एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
प्रतिक्रिया
21 Mar 2014 - 4:00 am | प्रभाकर पेठकर
'थंड डोक्याची अपेक्षा' म्हणजे 'थंड कृतीची अपेक्षा' असा चुकीचा अर्थ आपण घेतला आहे. 'थंड डोक्याने' म्हणजे 'भावनांनी विचलीत न होता' पण आवश्यकता असेल तिथे झटपट तरीही संतुलीत निर्णय घेणण्याची क्षमता असणे.
हे उदाहरण अप्रस्तुत आहे कारण हे 'थंड डोक्याने विचार करण्याचे' नाही तर 'थंड गतीने शारीरिक कृती' करण्याचे आहे. दोन व्यवसायांची तुलना करीत नाहीए पण एखादा पदार्थ बनविताना आम्हालाही त्यासाठी आवश्यक सर्व जिन्नस हाताशी घेऊन आणि ते ज्या क्रमाने वापरायचे आहेत त्या क्रमाने मांडावे लागतात. पुन्हा सांगतो दोन व्यवसायांची ही तुलना नाही. पण चुक झाली तर आमचा पेशंटही 'दगावतो'.
असो. कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.
21 Mar 2014 - 4:07 am | स्पंदना
ते फक्त वेळेचा अभाव जाण्वुन द्याय्चा प्रय्त्न करताहेत. एकूणच डॉक्टर्सच्या विरोधी सूराने रागावले आहेत.
21 Mar 2014 - 9:57 am | मंदार दिलीप जोशी
अनुमोदन पेठकर
7 Mar 2014 - 3:42 pm | मंदार दिलीप जोशी
शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. >>
अनुमोदन. हे मात्र खरे :(
6 Mar 2014 - 8:54 pm | दिव्यश्री
"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर . थोडासा अंगावर येतो पण ते ठीक आहे कारण मुळात विषय गंभीरच आहे . विक्रम गोखले आणि मुक्ता या दोघांनी अतिशय सुंदर काम केल आहे.
बाकी साती तै आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद छान आहेत . चांगली माहिती मिळतेय . :)
6 Mar 2014 - 9:43 pm | सूड
>>"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर.
अगदी हेच म्हणायला आलो होतो. सिनेमाचं नाव आठवत नव्हतं.
6 Mar 2014 - 8:58 pm | सुबोध खरे
साहेब
ती मृत व्यक्ती आपला जवळचा नातेवाईक होता हे मान्य करून आणि त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करूनही मला आपणाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. कि त्या डॉक्टरानी हलगर्जी पण केला असे आपण कोणत्या आधारावर म्हणत आहात?मुल त्या रुग्णाला आजार कोणता होता आणि त्याची शल्यक्रिया कशासाठी झाली होती त्या शल्यक्रियेनंतर काय गुंतागुंत झाली हे काहीही न विशद करता( कदाचित ते आपणास माहित असेलही पण इथे लिहिलेल्या गोश्वार्यात असे कुठेही दिसत नाही) आपण एक आरोप केलात. त्यात तथ्य असेलही पण कोणताही पुरावा न देता आपण आरोप केलात त्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर दुसरी शल्यक्रिया झाली म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा या गुन्ह्यात सहभागी झाले असे आपले म्हणणे आहे काय?
आणि एवढे सगळे पाहूनही आपण म्हणता जागृती करण्यासाठी तर कोणती जागृती आपल्याला अपेक्षित आहे? सर्व रुग्णालयात रुग्णवाहिका सर्व काळ उपलब्ध असल्याच पाहिजेत असा आपला आग्रह आहे काय?
"तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथे सांगितलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला?" मी असे कुठेही म्हटलेले नाही.
"अर्धवट माहितीवर जनजागृती करणे हे फारसे बरोबर नाही असे मला वाटते." यात काय चुकले हे आपण माझ्या अल्पमतीला समजावून सांगाल काय?
आपला जवळचा नातेवाईक दगावला त्यामुळे लोकांची सहानुभूती नातेवाईकाला असते याचा सरळ अर्थ तो डॉक्टर कसाई आहे असा लावणे चुकीचे आहे.
मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मी डॉक्टरची बाजू घेणार हेही आपण गृहीत धरून "तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?"हे वक्तव्य करणे म्हणजे आम्ही संवेदनाहीन आहोत असा अर्थ आपण कोणत्या आधारावर लावता? मी तो डॉक्टर कसाई आहे असे म्हटले असते तर आपल्याला बरे वाटले असते असाच अर्थ यातून निघतो पण तसे करणे माझ्या सद्सद विवेकबुद्धीला पटणारे नाही. प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका आणि रक्तपेढी आहे का ? याची खात्री केल्याशिवाय तेथे जाऊ नये हे आपणच म्हणता आहात त्यावर मी वस्तुस्थिती दर्शविणारा दुवा दाखविला आहे यावर आपली माहिती पूर्ण नाही हे मान्य न करता तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहात हे फारसे बरोबर नाही असेच मला वाटते असो वितंडवाद घालण्यात मला अर्थ वाटत नाही.
असो आपली मते आपल्यापाशी.
6 Mar 2014 - 10:22 pm | पाषाणभेद
डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद सोडले तर चालू या कॅटेगरीत मोडतात. आमचा फॅमेली डॉ. म्हणवणारा डॉक्टर आताशा एमआर कडची औषधे विकत देतो. एकदोन वेळेस मी चालवून घेतले पण आता मी वेळ मिळाला की मुद्दाम सर्दी झाली असे सांगून जातो अन सँपल औषधे दिली की मग झापतो त्याला.
साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस करतात.
6 Mar 2014 - 10:39 pm | आनंदी गोपाळ
नांव गावासकट डिग्री सांगा.
अॅलोपथीचा डॉक्टर असेल अन सँपलची औषधे विकलीत तर याचे रजिस्ट्रेशन क्यान्सल करायची जबाबदारी माझी.
नॉन अॅलोपअॅथ डॉक्टरांकडे सँपलची अॅलोपथी औषधे देणारे कंपनीवाले व एम आर यात जबाबदार आहेत की नाहीत?
6 Mar 2014 - 10:48 pm | पाषाणभेद
डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची औषधे अॅलोपॅथेची आहेत. सध्या मी बघतो काय ते. आयएमऐ कडे तक्रार केली तर कसे?
6 Mar 2014 - 10:57 pm | आनंदी गोपाळ
पाभेजी,
मेडिकल काउन्सिल अॅलोपथीची व इंडियन मेडिसिनची वेगळी आहे. तशीच होमिओची देखिल. त्यांच्या काऊन्सिलकडे तक्रार करायला हवी. त्या काउसिल्स मोस्टली डिफन्क्ट आहेत, सबब फार काही होणार नाही.
सर्व कायदे कानून फक्त अॅलोपॅथ्स साठी आहेत..
पूर्वी महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलकडे नोंदणी नसेल तर महाराष्ट्रात अॅलोपथी प्रॅक्टिस करता येत नसे. अगदी एम एस्/एमसीएच डिग्री असली तरी.
परवाच. एक्झॅक्टली २ दिवसांपूर्वी दिव्य गावित साहेबांनी मंत्रीमंडळाची या सर्वांना अॅलोपथी करू द्या अशी सहमती मिळवून अध्यादेश काढायची तयारी केलिये. पण ते अवांतर.
असो.
शुभरात्री!
6 Mar 2014 - 11:46 pm | सुबोध खरे
साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस करतात.
दिवसात १० हजार कमावण्यासाठी शंभर रुपये देणारे किमान शंभर रुग्ण तपासायला लागतील.शंभर रुग्ण तपासण्यास प्रेत्येकी पाच मिनिटे धरलीत तर साडे आठ तास न थांबता पूर्ण वेळ रुग्ण तपासायला लागतील. यात फक्त रिपोर्ट दाखवायला आलेले केमिस्ट कडून घेतलेली औषधे तपासुन घ्यायला आलेले रुग्ण धरता येत नाहीत. ( कारण ते पैसे देत नाहीत) किती "साध्या"डॉक्टरांचे हे भाग्य असेल? फार तर दोन टक्के. बाकी ९८ टक्के डॉक्टर किती कमावतात हा संशोधनाचा विषय आहे. डॉक्टर दाबून पैसे कमावतात या इतका गैरसमज दुसरा नसेल.
म्हणूनच शहाणी माणसे आजकाल डॉक्टर बनण्याच्या फंदात पडत नाहीत. माझी मुलगी कॉमर्स करते आहे आणि मुलगा अभियांत्रिकीला जायचे म्हणतोय. म्हणूनच मी आनंदात आहे.
7 Mar 2014 - 12:21 am | पक्या
आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल तपासणीचे एकावेळचे ३०० रूपये घेतात आणि दिवसभरात भरपूर गर्दी असते त्यांच्याकडे। त्यांच्याकडच्या नर्सेस अतिशय उध्दट आहेत आणि चेहर्यावर अजिबात हास्याची एकहि रेश नसलेल्या आहेत।
7 Mar 2014 - 11:31 am | स्मिता चौगुले
हे मात्र अगदि खरे आहे,या गोष्टिचा मलाही अनुभव आहे.( Orthodontics डॉक्टर बद्द्ल)
अगदि ३००-३०० रुपये तपासणी फी द्यायची.वर तिथे गर्दि अफाट. अक्षरश: लाईन असते. हे सगळे चालू असताना, तो डॉक्टर स्वत:च दिलेली दवाखान्याची वेळ न पाळता सर्रास उशिरा येणार!
बर,तोवर त्या रिसेप्शनिस्ट/नर्सेस याना काही विचारावे तर अतिशय उद्धटपणे उत्तर देतात.
फोन करुन अपॉइन्मेण्ट घ्यायची सोय असते,पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण तिथे डॉक्टरच्या उपलब्ध वेळेचे आणि येणार्या पेशण्ट/त्याना दिलेल्या वेळेचे गणितच चुकलेले असते.
मग, हे डॉक्टर एवढे कमवतात, शिकलेले असतात तरी असे का वागतात,वेळेचे मह्त्व कसे काय नाही या लोकाना, या उद्धट रिसेप्शनिस्ट/नर्सेस कसे काय ठेवतात इ. प्रश्न सामान्य जनतेला पडणे साहजिक आहे.
सगळेच डॉक्टर असे वागत असतील असे माझे मत नाही.एकाच्या वागण्यावरुन सगळ्याबद्द्ल मत दुषीत करुन घेणे चुकिचेच आहे. पण असे अनुभव येण्याची वारन्वारता वाढू नये अशी अपेक्षा.
मला मान्य आहे कि हा प्रतिसाद इथल्या चर्चेशी विसन्गत आहे,पण राहावले नाही म्हणून ट्न्कला.
खरे साहेब आपल्या आणि सातीताईच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. आपले लेखन आणि प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात त्याबद्द्ल वादच नाही
7 Mar 2014 - 2:37 pm | हवालदार
बाकी डॉक्टर खरे आणि साति यानी य्ववशित उत्तरे दिली आहेत. पण हा प्रश्न मलाही पडला आहे. सन्गवयास खेद वाटतो की बोर्डावर लिहीलेल्या वेळेला येनारा एकही डॉक्टर पाहीलेला नाही. अर्थात नियमला एखदा अपवाद असेलच पण पहण्यात तरी आलेला नाही.
7 Mar 2014 - 1:49 pm | सुबोध खरे
साहेब,
फिजिशियन हा एम बी बी एस ची साडे पाच वर्षे यानंतर एम डी ची तीन वर्षे असे बारावी नंतर साडे आठ वर्षे शिकलेला असतो. त्याने तीनशे रुपये सुद्धा घेऊ नये असे आपले म्हणणे आहे काय?एक गरीब आणि सेवाभावी डॉक्टर होता अशीच आपल्या कहाण्यांची सुरुवात असते किंबहुना डॉक्टरने सेवाभावी आणि गरीबच असावे अशी समाजाची अपेक्षा असते. आम्ही पैसे कमावणार पण तुम्ही मात्र सेवाभावी असावे.( हीच अपेक्षा शिक्षक/ प्राध्यापकांकडून केली जाते)
त्यांच्याकडे गर्दी का असते? हा विचार आपणच करा
माझ्या कडे संगणक बिघडल्यास माणूस येतो तो एका वेळेचे साडे तीनशे रुपये घेतो त्याची शैक्षणिक पात्रता कोणती? किंवा माझ्या मायक्रो वेव्ह चा magnatron बिघडलं त्यासाठी आलेल्या इसमाचे साडे चारशे रुपये (आणि magnatron ची किंमत साडे सोळाशे) असे २१०० रुपये मी दिले.
एकदा एका न्युरोसर्जन कडे नळ बिघडला म्हणून त्याने प्लंबर ला बोलावले प्लंबर ने नळ दुरुस्त केला आणि आपली फी आठशे रुपये सांगितली(मालाचे पैसे वेगळे)त्यावर न्यूरोसर्जन म्हणाला कि अरे मी न्यूरोसर्जन असूनही मला कोणी इतके पैसे देत नाही त्यावर प्लंबर हसून म्हणाला डॉक्टर जेंव्हा मी न्यूरोसर्जन होतो तेंव्हा सुद्धा मला कोणी एवढे पैसे देत नव्हते.
डॉक्टरांकडेच का साध्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात जाऊन पहा तेथील मुली आपल्याशी कशा वागतात ते. एकीला हाकलून दिले तरी दुसरी तुम्हाला तशीच मिळते. हा आपला भारतीय स्थायीभाव आहे.
6 Mar 2014 - 10:44 pm | आनंदी गोपाळ
नव्या सर्जनकडे पेशंट पाठवण्यासाठी कट मागणार्या, त्याला ब्लॅकमेल करणार्या होमिओ-आयुर्वेद वाल्या जिपड्यांचा यात काहीच वाटा नाही का?
सरकारी कारकुंड्याला लाच द्यावी लागली तर सामान्य माणूस बळीचा बकरा.
या भिकारचोट जिपड्यांना नाईलाजाने कट द्यावा लागला तर क्वालीफाईड डॉक्टर हरामखोर??
वा रे वा !
तुमच्या जीपीची चिठ्ठी घेऊन जाऊ नका ना स्पेशालिस्टकडे
6 Mar 2014 - 11:20 pm | सुबोध खरे
गोपाळराव
"मूर्ख लोकांशी वाद घालण्याच्या फंदात पडू नये" असे मार्क ट्वेन म्हणून गेले . कारण त्यांच्या बरोबर वाद घालताना ते तुम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत खाली खेचतात आणि मग अनुभवाच्या जोरावर तुमच्या वर मात करतात.(“Never argue with stupid people, they will drag you down to their level and then beat you with experience.”)
6 Mar 2014 - 11:25 pm | मुक्त विहारि
+ १
7 Mar 2014 - 8:55 am | अजया
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
स्वतःचा वेळ्,त्रास ,पैसे वाचवण्यासाठी ,आजाराचे गांभिर्य लक्षात न घेता, अॅलोपथीची औषधे ती न शिकलेली असताना देणार्या डॉक्टरकडे जाताना यातल्या कोणाच्याही संवेदना जागृत कशा नसतात?
7 Mar 2014 - 12:38 pm | बाबा पाटील
असल्या फंदात न पडलेले बरे,तुम्ही कितीही शास्र्तशुद्ध तर्कसंगत मांडणी केली तरी हे प्राणी,त्यांना सोइस्कर अर्थच काढणार्,आणी स्वतःवर वेळ आली की ?? ? जाउ द्या उगाच शब्द वाया जातील.
7 Mar 2014 - 12:58 pm | रुस्तम
सहमत...
7 Mar 2014 - 11:01 pm | पाषाणभेद
येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर असलेल्या सदस्यांबाबतीत आदर आहेच. समाजातील सन्माननिय डॉक्टरांच्या बाबतीतही तो आदर आहेच.
