फारीनचे जोक

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
19 Jun 2012 - 6:57 pm

परदेशी लोकांचे जोक आणि त्यांची विनोदी हाडे (फनी बोन्स) शेयर करूयात... मिपावर हा धागा आधीच अवतरला असेल तर काढून टाकावा ...

माजं कान्ट्रिब्युसन ...

********
जपानी डॉक्टरचे मराठी नाव ... टोचु-का-सुई
चिनी कुत्राचं नाव ... हे-हुंग्-ते-हुंग.
टांझानियन माणसाने गिरगावात स्विमिंग पूल उघडला त्याचे नाव ... या डुंबा डुंबा
त्या स्विमिंग पूलचा रखवालदार रशियन असेल तर त्याचे आडनाव ... उभा-का-बस्की
*******

म्हणतात स्वर्ग तिथे असतो जिथे ....

तुम्हाला अमेरीकन पगार असतो
तुम्हाला चायनिज जेवण मिळतं
तुमचं ब्रिटिश घर असतं
आणि तुमची बायको भारतीय असते.

पण नरक तिथे असतो जिथे ...

तुम्हाला ब्रिटिश जेवण मिळतं
तुमचं चायनिज घर असतं
तुम्हाला भारतीय पगार असतो
आणि बायको अमेरीकन मिळते!!!

*****

जपानचे प्रधानमंत्री मोर्री हे अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी चर्चा करायला शिकागोला जाणार होते. पण जाण्याधी दोन दिवस इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान अवगत करून घ्यावे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना सुचविले. मोर्रींनी ते मान्य केले व त्यासाठी टोकियोतील एका प्रथितयश इंग्रजी शिक्षकाला पाचारण करण्यात आले. पहिल्या दिवशी त्या इंग्रजी शिक्षकाने मोर्रींना इंग्रजीत अभिवादन कसे करावे हे जपानीत शिकवले.

"श्री. मोर्री जेव्हा आपण अध्यक्ष क्लिंटनना भेटाल तेव्हा त्यांना अभिवादन करताना विचारायचे की ’हाऊ आर य़ु?’
त्यावर श्री. क्लिंटन विचारतील, ’आय एम फाईन ऍण्ड यु?’
त्यावर तुम्ही हसत म्हणा , ’मी टू. थॅंक य़ु!!’"

दोन दिवसाची इंग्रजी शिकवणी संपल्यावर शेवटी मोर्रींना शिकागोला जायचा योग येतो. तिथे विमानतळावर अध्यक्ष बिल क्लिंटन सपत्निक हजर असतात. विमानातून उतरून प्रथम मोर्री क्लिंटन्शी हस्तांदोलन करताना विचारतात, "हू आर यु?"

त्यावर गोंधळून क्लिंटन, मोर्रींनी गम्मत केली असल्याचे मानून, हसत म्हणतात, "आय एम हिलरीज हसबण्ड"
मोर्री त्यावर लगेच उत्तर देत्तात , "मी टु!!!!! हा हा हा..."

अन तेव्हा विमानतळावर शांतता पसरलेली असते.

*******

एक अमेरीकन बायको आपल्या नवऱ्याकडे येऊन तक्रार करू लागली, "ह्या मुलांचं काय करू हेच कळत नाही"
नवरा विचारतो, "काय झालं?"
बायको म्हणते, "अहो प्रत्येक दिवशी माझी मुलं तुझ्या मुलांसोबत मिळून आपल्या मुलांना मारत असतात!!!!"

*****

एक सामान्य वर्तमानपत्र एका अमेरीकन बाईला कसा प्रकारे सुखी करू शकते ह्याचा नमुना .....
वर्तमानपत्राच्या अग्रपानावर छापलेली तिच्या दहा वर्षाच्या चुणचुणीत मुलावर चित्रित कॉर्नफ्लेक्सची जाहिरात!
पेपराच्या बिझिनेस विशेषांकात तिची अठरा वर्षाची मुलगी यंग आर्थप्रुनर म्हणून घोषीत!
पेजत्रीवर स्वतःच्या बॉयफ्रेण्डचा टॉपलेस फोटो!
अन हरवलेल्यांच्या यादीत नवऱ्याचे नाव!

******

एक जपानी माणूस अमेरीकेत काम करण्यासाठी येतो, आणि चांगले काम मिळावे यासाठी तो आपले इंग्रजी सुधारावे म्हणून इंग्लिश स्पिकींग कोर्स लावतो. तिथे त्याला कळते की इंग्रजी शब्दांचा डिक्शनरीतला अर्थ हाच त्यांचा शब्दशः अर्थ होय.

