"डॉक्टर चा अनुभव ..सूड का जातीयवाद? "भाग 1
सदर अनुभव हा सत्य असून ह्या अनुभवाशी संबंधित घटना मा. न्यायालय व इतर व्यक्तींशी संबधित असल्यामुळे स्थळ, काळ व नावे बदललेली आहेत. तसेच अनुभवामध्ये थोडी रंजकता आणण्याच्या दृष्टीने थोडे बदल केले आहेत.
....................................................................................................................
मी जाते अस म्हणून मनीषा वेगात बाहेर पडली. पण कॉलेज कडे जाताना तिच्या डोक्यामध्ये निलेश बद्द्लचेच विचार होते
वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना पण ती विचारात हरवून गेली होती.... मैत्रिणी ने हाक मारल्यावर तिची तंद्री तुटली. आज कोणीतरी तिला प्रपोज केले होते त्यामुळे ती मध्येच मोहरून जात होती, मध्येच चिंतेमध्ये पडत होती तसा तिलाही निलेश आवडत होता...पण एकाच गावामध्ये असल्याकारणाने तिला पण जरा अवघडल्यासारखे होत होते. विचार करतच ती घरी पोहोचली रात्रभर तिला डोळ्याला डोळा लागला नव्हता. सकाळी उठल्यावर डोके दुखत आहे असा कारण सांगून ती पुन्हा अंथरुणामध्ये शिरली व विचार करत पडून राहिली. संध्याकाळपर्यंत तिने काही निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बस stop वर आली, तेव्हा निलेश तिथेच उभा होता....त्याच्या कडे बघून ती ओठ मुडपून हसली व लाजली . ते पाहून निलेशला तर आकाशच ठेंगणे झाले
बस कोल्हापूर ला थांबल्यावर मनीषा पुढे निघून गेली व थोडे अंतर जाउन थांबली . निलेश तिच्या मागे होताच तो जवळ येताच ती म्हटली ...मला तुझे प्रेंम मान्य आहे पण आपल्या घरातले मान्य नाहीत करणार.
निलेश म्हटला काही हरकत नाही. मी वेळ आल्यास तुझ्या वडिलांशी बोलतो.....मी तुझ्या बरोबर आहे...तुझे जे दु:ख ते माझे आहे....मनीषा एकदम लाजली. व निलेश च्या बाहुपाशामध्ये शिरली.
दररोज हाच दिनक्रम सुरु झाला . मनीषा आणि निलेश कोल्हापूरमध्ये येउन भेटू लागले व गावाकडे परत जाताना अनोळखी म्हणून जाउ लागले...
पण हि गोष्ट निलेशच्या वडिलांच्या नजरेमधून सुटली नाही त्यांनी निलेशला बोलाऊन विचारले कि माझ्या कानावर तुझा आणि पाटलांच्या मनीषा बद्दल आले आहे ते खरे आहे का ? निलेश नाही म्हणण शक्यच नव्हत. त्याला माहित होत आपले वडील व त्यांचे हात कुठ पर्यत पोहोचले आहेत. तो म्हटला हो, माझं तिच्यावर आणि तीच माझ्यावर प्रेम आहे....
अरे प्रेम? तुला साध धुxxx अक्कल आहे का? म्हणे प्रेंम करतो? आप्पा म्हणाले
पण आप्पा , निलेश वडिलांना म्हणाला ... मी तिच्याशिवाय जगू शकत नाही...तुम्ही काहीपण करा पण माझे तिच्याशी लग्न लावून द्या..
.अरे मूर्ख आहेस का...आपली जात वेगळी आणि ते पाटील... हे होणे शक्य नाही.... आप्पा उत्तरले.