प्रश्न डॉक्टर लोकांनी पैसे अकारण घेण्याचा. डॉक्टरकी शिकणे बुद्धीचे काम आहे. त्यात वेळ पैसा भरपूर खर्च होतो. त्यानंतरही हॉस्पीटल (दवाखाना नव्हे) टाकणे आदी खर्चाचे काम आहे. त्याची परतफेड झालीच पाहीजे. पण तो होणारा खर्च वसूल करण्यासाठी केवळ काही डॉक्टरांनी बेकायदेशीर तत्वांचा अवलंब करणे अनुचित आहे.
मला सांगा. नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळांना थोडीतरी काविळ असते. बर्याच तान्ह्या बाळांना डॉक्टर काचेच्या पेटीत ठेवण्याचा सल्ला देतात. तो खरोखर गरजेचा असतो? केवळ मायेपोटी शिकलेले आईबापही या गरजेला तयार होतात.
डॉक्टरकी शिकतांना सामाजिक विषय (नाव माहीत नाही) अभ्यासाला असतो/ असावा. त्या विषयाला डॉक्टर लोक ५०% जागले तरी भरपूर.
7 Mar 2014 - 11:50 pm | आनंदी गोपाळ
अशी एक डिग्री आहे.
काचेच्या पेटीत ठेवणार्यांच्या डिग्र्या कोणत्या ते पुन्हा तपासून पहा, अशी तुम्हाला पुन्हा विनंती करतो पाभेजी.
स्वतःस डॉक्टर म्हणवून 'धंदा' करणार्या कुणालाही क्वालिफाईड पोस्टग्रॅज्युएट डॉक्टर समजून त्याच्यकडे जाणार्यांची कीव येते, अन असल्यांना दुकाने चालवू देणार्या, वरतून त्यांना अॅलोपथीची औषधे वापरायला ऑफिशियल परवानगी देणार्या बिनडोक सरकारी लोकांची चीड!
याउप्पर मॉडर्न मेडिसिनमधले पैशाचे रिझर्वेशनवाले प्रायवेट मेडिकल कालेजातले सुपरपदविधर!! हे काढणार सप्ततारांकित हॉस्पिटल्स, अन मग काढणार तुमच्याकडून पैसे.
महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री आजच्या घडीला एमडी मेडीसीन डिग्रीवाला आहे. याला तरी वैयक्तिक रित्या पाडलाच पाहिजे येत्या निवडणुकीत..
महोदय,
सरकारी शिक्का वाली एक 'होमिओपदी लै भारी' अशी अॅड आज टीव्हीवर पाहिली अन डोळे निवले!!
अधिक काय बोलावे?
8 Mar 2014 - 12:07 pm | सुबोध खरे
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे यकृत पूर्ण तयार झालेले नसते त्यामुळे ज्यावेळेस अर्भकाचे हिमोग्लोबीन बदलून मोठ्या माणसाच्या हिमोग्लोबीन मध्ये रुपांतर होते तेंव्हा त्यातून तयार झालेले पित्त शरीरभर पसरून नवजात मुलाला कावीळ होते. हि कावीळ किती आहे ते रक्तातील बिलीरुबीन हे रंगद्रव्य मोजून ठरवली जाते. याची पातळी जर फार वर गेली तर ते मेंदूत शिरून मुल मतीमंद होण्याचा धोका असतो. मुल जितके कमी दिवसांचे तितका हा धोका जास्त असतो. हे बिलीरुबीन कमी होण्यासाठी मुलाला काचेच्या पेटीत ठेवून त्याला अतिनील किरण (अल्ट्रा व्हायोलेट)दिले जातात ज्याने त्या बिलीरुबीनचे विघटन होते. हीच क्रिया सकाळच्या कोवळ्या उन्हात पण होते. परंतु मुल जर कमी दिवसाचे असेल तरमुलाच्या शरीरातून उष्णता निघून जाउन मूल थंड पडण्याचा धोका असतो.शिवाय मुलाच्या श्रीरातून पाणी जौं मूल डिहायड्रेट होण्याचा धोका असतो त्यामुळे काविळ थोडीशीच असेल आणि मुलाचे वजन जर चांगले असेल तर मुलाला कोवळ्या उन्हात धरता येते. पण मूल कमी दिवसाचे किंवा कमी वजनाचे असेल तर मुलाला हा धोका घेता येत नाही.म्हणून मुलाला नियन्तरीत तापमानाच्या पेटीत ठेवले जाते आणि अतिनील किरणाचा उपचार दिला जातो.
प्रश्न असा असतो कि आपण मुलाच्या आईवडिलांवर किती विश्वास ठेवू शकता.कि ते सांगितल्याप्रमाणेच करतील. लहान मुलांमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी फार कमी असतो आणि मुलाचे डीहायडरेशन झाले कि डॉक्टरला शिव्या घालणारी माणसे कमी नाहीत त्यामुळे डॉक्टर अशा फंदात पडत नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व डॉक्टर पैश्यासाठी असे करतात हे मानणे चुकीचे आहे.
सामाजिक भानाचे म्हणाल तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे people get the government they deserve याच लयीत मी म्हणेन
people get the doctors they deserve
8 Mar 2014 - 1:12 pm | बाबा पाटील
पेडीयाट्रीशियन व गायनॅकोलॉजिस्ट चुकुनही पेशंटच्या बाबातीत धोका स्विकारात नाही कारन चुकुन थोडे जरी कमी जास्त झाले तर अक्षरशः डॉक्टरच्या प्राणांशी गाठ असते,आणी जिव तोडुन प्रयत्न करुन परत वरती फुकटचा मार कोन कशाला खाइल हो,एक तर पेशंट पुर्ण बॅड बने पर्यंत घरी ठेवणारे प्राणी वेगळे असतात आणी पेशंटला काही झाले डॉक्टरची .... मारणारे वेगळेच प्राणी पुढे येतात.मी संघटना लेव्हलवर काम करतो आहे,रुग्न बरा होइ पर्यंत डॉक्टरला देव माणानारे जेंव्हा बिल हातात पडते तेंव्हा अचानक त्यांच्या साठी डॉक्टर कसाई होतो.
जवळ पासची कितीतरी रुग्नालये मागच्या १० वर्षात फोडण्यापासुन वाचवावी लागली आहेत.त्यातल्या कमी कमी १० तरी डॉक्टरांनी स्वतःचे व्यवसाय बंद करुन इतर धंदे सुरु केले आहेत. आज सगळेच डॉक्टर शहाणे आहे अश्यातला भाग नाही पण रुग्नाचे सगळेच नातेवाइक साधुसंत आहेत असेही नाही.
दर वर्षी सरासरी दिड ते दोन लाखाचा उधारीचा बांबु मला बसतो.तो अश्याच नमुन्यांकरीता गंगार्पण केलेला असतो. तरी एक लक्षात घ्या आपल्या येथे अजुनही डॉक्टर व रुग्नाचे नाते भावनीक लेव्हला आहे त्यात व्यवसायीकता घुसलेली नाही,ज्यादिवशी त्यात १००% व्यवासायिकता येइल त्या दिवशी पासुन खरी मजा येइल.
8 Mar 2014 - 8:59 pm | अजया
सहमत आहे.
8 Mar 2014 - 9:58 pm | आनंदी गोपाळ
हे बिल कितीही वाजवी काढले, तरीही, अॅडमिट करताना 'खर्चाची काळजी करू नका डॉक्टर, पेशंट चांगला झाला पहिजे' असं सांगणारे नमुने, अॅडव्हान्स जमा करायच्या वेळी सटकतात. अन देणारे टाळाटाळ सुरू करतात.
सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे, 'आमचा पेशंट बरा झालाच नाही!'
किंवा अमुक त्रास होतोय. जोर जोरात कण्हून दाखवतात ओपीडीत.
यावरचे इलाज आहेत, ते मी करतोही ;)
*
गाडी रिपेयर करायचं बिल, किराणा मालाचं बिल, गाडीचं पेट्रोल, सिनेमाचं तिकिट, घरच्या धुणेभांडेवालीचा पगार, शाळेची डोनेशन, रिक्षावाल्याचे पैसे, एस्टी/लोकल्/बेस्ट्/पीएम्टीचा पास, इंटरनेटचे बिल अन मोबाईलचा टॉकटाईम, दारावरचा भाजीवाला, अन दगड-धोंडे. लोकहो, यांच्यापैकी कोण तुम्हाला २ रुपडके कन्सेशन देते हो? मला तरी देत नाही कुणीच!
शिवाय इथे, दर महिना अखेर मला स्टाफचा पगार करावा लागतो.
चादरी उशांचे अभ्रे, गाऊन, ड्रेस, ड्रेप धुणार्या लाँड्रीवाल्याला पैशांपासून, फोनबिल, लाईटबिल, छापखानावाला, चहावाला, एक ना अनेक बिलं चुकवावी लागतात. अनेक सरकारी 'इन्स्पेक्टर' लोकांना 'शांत' करावे लागते, वरतून बँकवाला छातीवर उभा रहातो, तुमच्या उपचारांसाठी विकत घेतलेल्या लाखो करोडो रुपयांच्या मशिनरी अन ज्या बिल्डिंगला भुलून तुम्ही पायरी चढतात, तिला विकत घेण्याच्या हप्त्यांसाठी..
मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही. हजार खर्च असतात, करावेच लागतात.
असे असताना डॉक्टरनेच कन्सेशन द्यावे, चॅरिटी करावी, कारण काय, तर आलेल्या पेशंटच्या 'जिवाचा' प्रश्न आहे! बिचारा आजारी आहे! त्याचं बघायला कुणी नाही!!
यार, मी आजारी पाडला का रे तुला?
का मी अॅक्सिडेंट केला तुझा??
अरे भाऊ,
मी केल्या कामाचे पैसे मागतोय. चोरी नाही करत.
मी मेलो तर माझ्या बायकापोरांकडे पहायला कोण येणारे? तू की तुझे 'नातेवाईक' ज्यांच्या 'संवेदना' मी समजून घ्याव्यात अशी तुमची इच्छा आहे?
अन मी केलेल्या खर्चाचं अन कष्टाचं बिल मागू नको तर काय करू?
भीक मागायला बसू सारसबागेबाहेर?
8 Mar 2014 - 10:14 pm | चिगो
प्रतिसादाशी सहमत..
15 Mar 2014 - 2:26 am | बाळकराम
मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही.
विशेषतः या वाक्याला! सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं आणता येत नाही. आपली लोकं पण गरज सरो वैद्य मरो प्रकारातली आहेत. मला नेहेमी वाटायचं गरज मरो आणि वैद्य मरो अशीच म्हण का आली- गरज सरो आणि सुतार मरो/शिंपी मरो वा इतर कुणी मरो अशी का नाही आली? वैद्यच का? काही वर्ष प्रॅक्टिस केल्यावर याचा उलगडा झाला!
वर खरे सरांनी लिहिलं आहे तेच खरं- पीपल गेट द डॉक्टर दे डिझर्व!
8 Mar 2014 - 10:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत आहे.
फक्त डॉक्टरनीचं सेवाभावानी काम कराव आणि पैशाची अपेक्षा धरु नये असं म्हणणं बरोबर नाही. हॉस्पिटल मधे तोडफोड करणार्यांना त्यांच्यावर वेळ आली की शेवटी डॉक्टरचेच पाय धरावे लागतात हे विसरु नये.
9 Mar 2014 - 11:41 am | मृगजळाचे बांधकाम
१००००००००००००० % सहमत,आमच्या तालुक्यात ९० % bams,mbbs,bhms,bums डॉक्टर्स lab मध्ये,medicine मध्ये cut मागतात.मोठ्या doctor कडे पाठवल्यावर त्याचे कमिशन वेगळेच असते,
15 Mar 2014 - 2:13 am | बाळकराम
पण तुमच्यासारखेच ५५ प्रकारची सर्टिफिकेट्स घेऊन तुमच्या सारखाच "धंदा" करतात, मग त्यात "नाईलाजाने कट" द्यावा लागला तर एवढी तडफड कशासाठी? जसा तुमचा "धंदा" तसा त्यांचा ही धंदाच आहे की? आणि ज्यांच्याकडून तुमचा "धंदा" होतो त्यांनाच "भिकारचोट" म्हणायची ही कसली व्यावसायिकता? सरकारी कारकुंड्यांना लाच द्यावी लागते ती लोकं सामान्य लोकं असतात, तुम्ही सामान्य लोकं नाही, डॉक्टर आहात तुम्हाला हे रडगाणं गाता येणार नाही. कट मागणं जर भिकारचोटपणा आहे तर तो देणं सुद्धा तितकाच भिकारचोटपणा आहे, नाही का?
(कट न देता न घेता भारतात प्रॅक्टिस केलेला)
बाळकराम
15 Mar 2014 - 2:15 am | बाळकराम
इथे कसा काय पडला देव जाणे!
17 Mar 2014 - 9:08 pm | आनंदी गोपाळ
साहेबा,
रेडिऑलॉजिस्टकडून 'ऑफिशियल रेफरन्स फी' म्हणून चेकने कट आला, याची तक्रार एका अॅलोपॅथ डॉक्टरने महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिकलडे करण्याचे गट्स दाखविलेत, अन म्हणून हे प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कट मागणारा जीपी हा सिनियर व एस्टॅब्लिश्ड व्यक्ती असतो. नाईलाजाने देणारा, नवी प्र्याक्टीस सुरू करणारा ज्युनियर. ही कारणश्रुंखला तुम्ही विसरलात काय? माझ्याकडे येऊन (मी गेले पाव शतका पेक्षा जास्त काळ ऑपरेशने करीत आहे) एकादा ५-१० वर्षे प्र्याक्टीस करणारा 'एस्टॅब्लिश्ड' देखिल जीपी, कट म्हणून पैसे मागायची हिम्मत करील, असे तुम्हाला वाटते काय?
शिवाय, कुणी मागितलेच नाहीत, किंवा मागितले ते देण्यासाठी काही लिव्हरेज वापरले नाही, तर तुम्ही 'औट ऑफ गुडनेस ऑफ युअर हार्ट' म्हणून कुणाला २-५ हजार रुपये कट म्हणून द्याल का हो?
मी व्यक्तिशः ५ पैसेही कट देत नाही.
पण, अनेक मोठी इस्पितळे, ज्यांचे 'मालक' डॉक्टर्स नसून इतरच असतात, किंवा काही मूर्ख लोक, जे 'पीआरओ' नामक प्रक्रण नोकरीस ठेवतात, ते लोक हा प्रकार करतात, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी काय काय करायला हवे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते नक्कीच साध्य होईल, असा विश्वासही आहे.
7 Mar 2014 - 12:07 am | पक्या
http://www.youtube.com/watch?v=1Lg0kUtS8ic हा सत्यमेव जयते चा २०१२ चा एपिसोड आहे. ( पहिला प्रसंग तर जरूर पहावा।) हयाचा प्रतिवाद कसा करणार ? की हे ही खोटेच आहे असे समजायचे ?
पुण्यातील एक नावाजलेले हॉस्पिटल व तेथील एक एलोपेथी चे नावाजलेले डॉक्टर। ह्यांच्याकडे वडिलांची ट्रीटमेंट चालु होती. त्यावेळी आलेला अनुभव असा होता की आपल्या शंका निरसनासाठी काही प्रश्न त्यांना विचारले तर ते चिडत असत, उत्तर दिले तर चिडून काहितरी उलटेच बोलत जेणेकरून पेशंटने परत काही विचारूच नये.
