावे. मोठ्या खाजगी रुग्णालयात शल्यक्रियेचे दर हे छोट्या खाजगी रुग्णालयाच्या दुप्पट तरी असतात आणि ते मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गाला सहज परवडणारे नाहीत हि वस्तुस्थिती आहे.
रुग्णवाहिका २४ तास सांभाळणे हे खायचे काम नाही. विशेषतः त्याच्या चालकांचे नखरे सांभाळणे (रुग्णवाहिका विकत घेणे हे सोपे आहे ती उभी करण्यासाठी जागा सापडणे हे मुंबईत तरी कर्म कठीण आहे ). लोक रुग्ण वाहिका मागवतात आणि एकदा रुग्ण आतमध्ये बसवला कि पैसे देत नाहीत, आता अर्धेच घ्या नंतर आणून देतो इ इ.

चालक गैरहजर असेल तर दुसर्याला बाबापुता करून बोलावून घेणे हि रोजची कटकट असल्यामुळे खाजगी रुग्णालये या फंदात पडत नाहीत. शिवसेना सारख्या राजकीय पक्षाला ते ठेवणे किंवा सांभाळणे शक्य असते. बाकी सेवाभावी संस्था जेथे देणग्यांच्या माध्यमातून या गोष्टी चालवल्या जातात त्यांची गोष्ट वेगळी आहे पण त्यांचे अनुभव काही उत्साहवर्धक नाहीत. रुग्णाला एका किमी ला इतके पैसे लागतील असा रोखठोक हिशेब सांगितल्यास फार वादावादी होते.( इथे आमचा नातेवाईक मारायल टेकला आणि तुम्हाला पैश्याची पडली आहे इतक्या देणग्या येतात ते पैसे कुठे जातात इ.) चालक लोक रुग्णाचे स्ट्रेचर उचलायला तयार होत नाहीत हि रोजची तक्रार असते. तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही.जबरदस्ती केल्यास ते गैरहजर राहतात/ सोडून जातात. वाहतूक पोलिसांची कटकट( रुग्ण आत नसताना वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे) केलेला दंड किंवा पावती याची कटकट, रुग्णवाहिका बिघडली त्यातील ऑक्सिजन सिलिंडर रुग्ण घरी घेऊन जातात त्यासाठी एक अजून सहाय्यक ठेवा. रुग्ण आम्हाला एक डॉक्टर( किमान नर्स) बरोबर द्या असा आग्रह धरतात. असे अनेक मुद्दे आहेत.या कोणत्याच लफड्यात पडावे असे खाजगी रुग्णालय किंवा त्यांचे मालक यांना झेपणारे नसते.
या लेखामुळे कोणती जागृती झाली/ होणार होती ते कळले नाही. मुळात आपण कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसताना त्याचा न्याय निवाडा करणे हि चुकीची गोष्ट आहे यास्तव तेथे प्रत्यक्ष काय झाले( असावे) हे माहित नसताना मी त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही.
sitting on judgement of incomplete/ disputed information is bad in eyes of law अशा तर्हेचे इंग्रजी सुभाषित आहे. प्रत्यक्ष काय आहे ते न्यायालयाला ठरवू द्या.
एखादा माणूस ऐन तारुण्यात असा जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे तरीही अर्धवट माहितीवर जनजागृती करणे हे फारसे बरोबर नाही असे मला वाटते.

कवटी's picture

6 Mar 2014 - 5:11 pm | कवटी

सहमत

प्रमोद देर्देकर's picture

7 Mar 2014 - 5:08 pm | प्रमोद देर्देकर

डॉ. नहमी सारखाच सही जवाब १ ++++

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2014 - 11:56 am | अत्रन्गि पाउस

प्रत्यक्ष उदाहरण माहित नसले तरी एकंदर सिस्टीम बघता हे असेच होत असेल हे पटते..