परंतु त्याच बरोबर विचारात पण गढले कि हे जर झालं तर काही जुने हिशोब चुकते करण्याची संधी पण होती. वासुदेव काळे जरी सावकारी करत होते तरी गावामध्ये लोक काम असले तर त्यांना राम राम घालीत, पण मागे कोणी चांगले बोलत नसे... कारण सावकारी म्हटल्यावर जो कोणी पैसे परत नाही करत त्याचे गहाण जमीन जुंमला, दाग-दागिने वासुदेव ने हडप केले होते. पण पैश्यांच्या जोरावर सगळे काही मिळवता येते हा त्याचा भ्रम गावामध्ये पाटीलांना मिळणारा मान बघून दूर होत होता व पाटीलांच्याबद्दल अप्रत्यक्षरित्या असूया निर्माण होत होती. हा सर्व विचार करून शेवटी वासुदेव काळे म्हटले बर बाबा कर तुझ्या मनासारखे पण काळजीपूर्वक. घरून पाठीबां मिळाल्यावर तर निलेश आनंदाने उड्याच मारू लागला.
दिवसां मागे दिवस जात होते. मनीषा आणि निलेश प्रेमाच्या आभाळामध्ये उंच उंच उडत होते. पणं काही गोष्टी कधी लपत नसतात. निलेश मनीषा चे प्रकरण लवकरच पाटलाना कळले. त्यांनी मनीषाच्या आई ला बोलावून मनीषाला समजवायला सांगितले व तसेच ते तडक वासुदेव काळे कडे गेले.... वासुदेव काळेना पाटील का आले ह्याचा अंदाज आला होताच पण वर वर हसून ते म्हणाले ...या या पाटील, आज गरीबाकड कसा काय पायधूळ झाडली? या बसा अस वर जोत्यावर आरामशीर गादीवर बसा ..अहो बाहेर गुळ खडा लावून द्या पाण्याबरोबर ....काळेंनी सांगितले.
पाटील उत्तरले हो आज तुमच्या पोराने यायची वेळ आणली.
का? काय झाला ? वासुदेव काळे उत्तरले.
अहो तुमचा पोरगा माझ्या पोरीच्या मागे आहे. त्याला समजावा जरा पाटील शांतपणे म्हणाले.
म्हणजे?
अहो माझ्याकानावर काही गोष्टी आल्या आहेत, तुम्हाला माहित नाही म्हणता तर ऐका....अस म्हणून पाटीलांनी सर्व गोष्ट सांगितली आणि वर म्हणाले कि हे शक्य नाही, आम्ही ९६ कुली मराठे आहोत...आमच्यात आस काही घडले तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या. आणि आम्ही पण हे जमू देणार नाही. लेकाला समजावा जरा. म्हणाव मनीषा पासून लांब राहा. पाटील निघता निघता म्हणाले.
बर बर सांगतो तुमचा सांगावा त्याला. वासुदेव काळे छद्मी हसत म्हणाले.
दुसऱ्याच दिवशी मनिषाला निलेश ने गाठले व म्हणाला कि आपले प्रेंम हे लोक समजणार नाहीत. आपण पळून जावून लग्न करू. माझ्या वडिलांनी सर्व सोय केली आहे तिकडे साखरप्याला (कोकणामध्ये).... लग्न करून परत आलो कि काही नाही होणार.
मनीषाने पण जास्त विचार न करता हो म्हटले व दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता निघायचे ठरवले.त्याप्रमाणे मनीषा सर्व सामान आवरून झोपेचे नाटक करून पडली होती.. ४.३० चा mobile वर गजर किणकिणताच ती उठली व आवरून बाहेर पडली. बाहेर निलेश मारुती ८०० घेउन उभा होताच. मनीषा त्यात बसली व ते दोघेही सुसाटपणे गावाबाहेर गेले . हि गोष्ट पाटलांच्या वाड्यावर असणाऱ्या सकाळी दुधाची धार काढायला उठलेल्या गड्याने बघितली व पळत जावून पाटलांना सांगितले. पाटलांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, त्यांनी आपले सर्व पुतणे, गडी माणसे ह्यांना त्या दोघांचा पाठलाग करून पकडून आणायला सांगितले
.
पोरांनीहि मारुती van काढून त्यात तलवारी, लाकडी दांडके, गुप्ती भरले व निलेश - मनीषाच्या पाठलागावर निघाले. हे बघून वासुदेव काळे ने शक्कल लढवली व फोन फिरवला
हेलो... जयहिंद मलकापूर पोलीस स्टेशन. मी हेड कॉन्स्टेबल भेडसगावकर बोलतो
हेलो....मला एक बातमी द्यायची आहे ...पलीकडून आवाज आला.