याउलट मला अमेरिकेत आलेला अनुभव असा कि डॉक्टर्स पेशंटच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित त्याचे समाधान होईपर्यंत देतात. माझ्या मुलीला एकदा तिच्या एका आजारात स्टेरॉइड्स प्रिस्क्राइब केले होते। ती तेव्हा खुपच लहान म्हणजे २ वर्षाचीही नव्हती. त्यामुळे मला स्टेरॉइड्स द्यायला लागू नये असेच वाटत होते. मी त्याना अजुन काही पर्याय आहे का ? स्टेरॉइड्स तिला खुप हेवी तर होणार नाहित ना असे विचारल्यावर स्टेरॉइड्स ची मात्रा लहान मुलांना अगदी कमी प्रमाणात असते , तुम्हाला स्टेरॉइड्स नको असतील तर तुम्ही --- हे हे दुसरे औषध घेऊ शकता. स्टेरॉइड्स घेतले तर काय होईल आणि हे दूसरे औषध घेतले तर काय होईल वगैरे नीट समजावून सांगितले होते।
या उलट माझा मुलगा १ महिन्याचा ही नव्हता तेव्हा सर्दी झाली म्हणून त्याला पुण्यातील एका सुप्रसिध्द पेडियाट्रीशन ने एंटीबायोटिक्स दिले होते. त्यानंतर तो नीट खाईना, त्याला ६ व्या महिन्यात अमेरिकेत आणल्यावर लक्षात आले की गम्भीर आजार नसताना इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाहीत. इतक्या लहान वयात दिल्या गेलेल्या एंटीबायोटिक्स च्या पूर्ण कोर्स ने त्याच्या पोटाची पार वाट लागली होती. पचन बिघडले होते.
अजूनही लिहिण्यासारख्या बरयाच गोष्टी आहेत पण वेळे अभावी शक्य होत नाहीये.
7 Mar 2014 - 2:04 pm | सुबोध खरे
इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठीच काय पण जोवर रक्ताचा किंवा मेंदूतील पाण्याचा रिपोर्ट येत नाही तोवर मेनिन्जायटीससारख्या गंभीर रोगासाठी सुद्धा एंटीबायोटिक्स चालू करीत नाहीत.कारण समोरचा रुग्ण हा आपल्याला कोर्टात खेचणार आहे हे गृहीत धरूनच अमेरिकेत डॉक्टर काम करीत असतात. तेथील डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते परस्पर अविश्वासावर आधारलेले आहे. आणि आपल्या बाळाला सर्दी झाली असेल आणि आपण जर बालरोग तज्ञाला दाखवायला गेलात तर त्याची फी १००( ते ३००) डॉलर. रक्त इ च्या तपासण्याचे शंभर आणि औषधांचे शंभर डॉलर असे तीनशे ते पाचशे डॉलर आपल्या खिशातून जातातं. म्हणजे साधी सर्दी अमेरिकेत सहा ते तीस हजार रुपयाला पडते. आपली कंपनी आरोग्याविम्याचे पैसे भरत असल्याने त्याची आपल्याला झळ पोहोचली नसावी पण आपला विमा नसेल तर? पाचशे डॉलर हे एका इंजिनियरच्या तीन दिवसांचा पगार असतो(सामान्य माणसांची गोष्टच सोडा). जर एक रुग्ण भारतात दहा हजार रुपये देणार असेल तर येथील बाल रोग तज्ञ तुमच्याशी अर्धा तास बोलेल आणि एक तास तुमच्या मुलाला खेळवेल सुद्धा.
सारांश अमेरिकेची आणि भारताची अशी तुलना चुकीची आहे.
बाकी एखादा डॉक्टर उद्धट आहे, नीट बोलत नाही हा स्वभावाचा दोष आहे. त्याच्या कडे तुम्ही जाऊ नका.गोड बोलणार्या डॉक्टर कडेच जा. उद्धटपण अरेरावी यात पुणेरी दुकानदार कोणालाच हार जाणार नाही मग डॉक्टर काय चीज आहे.
7 Mar 2014 - 2:25 pm | कवटी
>>>जर एक रुग्ण भारतात दहा हजार रुपये देणार असेल तर येथील बाल रोग तज्ञ तुमच्याशी अर्धा तास बोलेल आणि एक तास तुमच्या मुलाला खेळवेल सुद्धा.
हे एकदम पटलं.
17 Mar 2014 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
>>>> उद्धटपण अरेरावी यात पुणेरी दुकानदार कोणालाच हार जाणार नाही.....
ह्या वाक्याची खरंच गरज आहे?
17 Mar 2014 - 3:22 pm | मंदार दिलीप जोशी
पुण्यातील एक नावाजलेले हॉस्पिटल व तेथील एक एलोपेथी चे नावाजलेले डॉक्टर। ह्यांच्याकडे वडिलांची ट्रीटमेंट चालु होती.
डेक्कनच्या आसपास क्लिनिक आहे का त्यांचे? :) ;)
7 Mar 2014 - 1:21 am | समीरसूर
इंद्रजीतची कहाणी खूपच दुर्दैवी होती. पण काही जाणकार सदस्यांमुळे काही माहिती नव्याने कळते आहे. धन्यवाद. सर्वसाधारणपणे रुग्ण बरा झाला नाही तर डॉक्टर किंवा हॉस्पीटलवर खापर फोडून नातेवाईक मोकळे होतात आणि प्रसंगी मारहाणदेखील करतात. एका परिचितांच्या वडिलांना ते आयसीयूमध्ये असतांना मुलाच्या आग्रहामुळे बाहेर आणले आणि जंतूसंसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा अनेक चुका हट्टी रुग्णदेखील करत असतात. सर्वसाधारणपणे डॉक्टर्स रुग्णाला वाचवण्याचे आणि बरे करण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात असे वाटते. काही हपापलेले डॉक्टर्स असतात. नानाविध धंदे करून आणि रुग्णांच्या जीवाशी खेळून पैसे कमविण्याची त्यांची खुमखुमी खरंच धोकादायक असते. पण असे डॉक्टर्स फार जास्त नसावेत. आणि साती म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर अपयशी ठरत असतील पण गुन्हेगार नाही. कट-कमिशनची प्रथा तर कित्येक दशके चालू आहे. शेवटी तो ही एक व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक अपप्रवृत्ती त्या व्यवसायात असणारच...
7 Mar 2014 - 5:13 am | खटपट्या
पण आजकाल बऱ्याचश्या रुग्णालयात चालू झालेली प्रथा अनुभवली - साध्या वार्डात जागा नाही असे दाखवून नवीन रुग्णास थेट आय सी यु मध्ये ठेवतात. माझ्या वडिलांना तसे ठेवले गेले. मी डॉक्टरना सांगितले कि गरज नसताना ठेवले आहे तर आय सी यु चे पैसे तरी लावू नका. तुम्ही फक्त आय सी यु चा पलंग वापरत आहात तेथील विशिष्ठ सेवांचा वडिलांना काहीच उपयोग होत नाही आहे.
पण डॉक्टरांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि शेवटी आय सी यु चेच पैसे लावले.
9 Mar 2014 - 11:59 am | मृगजळाचे बांधकाम
असले महाभाग डॉक्टर्स आमच्या कडेही आहेत
7 Mar 2014 - 12:37 pm | शिल्पा नाईक
अवांतर होइल हा प्रतीसाद खरं तर, पण वर जे doctor लोकांनी सांन्गितलय की इतर प्याथी (कस लिहायच कळत नाहीये) वाले आता नेह्मीच्या डाक्टरांची औषधे देउ शकतात.
पण या विरुध्ध कोणी आवाज नाही का उठ्वू शकत? जसे तुम्ही डाक्टर लोक.
(आता प्रत्येक औषध १० वेळा विचार करुन घेतल पाहिजे. खास करुन लहान मुलांना देताना. )
7 Mar 2014 - 2:20 pm | पिलीयन रायडर
माझा मुलगा ६ दिवसांचा असताना त्याला रोज तपासायला येणार्या डॉक्टरला त्याच्या छातीमधुन "मर्मर" ऐकु आली. म्हणुन त्याने ताबडतोब त्याचा २ डी इको करायला सांगितलं. दुसर्या दिवशी सकाळी ६ ला मुंबईला जाताना रस्त्यात थांबुन आमच्या बाळाची तपासणी करायला एक लहान मुलांचे हृदयरोग तज्ञ मिळाले. त्यांनी सांगितलं की मुलाला TAPVC हा आजार आहे. ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. त्यानंतर मला रोज तो किती दुध पितो हे लिहुन ठेवायला सांगितलं होतं..
सिरिंजनी.. बळजबरी.. तो ५-६ एम्.एल दुध प्यायचा. ९व्या दिवशी त्याला दुसर्या हॉस्पिटल मध्ये नेलं आणि NICU मध्ये अॅडमीट केलं.. तिथं ते त्याला वेगळी ट्रिट्मेंट अशी काही देत नव्हते..पण तो सुरक्षित वातावरणात होता. मी त्याला रोज जाऊन १० मिनिट भेटायचे.. त्यात मला असं जाणवत होतं की माझा मुलगा हळुहळु माझ्या पासुन दुर चालला आहे.. त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या.. जास्त करुन झोपेतच असायचा.. जागा असला तरी निर्जीव डोळ्यांनी एकटक कुठेतरी बघत असायचा.. हाडं दिसत होती.. दुध फारसं प्यायचा नाहीच.. ओठ घट्ट मिटुन घ्यायचा.. पायावर टिचकी मारली तरी रडायचा नाही.. कदाचित रडण्याचे कष्ट त्याला सहन होत नव्हते.. त्यापेक्षा तो ती टिचकी सहन करायचा..
NICU मध्ये ठेवुन बहुदा डॉक्टर त्याची प्रतिकारशक्ती वाढायची वाट पहात होते.. पण मला जे जाणवत होतं ते बाकी कुणाला का जाणवत नव्हतं ते माहित नाही..
साधारण मुलगा १५ दिवसाचा असताना मी एक दिवस त्याला भेटायला गेले तेव्हा त्याच वेळी त्याचे डॉक्टर (बालरोगतज्ञ) त्याला तपासायला आले.. कुठल्या तरी आंतरिक उर्मीनी मी त्यांना सांगितलं की मला मुलाला इथे ठेवायचं नाही, जिथे ऑपरेशन करायच असेल तिथे न्यायचं आहे.. डॉक्टरांना बहुदा हे आवडलं नाही..
"तुमचा मुलगा इथे सुरक्षित हातात आहे मॅडम.."
"असेल.. पण तुम्ही त्याचं ऑपरेशन करणार आहात का? मग सर्जनला पाहु द्या..जर ते म्हणाले की अजुन थांबा तर मी खर्च सहन करायला तयार आहे.. पण जर ते म्हणाले की वेळ निघुन गेली तर??"
का कोण जाणे पण मला त्याचा हृदयरोग तज्ञावरही विश्वास नव्हता.. त्यामुळे मी कुणाचच ऐकायला तयार नव्हते.. मला या सगळ्यातलं काय समजतय असा डॉक्टरांचा चेहरा झाला असेल.. किंवा मी आततायीपणा करतेय असंही त्यांना वाटलं असेल.. पण मला माझा मुलगा तातडीनी मुंबईला न्यायला हवा होता..
माझा अवतार पाहुन मुलाला ताबडतोब मुंबईला हलवलं.. तिथुन पुढे अॅम्बुलन्स, सर्जन, हॉस्पिटल सगळं काही हृदयरोग तज्ञाच्या सल्ल्या प्रमाणेच चालु होतं (अर्थात आम्ही सगळ्या गोष्टींची १०० वेळा चौकशी करुन ठेवली होतीच..)
जेव्हा आम्ही कॅशलेस वापरुन ऑपरेशन करणार आहोत असं कळालं तेव्हा हृदयरोगतज्ञाने आधी कॅश भरावी लागेल, नाही तर मुलाला ऑपरेशन टेबलवर घेता येणार नाही असं सांगितलं.. मी त्याला फोन करुन असं का म्हणुन विचारलं तर इन्शुरन्सचा काही भरवसा नसतो असं म्हणे..
"डॉक्टर.. तुम्ही हॉस्पिटले केशिअर आहात का? तुम्ही माझ्या मुलाकडे लक्ष द्या.. तो जेव्हा ऑपरेशन टेबल वर जाईल तेव्हा २.५ लाख रुपये तुम्हाला मिळालेले असतील.. ती माझी जवाबदारी आहे.."
गंमत म्हणजे हा माणुस माझ्या मामाच्या हॉस्पिटलमध्येही येतो.. ह्याच मामाचे इन्शुरन्स वाल्या कंपनीच्या मालकाशी मैत्रीचे संबंध आहेत.. आणि पैशाचा काही प्रॉब्लेम झाला तर सगळी रक्कम मी देईन असं मामानी त्याला सांगुनही हा मला असं बोलत होता.. बाकी गरीब पेशंटच काय होत असेल?
मुलाला नेल्यावर मला सांगितलं की २-३ दिवसात होईल ऑपरेशन.. तुम्ही ऑपरेशन च्या दिवशी या.. नवर्यानी रक्तपेढीत रक्त देण्या बद्द्ल विचारलं तर म्हणे की मुलाचा रक्तगट जो असेल त्या रक्त गटाचे २ जण असु दे.. ते देतील मग रक्त भरुन.. म्हणुन आम्ही पण निवांत राहीलो..
मुलगा दुपारी मुंबईला पोहोचला.. मला रात्री ८ ला फोन आला..
"उद्या सकाळी ८ ला ऑपरेशन आहे.. तुझं रक्त आवश्यक आहे.. ताबडतोब निघ.."
झालं असं होतं की जेव्हा मुलाला सर्जननी तपासलं तेव्हा त्यांनी दुसर्या दिवशीचं वेळापत्रक बदलुन मुलाला सकाळी ताबडतोब ऑपरेशनला घ्यायला सांगितलं.. आणि एवढ्या लहान मुलाला आईचं रक्त तपासुन मग त्याच्याशी जुळणार रक्त द्यावं लागतं .. त्यामुळे त्याचा न माझा रक्त गट वेगवेगळा असला तरी माझं रक्त आवश्यक होतं.. एवढ्या साध्या गोष्टी हृदयरोगतज्ञाला कळाल्या नाहीत..
रात्रि तातडीनी भाऊ आणि एक मित्र ह्यांना सोबत घेउन, हाताला लागेल ते सामान भरुन, मी आणि आई कारनी निघालो.. १ ला पोहोचलो आणि रक्त दिलं..
दुसर्या दिवशी ऑपरेशन झालं.. सर्जन म्हणाले की मुलगा थोडक्यात वाचला.. अजुन १२ तासानी आला असतात तर आम्ही काही करु शकलो नसतो.. (आणि आमचा हृदयरोगतज्ञ म्हणत होता की २-३ दिवस नाही होणार ऑपरेशन..)
शिवाय कॅशलेस नी ऑपरेशन झालं.. काहीही त्रास झाला नाही..
इथवर मी धीर धरुन होते.. ऑपरेशन नंतर सर्जननी अतिशय संयत शब्दात माहिती दिली..
नंतर आम्हाला हृदयरोगतज्ञ महाराज भेटले.. त्यांनी एखाद्या हिंदी पिक्चरची स्टोरी सांगावी तसं वर्णन सुरु केलं..
"मग आम्ही छातीवर कट घेतला.. असं रक्त उडालं.. ब्लडप्रेशर एकदम डाऊन.. असल्या ब्लडप्रेशवर तर चिमणी पण जगत नाही....पण तुमचा मुलगा जगला.. झालय ऑपरेशन नीट.. आता अजुन २-३ होल्स आहेत आत मध्ये.."
"काय?????? त्याच्या छातीत होल्स पण आहेत..??? मग आताच का नाही त्याचम पण ऑपरेशन केलं???"
"तसं नसतं करता येत.."
आता मी खरी घाबरले.. नक्की झालय काय माझ्या मुलाला हे कळेना.. पुढे माझ्या लक्षात येऊ लागल्म की अतिरेकी बोलणं हा त्याचा स्वभावच आहे.. बाकी डॉक्टर जेव्हा शांत असतात तेव्ह हा घाबरवुन सोडतो आणि भविष्यात अजुनही महागड्या चाचण्या कराव्या लागतील अशी प्रस्तावना सुरू करतो..
पुढेही ह्या माणसाचा हपापलेपणा सतत दिसत राहिला.. १० इनिटात इको करुन २ मिनिटात औषध देणे एवढाच काय ते तो करायचा.. "माझ्याच हॉस्पिटलमध्ये या.. खुप चाचण्या कराव्या लागतील.." असं म्हणायचा..
मी शेवटी हृदयरोगतज्ञ बदलला..
