गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला ! :(
या भागात माझ्या कॉलनीतील,तसेच काही घरगुती गणपती बाप्पांचं दर्शन घेतले.
आपल्याला ही बाप्पाची रुपे आवडतील अशी अपेक्षा करतो. :)
आधीचा भागः--- http://www.misalpav.com/node/22801
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो रिसाईझ केलेले आहेत.
प्रतिक्रिया
29 Sep 2012 - 11:01 pm | पैसा
पण तो आफ्रिकन हत्तीसारखा गणपती तेवढासा आवडला नाही!
30 Sep 2012 - 12:57 am | किसन शिंदे
सगळेच फोटो छान आले आहेत.
30 Sep 2012 - 9:33 am | ५० फक्त
फोटो छान आले आहेत, पण सगळॅच गणपती प्रचंड भडक वाटले, आणि तो काळा गणपति तर थोडासा हिडिस वाटला, असो..ह्या वर्षी पुण्यात देखील ब-याच मुर्ती आउट ऑफ प्रपोर्शन पाहिल्या, का माझ्या डोळ्यात आणि डोक्यात एक पर्पोर्शन पक्कं झालं आहे माहित नाही.
30 Sep 2012 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> फोटो छान आले आहेत,
सहमत. बाणाची फोटोग्राफी पायरी पायरीनं वर वर चालली आहे. :)
>>> काळा गणपति तर थोडासा हिडिस वाटला,
देवाला नाव कसं ठेवावं म्हणुन गप्प बसलो आहे.
अवांतर : बाणा औरंगाबादेत तो अग्निपथमधला देवबप्पा होता. (कलाकार तोच होता)
फोटोसाठी भारी क्यामेरा घेतला पाहिजे असा विचार तेव्हा डोकावला होता.
-दिलीप बिरुटे
30 Sep 2012 - 5:14 pm | मदनबाण
धन्यवाद मंडळी ! :)
पैसा आणि ५० फक्त यांच्याशी मी सहमत आहे,की काळा गणपती दिसायला वेगळा आहे,पण हिडीस वाटावा इतकाही तो दिसायला वाईट नाही असे मला वाटते.
@ ५० फक्तः- फोटो कंप्रेस केल्यावर बर्याच प्रमाण कलर शेड मधे फरक पडतो,पुढच्या वेळी अधिक काळजी घेण्याचा प्रयन करीन.
बाणाची फोटोग्राफी पायरी पायरीनं वर वर चालली आहे. :)
>>> धन्यवाद बिरुटेसर ! :) अजुन मी शिकतोच आहे,अश्या सणासुदींच्या कार्यक्रमांमुळे फोटो काढताना वेगवेगळे प्रयोग करण्याची मात्र खास संधी मिळते,हे मात्र खरे ! :)
1 Oct 2012 - 11:12 am | ५० फक्त
५० फक्तः- फोटो कंप्रेस केल्यावर बर्याच प्रमाण कलर शेड मधे फरक पडतो,पुढच्या वेळी अधिक काळजी घेण्याचा प्रयन करीन. - अहो मी तुमच्या फोटोमधल्या शेडबद्दल बोलतच नाहीये, एकुण गणपती / आरास / मंडप आणि त्यातल्या रंगसंगती बद्दल बोलत आहे, ते फ्लोरोसंट रंग व एलईडी हे तर स्वाईन फ्लुच्या साथीपेक्षा जास्त वेगाने पसरले आहेत. एखाद्या तांत्रिक प्रगतीचा उपयोग दुस-या चांगल्या गोष्टीचा बट्याबोळ करण्यासाठी कसं होतो याचं उत्तम उदाहरण.
1 Oct 2012 - 3:52 pm | सूड
फोटोज छान, पण देवाच्या मूर्तीत नाविन्य शोधायच्या नादात मूळ सौंदर्य आपण हरवत नाही ना याचा मूर्तीकारांनी विचार करायला हवा असं ती गजमूख जसंच्या तसं रंगवलेली मूर्ती बघून वाटलं.
शेवटून तिसर्या फोटोत खरोखरच एका मखरात दोन गणपती आहेत का ती इमेज फोटोशापित आहे.
1 Oct 2012 - 3:57 pm | मदनबाण
शेवटून तिसर्या फोटोत खरोखरच एका मखरात दोन गणपती आहेत का ती इमेज फोटोशापित आहे.
>>> एकाच मखरातले ते दोन गणपती आहेत्,त्यांचेच वेगवेगळे असे दोन फोटो खाली दिले आहेत.
6 Oct 2012 - 1:18 pm | दादा कोंडके
मस्त फोटू रे बाणा!