म्हैस's picture

6 Mar 2014 - 4:46 pm | म्हैस

एखादा छोटंसं operation करायला जाताना सुधा जर लोकांना जीव गमवावे लागत असतील तर त्यांनी काय करावा? ज्यांना परवडत त्यांनी रिस्क घेवू नये आणि ज्यांना परवडत नाही अश्यांनी घ्यावी असाच म्हणावं लागेल ना. operation छोटंसं असला तरी worst condition काय होऊ शकते आणि ती झाल्यावर लागणाऱ्या सुविधा हॉस्पिटल मध्ये आहेत कि नाही हे बघू नये असं म्हणायचं का तुम्हाला ? सामान्य माणसांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाण शक्य नाही हे मलाही कळतंय . पण ज्यांना शक्य आहे ते तरी ह्या केस मधून धडा घेवू शकतील म्हणून हा लेख लिहिलंय

नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपण काही मदत करु शकतो का ?

इंद्रजीत आधी आमच्या office मध्ये होतं. आम्ही सर्वांनी आपापला १ दिवसाचा पगार त्याच्या कुटुंबियांना देण्याचा ठरवला आहे. पैसे गोळा करण्याचं काम चालू आहे.

या लेखामुळे कोणती जागृती झाली/ होणार होती ते कळले नाही. मुळात आपण कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसताना त्याचा न्याय निवाडा करणे हि चुकीची गोष्ट आहे यास्तव तेथे प्रत्यक्ष काय झाले( असावे) हे माहित नसताना मी त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही.

तुम्हाला नक्की काय म्हणायचं? तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथे सांगितलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला? एवढा जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः जावून काही मुलभूत प्रश्न Prime Surgical Hospital च्या त्या डॉक्टर ला का विचारात नाही आहात तुम्ही ? त्याच्यावर सरकारच्या वतीने केस दाखल केली आहे. वकिलांनी सिद्ध त्याला अतिशय मुलभूत प्रश्न विचारले ज्यची उत्तरं डॉक्टरांना देता आली नाही. शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 6:58 pm | आनंदी गोपाळ

अच्छा!
म्हणजे तो पेशंट तुमच्या कुटुंबियांपैकी होता का!
तरीच.

प्यारे१'s picture

6 Mar 2014 - 7:10 pm | प्यारे१

?

डॉक्टर असेही असतात तर!

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 7:13 pm | आनंदी गोपाळ

म्हणजे कसे?

कुटुंबियांपैकी असला तरच भावना व्यक्त कराव्यात असं म्हणणारे भावनाशून्य...

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 7:27 pm | आनंदी गोपाळ

शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?

हे व आधीची वाक्ये वाचलीत का आपण आवले साहेब?
भावना व्यक्त करण्याचा प्रश्नच नाहीये. संयतपणे योग्य माहिती हाती असल्याशिवाय मत प्रदर्शन करणार नाही असे सुबोध खरे यांनी म्हटले आहे. त्यावर म्हैस महोदयांचे इरिटेटिंग उत्तर वाचल्यावर मी तो प्रश्न विचारलेला आहे.
म्हैस यांनी कोणती फर्स्ट हँड माहिती घेतली?
त्या रुग्णावर काय उपचार केले होते, त्याला आजार काय होता, इत्यादी बाबतींचा टेक्निकल सोडा कोणत्याही प्रकारचा फर्स्ट हँड विदा यांचेपाशी आहे काय?
उगा उठ अन झोड डॉक्टरला. काय खाऊ आहे का?

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 7:36 pm | आनंदी गोपाळ

आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा प्रतिसद वाचला.
मोठं व्हायची गरज कुणाला आहे, ते लख्ख समजलं! डॉक्टर्सबद्दल तुमचे मत पूर्वग्रहदूषीत आहेच, हेच तुम्ही सिद्ध केलेत दोन्हीकडे.
धन्यवाद!