आता ज्या मॅडम आहेत त्या १/२ तास नीट चर्चा करतात. मुलगा काय खातो.. रुटीन काय आहे, सवयी काय आहेत हे पहातात. कधी रागवतात, चिडुन चिडुन शिव्या घालतात की मुलांना नीट खाऊ घाला... फालतुच्या काही तपासण्या सांगत नाहित.. आणि ज्या सांगतात त्या नक्कीच महत्वाच्या असतात करण त्या कुठेही करा त्यांना फरक पडत नाही, त्यांना रिपोर्ट महत्वाचा असतो..
मला ह्या प्रसंगात ४ डॉक्टर भेटले..
ज्यानी माझ्या मुलाच्या छातीतमी मर्मर डिटेक्ट केली..
ज्यानी हा रोग शोधला.. हृदयरोगतज्ञ
ज्यानी हे ऑपरेशन केलं...
ज्या सध्या माझ्या मुलाची हृदयरोगतज्ञ म्हणुन काळजी घेत आहेत..
त्यातला एक मुर्ख माणुस सोडला तर बाकी ३ जण माझ्या आयुष्यातले फार महत्वाचे लोक आहेत.. ज्यांनी मुलाचं ऑपरेशन केलं ते तर देव आहेत माझ्या साठी...
ज्या बालरोगतज्ञांना मी हटकलं होतं ते आज माझ्या मुलाचे नेहमीचे डॉक्टर आहेत.. त्यांना कदाचित तेवढा अंदाज आला नव्हता माझ्या मुलाच्या तब्येतीचा, पण डॉक्टरही माणुसच आहे.. त्यांचा नुभव नसेल कदाचित एवढा.. पण बाकी ते उत्तम डॉक्टर आहेत..
पण हृदयरोगतज्ञ- त्याला मी माफ करु शकत नाही.. त्याने जे केलं तो हपापलेपणा आणि हलगर्जी होती.. त्यात माझ्या मुलासाठी काहिही काळजी नव्हती..
सरतेशेवटी माझं मत असं झालय की सरसकट सगळेच डॉक्टर वाईट नसतात.. आपल्याला फार कमी कळत असतं डॉक्टरकी मधलं. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणं चुक.. शक्यतो आपल्या डॉक्टरवर मनापासुन विश्वास टाकावा. पण माणुस कसा आहे ते आपण ओळ्खायच असतं.. अनेकद हे गट फिलिंग खुप उपयोगी असतं.. डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये..
पण माणुस चुकीचा आहे असं वाटायला लागलं तर मात्र जरुर पाऊल उचलावे..
(लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा झालाय.. पण आज रहवलं नाही...)
7 Mar 2014 - 3:00 pm | सूड
>>डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये..
पण माणुस चुकीचा आहे असं वाटायला लागलं तर मात्र जरुर पाऊल उचलावे..
हे लाख बोललात.
7 Mar 2014 - 3:24 pm | साती
अवैज्ञानिक असला तरी पिरा तुझे हे वाक्य फार महत्त्वाचे आहे.
डॉक्टर चांगला आहे आणि आपली त्याला काळजी आहे हे एकदा रूग्णाला जाणवले की आपोआप पुढच्या गोष्टी सुकर होतात.
तो/ ती रागावली तरी आपल्या भल्यासाठी हे जाणवायला लागतं.
7 Mar 2014 - 3:13 pm | आदूबाळ
भयानक अनुभवातून गेलात तुम्ही. तरी तुमची प्रतिक्रिया खूपच संयत आहे.
[तुरुंगवासातून सुटल्यावर वुडहाऊसला एकदा विचारलं होतं - डू यू हेट जर्मन्स? तो म्हणाला - आय डोंट हेट इन प्लूरल्स. त्याच्या मॅच्युरिटीचं कौतुक वाटलं होतं. आज तुमच्याबद्दल तेच वाटतंय.]
7 Mar 2014 - 3:44 pm | पिलीयन रायडर
संयत वगैरे आता हो.. १.५ - २ वर्षापुर्वी जेव्हा हे घडलं तेव्हा मी डोळ्यात रक्त आणुन.. खुन्नस देऊन.. जळजळीत कटाक्ष टाकुन.. टोमणे मारुन त्या डॉक्टरला घाबरवुन सोडला होता..
"माझं पोरगं नाही वाचलं तर तु मेलास.." वगैरे लुक मी त्याला दिले होते..
म्हणजे रुग्णाला काही झालं तर डॉक्टरला मारा असं मी म्हणत नाहीये पण जर सर्जननी प्रय्त्न करुनही मुलगा नसता वाचला तर मी ते सहन केलं असतं, कारण मला त्या माणसावर विश्वास आहे..
पण वेळेल्त गेलो नाही म्हणुन मुलाला काहि झालं असतं तर डॉक्टरचा निष्काळजीपणा म्हणुन मी सटकले असते हे खरच..
परिस्थिती किती गंभीर आहे हे हृदयाच्या डॉक्टरला कळायला हवचं.. त्यासाठी मी बालरोगतज्ञाला माफ करेन.. हृदयरोगतज्ञाला नाही..
8 Mar 2014 - 12:03 pm | खटपट्या
तुमच्या बाळाला पाहण्याची इच्छा होतीय !
7 Mar 2014 - 5:05 pm | पैसा
वाचून शहारा आला. फार मोठ्या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलीस...
7 Mar 2014 - 8:22 pm | सखी
खरच शहारा आला पिरा - किती लहान होतं गं पिल्लु तुझं. मनापासुन आनंद होतोय कि तो आणि तुम्ही सगळे सुखरुप आहात आता. पण मला एक कळले नाही, त्याला मुंबईला हलवल्यावर तु गेली नाहीस त्याच्याबरोबर? कारण खरतर आपली सगळी जनता (दोन्हीकडची फॅमिली) बरोबर असते ना गं अश्या मोठ्या प्रसंगी?
10 Mar 2014 - 10:02 am | पिलीयन रायडर
हो.. पण सिझेरीयन डीलेव्हरी मुळे मलाही जास्त हिंडता फिरता तेय नव्हते. शिवाय मुंबईला आमचे कुणी नातेवाईक नसल्याने मी रहायचे कुठे.. बाळांतीण असल्याने बाहेरचे खायचे कसे हे प्रश्न होतेच.. म्हणुन नवरा आणि बाबा आधी जाऊन माझी व्यवस्था करणार होते..
अर्थात त्याचा काही फायदा झाला नाही आणि मला ताबडतोब त्यांच्या मागे जावं लागलंच..
@खटपट्या - माझा मुलगा आता मस्त आहे.. अगदी नॉर्मल!
10 Mar 2014 - 5:26 pm | सखी
कशी अवस्था झाली असेल तुझी आणि घरच्यांचीसुद्धा, फक्त कल्पना करु शकते. खरचं आता अबिरला भेटायचं आहे, भारतात येईल (कधी योग येईल तेव्हा) तेव्हा एक कट्टा पिरा+अबिरके साथ मंगता है :)
7 Mar 2014 - 10:11 pm | विकास
हा सगळा धागाच आत्ता वाचला. धाग्यातील मूळ दुर्दैवी कथा आधी वाचली होती आणि अस्वस्थता आली होती. हा अनुभव तर अजूनही अस्वस्थ करणारा वाटला पण हॅपि एंडींग बघून बरे वाटले. हृदरोगतज्ञास आईचे हृदय काय आहे आणि कशी प्रतिक्रीया देऊ शकते हे कळले असावे.
8 Mar 2014 - 8:40 pm | संजय क्षीरसागर
आयुष्यात कायम उपयोगी होईल असा अत्यंत योग्य अप्रोच आहे आणि अफलातून प्रसंग निभावलायं.
10 Mar 2014 - 3:06 pm | आरोही
पी रा खरच खूप कठीण प्रसंगातून गेलीयेस तू ....अनुभव वाचून मन सुन्न झाले ...काही शब्द च नाहीयेत काय बोलावेत ..
7 Mar 2014 - 2:35 pm | शिल्पा नाईक
बापरे....
7 Mar 2014 - 3:18 pm | शिद
सिझेरियनने मोडला बाळाचा हात
सौजन्यः मटा.
7 Mar 2014 - 3:52 pm | मंदार दिलीप जोशी
या घटनेतले ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत की मॅकेनिक?
7 Mar 2014 - 3:50 pm | आतिवास
मूळ धाग्यातल्या घटनेबाबत दु:ख वाटले.
प्रतिसादातून साती, खरे, आनंदी गोपाळ या डॉक्टर मंडळींनी मोलाची भर घातल्याबद्दल त्यांचे आभार.
चर्चा वाचतेय आणि नोंद घेते आहे.
7 Mar 2014 - 3:50 pm | दिव्यश्री
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=437910&boxid=11537921&pgno=1&u...
7 Mar 2014 - 10:49 pm | विकास
वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मूळ प्रस्तावातील प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. सर्व प्रतिसाद वाचले असले तरी (साती म्हणाल्या तशी गुन्हेगारी नसेल कदाचीत पण) डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्थेतील मर्यादा जाणवल्या असेच वाटते. कधीकाळी वाचलेले अरूण लिमयेंचे क्लोरोफॉर्म, लाख मोलाचा जीव ते रॉबीन कुकचे कोमा आणि इतर अनेक घटना वाचताना असे नक्की वाटते की अजून बरीच सुधारणा होण्याची गरज आहे.
मला स्वतःला भारतातील डॉ़क्टर्सचे चांगले अनुभव आले आहेत. फक्त लहानपणी एका डेंटीस्टकडचा अनुभव सोडल्यास! माहीतीतील एका व्यक्तीस विषबाधा (खरे विष) झाली होती. असे प्रकार अनेकदा खाजगी रुग्णालयात घेत नसल्याने त्या व्यक्तीस सरकारी इस्पितळात न्यावे लागले होते. प्रसंग गंभीर होता, पण त्यातून त्या व्यक्तीस सहीसलामत बाहेर काढल्याचे पाहीले आहे. त्याच बरोबर याच सरकारी इस्पितळात चांगले तज्ञ-उपचारपद्धती असताना देखील एका भाजलेल्या व्यक्तीस खाजगी रुग्णालयात नेल्याने प्राण गेलेला पण दुर्दैवाने पहायला लागले आहे. तरी देखील सर्व डॉक्टर्स म्हणजे हजाम असे म्हणणार नाही. परीस्थिती किंबहूना त्याच्या बरोब्बर विरुद्ध आहे असेच म्हणेन. असो. भारतीय डॉ़क्टर्सना अमेरीकेत देखील मान असलेला पाहीला आहे.
वर चर्चेत अमेरीकेसंदर्भात काही भाग आलेला दिसला त्या संदर्भात थोडक्यात
आता अमेरीकेत वीमा सर्वांनाच सक्तीचा केला गेला आहे (ओबामाकेअर असे त्याला त्याचे विरोधक उपरोधाने म्हणतात पण आता तेच नाव पडले आहे!). तसे होण्याच्या आधी देखील ज्यांच्याकडे वीमा नसेल अथवा मर्यादीत वीमा असेल अशांना देखील इमर्जन्सी असल्यास कुठ्ल्याही हॉस्पीटलला कायद्याने अॅडमिट करून ट्रीटमेंट द्यावी लागते.
इथे देखील चुका होतात. श्रीदेवीच्या आईच्या मेंदूचे ऑपरेशन हे चुकीच्या भागात केल्याची (कु)प्रसिद्ध गोष्ट या निमित्ताने आठवली.
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते. (अर्थात अपवाद आहेत). मला खरेच कल्पना नाही, म्हणून विचारत आहे... इथे लिहीत असलेल्या डॉक्टर्सना प्रश्न - आपल्याकडे अशा पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते का? नुसतेच डॉक्टर्सना नाही तर वॉर्डबॉय पासून वैद्यकीय व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीस? त्यात नुसते तंत्रज्ञानच येत नाही तर वैद्यकीय सेवेसाठी लागणारी वेगळीच हॉस्पिटॅलीटी देखील येते ज्याचा सकारात्मक परीणाम रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांवर होऊ शकतो.
अजून एक मुद्दा: मला वाटते आता अमेरीकेत सर्वत्रच फार्मा आणि तत्सम कंपन्यांकडून साधा चहा घेण्यावर डॉक्टर्सना बंदी आहे. आपल्याकडे डॉक्टर्सच्या ज्या कॉन्फरन्सेस निमित्ताने परदेशवार्या चालतात त्यात मिंधेपणा होतो असे वाटते का? (परत अपवाद आहेत जे अशा गोष्टींना बळी पडणार नाहीत...)
8 Mar 2014 - 11:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते.
अमेरिकन वैद्यकिय सेवा जगात आदर्श मानली जात नाही. हे वाचायला विचित्र वाटेल. अनेक दशके हा विषय सतत वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्रात चर्चेत आहे. अनेक तज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रात विश्वासू समजल्या जाण्यार्या जर्नल्समध्ये आलेल्या लेखांमधिल माहिती हेच सांगते.
वर डॉ खरेंनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकन वैद्यकिय सेवा ही रुग्ण-डॉक्टर यांच्या परस्पर अविश्वासावर आधारित आहे. त्यामुळे रोगी आपल्यावर खटला भरणार आणि ते शक्य होऊ नये यासाठी सर्व काळजी घेणे हा डॉक्टरच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तेथे "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असा वाक्प्रचार तयार झाला आहे. कारण एकदा खटला भरला गेला आणि विषेशतः तो हरला तर डॉक्टरच्या व्यवसाय विम्याचा हप्ता इतका वाढतो की डॉक्टरकी सोडून इतर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारे असते. अर्थातच हे टाळण्यासाठी जर डॉक्टरने कायद्यात बसणार्या ग्राहकांच्या बाजूच्या तरतुदींपासून बचावण्यासाठीच्या सर्व खबरदारी घेण्याला आणि डॉक्टरच्या बाजूने असलेल्या सर्व कलमांचा पुरेपूर वापर करण्याला प्राथमिकता दिली तर आश्चर्य काय?
मात्र या सर्वामुळे कायद्याने डॉक्टर केवळ एक सेवादाता बनला आहे आणि त्याला अतिगौरवित नीतिमत्तेच्या (glorified morals) आधारवर वेठीला बांधण्याचा अधिकार अमेरिकन रुग्णांनी गमावलेला आहे आणि तेथे कांगावा काम करत नाही, कोर्टात तर नाहीच. हे अमेरिकन रुग्णसुद्धा जाणून आहेत, यात परदेशांतून तेथे स्थलांतरीत झालेले रुग्णही आलेच.
याचा सर्वात जास्त परिणाम वैद्यकीय सेवा आश्चर्यकारकरित्या महागडी होण्यात झाला आहे आणि ती अमेरिकन सरकारला डोईजड झालेल्या अनेक खर्चांपैकी एक आहे. ओबामाकेअरला झालेल्या विरोधात हे प्रमुख कारण होते.
आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही... येथे (McKinsey: Only 14% Of Obamacare Exchange Sign-Ups Are Previously Uninsured Enrollees) त्याबाबतितली ताजी (८ मार्च २०१४) माहिती वाचायला मिळेल.
येथे अनेक विश्वासू वैद्यकीय जर्नल्समधिल दुवे देवून लिहीलेली महिती मिळेल. दुवा मोठा आणि माहितीपूर्ण आहे. वैद्यकीय व्यवस्थापनात रस असणार्यांनी मुळातून वाचवा. खाली फक्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत...