एकदा त्याला प्राणी संग्रहालयात काम मिळते. तिकडे इण्टरव्ह्यू घेणारा सिक्युरीटी गार्ड बर्गर खात त्याला चिनी समजून विचारतो, "तुला पाण्डा सांभाळायचा आहे. माहित आहे ना?"
हा पॉकेट डिक्शनरी ऊघडतो आणि त्यात पाण्डा शॊधतो. त्यात लिहिलेले असते,

पाण्डा - एक काळॆ पांढरे अस्वल, जे झाडाची पानं आणि मूळं खाते."

ते वाचून तो म्हणतो, "हो माहित आहे."
तरी इण्टर्व्हू घेणारा थोडा साशंकच असतो. म्हणून तो पुन्हा विचारतो, "बरं सांग बघू, पाण्डा काय करतो ते?"
त्यावर जपानी माणूस त्याच्या हातातला बर्गर हिसकावून खाऊन टाकतो, त्याची बंदूक स्वतःकडे खेचून हवेत चार बार ऊडवतो आणि तिथून निघून जातो!

इकडे सिक्युरीटी गार्ड त्याच्या ह्या वागण्याने घाबरून जाऊन इतर सिक्युरिटी गार्ड्सना बोलावतो, सगळे एकत्र जमून झालेल्या प्रकाराची चौकशी करत असतानाच हा जपानी परत येतो आणि त्याच सिक्युरीटी गार्डच्या समक्ष जाऊन स्मित देत उभा राहतो.

"तुझं डोकं बिकं फिरलंय काय?", गार्ड रागात किंचाळतो आणि जपानी माणसाला दंडाने पकडून बेड्या ठोकतो, "एक तर माझा बर्गर खाल्लास, त्यात माझ्याच बंदुकीने हवेत गोळीबार करून ऊर्मटपणे निघून गेलास अणि आता माझ्या समोर परत येऊन हसतोयस?"
जपानी म्हणाला, "पण, पण, मी तर तुम्हाला पाण्डा काय करतो ते दाखवत होतो!!"
गार्ड पुन्हा किंचाळतो, "खोटं बोलू नकोस!"
जपानी घाबरून म्हणतो, "नाही खरंच, पॉकेट डिक्श्नरीत हेच लिहिलेय!!"
म्हणून गार्ड त्याच्या खिशातली डिक्श्नरी उघडून त्यात पाण्डा शोधतो. त्यात लिहिलेले असते ....

Panda - a black and white bear that eats shoots and leaves

******

एक अमेरिकन नवऱ्याचे आपल्या बायकोशी त्याच्या नशेबाजीवरून बरेच भांडण व्हायचे. एकदा बायकोने फर्मान काढले, "ह्यापुढे जर तू पुन्हा दारू पिऊन आलास तर मी तुझ्याशी घटस्फोट घेऊन तुझं पूर्ण घर मुलांसकट कॉंपन्सेशन मध्ये मागीन!"

घटस्फोट म्हणजे आता ह्या प्रकरणाने सिरीयस वळण घेतलं होतं, त्यामुळे भिऊन त्या नवऱ्याने काही दिवस दारूला स्पर्शही केला नव्हता. पण एकदा मित्रांच्या पार्टीत दारू झालीच. झिंगलेल्या अवस्थेत हा घरी परतला आणि दारावर रागवलेल्या बायकोने त्याचे स्वागत केले. तिचे वटारलेले डॊळे पाहून तिथेच तो शुद्ध हरपला.

सकाळ झाली. नवरा उठला. साहजिकच बाजूला बायको नव्हती. "सोडून गेली वाटते", हॅन्गओव्हर आणि त्याहूनही घटस्फोटाच्या विचारांनी नवऱ्याचे डोके भणाणून सोडले होते. तो बिचकत बिचकत बाथरूम मध्ये आला. बाथरूम घासून पुसून स्वच्छ केलेले होते. ऑर्किडच्या फुलांचा ताजा गुच्छ पूर्ण न्हाणीघरात सुगंध दरवळत होता. नवऱ्याची न्हाणीचप्पल, टॉवेल, कपडे सगळे कधी नव्हे ते इस्त्रीकरून ठेवलेले होते. नवरा कोड्यात पडला.

बाथरूम मधून आंघॊळ करून किचन मध्ये बेकफास्ट करायचा म्हणून जाऊन बघतो तर, ऍपल पाय, फ्रेन्च वाईन आणि उकडलेले अंड असा ह्याचा आवडता बेत होता. हा फक्त बायको नव्हती पण.

नवऱ्याने कोड्यात ब्रेकफास्ट खायला बसला तोच त्याची नजर मुलांच्या खोलीत गेली. ती तिथंच होती. "हिनं मुलांना इथेच ठेवलंय". अचानक त्याला काहीच कळेनासं झालं. तोच त्याला टेबलावर कागद दिसला.... त्याच्या बायकोच्या अक्षरातला.