काय?
साधारण ७ ते ८ जन गाडीमध्ये हत्यारे घेउन आंबा घाटाकडे जात आहेत. आणि दरवडेखोर आहेत... मारुती van असून पांढऱ्या रंगाची असून नंबर आहे एमच - ०९ - एबी - xxxx आहे त्यांना पकडा.
हेलो...हेलो...हेलो.....तुम्ही कोण बोलताय?हेड कॉन्स्टेबल भेडसगावकर म्हणाले
खट्ट...फोने ठेवल्याचा आवाज आला.
हेड कॉन्स्टेबल भेडसगावकर ने वायरलेस वरून Duty इस्पेक्टरना कळवले व बंदोबस्तावरील पोलीस घेउन रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवू लागला. साधारण तासाभरातच वर्णन केलेली गाडी आली.... पोलिसांनी हात करताच गाडी थांबली.... पोलीस गाडीमध्ये शोध घेउ लागले आणि त्यांना सीट खाली ठेवलेली हत्यारे सापडली. आता पोरांची पण पंचाईत झाली कि काय सांगावं कि मुलगी पळून गेली आहे आणि तिला शोधायला चाललो आहे ? तर मग गाडी मध्ये हत्यारे का? यथावकाश सगळ्यांची रवानगी प्रथम पोलीस स्टेशन व नंतर न्यायालय व त्या नंतर कळंबा जेल अशी झाली.
इकडे पाटलाना सर्व परिस्थिती कळली व काळेंचा सहभाग पण कळला..पण करतात काय? पोरगीनेच केसाने गळा कापला होता ...दुसऱ्याला बोलून काय करणार? पण पाटील आतून धुमसत होते. त्यांनी वासुदेव काळेला गाठले व सांगितले आजच्या आज मला माझी पोरगी परत पाहिजे नाहीतर तुझा पोरगा संपला . काळेंना थोडा अंदाज आला होताच ..त्यांनी लगोलग साखरप्याला फोन करून दोघांना माघारी धाडायला सांगितले. संध्याकाळपर्यंत मनीषा परत आली. तिला पाटलांनी तिला तिच्या आईच्या ताब्यात दिली व काळे ना म्हणाले ...वासुदेव आज पर्यंत मी तुम्हाला काही बोललो नाही..पण आज तु पोरांना जेल मध्ये धाडून चूक केली आहे..... आत भेटू निवांतच
यथावकाश पोर जामिनावर सुटून आली ..पाटलांनी मनीषा चा लग्न जवळच्याच गावामध्ये लाउन दिल. ह्या सगळ्या घडामोडी मध्ये ४-५ महिने सहज गेले
रविवारचा दिवस होता ... रविवारी आमची ओ. पी. डी. नसते, त्यामुळे admission पण फारश्या नव्हत्या . संध्याकाळ झाली होती व संध्याकाळचा राउंड टाकून पेशंट व्यवस्थित आहेत हे बघून मी चेम्बर मध्ये येउन बसलो होतो.. तो पर्यंत बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. मागोमाग खाड खाड बुटांचा आवाज माझ्या केबिन कडे येउ लागला.
जयहिंद सर..... कॉन्स्टेबल सुरवसे खाडकन कडक Salute ठोकून उभा राहिला.
कॉन्स्टेबल अमर सुरवसे नवीन भरती झालेला व मोठा उमदा तरुण पोलीस कर्मचारी. PSI साठी खात्याअंतर्गत परीक्षेसाठी तयारी करत होता.
मी Salute स्वीकारून म्हटलं काय सुरवसे काय म्हणताय ? आज इंकडे ? सर्व साधारणपणे आमचा आणि पोलिसांचा संबंध सहसा आरोपीची वैद्यकीय तपासणी अथवा PM (पोस्ट मार्टेम) साठीच असतो
. अंदाज बांधून मी विचारले काय आज विशेष?