Efficiency
Preventable deaths
...Between 1990 and 2010, among the 34 countries in the OECD, the US dropped from 18th to 27th in age-standardized death rate. The US dropped from 23rd to 28th for age-standardized years of life lost. It dropped from 20th to 27th in life expectancy at birth. It dropped from 14th to 26th for healthy life expectancy.[4]
According to a 2009 study conducted at Harvard Medical School and published by the American Journal of Public Health, lack of health coverage is associated with nearly 45,000 excess preventable deaths annually.[8][82] Since then, as the number of uninsured has risen from about 46 million in 2009 to 48.6 million in 2012, the number of preventable deaths due to lack of insurance has grown to about 48,000 per year.[9]
Value for money
A study of international health care spending levels published in the health policy journal Health Affairs in the year 2000 found that the United States spends substantially more on health care than any other country in the Organization for Economic Co-operation and Development (OECD), and that the use of health care services in the U.S. is below the OECD median by most measures. The authors of the study conclude that the prices paid for health care services are much higher in the U.S. than elsewhere.[83] While the 19 next most wealthy countries by GDP all pay less than half what the U.S. does for health care, they have all gained about six years of life expectancy more than the U.S. since 1970.[63] हे एक दशकापूर्वीचे आकडे दरवर्षी अधिकधीक डोईजड होत आहेत. दर अमेरिकन बजेटमध्ये हा खर्च कसा भागवायचा याची चिंता असते पण उपाय दृष्टीपथात नाही. ओबामाकेअरने हा खर्च अधिकच वाढवला आहे.
Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे.
american healthcare या शब्दांनी गुगलल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
मेडिक टूरीझम हा अनेक बिलीयन डॉलरचा व्यवसाय केवळ पाश्चिमात्य वैद्यकिय सेवा महाग आहे या एकाच कारणावर आधारलेला नाही. पण विस्तार आणि अवांतरभयास्तव त्याबद्दल येथे इतकेच पुरे.
वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते.
या प्रतिसादाचा उद्येश भारतातील वैद्यकिय व्यवसायाची बाजू घेण्यासाठी नाही तर भारतिय आणि अमेरिकन सेवा दोन्हीं बाजूंबद्दलचे बरेचसे प्रतिसाद "एखाद्या वैयक्तीक अनुभवाच्या सरसकटीकरणावर" आणि "तज्ञाच्या मतापेक्षा केवळ सर्वसामान्य वैयक्तिक आकलनावर" आधारलेले आहेत असे वाटते. यात बर्याच प्रमाणात समजुतीचे घोटाळे असू शकतात.
उदाहरणार्थः एखाद्या औषधाची अॅलर्जी कोणाला आणि किती प्रमाणात येईल ते सांगणे शक्य नसते. अश्या अगदी एकसारख्या केसेस मध्ये खालचे दोन्ही अनुभव नोंदले गेलेले आहेतः
१. रुग्णाचे समजूतदार नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण आपलेच नशीब खराब होते."
२. रुग्णाचे तितकेसे समजूतदार नसणारे नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन न करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टराने धडधाकट माणसाला मारले की हो."
वैद्यकिय क्षेत्रासारख्या गुंतागुंतीच्या शास्त्रातील सेवेबद्दल दोन्ही बाजू शास्त्रिय पद्धतिने समजावून घेतल्याशिवाय तडक निवाडा करणे (दोन्ही बाजूंसाठी) अन्यायाचे होईल असे वाटते. केवळ म्हणूनच हा लेखनप्रपंच.
10 Mar 2014 - 7:36 pm | विकास
माझ्या प्रतिसादात मी खालील दोन मुद्दे मांडले होते. दुद्रैवाने त्याचे उत्तर मिळालेले नाही...
मला खरेच कल्पना नाही, म्हणून विचारत आहे... इथे लिहीत असलेल्या डॉक्टर्सना प्रश्न - आपल्याकडे अशा पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते का? नुसतेच डॉक्टर्सना नाही तर वॉर्डबॉय पासून वैद्यकीय व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीस? त्यात नुसते तंत्रज्ञानच येत नाही तर वैद्यकीय सेवेसाठी लागणारी वेगळीच हॉस्पिटॅलीटी देखील येते ज्याचा सकारात्मक परीणाम रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांवर होऊ शकतो.
अजून एक मुद्दा: मला वाटते आता अमेरीकेत सर्वत्रच फार्मा आणि तत्सम कंपन्यांकडून साधा चहा घेण्यावर डॉक्टर्सना बंदी आहे. आपल्याकडे डॉक्टर्सच्या ज्या कॉन्फरन्सेस निमित्ताने परदेशवार्या चालतात त्यात मिंधेपणा होतो असे वाटते का?
आपले (भारतातील) डॉ़क्टर्स हे फार्माकंपन्यांकडून आणि तत्सम इतर उद्योगांकडून भेटवस्तू घेत नाहीत असे म्हणायचे आहे का? त्यातून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होत नाही असे म्हणायचे आहे का? आपल्याकडे फुकाचे टेस्टींग, ट्रीटमेंट करायला लावणार्यांच्या चेन्स नसतात असे म्हणायचे आहे का?
कधीकाळी झालेले जेजे हत्याकांड (इंडस्ट्रीयल ग्लिसरीनचा औषधी वापर) हा केवळ अपवाद आहे असे म्हणायचे आहे का?
आत्ता याच धाग्यात एक प्रतिसाद वाचला की असे इतर पेशातही होते... पण म्हणून त्या चूका पण प्रकाशात आणायच्या का जीवावर बेतणार्या या चुकांना झाकायचे? मला पूर्ण आदर राखून असे म्हणायचे आहे की इथले डॉक्टर्स जणू काही स्वत:वर टिका केली आहे असे घेऊन डिफेन्स करत आहेत. त्याची काही गरज नाही असे वाटते. पण त्यांना देखील आपली व्यवस्था एकदम चिरेबंदी - अर्थात फूलप्रूफ आहे असे म्हणायचे आहे का?
------------ पुढचे सर्व इतर किंचीत अवांतर मुद्यांच्या संदर्भात आहे ----------
मी आधी देखील म्हणल्याप्रमाणे, भारतातील माझा व्यक्तीगत (त्यात जवळचे कुटूंबीय देखील आले) सुदैवाने डॉक्टर्सचा अनुभव चांगला आहे. अमेरीकेबाबत जर वैद्यकीय व्यवस्थेबद्दल बोलले तर ते कुठेतरी व्यक्तीगत घेतले जाते, मग अमेरीकेत खटले कसे होतात, वगैरे पर्यंतच दुर्दैवाने मर्यादीत चर्चा रहाते. केवळ अमेरीकेतील मेडीकल मालप्रॅक्टीस खटल्यांना घाबरून इथले डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात असे म्हणणे म्हणजे आपल्याकडचे सरसकट सगळे डॉक्टर्स हे डॉक्टर्स नसून हजाम आहेत असे म्हणण्याइतकेच वरकरणी वाटते. हवे असल्यास अमेरीका हे नाव काढा आणि तेथे युके अथवा कॅनडा म्हणा, जेथे खर्या अर्थाने पब्लीक हेल्थ केअर सिस्टीम आहे....
तुम्ही मांडलेल्या अमेरीकेसंदर्भातील काही मुद्यांबद्दल किंचीतः
आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही...
अर्थातच नाही. हा विषय वेगळ्या चर्चेचा होऊ शकतो पण येथे त्या चर्चेत किती उत्साह असू शकेल याबद्दल शंका येते. इतके देत आहेत ते देखील आश्चर्य आहे. इतका खाजगी उद्योग, इन्शुरन्स कंपन्या, रिपब्लीकन्स आणि अगदी काही डेमोक्रॅट्सकडून याला विरोध आहे. तुम्हाला माहीत आहे का माहीत नाही, पण जनतेला हेल्थकेअर मिळणे गरजेचे आहे म्हणून असाच प्रयत्न नजीकच्या भूतकाळात तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन हिने साधारण २१ वर्षांपूर्वी डेमोक्रेटीक मेजॉरीटी असलेल्या अमेरीकन काँग्रेस मधे असे विधेयक/धोरण आणायचा प्रयत्न केला आणि तो या डेमोक्रॅट्सनीच हाणून पाडला. यात केवळ मानवता हा दृष्टीकोन नाही. जेंव्हा वीम्या अभावी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नसते तेंव्हा माणसे अंगावर आजार काढतात. मग शेवटी इमर्जन्सीमधे जावे लागते, जे कायद्याने पैसे-वीमा असोत नसोत, द्यावे लागते. मग शेवटी त्याचा भार हा मेडीकेअर/मेडीकेड या सरकारी फंडांवर आणि खाजगी हॉस्पिटल्सवर पडतो. त्या सर्व संदर्भात, इतक्या वर्षांनंतर ओबामाकेअर ही बदलाची निव्वळ सुरवात आहे. त्यात आता वार्षिक वैद्यकीय चाचणी एकाअर्थी सक्तीची केली आहे आणि त्याचा खर्च विम्यातच अंतर्भूत केलेला आहे. दुसरीकडे नुसतेच प्रिव्हेंटेटीव्ह मेडीसिन नाही तर आहार आणि व्यायाम या संदर्भातून देखील अनेक पॉलिसीज, लोकशिक्षण दिले जात आहे. ते नुसतेच सार्वत्रिक वीमा इतके मर्यादीत नाही. असो.
वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते.
सहमत. पण या देशाची लोकसंख्या, आकार, देशाचे व्यवस्थापन, कायदेशीर-बेकायदेशीर स्थलांतरीत लोकसंख्या वगैरेचा विचार केल्यास अशी तुलना ही अॅपल टू ऑरेंज अशी ठरू शकेल. पण अमेरीका आणि भारत हे या प्रश्नांच्या संदर्भात बरेच समान आहेत म्हणून दोन्हीकडे absolute काय व्यवस्था आहेत हे बघण्यापेक्षा पुढे जात असताना स्वतःच्या चुका, करेक्टीव्ह अॅक्शन्स, देशाच्या म्हणून पॉलीसिज, वैद्यकीय व्यवस्थेतील (निव्वळ डॉक्टर्सचेच नाही) प्रशिक्षण, संशोधन आदी अनेक गोष्टी बघाव्यात असे वाटते. थोडक्यात आत्ता काय कमी-जास्त आहे यावर चर्चा करण्याऐवजी ट्रेंड काय आहे हे बघणे महत्वाचे वाटते.
Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे.
हा खाजगी लेख आहे असे वाटले. पण एन आय एच (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ) ची वगैरे अधिकृत आकडेवारी तुम्ही म्हणता त्यापेक्षा फार वेगळी असेल असे वाटत नाही. अधिक संशोधन करून चर्चा करू शकेन. पण मुद्दा इतकाच आहे, की बदल काय हवेत, कुठे कमी पडतो आहोत हे येथे पाहीले जात आहे. आपण एक व्यवस्था आणण्यासाठी तसे करायला तयार आहोत का? तसे होत असल्यास चांगलेच आहे. येथे अवश्य सांगावे.
10 Mar 2014 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. डॉक्टरांना फार्मा / वैद्यकीय उपकरणे विकणार्या कंपन्यांकडून मिळणार्या भेटी, कॉन्फरन्सला जाण्यासाठी मिळणारी मदत इ बाबतीत सर्वच देशांत नेहमी चर्चा होते. हे प्रकरणाला वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पदर आहेत... काही चांगले तर काही तद्दन वाईट.एक मात्र खरे की अमेरिकेत हे कायद्याने पूर्णपणे बंद आहे हा गैरसमज आहे.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनचा या संदर्भातला लेख इथे मुळातून वाचू शकाल. पण त्यातल्या सारांशाने दिलेल्या गाईडलाईन्स खालीलप्रमाणे आहेत.
GUIDELINES FOR GIFTS FROM INDUSTRY TO PHYSICIANS
The ethical considerations discussed above suggest several principles.
1. Any gifts accepted by physicians individually should primarily entail a benefit to patients and should
not be of substantial value. Accordingly, textbooks, modest meals and other gifts are appropriate if they
serve a genuine educational function. On the other hand, cash payments serve only the physician's
personal interest and therefore should not be accepted from industry. A gift which is appropriate because
of its contribution to patient care may become inappropriate because of its extravagance.
Gifts of minimal value raise fewer concerns and are permissible as long as the gifts are related to the
doctor's work (e.g., pens, diaries, books or rulers).
2. Gifts by drug companies to underwrite medical conferences or other professional meetings enhance the
ability of academic institutions, professional associations and health care organizations to provide
continuing education to physicians. Consequently, such gifts make an important contribution to patient
care. Subsidies from industry should not be accepted to pay for the costs of travel, lodging or other
personal expenses of physicians attending conferences or meetings, nor should subsidies be accepted to
compensate for the physicians' time. Subsidies for hospitality should not be accepted outside of modest
meals or social events held as a part of a conference or meeting. It is appropriate for faculty at
conferences or meetings to accept reasonable honoraria and to accept reimbursement for reasonable
travel, lodging and meal expenses. It is also appropriate for consultants who provide genuine services to
receive reasonable compensation and to accept reimbursement for reasonable travel, lodging and meal
expenses. Token consulting or advisory arrangements cannot be used to justify compensating physicians
for their time or their travel, lodging and other out-of-pocket expenses.
The giving of a gift directly to a physician from a company's sales representative may create a personal
relationship that could influence the use of the company's products. Accordingly, when a company
contributes funds for conferences that are sponsored by academic or other educational institutions, the
funds should be given by the company to the conference sponsor who in turn can use the money to reduce
the conference's registration fee. Payments to defray the costs of a conference should not be accepted
directly from the company by the physicians attending the conference.
3. No gifts should be accepted if there are strings attached. For example, physicians should not
accept gifts if they are given in relation to the physician's prescribing practices.
4. Sponsors of continuing medical education conferences have a special responsibility to ensure that
gifts are appropriate. The Accreditation Council for Continuing Medical Education has adopted a number
of useful guidelines to prevent industry funding for continuing medical education conferences from
leading to undue influence by the companies: (a ) responsibility for and control over the selection of
content, faculty, educational methods and materials should belong to the accredited sponsors of
conferences, (b) presentations must give a balanced view of all therapeutic options, and (c) financial support must be acknowledged in printed announcements and brochures, but reference should not be
made to specific products.17
The Task Force on Pharmaceutical Industry/CME Cooperation is currently developing an updated set of
guidelines for industry funding of continuing medical education conferences.
Some of these guidelines are appropriate for smaller educational meetings and in other educational
contexts, for example, when companies support meetings or lectures for medical trainees.
5. Financial support for conferences should be disclosed publicly. Physicians will be able to evaluate the
information presented to them more appropriately if they are aware that companies have contributed
funds to defray the costs of the presentation.
२. ओबामाकेअर : सर्व नागरिकांना वैद्यकिय सेवा सहज मिळावी याबाबत कोणाचेच दुमत असू नये. मात्र अमेरिकन वैद्यकिय सेवेचे फायदा-खर्च गुणोत्तर (बेनेफीट-कॉस्ट रेशो) हे फार खाली गेले आहे. त्यामुळे केवळ सेवेचा आवाका वाढवणे म्हणजे आधिकच कर्जाच्या ओझ्याने पिचलेल्या सरकारवर अधिक अनुत्पादक भर टाकणे आहे. हाच मुद्दा ओबामाकेअरचा विरोध करणार्यांचा (त्यात ओबामांच्या पक्षात असलेल्या नेत्यांचाही समावेश) होता/आहे. नुकत्याच ओबामाकेअरचा अभ्यासदौरा करून आलेल्या एका कार्यकारी अधिकार्याशी प्रत्यक्ष बोलणे झाले. ते सगळे सार्वजनिक रित्या सांगणासारखे नाही. मात्र अमेरिकन वैद्यकिय सेवेवर होणारा खर्च कमी करण्यात अनेक हितसंबंधांना होणार्या धोक्यांमुळे तो कमी करण्याचे प्रयत्न होत नाहीत हे उघड सत्य दोन्ही बाजूस माहित आहे ! त्यामुळे त्याबाबत फारसे होईल असे वाटत नाही. हा प्रकार काहीसा पीडीएस मधली गळती कमी करण्याऐवजी अजून एक अन्नसुरक्षा कायदा आणून प्रचंड गळक्या टाकीत अजून पाणी ओतण्यासारखाच प्रकार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. आणि अमेरिका झाली म्हणून सगळ्याच गोष्टींना उघड विरोध करणे सोपे असते तर एवढी मोठी जागतिक आर्थिक आपत्ती (financial crisis) टळली असती. असो.