प्यारे१'s picture

6 Mar 2014 - 8:26 pm | प्यारे१

:)

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 10:13 pm | आनंदी गोपाळ

उत्तर सुचले नाही तर स्मायली टाकायची.
मी साती अथवा खरेंसारखा नरम लिहिणारा डॉक्टर नाही.
हलकटपणा वाटेल, पण मी दुकान टाकून, तिथे ५५ प्रकारची सरकारी सर्टिफिकेटं, ज्यात शॉप अ‍ॅक्ट लायसन लागू आहे,- लटकवून, 'धंदा' करणारा व्यावसायिक आहे. इथे मी दुकानदार आहे अन तुम्ही ग्राहक. आज फक्त नादुरुस्त शरीर दुरुस्त करण्याचे वर्कशॉप आहे इथे. दुकान.
ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे. पदोपदी संशय!
ज्या विषयातले शष्प शिक्षण घेतले नाही त्यातली शस्त्रे तुमच्यावर चालवायची परवानगी होम्योपदी अन इतरांना तुमच्या सरकारने दिलेली आहे. काय वाट्टेल त्या नावाखाली काय हवे ते कायदे गळ्यात मारताहेत.
इथल्या एका तरी टिनपॉट डॉक-ब्याशर ची औकात अन ऐपत आहे का इथे, की जाऊन बालाजी तांबे वा रामदेव बाबा सारखे लोक जे कोणत्याही डीग्री वा रजिस्ट्रेशन शिवाय करोडो रुपयांचा धंदा करतात, अन तुम्हाला तुमच्या आरोग्यबद्दल चुतिया बनवतात, त्यांना जाब विचारेल? हा म्हैस नामक प्राणी खरेंना विचारतो, की 'त्या डॉक्टरला' जाब विचारला का? अरे हूट! काय संबंध?
कोणत्या तोंडाने असले धागे काढून त्या धाग्यांवर प्रतिसादही लिहिता हो तुम्ही?

उत्तर सुचलं नाही म्हणून नाही तर तुमच्या अ‍ॅटीट्युड मुळे ती स्मायली टाकली होती....!

'नातेवाईक असलं तरच बोलावं' असं आपला प्रतिसाद सुचवतो आहे त्याबद्दलच ते म्हणणं होतं. बाकी स्टुडन्टसवरचा प्रतिसाद नीट वाचला असतात तर समजला असता.

चांगल्या डॉक्टर्स बद्दल, त्यांच्या स्कील बद्दल निश्चितच आदर आहे मात्र ह्याचा अर्थ सगळे डॉक्टर चांगले असतात असं नाही.

स्टुडन्टसना मारणं निषेधार्हच आहे पण त्या मारण्याचा आत्ताच्या केसशी काय नि कसा संबंध होता हे समजेल का? वडाची साल वांग्याला लावण्यात काय हशील आहे?

म्हैसनं जे सुचवलं अथवा जे काही लिहीलं (म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?) ते डॉ. खरेंनी व्यवस्थित उत्तर देऊन क्लिअर केलं आहे. असो. वरच्या प्रतिसादात आपण आपल्याच अनेक व्यवसाय बंधूंना अपमानित केलेलं आहे असं वाटत नाही का? सरकार आमचं नि तुमचं काय मग?

जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना?

ही आणखी एक स्मायली :)

म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?

अगदी अगदी.

म्हणून काय वाट्टेल ते ऐकून घेऊ का?

ते निरुपद्रवी प्रश्णः माझ्या दुकानात केलेल्या रिपेरिंग जॉबचे पैसे कोण देणारे? इन्शुरन्स कंपनीवाला की दुसरा कुणी? यासाठी ते विचारतो आम्ही. हेच तुमचा मारुती वर्कशॉपवाला विचारतो, किंवा कोपर्‍यावरचा वाणी तुम्हाला उधार देण्याआधी विचारतो. अन खोटी बिले मागायला येणारे तुमच्यापैकीच असतात. लाज वाटते माझ्याच शाळेतला मास्तर बापाच्या ऑपरेशनच्या पैशाची रिएंबर्समेंट मागताना 'अरे बिल वाढव जरा. मलाही थोडे सुटले पाहिजेत' असे सांगतो तेव्हा. मी सरळ हाकलून देतो असल्या गुरुजनांना.

प्लस,
अमुक जॉब मधे तमुक आजार होऊ शकतात, अशी एक गम्मतही असते. उदा. आयटिमधे असाल तर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा कार्पल टनेल सिंड्रोम (हा आरेसाय नाहीच असे अमेरिकन इन्शुरन्स कंपन्ञांनी कोर्टात सिद्ध केलंय बादवे)

बाकी माझी अ‍ॅटिट्यूड आधीच क्लियर केलिये मी. 'हलकट' ;)

ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच स्मायली टाकलेली.
हाथ मिलाओ! आम्ही पण....हलकटच. :)

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 11:04 pm | आनंदी गोपाळ

गले मिलो दादा! सिर्फ हाथ मिलानेसे क्या होगा?