सुरवसे उत्तरला सर PM आहे. मी आठ्या घालताच विचारले आता आणि कोण? (कारण हे PM आमच्या डोकेदुखीच एक मोठ कारण असतं. कारण जर खून अथवा अपघात असेल तर ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये हे झाला त्या पोलीस स्टेशन ला PM रिपोर्ट द्यावा लागतो, तसेच साक्षीसाठी कोर्टाच्या फेऱ्या पण माराव्या लागत्तात असो.)
सुरवसे उत्तरला आहो सर आत्ताच थोड्यावेळापूर्वी जवळच्या xxxx मध्ये खून झाला.
काय सागता? कधी ?
सर साधारण 3 च्या सुमारास.मी वेळ पहिली ६ वाजत आले होते...म्हणजे खून होऊन ३ तास झाले होते.
मी म्हटले बर मग body कुठे आहे ?
सर आणली आहे, गाडीमध्ये आहे. मी म्हटले बर चला PM रूम कडे घेउन चला body . अस म्हणून मी शिपायाला बाळूला पाठवायला सांगितले.
बाळू आमचा PM करतानाचा उजवा हात होता. त्याला फक्त २०-३० रुपये दिले मस्त तंद्री लावून कसलीही body असुदे दे तो व्यवस्थित काम करायचा :)
बाळू आला ...मी पण PM रूम कडे निघालो तर बाहेर बरीच लोक जमले होते. आता गेल्यावर तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण डोळ्यासमोर जे काही शरीर नावाची वस्तू पडलेली होती त्याच्या वर १ नाही २ नाही तर तब्बल १७ घाव होते.
मी सरवसे कडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. तो म्हणाला सर हा वासुदेव काळे. दुपारी कोल्हापूर मधून आला आणि एष्टी मधून उतरला. काही कळायच्या आत ४-५ जन कोयते, तलवार घेउन आले. सपासप घाव घातले आणि पूर्ण मेल्याची खात्री करूनच परत गेले.
मी म्हटलं कोण होते ते लोक?
सुरवसे म्हटलं काही कळलं नाही कारण हल्ला होताच दुकाने पटापट बंद झाली व सर्व लोक निघून गेले. त्यामुळे साक्षीदार कोणी नाहीत.
मी बारकाईने प्रेताची पाहणी केली तर डाव्या बाजूच्या डोक्यापासून ते माने पर्यंत घावच घाव होते. हाताने वार अडविण्याचा प्रयत्न झालेला दिसत होता कारण डाव्या हातावर पण घाव होते. पोटावर पण जखम दिसत होती . कोणीतरी दातेरी चाकू घेउन भोसकाल्याचे दिसत होते कारण आतड्याचा काही भाग पण बाहेर आलेला दिसत होता.
मी खुनाचे कारण ' काहीतरी धारदार वस्तूने मज्जातंतू तुटल्याने मृत्यू' असे देउन PM रिपोर्ट पाठवून दिला.
पोलिसांचा संशय पाटलावरच गेला.कारण मनिषाचे प्रकरण सगळ्या गावाला माहित होते खून करणारी मुलेही पकडली गेली.... त्यांनी हत्यारे माळ्यावर लपून ठेवली होती ते काढून दिली.
नेहमी प्रमाणे कोर्टाचे मेडिकल ऑफिसर म्हणून साक्षी साठी समन्स आले . साक्ष देउन आलो . पण जवळ जवळ २० -२५ जणांसमोर झालेला खुनासाठी फक्त २ साक्षीदार होते. त्यातला एक साक्षीदार गावामधीलच असल्यामुळे फितूर झाला.व एका साक्षीदारामुळे १ जणाला जन्मठेप झाली. बाकीचे निर्दोष सुटले. गावामध्ये पण वासुदेव काळे मेला म्हणून खासगीत का होईना आनंद व्यक्त झाला.