३. स्कँडिनेव्हियन वैद्यकिय सेवा: या देशांतिल वैद्यकिय सेवा "क्वालिटी" आणि "बेनेफिट-कॉस्ट रेशो" या दोन्ही बाबतित जागतिक आदर्श समजला जाते. याबाबतीत व्यवस्थापन शास्त्राचा सर्वसाधारण नियम तुमच्या मतापेक्षा वेगळा आहे. जेवढा देश लहान तेवढा "एकॉनॉमीज ऑफ स्केल"चा कमी फायदा मिळतो. म्हणजेच जास्त लोकसंख्येच्या देशात त्याच क्वालिटीची सेवा कमी किमतीत देणे शक्य होते... अर्थात जर उत्तम व्यवस्थापन, कमी राजकारण आणि कमी गळती असली तरच.
४. Preventable medical errors बद्दल संदर्भ म्हणून दिलेला लेख हे कोणाचेह खाजगी मत नाही: "बादवे माझा मूळ मुद्दाच खाजगी मतांचे सरसकटीकरण करू नये हा होता !" Preventable medical errors च्या दुव्याचा पहिला पॅराग्राफ असा आहे:
In 1999, Americans learned that 98,000 people were dying every year from preventable errors in hospitals. That came from a widely touted analysis by the Institute of Medicine (IOM) called To Err Is Human. This was the “Silent Spring” of the health care world, grabbing headlines for revealing a serious and deadly problem that required policy and action.
IOM ची ओळख "Established in 1970, the IOM is the health arm of the National Academy of Sciences, which was chartered under President Abraham Lincoln in 1863." अशी दिली जाते. ही एक जागतिक स्तरांवर मानली जाणारी, सल्ला देणारी आणि वैद्यकिय मानके तयार करणारी अमेरिकन संस्था आहे.
सप्टेंबर १९१३ मध्ये अलेल्या या लेखात १९९९ मध्ये IOM ने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या धक्कदायक निबंधानंतरही अनेक मान्यवर वैद्यकशास्त्रिय जर्नल्स मध्ये आलेल्या लेखांमध्ये परिस्थिती अजून कशी सुधारली नाही याबाबत विवेचन आहे. Preventable medical errors अशी गुगलविचारणा केल्यास तेथेही मान्यवर वैद्यकिय जर्नल्समधले अनेक लेख सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले दिसतील.
असो.
याचा अर्थ भारतात सगळे आलबेल चालले आहे किंवा अमेरिकेत खूप घोळ चालले आहेत असा मुळीच नाही. उडदामाजी काळेगोरे सर्वच ठिकाणी सर्वकाळच असतात... कायद्याचा बडगा प्रबळ असला तर काळेपणा कमी दिसतो... मात्र तेथेही कधी कधी तो "वरवरचा दिखावा" म्हणजे एक प्रकारची रिस्क मॅनेजमेंट टॅक्टीक् असू शकतो.
पण माझा मुख्य मुद्दा असा होता की एखाद्या व्यवस्थेची स्तुती अथवा टीका वरवरच्या माहितीने अथवा एका खाजगी अनुभवाचे सरसकटीकरण करून करणे न्यायाचे नाही. सरसकटीकरणाचा दावा करायचा तर त्यामागे योग्य प्रमाणात शास्त्रिय पद्धतिने जमवलेला डेटा असावा. असो.
11 Mar 2014 - 6:00 am | विकास
एक मात्र खरे की अमेरिकेत हे कायद्याने पूर्णपणे बंद आहे हा गैरसमज आहे.
दुव्याबद्दल धन्यवाद. अविश्वास नाही पण मला खात्री नाही. कारण इतकेच की मी स्वत: २०१३ ला बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) जे बॉस्टन/प्रॉव्हिडन्सला आधिवेशन झाले त्याच्या प्रमुख समितीतर्फे बीएमएम च्या वैद्यकीय आधिवेशन संयोजन करण्यात होतो. मी एकटाच मॅनेजमेंट प्रमाणे डॉक्टर नसलेला होतो. इतर सर्व प्रथितयश डॉक्टर्स होते. पुर्वीच्या काळात अशा वैद्यकीय आधिवेशनात फार्मा कंपन्या अथवा तत्सम कंपन्यांकडून सहज डोनेशन मिळायचे आणि आत्ता देखील मिळाले असते. पण ते केले गेले नाही कारण मी म्हणल्याप्रमाणे असलेली बंदी. अर्थात हे डॉक्टर्सनीच सांगितले होते. अजून देखील जमल्यास मी काही जणांना विचारून बघेन. कदाचीत रीजनल असेल अथवा एएमएच्या गाईडलाईन्स असल्या तरी कायदेशीर काही बदल झाले असल्यास माहीत नाही. (मला आत्ता पटकन शोधताना मिळालेले नाहीत).
बाकी काही उत्तरे...
हे प्रकरणाला वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पदर आहेत... काही चांगले तर काही तद्दन वाईट.
माझे (सर्व अपवाद गृहीत धरून) असे स्पष्ट मत आहे की आत्ताच्या घडीस भारताला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्यात डॉक्टर्स देखील आले. त्यामुळे चांगल्या पेक्षा तद्दन वाईटच अधिक असण्याची शक्यता आहे. आणि सामान्य भेटवस्तू घेणे एक आणि परदेशवार्यांसाठी पैसे घेणे हे एक. यातील परदेशवार्यांसाठी अथवा तत्सम खर्चासाठी कुठलाही पदर समजू शकत नाही. ती लाचच वाटते. परत माझा अनुभवः आम्ही सरकारी नोकरीत व्यवस्थापनात आहोत. आम्हाला वर्षभरात जर कोणी गिफ्ट दिली, मी घेतच नाही, पण ख्रिसमसला वाईन / भेटवस्तू वगैरे तर ते पन्नास डॉलर्सपेक्षा अधिक असता कामा नये हा सरकारी नियम आहे. तोच नियम मी अगदी डिलॉईट सारख्या ठिकाणी काम करणार्या ऑडीटर्ससाठीपण बघितला आहे. ते धाब्यावर बसवणारे येथे देखील नक्की असतील. पण मग कायद्याने त्यांना जी शिक्षा होईल ती भयानक असते. एक उदाहरण - मॅसॅच्युसेट्स राज्याचा स्पिकर (#२ पॉवरफूल पोस्ट) याने एका सॉफ्टवेअर कंपनीस कॉन्ट्रॅक्ट देताना स्पेशल ट्रीटमेंट दिली. त्याचा त्याला (निवडणूकफंडास) काहीतरी $५०,०००च्या आसपास फायदा झाला. प्रकरण उघडकीस आले... आज तो दहा वर्षासाठी तुरूंगात आहे. डॉक्टर्सच्या पण अशा केसेस असतील. आपल्याकडे काही वचक आहे असे वाटते का?
ओबामाकेअर आणि स्कँन्डेनेविअन देश हा पूर्ण वेगळा विषय आणि अवांतर होत असल्याने येथे लिहायचे टाळतो. हवे असल्यास खरडी करू शकतो.
Preventable medical errors बद्दल संदर्भ म्हणून दिलेला लेख हे कोणाचेह खाजगी मत नाही:
मी तसे म्हणले नव्हते. पण मला त्यावर संशोधन करायला वेळ नव्हता म्हणून इतकेच म्हणले पण पुढे असे देखील म्हणले होते: पण एन आय एच (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ) ची वगैरे अधिकृत आकडेवारी तुम्ही म्हणता त्यापेक्षा फार वेगळी असेल असे वाटत नाही. थोडक्यात सहमतीच दर्शवली होती. आत्ता एन पी आर वर या संदर्भात माहिती मिळवली तर त्यात हा आकडा याहूनही मोठा आहे असेच म्हणलेले आहे.
पण या सर्व गोष्टी अमेरीके बद्दल बोलत आहोत. तेथे त्या शोधल्या जातात, त्यावर विचार केला जातो आणि करेक्टीव्ह अॅक्शन्स घेतल्या जातात. डॉक्टर्सवर आणि हॉस्पिटल्सवर देखील कायदेशीर कारवाई देखील होते. कारण "लाख मोलाचा जीव" धरला जातो. डॉक्टर्सच्या संघटना त्यात ऑफेन्सिव्ह समजत नाहीत... आपल्याकडे काय होते हा प्रश्न आहे. कारण चर्चा विषय हा भारतावर आधारीत आहे. आणि त्यावर मुग गिळणे योग्य नाही असे वाटते.
11 Mar 2014 - 1:40 pm | सुबोध खरे
विकास साहेब
अमेरिकेचा मुद्दा मी आणला नव्हता किंवा इथली आणी तिथली वैद्यकीय व्यवस्था याची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. श्री पक्या यांनी त्यांच्या बाळाच्या आजाराच्या वेळेस तेथील डॉक्टर नि कसे व्यवस्थित समजावून सांगितले आणी इथे डॉक्टर कसे वाईट आहेत यावर मी फक्त एवढेच म्हटले कि तुम्ही जर दहा ते तीस हजार रुपये एका भेटीला दिलेत तर बालरोग तज्ञ तुम्हाला अर्धातास सर्व समजून देईलच पण आणखी अर्धा तास बाळाला खेळवेल. अमेरिकेत प्राथमिक आरोग्य सुविधा भारताच्या दसपटीने तरी उत्तम आहे याबद्दल कोणतीही शंका नाही. आपण येथे तुलना मिपावरील लोक जे मध्यम किंवा उच्च वर्गीय आहेत त्यान मिळणाऱ्या सुविधा आणी अमेरिकेतील सुविधा यांची तुलना केली पाहिजे.
मुळात भारतात आपण पंधरा वर्षे एखाद्या डॉक्टर कडे काम केले तर आपल्याला आर एम पी हि डिग्री घेऊन व्यवसाय करता येत असे. सुदैवाने ते बंद झाले आहे पण जे लोक अगोदरपासून व्यवसाय करीत आहेत ते अजूनही चालूच आहे. यानंतर आयुष ( आयुर्वेद, युनानी,सिद्ध आणी होमेपदी) या शाखांचे (७५ टक्के) डॉक्टर सुद्धा आधुनिक वैद्यकाची औषधे त्यामध्ये कोणतेही शिक्षण नसताना सर्रास देताना दिसतात.उरलेले २५ टक्के( खरतर बरेच कमी टक्के) आपल्या शाखेचा औषधोपचार करतात. यावर आपल्या कल्याणकारी सरकारने त्यांना आता अधिकृतपणे तसे करण्यस परवानगी दिली आहे.
यानंतर येतात ती आधुनिक वैद्यक शास्त्राची महाविद्यालये. सरकारी महाविद्यालये १८१ आणी खासगी महाविद्यालये २०६ आहेत. खासगी महाविद्यालयात सरासरी ८ लाख रुपये दर वर्षाची फी आहे( आणी हि दर वर्षी १० % ने वाढवण्याची परवानगी मिळालेली आहे)म्हणजे ३५ लाख रुपये भरून आपण खाजगी महाविद्यालयातून सेवाभावी डॉक्टर तयार करणार. यानंतर जर त्यांना स्पेशालीस्ट व्हायचे असेल तर तीस लाख( स्कीन चा डिप्लोमा) पासून चार कोटी रुपये (एम डी रेडियोलॉजि) साठी अशी देणगी आहे.
यानंतर येतात सरकारी महाविद्यालये- येथे ५० टक्के आरक्षण आहे आणी सदतीस टक्के बारावीच्या गुणावर येथे प्रवेश मिळतो. आता सत्त्याण्णाव आणी सदतीस ची तुलना आपण कशी करणार.
म्हणजे मूळ भारतात दर वर्षी ३०००० डॉक्टर आधुनिक वैद्यकाचे (आणी ८ लाख "आयुष"चे तयार होतात.) ३०००० पैकी १४००० खाजगी महाविद्यालयातून. उरलेल्या १६००० मध्ये ८००० राखीव. या ८००० गुणवत्तेवर प्रवेश मिळवणार्यापैकी प्रत्यक्ष किती जणांना डॉक्टर व्हायचे होते आणी किती मुले आई वडिलांच्या इच्छे साठी/ हुशारीमुळे प्रवेश मिळाला म्हणून आलो अशी आहेत.
आणी अशा परिस्थिती नंतर किती डॉक्टर एकदा पदवी मिळाल्यावर आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतात?
हा आहे वैद्यकीय शिक्षणाचा लेखाजोखा.
माननीय सर्वोच्च न्यायालयात हि भयावह परिस्थिती मांडल्यावर त्यांनी काय केले? काही नाही.
त्यांना हे सांगण्यात आले कि कायद्याचा कोणताही डिप्लोमा नाही किंवा अनुभव असेल तरी आपल्याला कायदेतज्ञ म्हणून व्यवसाय करत येत नाही. पूर्ण एल एल बी होऊन सनद घेतल्याशिवाय जर तो व्यवसाय करता येत नाही तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ असलेली वैद्यक शाखा अशी वार्यावर कशी सोडता येईल.जेथे आर एम पी, डिप्लोमा, आपली सोडून दुसरी पथी याचे कोणतेही ज्ञान नसताना सामान्य माणसाचा जीव धोक्यात घालायला अधिकृत परवानगी कशी देता येते?
यावर तुम्ही तुमचे बोला कायदे शिक्षण हा सध्याचा विषय नाही आणी जास्त बोलला तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी नोटीस देण्यात येईल
आणी तुम्ही म्हणता अमेरिकेशी तुलना?
डॉक्टर रुग्णाला बरे करतो हे अर्धसत्य सुद्धा नाही.हे एक पंचमांश सत्य आहे.
१) रुग्ण वेळेत डॉक्टर कडे गेला पाहिजे
२) डॉक्टर त्या शाखेत तज्ञ असला पाहिजे
३) त्या डॉक्टरचे निदान व्यवस्थित झाले पाहिजे
४) निदान व्यवस्थित होऊनहि त्याच्या वर इलाज व्यवस्थित झाला पाहिजे
५)या सगळ्या गोष्टी बरोबर होऊनहि त्या रुग्णाचा आजार असाध्य नसला पाहिजे( रुग्ण नशीबवान पाहिजे)
एवढे सगळे दुवे सांधले गेले तर तो पूर्ण बरा होणार.
12 Mar 2014 - 12:47 am | विकास
अमेरिकेचा मुद्दा मी आणला नव्हता किंवा इथली आणी तिथली वैद्यकीय व्यवस्था याची तुलना करण्याचा प्रश्नच नाही.
तुम्ही अथवा इतर कोणी (इस्पिक एक्का सहीत) येथे मुद्दामून अमेरीका हा विषय आणला असे म्हणायचे नव्हते. लिहीण्यामुळे तसे वाटले असल्यास क्षमस्व. बर्याचदा समोरासमोर बोलत नसल्याने लिहीण्यातून गैरसमज होऊ शकतो अथवा विषय अधिक भरकटू शकतो, म्हणून तसे म्हणले होते. असो.
हा आहे वैद्यकीय शिक्षणाचा लेखाजोखा.
हे वास्तव आहे हे नक्कीच. दुर्दैवाने त्यात आश्चर्य वाटले नाही. म्हणून कडक कायदे हवेत आणि नक्की वैद्यकीयसेवा कोणी देयच्या याचे निकष आणि ते पाळणार्यांसाठी शिक्षा असणे देखील गरजेचे आहे. मात्र त्यापुढे त्या त्या पद्धतीत म्हणजे जे आयुर्वेदीक वैद्य (वैदू नाही) असतील त्यांनी फक्त त्याच क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे आणि स्वतःच्या क्षेत्रातले नुसतेच घोटाळे म्हणून नाही तर तृटी समजून दूर करणे गरजेचे आहे. तेच अधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्समंडळींना लागू होते. मला नाही वाटत असे आपल्याकडे कुठल्याच क्षेत्रात घडते. वैद्यक क्षेत्राप्रमाणे सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पण गरज आहे कारण अप्रत्यक्षपणे सिव्हील इंजिनिअरच्या हातात अनेकांचे जीव असतात... पण आज काय अवस्था झाली आहे ते सांगायची गरज नाही. What is not measure, cannot be managed. हे तत्व लागू पडते.