आनंदी गोपाळ's picture

6 Mar 2014 - 11:03 pm | आनंदी गोपाळ

अरे हो!
सरकार आमचं अन तुमचं काय मग? याचं उत्तर राहिलं.
आज डोकं जरा जास्त तडकलेलं आहे.
ते जे कानपूरचे विधायक इर्फान सोलंकी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय टीव्हीवर. 'हमे जनताने चुनकर दिया है. डॉक्टरोने नही'
हवं तर व्हिडियो डकवतो...

प्यारे१'s picture

7 Mar 2014 - 2:11 pm | प्यारे१

पक्षाचे नाव वाचलेत ना त्यांच्या?
स-माजवादी.
दुसरी अपेक्षा ती काय करणार? :(

बाकी 'दुसरी बाजू' असेल ना काहीतरी ;)

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 3:45 pm | मंदार दिलीप जोशी

जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना? >>

:D :D :D

जबराट उत्तर

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 3:42 pm | मंदार दिलीप जोशी

काय इब्लिस उर्फ डॉक्टर शेखर, इथे पण सुरू का? ;)

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 3:44 pm | मंदार दिलीप जोशी

इथल्या एका तरी टिनपॉट डॉक-ब्याशर ची औकात अन ऐपत आहे का इथे,>>

या घाणेरड्या भाषेचा निषेध.

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2014 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे.

हा एकतर्फी आरोप आहे. डॉक्टरांच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींमुळे ह्या विषयाला चालना मिळाली. पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत. स्वार्थी राजकारणी आणि तोडफोड संस्कृतीवाल्यांनी असे कायदे करायला लावून सर्वसामान्य आणि सरळमार्गी रुग्णांची दोन्हीकडून कोंडी केली आहे.

दुकानाचा व्यावसायिक दृष्टीकोन समजण्यासारखा आहे तरी पण प्रामाणिकपणे, सचोटीने दुकान चालविता येतेच नं? दुकानातही फसवेगिरी शिरली की नैतिकता रसातळाला जाते.

नैतिकता फक्त डॉकटरांकडूनच अपेक्षित आहे असे नाही तर रुग्णांनाही ती बंधनकारक आहे. पण 'ज्ञानी' माणूस 'अज्ञानी' माणसाला हातोहात फसवू शकतो. त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते. तसेच, कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे डॉक्टर-रुग्ण संबंध बिघडताहेत.

हल्ली बहुतेक डॉक्टर शल्यक्रिये आधी रुग्णाला/नातेवाईकांना त्यातील धोके समजावून सांगतात आणि हे समजावून सांगितले आहे अशा विधानाचे कागदपत्र करून त्यावर सह्या घेतात. त्यामुळे रुग्णांनी/नातेवाईकांनी शल्यक्रिये आधी डॉक्टरांशी विचारविनिमय करून काय तो निर्णय घ्यावा. त्याहून कांही हलगर्गीपणा झाला असा संशय आला तर कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात करावी. कायदा हातात घेऊ नये.

आनंदी गोपाळ's picture

17 Mar 2014 - 8:51 pm | आनंदी गोपाळ

पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत.

१. आजच्या काळातही देवासारखे वागणारे "काही" डॉक्टर आहेत. :) प्रमाण "देव मानणार्‍या" लोकांचं कमी होतंय. मग तो देवही देवासारखा वागत नाही, यात काय नवल?
अमेरिकन रेड इंडीयन्सबद्दलच्या एका लिखाणात एक इंटरेस्टींग थियरी वाचनात आली होती. 'A god is powerful because of his worshipers. If the number of worshipers is more, the god becomes strong. If that number goes down, the god becomes less powerful, and eventually can be forgotten.' 'पूर्वीचे डॉक्टर देव होते' डॉक्टरला देव म्हणणारे भक्त कमी झाल्याने, डॉक्टरांतलं देवत्व कमी झालंय, हे कृपया लक्षात घ्या. मघाच पासून या धाग्यावर मी तेच सांगतोय. डॉक्टरवरही थोडा विश्वास ठेवलेला बरा असतो. विश्वास नसेल अन मग तो डॉक्टर दुकानदारासारखा वागला, तर तणफण कशाला हविये?