या सगळ्या आरोपींच्या मध्ये १ आसाही संशयित आरोपी होता जो खुनाच्या आदल्या दिवशी इस्पितळामध्ये पोटदुखी साठी दाखल होता व नर्सेस च्या जबाब वरून खुनाच्या वेळेमध्ये नर्स शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना वार्ड आमध्ये दाखल करून घेत होत्या. संशयित आरोपी सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेमध्ये तपासणी व औषधासाठी उपलब्ध होता तसेच दुपारी पण जेवण्याच्या वेळेमध्ये बेड वर होता याचा अर्थ तो इस्पितळामध्ये होता. पण चहा पिण्यासाठी जर तो बाहेर गेला असेल तर आम्ही काही सांगू शकत नाही कारण वार्ड मध्ये खूप गर्दी आसते व सिरीयस पेशंट सोडून आम्हाला फारसे इतर कोणाकडे बघण्यास वेळ नसतो.. त्यामुळे संशयाचा फायदा मिळून अगदी चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे आरोपी सुटला होतां
काही प्रश्न :
हे टाळता आले असते? जर जात एक असती तर हे लग्न झाले असते?
वासुदेव काळेंचा जुने हिशोब चुकते करण्याचा डाव अंगाशी आला?
का मनीषा जरा पळून गेली नसती तर हे सर्व टळले असते?
खरच उत्तरे नाहीत कि हा सूड होतां का जातीयवाद ?
वरील भागामध्ये रंजकता आणण्याच्या दृष्टीने बदल केले असून जर चुकून कोणाच्या घटनेशी जुळत असेल तर निव्वळ योगायोग समजावा. अनुभव सत्य असून नावे, पात्रे, स्थळ व घटना बदललेल्या आहेत याची नोंद घ्यावी. कोणाच्याही भावना दुखावल्या आसतील तर क्षमस्व.
समाप्त
प्रतिक्रिया
13 May 2012 - 4:14 pm | मुक्त विहारि
व्य. नि. केला आहे.
13 May 2012 - 4:44 pm | पैसा
अजूनही जातीपातीवरून आपल्याकडे असले प्रकार होतात. नशीब उत्तर भारतातल्यासारखं ऑनर किलिंग वगैरे नाहीये...
13 May 2012 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर
आम्ही ९६ कुली मराठे आहोत...
पाटील ९६ कुळी मराठा आहेत हे कळले पण श्री. वासूदेव काळे जातीने कोण होते?
अर्थात, हा प्रश्न उत्सुकतेपोटी नसून शिर्शकात 'जातीयवाद' शब्द आला आहे तेंव्हा लेखकाने दोघांच्याही जाती उघड कराव्यात असे वाटते. अन्यथा जातीयवादाचा मुद्दा अधोरेखित करू नये.
मराठ्यांमध्येही ९६ कुळी, ९४ कुळी वगैरे पोटजाती आहेत. त्यांच्यातही, 'पंगतीत पान काटकोनांत वाढणे' असे प्रकार असायचे. हल्ली कधी ऐकले नाही. पण ही कर्मठता कधी कधी पराकोटीची होऊन वरील प्रमाणे वितुष्ट येताना दिसते.
जात-पात मानणे, पाळणे कोणास कितीही समर्थनिय वाटले तरी ते संकुचित मर्यादेत राहू द्यावे आणि माणसाला 'माणूस' म्हणून जास्तीत जास्तं मान मिळावा.
13 May 2012 - 10:31 pm | हर्षद खुस्पे
वासुदेव काळे राहत होता. जवळ जवळ ५०, ६० मेढर बाळगून होता. म्हणजे जातीने कोण हे लक्षात घ्या. काही जातींचा उल्लेख करता येत नाही हे कृपया ध्यानात घावे हि विनंती
14 May 2012 - 1:59 am | शिल्पा ब
खुन बिन पाडायची काही गरज नव्हती...पण नुसताच हीशेब चुकता करायचा म्हणुन संपवला दिसतोय.
एक गोष्ट जाणवतेय ती म्हणजे वासुदेव काळे या व्यक्तीने मुलाला अजुन फुस लावली...त्यापेक्षा अशा गोष्टी थोड्या भांडणानंतर का होईना मिटतात ते इथपर्यंत पोहोचलं.
शहरात वगैरे आंतरजातीय लग्न होउन जातीयता कमी व्हायला लागली आहे हे नसे थोडके.
14 May 2012 - 2:56 pm | टवाळ कार्टा
मुम्बै मधे जातीबाहेर लग्न न करणे योग्य मानणारे engineer पण खुप आहेत (मुली जास्त...इथे मी काडी टाकली का?)