वरती इस्पिक एक्का यांनी अमेरीकेत घडणारे lack of preventative care मुळे घडणार्या मृत्यूंच्या संख्येबद्दल लिहीले आहे. मी माझा बीएमएम मधील स्पॉन्सरशीपचा अगदी आत्ताचा अनुभव सांगितला आहे. अजून एकः वर सिव्हील इंजिनिअरींग म्हणले म्हणून - अमेरीकन सोसायटी ऑफ सिव्हील इंजिनिअर्स या देशातल्या सगळ्यात जुन्या व्यावसायीक संघटनेने अमेरीकन इन्फ्रास्ट्रक्चरच्या सद्यस्थितीवर संशोधन करून त्याला "D" ग्रेड दिली आहे. आता म्हणून त्याच्याशी आपण आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरची तुलना करू शकतो असे वाटते का? पण परत तो मुद्दा नसून आपली अवस्था काय आहे आणि ती कुठे बदलली पाहीजे ह्यावर सातत्याने बोलले-लिहीले जाते आणि मग त्यावरून धोरणे-नियम केले जातात, हा आहे.
फार्माच्या देणग्यांच्या बाबतीत... केवळ उदाहरण म्हणून - रॅनबक्सीवर अमेरीकेत बंदी आणली गेली. आपल्याकडे तीच औषधे अजून चालतात का? जर चालत असतील तर त्याला रॅनबक्सीकडून मिळणारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्पॉन्सरशीप जबाबदार आहे असे म्हणावे लागेल का? असे प्रश्न उपस्थित होतात.
डॉक्टर रुग्णाला बरे करतो हे अर्धसत्य सुद्धा नाही.हे एक पंचमांश सत्य आहे.
अधिष्ठान-अहंकार-तशी विविध साधने, वेगळाल्या क्रिया नाना, दैव ते येथ पाचवे. हे तत्वज्ञान म्हणून हे पटते आणि दैव हे २०% असते असे मानायला मी तयार देखील आहे. तरी पण कर्मयोग म्हणून विचार केला तर पेशंट आणि डॉक्टर्सचे असे दोघांच्या वागण्यावरून, एकमेकांवरील विश्वास, सहकार्याने बरेच यश हे हातात येते... (उ.दा. १९७५.. जवळची मराठवाड्यात रहाणारी नातेवाईक. डॉक्टरांकडे अगदी साध्या कारणासाठी गेली. डॉक्टरना मरमर ऐकू आली. पुण्याला पाठवले. पुण्यातल्या हृदरोगतज्ञांनी तपासून मुंबईस. मुंबई हॉस्पिटलमधे यशस्वी शस्त्रक्रीया झाली. यात रुग्णाने/नातेवाईकांनी घाबरून गळून जाउन वेळ लावला नाही. डॉक्टर्स योग्य मिळाले. पुढचे सगळे आहेच. असो,)
17 Mar 2014 - 9:19 pm | आनंदी गोपाळ
सर्वश्री विकास व इस्पिकचा एक्का, यांचेतील सुरू झालेली व सुबोध खरे यांनी सहभाग नोंदविलेली चर्चा माझ्या वाचनातून सुटली. नीट वाचून लवकरच प्रतिसाद देईन म्हणतो. अनेक रोचक मुद्दे आहेत. तसेच, डॉक बॅशिंग अथवा वर्शिपिंग या दोन अतिरेकी मुद्द्यांपेक्षा वेगळी, व सकारात्मक चर्चा होऊ शकेल असे वाटते.
सो, अॅज सून अॅज आय गेट टाईम..
7 Mar 2014 - 10:51 pm | ओसामा
आमच्या ठाण्यात एक धर्मवीर होते. बहुतेक २००० साली त्यांचे एका छोट्या अपघातात निधन झाले. त्यानंतर कट्टर शिवसैनिकांनी सिंघानिया रुग्णालय जाळून टाकले. सध्या ठाण्यात बरीच रुग्णालये आहेत पण त्यावेळेस खूप लोकांना सिंघानियाचा हाच पर्याय होता. त्यावेळेस ह्या विषयावर बरीच चर्चा झाली (मिपा वर नाही पेपर मध्ये)
9 Mar 2014 - 11:53 am | मृगजळाचे बांधकाम
आमच्याकडे आमच्या भागातील बोगस doctor शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम करीत असताना एक बोगस doctor वर आम्ही कारवाई ची तयारी सुरु केली,तर त्याच्या वर कारवाई करणे थांबवावे त्याला practice करू द्यावी म्हणून मला आमच्या भागातील काही प्रसिध्द डॉक्टर्स चे फोन आले.नंतर मी चौकशी नंतर असे कळले कि तो बोगस डॉक्टर्स या प्रसिध्द डॉक्टर्स कडे patient पाठवत असे. त्याचे त्याला ३०% cut मिळत असे.
9 Mar 2014 - 12:39 pm | बिपिन कार्यकर्ते
"The truth is always somewhere in between."
सगळ्याप्रकारचे लोक सगळीकडे असतात. डॉक्टरच चांगले किंवा पेशंटच चांगले, असं एकांगी काही नसतं. मात्र, प्रत्येक नात्यात एक सिनिअर पार्टनर असतो तसे या नात्यात डॉक्टर हा वडिलधारा असतो. बहुतांश केसेसमधे पेशंट आणि इतर नातेवाईक त्या भावनेतून वावरतानाही दिसतात. त्यामुळे, पेशंटशी कसे वागावे, कशी हँडल करावी परिस्थिती इत्यादींबद्दल डॉक्टरांना काही तरी ट्रेनिंग असावे / असेलही.
माझ्या घरात आणि अगदी निकटच्या वर्तुळात बरेच डॉक्टर आहेत. त्यातले बव्हंशी अॅलोपाथ (सर्जन, एमडी वगैरे आहेत). काही होमिओपाथही आहेत. या सर्वांशी गप्पा मारताना प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे, आज या व्यवसायात नको तितक्या मालप्रॅक्टिसेस असाव्यात. असो. माझे निरीक्षण अगदी सामान्य आहे आणि माझ्याकडे विदा वगैरेही नाही. पण या लोकांच्या बोलण्यावरून काही लक्षात येते ते एवढेच.
मला स्वतःला आलेला एक अनुभव.
बावीस वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या बहिणीला मुलगी झाली. पावसाळ्याचे दिवस होते. मुंबईचा प्रचंड पाऊस बदाबदा कोसळत होता. बाळंतपण सुखरूप झाले. बाळ एकदम मस्त होतं. दवाखान्यात एक बालरोगतज्ञ येत असत. त्या आमच्या इथल्या तशा नाव राखून असलेल्या होत्या. दिवसातून एकदा येऊन सगळ्या बाळांची तपासणी करून त्या जात असत. दुसर्या दिवशी आमच्या शेजारी एक नर्सिंगचे पूर्ण शिक्षण घेतलेली एक मुलगी राहत असे ती भेटायला आली. तिने बाळाला बघून, बाळ जरा पिवळे दिसते आहे, पण काही काळजीचे कारण नाही असे होतेच असे म्हणले. माझी आई व आजीही म्हणल्या की हे होतं कधीकधी. बाळकाविळ का असं काही तरी म्हणतात आपल्याकडे त्याला. त्या दिवशी बाळाने दूध प्यायले की उलटी करायला सुरूवात केली. रडूही लागले. पोटाला धक्का लागला की रडायची. बालरोगतज्ञ बाई आल्या. त्यांनी तपासले आणि म्हणल्या, "ताबडतोब एक्सरे वगैरे करावे लागेल. काही तरी गंभीर प्रकार दिसतोय." आम्ही घाबरून गेलो. मात्र, माझ्या मेव्हण्याने आणि वडिलांनी तातडीने बाळाला घेऊन टॅक्सीने एक्सरे क्लिनिक गाठले. संध्याकाळ होऊन चालली होती. एक्सरेचा फोटो लगेच मिळाला. रिपोर्ट नंतर घेऊन जा म्हणले. आम्ही परत दवाखान्यात. बाईंना फोन केला. त्या आल्या. एक्सरे बघून म्हणल्या, 'आतड्याला पीळ अथवा अडथळा (twist or obstruction) आहे. तातडीने ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता वाडियाला घेऊन जा.' रात्रीचे ११-१२ वाजत आले होते. भयानक पाऊस होता. आम्ही टॅक्सी करून वाडियाला. तिथे, इमर्जन्सीमधे गेलो. या बाईंनी दिलेले पत्र दाखवले. त्यांची धावपळ झाली आणि एक ड्युटीवरचा ज्युनिअर डॉक्टर (हाउसमन की रजिस्ट्रार म्हणतात तो) आला. त्याने नीट चेकप केला. एक्सरे बघितला. आणि एकदम बोलला, 'इथे का आणलं? कोणी सांगितलं?' आम्ही सगळी कहाणी रिपिट केली. त्यावर तो म्हणला, 'धन्य आहे. अहो हिला पोटात गॅस झालाय आणि हे दिसत आहेत एक्सरे मधे ते गॅस बबल्स आहेत. I really am surprised that an MD has sent you here.' आम्ही चकितच झालो. मग तो म्हणला, 'आता आलाच आहात, तर थांबा. अॅडमिट करू आपण हिला. सकाळी, आमचे सर येतील तेव्हा तेच काय ते फायनल सांगतील.' म्हणून आम्ही थांबलो. सकाळी ते सर आले. सत्तरीऐंशीचा एक पारशी बुढ्ढा. त्याला बघूनच दिल खुश. पण एकदम कडक आणि बोलायला टोकदार. त्याने तपासले, सगळी कहाणी ऐकली. काही बोलला नाही. थेट त्या बालरोगतज्ञबाईंना फोन लावला. त्या याच्याच विद्यार्थिनी निघाल्या होत्या. फोनवर हासडहासडहासडलं त्या बाईंना. बेक्कार शाळा केली. मग आम्हाला म्हणला, 'आता परत जाऊ नका. आपण हिला इथेच दोन तीन दिवस ठेवू. मग थेट घरीच न्या. काही झालेलं नाहीये हिला. पण इतक्या पावसाचं हिला परत बाहेर हवेवर नेऊ नका. पाहिजे तर आईलाही इथेच आणा.'
पुढे सगळं नीट झालं. खर्चही काही आला नाही फार. तो बुढ्ढा बाबाजी रोज दोनदा येऊन राउंड मारायचा. मात्र, इतकं चुकीचं डायग्नोसिस कसं काय झालं हे आश्चर्यच आहे. नंतर आम्ही एकदा त्या बाईंकडे त्यांना सांगायला गेलो की आता बाळ ठीक आहे तर त्यांनी सरांकडुन बसलेल्या फटक्याचा राग आमच्यावर काढला. आम्ही झक मारली आणि आलो असं वाटून घरी परत आलो.
सांगायचे तात्पर्य असे की, It happens... from both sides. तरीही, एखादा चांगला डॉक्टर पेशंटला कसं वागवतो, कसं समजावतो आणि त्यामुळे पेशंटला किती उभारी येते वगैरे महत्त्वाचे आहेच.
माझ्यापुरते बोलायचे तर, जेव्हा कधी एखाद्या मेडिकल चाचणीचा रिपोर्ट मला समोर दिसतो (माझा किंवा इतरांचा) तेव्हा मी तो स्वतः नीट वाचतो. त्यातल्या बर्याच गोष्टी चक्क अगदी सामान्यपणे कळण्यासारख्या असतात. आपण नीट लक्ष देऊन वाचावं फक्त. प्रत्येक आकड्याच्या Min Max लेव्हल्स, रेंज, नॉर्मल म्हणजे काय वगैरे कंसात दिलेले असते. त्यावरून आपल्याला थोडातरी अंदाज येतो. (माझ्या वडीलांना जन्मतःच एक किडनी नाहीये. म्हणजे ती कधी फॉर्मच नाही झाली. ती जागा अक्षरशः रिकामी आहे. त्यांच्या एका आजारपणात त्यांची सोनोग्राफी करावी लागली तेव्हा तो रिपोर्ट मीच आणला होतो. त्यात, उजवी बाजू मोकळी आहे हे वैद्यकिय भाषेत लिहिले होते. ते वाचून आणि थोडासा कॉमन सेन्स वापरून मी घरी 'बाबांना एक किडनी नाहीये' असं बोललो. त्यावेळी, माझी आत्या भयानक रागवली होती माझ्यावर, 'काय मेला अभद्र बोलतो म्हणून'! ;) ) डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्याकडून नीट समजून घ्यायचा प्रयत्न करतो. चांगला डॉक्टर असेल तर तो अतिशय व्यवस्थितपणे समजावतोही. अगदी आकृत्या वगैरे काढून. त्याउप्पर अजून समजून घ्यायचं असेल तर मग आजकाल आंतरजालावर खूप काही छान माहिती मिळते. ती समजून घ्यायची. मात्र हे सगळं करताना, 'शेवटी डॉक्टरच तज्ञ आहे. तो म्हणेल ते करायचं. आपली अक्कल फार पुढे न्यायची नाही.' हे भान ठेवायचं. डॉक्टर निवडताना नीट निवडा, पण एकदा का त्याच्या/तिच्याकडे गेलं की मग आपलं डोकं फार चालवू नये. उन्नीसबीस चालायचंच आणि तेवढी तयारी ठेवायचीच मनाची. आपण अलर्ट राहिलं की समोरचाही आपल्याला फसवताना चारवेळा विचार करतो.
9 Mar 2014 - 1:10 pm | कवितानागेश
इथली झकाझकी जरा थांबल्याची बघून अगदी हेच लिहायला आले होते.
प्रॉब्लेम्स्चे कारण आहे अज्ञान आणि आळशीपणा, डॉक्टर आणि पेशंट दोघांचाही.
पेशंटला कळत नसेल तर त्याला केस काय आहे ते डॉक्टरनी नीट सांगायला हवं. किंवा डॉक्टर गोंधळ घालतोय/ लपवाछपवी करतोय/ बेपर्वाई आहे असं पाहिल्यास पेशंटनी डॉक्टर बदलावा.
मागे काही वर्षांपूर्वी माझ्या मावसबहिणीनी डॉक्टर्स नीट को ऑपरेट करत नाहीयेत हे लक्षात आल्याबरोबर पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस कळा सुरु झाल्या असताना होस्पिटल बदललं होतं! बदललेल्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाली. दोघेही सुखरुप होते. ती हे सहज करु शकली कारण तिला स्वतःला नक्की काय होतंय, आणि काय हवय हे तिला व्यवस्थित माहित होतं. कारण नेहमीच्या विश्वासातल्या डॉक्टरांशी सतत संपर्क आणि चर्चा होत होती.
माझ्म स्वतःचे ११ वर्षाचे असताना कानचं ऑपरेशन झालं होतं. पोहायला जायचे. त्यातून वॅक्स हार्ड झाला होता. १ महिना ट्रीटमेन्ट घेउनही कान दुखणं आनि रक्त येणं सुरु होतं. कानाचं ऑपरेशन करणं डॉक्टर शक्यतो टाळत होते, कारन जनरल अनेस्थेशिया द्यावा लागेल. त्यानी मी लहान असूनही मला सगळं नीट समजावून सांगितले होते. मीपण नंतर शाळेत जाउन मैत्रिणींना आक्रुत्या वगरै काढून कानाची रचना समजावून सांगितली होती! ;)
अनेस्थेशिया द्यायच्या क्षणापर्यंत डॉक्टर्स माझ्याशी बोलत होते आणि काय चाललंय ते सांगत होते.... अर्थात मी खूप प्रश्न विचारत होते म्हणूनच. :)
बहुतांश लोकांना विज्ञान/शरीरशास्त्र हा विषय फक्त शाळेत थोडे मार्क मिळवण्यापुरताच माहित असतो. बाकी त्यातले काय ते डॉक्टर बघून घेइल, असा एक बेपर्वाईचा दॄष्टीकोन स्वतःच्याच रोजच्या सतत वापरण्याच्या यंत्राबद्दल- शरीराबद्दल असतो. अज्ञानाचा गैरफायदा कुणालाही सहजच घेता येतो.
आपण स्वतः जागे राहिलो, आणि नीट माहिती ठेवली तर आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही.
