सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
26 May 2012 - 4:37 pm

विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या तीन्ही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734

http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.

http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.

शेवटचे दोन डाव उरलेत! आज ११ वा आणि परवा १२ वा. दोघांची गुणसंख्या समसमान आहे.
कोंडी कोण फोडू शकेल?
फोडू शकेल का? की गेम टायब्रेकरमधे जाईल? अशा प्रश्नांचं मोहोळ उठलंय.

आज बोरिस पांढरा आहे. बघूयात सामना ११ वा.

-चतुरंग

क्रीडाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

उशीर झाला. क्षमस्व!

आज बोरिसने पुन्हा डी४ पासून सुरुवात केली. आनंद बहुदा स्लाव डिफेन्सला वैतागला असावा. त्याने डाव निम्झो इंडियनकडे नेलाय. आनंद वेगाने खेळतोय. केवळ १ मिनिटात आनंदने ८ खेळी केल्या आहेत!
सातव्या खेळीला उंट डी ७ अशी वेगळीच खेळी त्याने केली आहे. बोरिस विचारात पडलाय. त्याच्या घड्याळात १० मिनिटे होऊन गेली आहेत.

बोरिस आपली खेळी करून फेर्‍या मारायला निघून जातो. या उलट आनंद आपली खेळी झाल्यावरही प्रतिस्पर्ध्याच्या समोर शांतपणे बसून राहतो बहुतेक वेळा. एक प्रकारे आपल्या अस्तित्त्वाचा दबाव टाकतो समोरच्यावर. :)

नवव्या खेळीला बोरिसने पंधरा मिनिटाहुन अधिक काळ घेतला आहे. आनंदची उंटाची खेळी त्याला चांगलीच बुचकळ्यात टाकणारी होती अशी दिसते.

रमताराम's picture

26 May 2012 - 4:57 pm | रमताराम

पंचवीस मिनिटे!!!! काय होतंय. वेळेचा जवळजवळ चौथा हिस्सा एकाचा खेळीला. काय होतंय.

रमताराम's picture

26 May 2012 - 5:02 pm | रमताराम

चेस्डम वर ग्रँ.मा. Arkadij Naiditsch म्हणतोय :
I guess Anand and particularly his team took a deep breath after losing the opening duel in so many games in a row. Finally they managed to surprise the very well prepared Boris Gelfand.

चतुरंग's picture

26 May 2012 - 5:21 pm | चतुरंग

बरोबर आहे. पण ह्या सरप्राईजचा काहीतरी वापर करुन घे म्हणावं. आज "ब्लॅक्मॅजिक" बघायला मिळेल का?

रमताराम's picture

26 May 2012 - 5:33 pm | रमताराम

वापरलेल्या वेळेत तब्बल ४० मिनिटांचा फरक आहे! याचा फायदा उठवायला हवा विशीने. या आधी मला आनंदचा वजीर सी-७ मधे येऊन एफ पट्टीतील घोड्याच्या सहाय्याने बोरिसच्या राजाच्या कोपर्‍यात घुसण्याची धमकी देऊन (आधी सी पट्टीतील उंटाने कदाचित बोरिसचा एफ पट्टीतील घोडा घेऊन) बोरिसला स्वतःची लाईन खेळण्याची संधी न देता प्रतिक्रियात्मक खेळायला लावेल असे वाटले होते. पण वजीर ए पट्टीत नेऊन बोरिसची मोहरी त्याबाजूला - राजापासून दूर - खेचण्याचा प्रयत्न चालू आहे असे दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वजीर ऐ५ खेळावं किंवा एफ वरील घोडा जी४ खेळावा
म्हणजे आनंद मध्यपटावर आला आहे, असे समाधान मला मिळेल.

पण आपल्या समाधानासाठी खेळतं कोण ? :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता वजीर सी३ ला घेऊन घोडा जी४ वर येऊ दे.
पुढंचं पुढं बघू.

रमताराम's picture

26 May 2012 - 5:35 pm | रमताराम

तुम्ही सूक्ष्मरूपात जाऊन त्याच्या कानात सांगताय काय? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगाशेठ आणि तुम्ही मला सांगा अजून दोन ते तीन खेळ्यात आनंद काही जब्रा चाली चालला तर
डावावर त्याची पकड बसेल नै तर चला मागे आणि करा बचाव अशी स्थिती येईल.

काय म्हणता ?