२. कन्सेन्ट घ्यायची सिस्टीम पूर्वीपासून आहे हो. आजकालची नाही.

३. या आधीचा एक प्रतिसाद आहे. "ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले.
सर, जबाबदारीने वागूनही या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले.
कलियुगात तरी लिमिट असते हो जबाबदारीची.

>>

कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे

<<

चांगल्या बातम्या कानावर कोण घालील? आमच्या आयएमएने जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त गावांत हेल्थ कार्ड्स वाटण्याचे ठरविले आहे. वाटप सुरूही झाले आहे ऑलरेडी. येत्या डिसेंबरापर्यंत जेन्युइन लाभार्थींना (सर्व्हे, अन लाभार्थी आयेमेनेच ठरविलेत.) ५०% पैशात तपासणी/उपचार्/ऑपरेशनं करणार आहोत. या साठी पेड न्यूज वापरावी काय?

अर्थात यातही फसवाफसवीच दिसली कुणाला तर मी काय करू शकतो?

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2014 - 2:12 am | प्रभाकर पेठकर

"ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले.

आनंदी गोपाळ साहेब,

मी, डॉक्टरांनी कोणालाही 'समजून घ्यावे' असे कुठेही म्हंटलेले/सुचविलेले नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की नैतिक जबाबदारी 'ज्ञानी' माणसावर जास्त असते. म्हणजे रुग्णांनी अनैतिक वागावे असा अर्थ नाही. जो एखादा बलवान असतो त्याने आपल्या बळाचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे नैतिक बंधन त्याच्यावर असते. तो बळाचा वापर दुर्बलावर अत्याचार करण्यासाठी करायला लागला तर ते अनैतिक होते. डॉक्टरांजवळ ज्ञानाचे बळ असते ते त्यांनी सत्कर्मी लावावे एवढीच अपेक्षा आहे. रुग्णाचे नातेवाईक चुकतात, भावनेच्या भराव वाहात जातात मला मान्य आहे. राजकारणी लोकं अशांच्या तप्त भावनांचा, आपली पोळी भाजून घ्यायला, वापर करतात.

या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले.

शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते. कारण शल्यक्रियेसाठी त्याला डोके शांत ठेवून काम करावे लागते. तिच वृत्ती त्याला दैनंदिन आयुष्यात वापरावी लागते. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सोडून द्या. हाताची सर्व बोटे सारखी नसतात हे मी सांगायला नको. तुमच्या व्यवसायातील कांही व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधील कांही व्यक्ती वातावरण कलुषित करण्यास मदत करतात. इथे कोणावरही वैयक्तिक दोषारोप होत नसल्याने संयम बाळगावा. एखाद्या रुग्णाला आलेला वाईट अनुभवही खरा असू शकतो एवढी शक्यता लक्षात घ्यावी. डॉक्टरी व्यवसायातही प्रामाणिक आणि सेवाभावि व्यक्ती आहेत ह्यावर आमचा विश्वास आहे.

आनंदी गोपाळ's picture

20 Mar 2014 - 11:39 pm | आनंदी गोपाळ

तुमच्या संयत व संतुलित लिहिण्याबद्दल मनात संशय कधीच नव्हता व नाही.
फक्त तुमच्या लिहिण्याचे बोट धरून इतरांनी वात्रट निष्कर्ष काढू नयेत म्हणून थोडा कडू काढा तुमच्या प्रतिसादाखाली ओतला, इतकेच.
बाकी,
"शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते." ;) हे वाक्य थोडे गमतीचे आहे. तिथे अनेकदा, लौकर बाप दाखव! नाही तर ताबडतोब श्राद्ध कर, अन ते ही ३ सेकंदात! अशी लढाई असते.
तेव्हा ऑपरेशन करणार्‍या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा म्हणजे, फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्‍या बल्लवाचार्यांसारखे आहे ;)