डॉक्टर चा अनुभव ...........सूड का जातीयवाद ?
सदर अनुभव हा सत्य असून ह्या अनुभवाशी संबंधित घटना मा. न्यायालय व इतर व्यक्तींशी संबधित असल्यामुळे स्थळ, काळ व नावे बदललेली आहेत. तसेच अनुभवामध्ये थोडी रंजकता आणण्याच्या दृष्टीने थोडे बदल केले आहेत.
....................................................................................................................
कोल्हापूर मधले एक छोटेसे खेडेगाव, तसा म्हटले तर कोल्हापूर पासून फक्त ३०-३५ कि . मी अंतर ..... गावामध्ये तसा एकोपा पण राजकारण तर पश्चिम महाराष्ट्र च्या पाचवीलाच पुजलेल. तसं गावामध्ये हि दोन तट आहेतच . पण कधीही हाणामाऱ्या झाल्या नाहीत. गाव तसे शांत, पंचगंगेच्या पाण्यावर फुललेली हिरवीगार शेती उसाने भरलेले लांबलचक पट्टे. सकाळच्या कोंबड्याच्या कुकारानंतर कुक कुक आवाजाने सुरु होणारी गुऱ्हाळे, मध्येच मोरांचा केकारव. जवळच जोतिबाचा डोंगर, उजवीकडे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा किल्ला अश्या मोठ्या आल्हाददायक वातावरणामध्ये लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. गावामध्येच सर्व जाती धर्माचे लोक व्यवस्थित राहतात. परंतु पाटील घराण्याचा मान तसं गावात असतोच तसा ह्याही गावामध्ये होताच. संभाजी पाटील तसं बऱ्यापैकी पैसे बाळगून होते. १ मुलगा आणि १ मुलगी अस छोटंसं पण सुखी जोडप. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धत आसल्यामुळे तसं कुटुंबाचा आकार मोठा. एकूण ५ भावंड, त्यःच्या बायका, आणि मुले . त्यांना वावरायला मोठा वाडा आणि शेती म्हणाल तर चांगली ३०-३५ एकर बागायती शेती. व १०-१५ एकर जिरायती शेती. सर्व उत्पन्न मिळून वर्षाला साधारणपणे १२-१३ लाख रुपये मिळत. मुलगा संग्राम कोल्हापूरला KIT Engineering collage मध्ये शिकायला होता. मुलीचे मनिषाचे बी. ए चालले होते व ती कोल्हापूर ला येउन जावून करत होती. मनीषा संग्रामपेक्षा ३ वर्षांनी मोठी होती. देखणी, उंच व स्वभावाने ही गोड. तिचे हे शेवटचे वर्ष संपताच पाटील तिचे लग्न एका जातीमधालाच मुलगा बघून करून देणार होते. पैश्यांचा काहीच प्रोब्लेम नाही .
गावामध्ये इतर जाती धर्माच्या लोकांप्रमाणे वासुदेव काळे राहत होता. जवळ जवळ ५०, ६० मेढर बाळगून होता. तसं. त्याचे अनेक बाकीचे पण धंदे होते जस कि सावकारी करणे, लोकर विकणे, शेती करणे व इतर धंदे होते.धर्माला पण एक मुलगा होता निलेश त्याचे नाव. निलेश पण गावातूनच कोल्हापूरला शिक्षणासाठी येउन जात होता. तो बी कॉम. करत होता व शेवटच्या वर्षाला होता. आणि तसा कोल्हापूर ला येउन शिकण्यापेक्षा खासबाग मैदानंजवळच्या कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची मापे काढण्यात वेळ घालवत होतां
जवळपास तीन वर्ष निलेश व मनीषा एकाच बस मधून येत जात पण बोलत नव्हते. निलेशला मनीषा आवडत होती पण गावामधीलच आणि त्यात पाटलांची मुलगी म्हटल्यावरच त्याच अवसान गळत होतं. पण एकेदिवशी मित्रांच्या बरोबर दारू प्यायला बसल्यावर मित्रांनी त्याची भरपूर चेष्टा करून मनीषाला प्रोपोज करण्यासाठी तयार केले. निलेश पण इरेला पेटला आणि त्याने ठरवले उद्या येताना मनीषाला आपण आपल्या प्रेम बद्दला विचारायचेच.,,,हाच विचार करत तो झोपला.