चतुरंग's picture

26 May 2012 - 5:31 pm | चतुरंग

आनंद वजीर ए५ असा खेळला! बघा. केलंन की नाही समाधान. आमचा आनंद तसा गुणाचा हो!:)

तुमच्यापैकी कोणी बुद्धीबळ खेळ कसा खेळायचा हे सांगेल का?

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2012 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

छे! नाव सोडा हो! रंगोपंतांना सांगून थकलोय! आणि ते दुसरे हुशार सद्गृहस्थ... जौद्या! चांगली मॅच चालली आहे... तीच बघू आपण! ;)

रमताराम's picture

26 May 2012 - 6:13 pm | रमताराम

मला सद्गृहस्थ म्हटल्याबद्दल बिपिनचा वाड्यावर सत्कार करण्यात येईल (भीम्याला बोलवून ठेवा रे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 5:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीबळ समजून घेण्यासाठी टेंपरवारी हा दुवा देतो. दुव्यावर प्यांदी, घोडे,उंट, वजीर, आणि राजा कुठे चालतात त्याची माहिती आहे.
म्याच संपल्यावर रंगाशेठ आणि रमतारम आपणास बुद्धीबळ समजून सांगतीलच ?

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

26 May 2012 - 6:03 pm | चतुरंग

chessgames.com ह्या संकेतस्थळावर जाऊन बघा. बरीच माहिती आहे.
सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या आसपास कोणी खेळणारे असेल तर त्याच्याबरोबर खेळायला लागणे.
अगदी कोणी लहान मुले खेळत असली तर त्यांना भलताच उत्साह असतो ते लगेच खेळायला तयार होतात.
चटकन शिकवतातही! ;)

रमताराम's picture

26 May 2012 - 5:52 pm | रमताराम

थोडी मारामारीची शक्यता दिसते. मी वर म्हटलेली शक्यता तुम्हा आली आहे. फक्त वजीर सी पट्टी ऐवजी एच पट्टीतून एच पट्टीतल्ल्या प्याद्यावर हल्ला करायला टपून बसलाय. बोरिसला घोड्याला वाचवून आनंदचा डाव उधळायला काहीतरी करावे लागणार.

चतुरंग's picture

26 May 2012 - 6:01 pm | चतुरंग

वजीर पांढर्‍या राजाच्या बाजूला आणलाय, आता घोडा जी४, आणि वजीर एच२ चे प्यादे घेऊन राजाला शह अशी धमकी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढे एच १ ला जाऊ शकतो का वजीर अर्थात अडथळा आला नाही तर ?
सीएफ३ ?

चतुरंग's picture

26 May 2012 - 6:08 pm | चतुरंग

पण बोरिस कसा जाऊ देईल? ;)

चतुरंग's picture

26 May 2012 - 6:07 pm | चतुरंग

खोलवरचा प्लॅन असा की जर घोडा ई५ आला तर सरळ व्जिराव्जिरी करुन मोकळे व्हायचे म्हणजे पांढर्‍याचा कणाच मोडतो. डाव बरोबरीकडे गेला तरी चालेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>घोडा ई५ आला तर सरळ व्जिराव्जिरी करुन मोकळे व्हायचे

अगदी गुरुच आहात. झाली वज्रावज्री.
आता बघा कंटाळवाणी बरोबरी ?

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

26 May 2012 - 6:09 pm | रमताराम

एक हत्तीची पोजिशनल मूव केली, सध्याच्या स्थितीवर थेट परिणाम न करणारी. बहुधा आनंदच्या दृष्टीने सध्यची स्थिती इक्वलिब्रियमची असावी. त्यामुळे ती फोडायची जबाबदारी बोरिसवरच टाकली त्याने.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेसबाँबवर चॅट करणारी काही पब्लिक भलतं मजेदार आहे.
परवाच्या म्याचच्या वेळी एकजण म्हणाला (स्वैर अनूवाद माझा)
अल्लाह आज आनंदला हरु दे. तर दुसरा लगेच म्हणाला की,
येशू आणि हिंदू देवतांच्या मधे अल्लाह आज न्यूट्रल आहे. हाहाहा.

[प्रतिसाद आक्षेपार्ह तर नैना]

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

26 May 2012 - 6:13 pm | चतुरंग

लोक सुटलेले असतात जाम! :)

परवा आलेले हे कार्टून बघा

२० मिनिटात १७ खेळ्या!
उलट बोरिसने तब्बल १ तास २० मिनिटे घेतली आहेत. जाम टाईम प्रेशरमधे येणार आज तो आणि चटकन चाली कराव्या लागून डाव बरोबरीत जाईल! :(
किंवा चूक केली तर मग आनंद सोडणार नाही त्याला!!