"माझ्या स्विटीस, आज रात्री बीचसाईड डिनर आहे. होटेलात जायचंय. मी मुलांना माझ्या आईकडे ठेवीन. संध्याकाळी भेटूया."

ह्याला सातवं आकाश ठेगणं वाटू लागलं. पण हे सगळे काय चाल्लेय ह्याचा अजून अंदाज लागत नव्ह्ता. तोच त्याने त्याच्या मोठ्या मुलाला , ८ वर्षाच्या जॉनला बोलावलं.

"जॉन आई कुठे गेलीय?"

जॉन म्हणाला, "आई शॉपिंग करायला गेलीय. आजच्या रात्रीच्या डीनर साठी."

"शॉपिंग!!!", हे नविनच होतं. नवऱ्याला महित होतं कि हिचा मूड जेव्हा खूप चांगला असतो तेव्हाच ही शॉपिंग करते.

"तुला अन काल रात्री काय झालं माहित आहे?"

"मला नाही काही माहित. फक्त एवढंच की काल तुम्हाला बेडरूम मध्ये नेल्यावर मम्मी तुमचे कपडे काढत असताना तुम्ही ओरडत होतात... सोड सोड मला चांडाळे. माझ्या कपड्यांना हात लावू नकोस..............
...........
...........

मी विवाहित आहे!!!!"

*****************************

कॉपीराईट करू नये ... नेहेमी राईट कॉपी करावी....

संस्कृतीदेशांतरभाषाविनोदजीवनमानमौजमजाप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2012 - 7:45 pm | श्रीरंग_जोशी

जपानी शाळेचे नाव - याशिका
रशियन शिक्षकाचे नाव - उठकीबसकी

कपिलमुनी's picture

19 Jun 2012 - 8:15 pm | कपिलमुनी

फुंकून पी

jaypal's picture

19 Jun 2012 - 8:32 pm | jaypal

जपानी धाग्यांचा जोर पाहता जपानी **साहेबांच नाव
"ह्याचीमारुकात्याचीमारु"

त्यांचच रशियन नाव
"वस्कनवरडलासकी"

जपानी: आमच्या कडे डॉलफिन फुटबॉल खेळतात.
अमेरिकन : हे तर काहीच नाही आम्च्या कडे हत्ती लाँगजंप मारतात.
भारतिय : हे सगळ एकदम बकवास आणि फालतु आहे. आमच्या कडे तर गाढवं सरकार चालवतात.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2012 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा

बाबौ! :-D खतरनाक हसलोय.

गणपा's picture

19 Jun 2012 - 9:38 pm | गणपा

=))

मुक्त विहारि's picture

19 Jun 2012 - 9:41 pm | मुक्त विहारि

जपानी शाळेत कुठली गोष्ट शिकवतात--- हिताची.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2012 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

जेष्ठ स्त्रीसाठी असणारे जपानी संबोधन

- अकाई (अक्का + आई)

अर्धवटराव's picture

19 Jun 2012 - 10:33 pm | अर्धवटराव

माझ्या पत्नीने त्या इंग्लीश बाईची खणाने ओटी भरली... तर त्या बाईने त्यातुन एक झगा शिवला आणि एक मॅचींग रुमालही काढला =)))))

अर्धवटराव

स्पंदना's picture

20 Jun 2012 - 6:38 am | स्पंदना

ह. ह. पु. वा.
बाकि तुझी पोर माझी पोर अन आपली पोर ....एकदम खर. माझ्या गल्लीत तिन कपल आहेत अशी. तिची दोन आहेत माझी दोन आहेत, आम्हाला एक आहे, अस सांगतात.
मुलांसाठी फॉर्म भरताना, तुझा नवरा तुझ्या मुलांचा कोण? असा प्रश्न असतो.

५० फक्त's picture

20 Jun 2012 - 7:35 am | ५० फक्त

जुने जोक पुन्हा एकदा वर आणल्याबद्दल धन्यवाद, यापेक्षा कट्ट्याला आलात तर एवढे जोक ऐकायला मिळतील ते सुद्धा ताजे आणि अस्सल भारतीय आणि मराठी, फक्त इथं टायपता येणार नाहीत.

विनीत संखे's picture

20 Jun 2012 - 11:08 am | विनीत संखे

पन्नासराव माफी असावी... मला जुने जोक कुठे होते हे ठाऊक नव्हतं... शिवाय हा "कट्टा" कुठे सापडेल?

ऋषिकेश's picture

20 Jun 2012 - 4:11 pm | ऋषिकेश

लय भारी!
अजून येऊंदे!