मग तो डॉक्टर असो की दारावरचा विक्रेता की शेअर ब्रोकर....
9 Mar 2014 - 2:17 pm | मराठीच
डॉक्टर लोक फार माजलेत हे खरं आहे.
हास्पीटल, तिथेच यांच्या बायकोचे पॅथलॅब ,तिथेच पलिकडे यांच्या बापाचे नाहीतर भावाचे मेडीकल, हे सरळ लूट करतात.
एका डॉक्टरने मला चारशे रुपायची औषधे दिली ,दहा गोळ्या. मी मित्राला विचारले तर त्याने सांगितले की यांची लिँक असते, कमिशन मिळते .जे औषध ऐंशी रुपायात मिळते ते हे महागड्या ब्रॅन्डचे चारशेचे देतात.
दहा दहा कोटींची हॉस्पीटल्स, कॉन्फरन्सच्या नावाखाली फार्मा कंपणीच्या पैशाने 'ऐय्याशी' करायला परदेशात जाणारेही अनेकजण आहेत. यांचे एकेक नाद सांगितले तर चाट पडाल..यांना आता कायदाचा बडगा दाखवलाच पाहीजे.
9 Mar 2014 - 3:37 pm | सुबोध खरे
अगदी अगदी.
सगळ्या खाजगी दवाखान्यांचे आणि रुग्णालयांचे राष्ट्रीयीकरण झालेच पाहिजें आणि तेथील डॉक्टरना रोजगारावरच ठेवले पाहिजे. इतकेच नव्हे तर खाजगी औषध कंपन्यांचे सुद्धाराष्ट्रीयीकरण झाले पाहिजें. सर्व औषधे निर्मितीचे हक्क सरकारी कंपन्यांनाच दिले पाहिजेत आणि त्याचे वैद्यकीय प्रचारक, मार्केटींगची माणसे यांना पण रजा दिली पाहिजे म्हणजे या सर्व साट्या लोट्यातून सामान्य माणसाची मुक्तता होईल. सगळे उपचार सरकारी दवाखान्यात आणि सरकारी रुग्णालयातच आणि औषधे पण सरकारीच. म्हणजे कोणाचाच माज नको आणि महागडी औषधेही नकोत आणि पैसेही खर्च व्हायला नकोत.
एकदम १०० टक्के पटले.
9 Mar 2014 - 3:48 pm | प्यारे१
:)
10 Mar 2014 - 9:40 am | पिलीयन रायडर
एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच नात कसं असु शकतं आणि जो डॉक्टर जीव वाचवु शकतो, त्याचा स्वतःकडे बघायचा द्रुष्टीकोन कसा असु शकतो...
मी डॉ. शिवप्रकाश ह्यांना लिहिलेलं पत्र..
Hello Doctor,
You may not recognize me but, every time I look at my son Abeer, he reminds me of you…
You did open heart sugary on him for TAPVC on 3rd July 2012...exactly a year ago… for us it is the day when Abeer was re-born…
Like any other parents, me and my husband too had many dreams for him right from the moment we knew about my pregnancy. But, just after a week he was born, we had only one dream left.. To see him alive…
We were in the happiest period of our life... And life gave us a very cruel truth to live with…
Compared to the children born during same week in the hospital, he looked very dull and lifeless. That moment is still burning in my heart.
Every passing day his intake reduced and finally we had to shift him to NICU. There he was fed by tube through nose. Which was a horrible sight for any parents to watch, but our misery didn’t end there.
I cried like anything when I saw him with that tube. When he was sent to Seven hills Hospital, Mumbai, I felt very helpless. I could not stop crying. However, I did not know that it was last tear that rolled down my cheek because very next day...I met you!
The moment I saw you, I cannot explain why, I felt relieved. Your presence is very comforting. Even though you explained high risk associated with sugary, I felt confident.
I still remember the last conversation before going to OT, where my husband said
“I hope we are in lucky 95%" and you replied,
“hum to 100% ke liyehi try karenge".
There was doubt in our mind... We had “Hope”…. You had “confidence”.
You knew what you were doing. ..
I tried looking at animation of open heart sugary for TAPVC. But, I could not watch it for more than 15 sec. I really don't know how you operated that tiny heart... However, that day you saved two lives... I could have never lived without my son...
During our stay at Seven Hills, everybody around us told that you are nothing less than “The God”. I would not have believed such “Larger than life” description of anybody...
But that day I believed...from bottom of my heart...
Today my child sets house on fire for food. He was 2.75kg when born and he lost 0.75 kg after operation. Now, I get warning from his cardiologist that he is a “Healthy Child” and I should watch him for being overweight! I may never be able to put my feelings in words. I just wish that one day my child will be a Heart surgeon like you..
He owes his life to you...!
At last I and my husband wish you luck with every little heart you touch...
May God give you strength to help those who share same fate as we did a year back!!
Regards,
डॉ. शिवप्रकाश ह्यांचे उत्तर..
Dear
Warm Greetings. Thanks for the touching comments. We are humbled by your words. It is the god's will that we are serving his cause and we are merely instruments in his hands to deliver what he has decided for all of us.
It is so pleasing to see the photo of Abeer and it is difficult to believe that the child had obstructed TAPVC. May the god shower the best of the best in his life.
Please stay in touch.
Dr KSP
Dr. Shiva Prakash K MBBS, MS, MCh
डॉक्टरला कितीही शिव्या घाला.. स्वार्थी माना.. पण जेव्हा कुणी अत्यंत जवळचं मरणासन्न असतं तेव्हा जगात हा एकच माणुस असतो जो काहीतरी करु शकतो.. तो नेहमी यशस्वी होईलच असं नाही पण तो १००% प्रयत्न तरी करेलच..
10 Mar 2014 - 2:17 pm | बेकार तरुण
आपला अनुभव वाचुन डोळ्यात पाणी आले.
आपणहि आठवण ठेवुन आभार मानले हे विशेष.
10 Mar 2014 - 2:33 pm | प्यारे१
हृदयस्पर्शी!
>>>It is the god's will that we are serving his cause and we are merely instruments in his hands to deliver what he has decided for all of us.
हम्म्म.
10 Mar 2014 - 3:52 pm | विटेकर
पूर्ण चर्चा आणि प्रतिसाद ही वाचले.
वास्तविक येथे जे आक्षेप वैद्यकीय व्यवसायावर नोंदविले आहेत , ते कुठल्याही व्यवसायाला जशेच्या तशे लागू होतात.
साती आणि डो. सुबोध खरे ( नेहमी प्रमाणे ) यांनी अत्यंत संयत पद्धतीने प्रतिवाद केला आहे.
मात्र आनंदी गोपाळ यांचा सूर थोडा तिखट लागला आहे.
अजूनही या व्यवसायाला समाजात फार मोठा मान आहे . मेट्रो च्या बाहेरील गावात अजूनही लोक डॉक्टरला देव मानतात ( अर्थात अपवाद आहेतच )
माझा वैयक्तिक अनुभव - माझ्या वडिलांना अॅटॅक आल्यावर कोल्हापूरच्या एका टिनपाट हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले. आम्ही दोघे बंधु पुण्यातून तिथे पोह्चलो , थ्रोम्बोलिसिस करुन सगळे ठिक-ठाक होईपर्यन्त थाम्बणे भागच होते.
पहिल्यादिवशी डॉक्टर नीट बोलेचना ! त्यांना बहुधा पेशंट्च्या नातेवाईकांना काही माहीती सांगावी लागते याचा गंध ही नव्हता. त्यातून आम्ही थांबावे अशी काही सोयही नव्हती .. आय सी यू पण धन्य होते.. नावालाच आय सी यू , पडदे टाकून केलेले.. कोणीही आत जाऊ शकत असे..
पण पुढच्या दोन दिवसात तिथल्या स्टाफ ने आम्हाला अक्षरशः जिंकून घेतले. पुण्यात असणार्या सुविधा तिथे नव्हत्या पण रुग्णाबद्दल एक अकृत्रिम स्नेहभाव होता पूर्ण रुग्णालयात. पेशंट ची काळजी होती ...
आम्हीही नंतर हॉस्पिटलला पत्र लिहिले. त्यानंतर पुण्यात आल्यावर अन्जिओप्लास्टी करताना फरक आणखी स्प्ष्ट झाला.
रुग्ण आणि डोक्टर हे एक " नाते " आहे , त्याची जपणूक दोन्ही बाजूनी व्हायला हवी, शेवटी मरण कोणीच चुकवू शकत नाही मात्र डोक्टर चे प्रामाणिक प्रयत्न हा रुग्णाचा अधिकार आहे तर डोक्टरला उचित आदर हे रुग्णाचे आणि नातेवाईकांचे कर्तव्य आहे.
19 Mar 2014 - 2:42 am | प्रभाकर पेठकर
मला वाटते विषयाचा समारोप झाला आहे.
11 Mar 2014 - 4:07 pm | वेल्लाभट
फार फार वाईट आहे हे....
डॉक्टरकीच्या पदव्या कशाच्या जोरावर मिळतात, या गोष्टीत याचं कारण दडलेलं आहे.
आता जर 'अशा' बाबतीत पेशंटच्या नातेवाईकांनी त्या डॉक्टरांना धुतला, तर त्यांचं तरी काय चुकलं म्हणा. असो.
11 Mar 2014 - 4:46 pm | आशु जोग
म्हैस
हा डॉक्टर कोण होता माहिती मिळवा... त्यापूर्वीच २ आठवडे आम्ही अनुभव घेतला होता... त्यावेळी निष्काळजीपणा जाणवला होता...
12 Mar 2014 - 1:27 am | पक्या
डॉक्टर वर फौजदारी झाली आहे अस एका मित्राच्या ओळखीतल्या डॉक्टरांकडून समजले। त्यांनी त्या डॉक्टर चे नाव ही सांगितले पण ते इथे सांगणे उचित नसेल
12 Mar 2014 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे
संशयीत डॉक्ट्ररबद्दल कायदेशीर कारवाई केली गेली हे उत्तम झाले. आता या केसचा सर्व बाजूने विचार होउन योग्य निकाल लागावा अशी आशा करायला हरकत नाही. हा मार्ग योग्य आहे आणि असे सतत झाले तर दोषी व्यावसाईकांवर आपोआप अंकूश बसायला मदतच होईल.
मात्र जसे हॉस्पीटलची नासाधूस करणार्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या एका उदाहरणाने सर्व समाजाला नावे ठेवणे योग्य नाही तसेच एका चुकार डॉक्टरच्या दुर्वतनाने सर्व वैद्यकीय व्यवसायाला दोषी ठरवणे योग्य नाही.
विषेशतः सरकारने अनेक नॉन-अॅलोपेथिक वैद्यकीय व्यवसायीकांना अॅलोपॅथिचा व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने काही अॅलोपॅथितील अ/अर्ध-शिक्षित व्यावसाईकांना एकाच तराजूत तोलले जाते, हा एक दुर्दैवी विनोद आहे !
12 Mar 2014 - 12:52 pm | सुबोध खरे
साहेब फौजदारी झाली म्हणजे गुन्हा दाखल( FIR) केला एवढेच. पूर्ण तपासांती सत्य बाहेर येईलच. पण त्या अगोदरच आपले लोक डॉक्टरला दोषी ठरवून मोकळे झालेले आहेत.
19 Mar 2014 - 4:37 am | अर्धवटराव
मिपाच्या "काश्मिरी" स्वभावाच्या अगदी विपरीत फार छान चर्चा झाली. खरे साहेब, साती मॅडम नेहमीप्रमाणे संयत-मुद्देसुद-स्ट्रेट. गोपाळराव थोडं रागावल्यासारखे वाटले तरिही त्यांची कळकळ आणि मुद्दे बरोबर आहेत.
माझ्या वडिलांची दोनदा अँजिओप्लॅस्टी, दोन पोटाचे ऑपरेशन्स (बाकि हेल्थ कंडीशन फार चांगली नसताना. डॉक्टरने अगदी आवष्यक म्हणुन ऑपरेशन केलं होतं... आणि "मी हे ऑपरेशन कुठल्या परिस्थीत केलं हे माझं मलाच माहिती" असे डॉक्टरांचे रिलीफ उद्गार होते. ऑपरेशनच्या रिस्क माहिती असल्याच्या फॉर्मवर मीच सहि केली होती), आणि इतर बरच काहि बाहि झालं आहे. सध्यादेखील तिर्थरूप जेवण कमि आणि औषधच जास्त घेतात असं वाटतं. पण डॉक्टरवरचा भरवसा आणि प्रचंड विलपॉवरच्या भरवश्यावर आमचे पिताश्री अजुनही "बाप" आहेत. आमचे चिरंजीव सुद्धा जन्मल्याबरोबर अॅडमीट झाले व आठवड्याभराने आईच्या कुशीत परतले. कार्ट्याच्या हृदयातल्या झडपाच उघडल्या नव्हत्या, शरीराला कळलच नव्हतं कि आपण गर्भाशयातुन बाहेर आलोय. मग ते अशुद्ध रक्त मिक्स होणं काय नि काय काय चाललं. बापासारखाच आळशीपणा आणि काय. सौ च्या बाबतीत पण हेच. तिला चार वेगवेगळ्या गायनेक नी चार वेगवेगळी निदानं सांगितली तिच्या प्रॉब्लेमची. आणि प्रत्येकाचा हाच प्रश्न कि दुसर्या गायनेकला अक्कल नावाची गोष्ट नाहि काय कि त्याने/तिने अमुक एक निदान करावं/ऑपरेशन सजेस्ट करावं.
सांगायचा मुद्दा असा कि या सर्व घडामोडीत आम्हि मेडीकल व्यवसायाचे भले-बुरे दोन्हि रुपं बघितले. मी तरी अजुन म्हणावा तेव्हढा अॅलर्ट झालो नाहिए, पण सौ बराच अभ्यास करते आरोग्याचा-आहाराचा. मग आम्हि दोघं मिळुन ठरवतो कि एका अमुक डॉक्टरकडे ट्रीटमेंट कंटिन्यु करायची कि नाहि. एकदा ठरलं कि इलाज पूर्ण तिथुनच करतो.
20 Mar 2014 - 12:02 am | दिव्यश्री
मायबोलीवरील डॉ.सुरेश शिंदे यांचे सगळे लेख एकदा येथील सदस्यांनी वाचावेत अशी आग्रहाची विनंती आहे .
बाकी विज्ञान कितीही पुढे गेले तरी त्याला आणि ते पुढे नेणार्याला मानवाला काही मर्यादा आहेत . डॉ.चे अनुभव चांगले आले तर देव नाहीतर दानव , राक्षस ई. अशी सरळ सरळ विभागणी दिसते बर्याच वेळा . पेशंट आपल्या चुका सांगत नाहीत , महत्वाची माहिती लपवून ठेवतात खूप वेळा यात नुकसान पेशंटचेच असते आणि पर्यायाने त्यांच्या जवळच्या माणसांचे . हल्ली लोक सगळा दोष डॉ.वर देऊन मोकळे होतात खूप वेळा पण अस करू नये .
मी पण माझी दोन माणसे गमावली आहेत अगदी अद्ययावत हॉस्पिटलमध्ये . शेवटी आपल प्रारब्ध हेच खर आहे . माझ्या काकाच्या वेळेस माझ्या बाबांना खूप लोकांनी सांगितलं डॉ.वर केस करा त्यानेच चुकीच इंजेक्शन दिल , नुकसान भरपाई मागा इथपर्यंत सल्ले दिले होते .त्यावेळी त्यांनी एकंच प्रश्न विचारला सल्ले देणार्यांना कि हे सगळ करून माझा भाऊ मला परत मिळेल काय? डॉ. आयुष्य उधवस्त करून त्यांच्या घरच्यांचे / मुलाबाळांचे शाप मी घेणार नाही आणि केसही करणार नाही .
26 Apr 2014 - 5:30 pm | दिव्यश्री
शोकांतिका ...दवाखाने बनले पैशे छापण्याचे कारखाने . :(
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5160183282999899590&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140426&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=मृत महिलेला आठवडाभर ठेवले व्हेंटिलेटरवर