रमताराम's picture

26 May 2012 - 6:15 pm | रमताराम

बरोबरी करण्याच्या दृष्टिने हालचाली सुरू केल्या. वजीरावजीरी करण्याचा प्रयत्न आहे आता.

विसुनाना's picture

26 May 2012 - 6:15 pm | विसुनाना

गेलफंडचे आव्हान - मारून दाखव घोड्याला.
आता वजीरा-वजिरी? झालीच!

विसुनाना's picture

26 May 2012 - 6:17 pm | विसुनाना

Re8? पण कापाकापी चालली आहे.

विसुनाना's picture

26 May 2012 - 6:26 pm | विसुनाना

शेवटाची सुरुवात nf6e4?

रमताराम's picture

26 May 2012 - 6:34 pm | रमताराम

हत्ती डी-३ मधे येऊन पळवून लावेल त्याला. हाती काही पडणार नाही. वर बोरिसचा एक हत्ती आडवा बाहेर पडायला मदत होईल, तो अ‍ॅक्टिव होईल. शिवाय आपलाच मागचा उंट ब्लॉक करेल तो. :(

मागे प्याद्याने उंटावर हल्ला करण्याची शक्यता खुली होईल हा एक दुय्यम फायदा आहे. पण त्याच्या पुढे कसा उपयोग करून घेता येईल ते आताच समजत नाही मला. :(

रमताराम's picture

26 May 2012 - 6:41 pm | रमताराम

तुम्ही पण सूक्ष्मात? :) आनंदने ऐकले तुमचे. आता बोरिस आमचे ऐकतोय का ते पाहू.

रमताराम's picture

26 May 2012 - 6:42 pm | रमताराम

बोरिसने ऐकले की आमचे. :)
छ्या: आता अजिबात सूक्ष्मात जाणार नाही, आपोजिशनला कशाला फायदा करून देऊ.

रमताराम's picture

26 May 2012 - 6:19 pm | रमताराम

बोरिसचे दोन्ही हत्ती नि एक उंट मागे अडकल्याने आनंदचा उंट नि घोडा नाचणार मध्यावर. बघू हत्तीवर हल्ला करून फायदा उठवतो का ते.

रामदास's picture

26 May 2012 - 6:22 pm | रामदास

येथे भाव विचारा.

रमताराम's picture

26 May 2012 - 6:23 pm | रमताराम

बा***. त्या झैरातींच्या. आता दोन्ही खेळाडूंना लाईव पहायला मिळाले असते तर बरे झाले असते. सालं १५-१५ मिनिटे झैराती. मुडदा बशिवला त्या आर्ट ग्यालरीचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2012 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मुडदा बशिवला त्या आर्ट ग्यालरीचा.

हाहाहाहाहा. सालं ऐन म्याच रंगात यायला लागल्यावर
आपल्याला उगा आर्ट ग्ल्यालरीत बसवून ठेवतात. :)

बाकी, डावाची बरोबरीच होईन असं वाटतंय.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

26 May 2012 - 6:59 pm | रमताराम

खेळी २३: प्यादे सी-५, उंट जी-३ यातून बोरिसच्या डी पट्टीतील हत्तीला धोका निर्माण करून हटवण्याचा प्रयत्न होतो, नि तो हटला की बोरिसचे डी प्यादे मटकावता येते. बोरिसचा पांढरा उंट हत्तीच्या मागे अडकल्याने आनंदच्या उंटावर हल्ला करू शकत नाही.

चतुरंग's picture

26 May 2012 - 7:09 pm | चतुरंग

१७ खेळ्यांना फक्त २५ मिनिटे आहेत! :(
टाईमप्रेशर काय करते ते बघूयात.
आता हत्तीने डी३ प्यादे मारले तर बी७ वरचे प्यादे पडते आणि बोरिसचा हत्ती सातव्या पट्टीत येतो.

रमताराम's picture

26 May 2012 - 7:14 pm | रमताराम

ड्रॉ. आनंदने का मान्य केले देव जाणे. हॅ.

विसुनाना's picture

26 May 2012 - 7:18 pm | विसुनाना

+१ (आनंदनेच ड्रॉ ऑफर केला? :()

चतुरंग's picture

26 May 2012 - 7:15 pm | चतुरंग

ड्रॉ!!!??/
हॅट साला...कसला बाद गेम झाला राव..

विसुनाना's picture

26 May 2012 - 7:23 pm | विसुनाना

पुढचा डाव आनंद पांढर्‍याने खेळतोय तेंव्हा पाहू...