सकाळी जाग आल्यावर मस्त आंघोळ करून त्याने चुलत भावाच्या लग्नामध्ये घेतलेला आकाशी रंगाचा शर्ट घातला. काळ्या रंगाची विजार व काळे बूट घातले. KS चा डिओ मारला, गळयामधील सोन्याची चेन सारखी केली व आज घरातली बुलेट मोटारसायकल घेउन कोल्हापूरला गेला व मनिषाला घेउन येणारी बस थाबते तिथे तिची वाट बघू लागला. आज कधी नाही ते बस पण लवकरच आली हा त्याला शुभशकूनच वाटला. तो मनीषा बस मधून उतरण्याची वाट बघू लागला. यथावकाश मनीषा बस मधून उतरली व कोलेज कडे चालू लागली. निलेश ने बसमधील बाकीचे गावामाधली लोक जाउ दिले आणि बुलेटला किक मारली व मनीषाच्या पुढ्यात नेउन गाडी उभी केली. मनीषा दचकली आणि निलेश कडे बघू लागली. ती तसं त्याला ओळखत होतीच कारण लहान गावामध्ये सगळ्यांच्या ओळखी असतातच.
मनीषा मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे . निलेश म्हटला.
काय? मनीषा उत्तरली.
नाही इथे रस्त्यावर नाही बोलू शकत आपण ताराबाई पार्क मधील खट्टा मिठ्ठा मध्ये बसुयात का? निलेश म्हणाला.
अरे ! पण मला कोलेज आहे आत्ता. मनीषाने उत्तर दिले.
निलेश म्हटला फक्त तुझा १/२ तास दे मला आज, परत नाही तुला अडवणार.
शेवटी मनीषा तयार झाली व निलेश च्या मागे बसून हॉटेल मध्ये गेली . वर जिना चढून गेल्यावर दोघे बसले व निलेश ने चहा व ब्रेड बटर ची ओर्डर दिली. वेटर गेल्यावर त्याने मनिषाला म्हटले ..
मनीषा, आपण एकाच गावात राहतो. मी तुला आणि तू मला ओळखते .. पण आपण फक्त एकमेकांना बघतो..बोलत कधीच नाही.... पण आज मी तुला काही विचारणार आहे. तूला पटलं तर हो म्हण अथवा सर्व विसरून जा. हे म्हणत आसताना निलेश ला घाम फुटत होता.. सारखे रुमालाने तोंड पुसत होता.
अचानक निलेश म्हटला 'मनीषा मला तू आवडतेस . तू माझी होशील का?' मनिषाला धक्काच बसला. ती अडखळत म्हणाली...मला आत्ता काहीच सुचत नाही .....मी नंतर बोलते मला क्लास आहे...मी जाते अस म्हणून ती वेगात बाहेर पडली.
क्रमश:
प्रतिक्रिया
13 May 2012 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुभाप्र. पुढील भागात पाटील निलेशच्या जीवावर उठत असेल.
आणि गावातल्या एकोप्याला गालबोट लागले असेल असेही काही झाले असेल.
-दिलीप बिरुटे
13 May 2012 - 9:59 am | हर्षद खुस्पे
वाचत रहा... :)
13 May 2012 - 10:02 am | नन्दादीप
आता निलेशने ऑर्डर केलेला ब्रेड - बटर कोण खाणार???? खाऊन झाल्यावर तरी विचारायच......
13 May 2012 - 6:56 pm | चिगो
हे वाचून मला पुलंचा "प्रत्येक प्रेमभंगानंतर भरपुर खायला लागणारा" सोन्या बागलाणकर आठवला.. ;-)
असो. पुभाप्र..
13 May 2012 - 10:22 am | सोत्रि
पुभाप्र!
"सूड का जातियवाद" हे हिंदीत आहे असे समजून वाचले आणि अंमळ हसू आले. ;)
- (अनुभवी) सोकाजी
13 May 2012 - 11:53 am | मन१
भारिच निरिक्षण.
(मराठी का प्रेमी) मनोबा
13 May 2012 - 11:43 am | प्रचेतस
वाचत आहे. पुभाप्र.
13 May 2012 - 11:50 am | पैसा
पुढचा भाग लवकर येऊ द्या.
13 May 2012 - 3:12 pm | स्पा
काय हो खुस्पे हे मरा ठित ले इशकजादे बनणार वाटत :-)
इशकजादा मन्या :-)