महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे.
उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे. परंतु हे करावे कसे, पावसाचे पाणी अडवल्यास होणारे फायदे किती व कोणते याबाबत पुरेशी माहिती मिळवणे बरेच अडचणीचे जाते.
या अडचणींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डीएनए वृत्तपत्राने येत्या शुक्रवारी (११ मे रोजी) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील आयसीसी ट्रेड सेंटरमधील सुमन मूलगावकर हॉलमधे एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. पुणे मनपाचे अधिकारी, भूजल संशोधन केंद्रामधील तसेच अन्य तज्ञ, बांध॑काम व्यावसायिक आणि विकसक, ज्यांनी यापुर्वीच पावसाचे पाणी अडवले आहे अशा विविध सोसायट्या आणि पावसाचे पाणी अडवू इच्छिणारे नागरिक यांना एकत्र आणुन त्यांच्यात वैचारिक आदान प्रदान घडवणे हा त्यामागील हेतू आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य असला तरी नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणी करण्यासाठी puneinbox@dnaindia.net या ईमेल अॅड्रेसवर आपले नाव कळवावे किंवा DNAVOP RAIN असे लिहुन आणि त्यापुढे आपले नाव लिहुन ५७५७८ या मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवावा.
('नो किडिंग' ह्या कार्यक्रमाच्या माहितीच्यावेळी अनेकांनी असे कार्यक्रम अथवा उपक्रम ह्यांची माहिती आगोदर मिळत नसल्याची तक्रार केल्याने ह्यावेळी खास आगोदर माहिती देण्यात येत आहे. धन्यवाद.)
माहितीस्त्रोत :- प्रसन्न केसकर
प्रतिक्रिया
10 May 2012 - 11:18 am | ऋषिकेश
आजच डीएनएमधे वाचले..
बरं झालं इथेही माहिती दिलीस ती
10 May 2012 - 11:56 am | खेडूत
चांगला उपक्रम,
अशीच एक बातमी नुकतीच वाचली होती.
http://www.esakal.com/esakal/20120321/5536392389179837178.htm
एक दुरुस्ती : सुमन नव्हे, सुमंत मुळगावकर
10 May 2012 - 12:06 pm | रणजित चितळे
...
10 May 2012 - 12:09 pm | स्पा
उत्तम उपक्रम आणि उत्तम माहिती
10 May 2012 - 4:31 pm | निश
परिकथेतील राजकुमार साहेब, अतिशय चांगला उपक्रम व त्याबद्दल तुम्ही दिलेली माहीती पण अतिशय उपयुक्त.
तुमचे आभार. मी ही माझ्या पुण्यातल्या नातलगाना व मित्राना नक्की सांगिन ह्या उपक्रमाला जाउन यायला.