पाऊली यांचा वगळ सिद्धांत

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
25 Apr 2012 - 4:32 pm

पाऊली यांचा वगळ सिद्धांत
(अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)

त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.

फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे. वायूतील अणू हे घनातील अणूच्या मानाने अभ्यासास जास्त सोपे असतात, म्हणून त्यांनी वायूतील अणू आणि त्यांतील कणांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. फार फार पूर्वी त्यांनी "परिपूर्ण" वायूची कल्पना केलेली होती. खरेखुरे वायू अनिश्चित स्वरूपाच्या बाह्य बलांनी बाधित होतात. त्याउलट "परिपूर्ण" वायू स्थिरपद राहत असावेत अशी त्यांची कल्पना होती. अशाप्रकारचा "परिपूर्ण" वायू, अणू आणि विजकांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यासाठी आदर्श पर्यावरण ठरू शकतो. प्रारणांनी उत्सर्जित ऊर्जेचे त्यात निरीक्षण करता येते आणि ती मोजताही येते. पण अशा वायूचे नियमन कुठल्या नियमांनी होत असावे? त्या नियमांत आणि पाऊलींच्या संशोधनात काय संबंध असावा?

गप्पा मारत मारत, फर्मी आणि त्यांचे मित्र फ्रँको रासेट्टी एव्हाना डबक्यापाशी पोहोचलेले होते. त्यांनी त्यांचे सोबत दोन लांब दांडे आणलेले होते. प्रत्येकाच्या टोकाशी रेशमी दोरीचा सरफास बांधलेला होता आणि त्याच्या टोकाशी मासेमार लोक बांधतात तशा पद्धतीने लहान सहान किटकांचे आमिषही बांधलेले होते. ते डबक्याच्या कडेला भुकेल्या सरड्यांनी आमिषांवर झडप घालण्याची वाट पाहत बसून राहिले.

"सरडा अगदी समोरच आहे," रासेट्टी कुजबुजले. "ईशान्येकडे सरकत आहे. वेग शून्य दशांश एक सात नॉटस्."

फर्मींनी तेवढ्यात असे काही पाहिले होते, ज्याकडे रासेट्टींचे लक्षच गेलेले नव्हते. दुसरा एक लहान सरडा, त्याच आमिषाकडे समांतरपणे सरकत होता. त्यांनी एकाच वेळी झेप घेतली. मोठ्या सरड्याने आमिष पकडले. रासेट्टींनी दोऱ्याला झटका दिला, फास आवळला आणि मोठा सरडा गिरफ्तार झाला. मात्र झेपावणारा लहान सरडा थोडा कमी पडला. आणि मागे वळून पळून गेला.

हो! खरेच आहे!! कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात.

फर्मींचे मन धावत होते. आधीच ते त्या "परिपूर्ण" वायूच्या संदर्भात विचार करत होते, जो त्यांनी एकल अणूचा मानला होता. त्याच्या अणूतील विजक कसे वागत असावेत. मग फायरेंझमध्ये परतल्यावर पुन्हा, त्यांनी लगेचच "परिपूर्ण एकल वायूच्या पुंजीकरणाबाबत" नावाचा शोधनिबंध लिहायला घेतला.

त्या शोधनिबंधात काढलेले निष्कर्ष आजही धातुवैज्ञानिक आणि अभियंते अनुसरत आहेत. इतर गोष्टींसोबतच, त्यात विविध धातू किती चांगल्या वा वाईट प्रकारे उष्मा वा विद्युत वहन करतात ते निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. फर्मींचे निष्कर्ष वैध होते आणि आजही आहेत. एवढेच नव्हे तर आणखीही एका शास्त्रज्ञांनी -पॉल डिरॅक ह्यांनी- स्वतंत्रपणे तेच आकडे शोधून काढले होते. ह्याच सूत्रांना अजूनही "फर्मी-डिरॅक संख्यांकने -Fermi-Dirac Statistics-" म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नियमांचे अनुसरण करणाऱ्या वायूकणांना "फर्मिओन्स" म्हटले जाते.

हा लेख, “एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता [१]” ह्या पुस्तकातील एका उतार्‍याचा मराठी अनुवाद आहे.
पूर्वप्रसिद्धीः मनोगत डॉट कॉम ०६-०२-२००८

[१] एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता (Enrico Fermi: Pioneer of Atomic Age), मूळ इंग्रजी लेखक: टेड गॉटफ्रीड, मालिका: आधुनिक युगाचे कर्ते (Makers of the Modern Age), प्रकाशक: युनिव्हर्सिटी प्रेस, प्रकाशन काल: १९९९, वितरक: ओरिएंट लाँगमन लिमिटेड, किंमत: रु.१२५/- फक्त.

इतिहासविज्ञानमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखभाषांतर

प्रतिक्रिया

छान लेख गोळेकाका.
पण प्रत्येक शब्दाला मराठी शब्द देण्याच्या अट्टाहासापायी भाषा जास्त बोजड बनत आहे. उदा. वगळ, विजक, एकल अणू, पुंज स्थिती इ.

त्याऐवजी मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द वापरलेत (उदा. इलेक्ट्रॉन इ.) तर लेख अधिक सुघड होईल.

अर्थात ही टीका नसून सूचना.

कुंदन's picture

25 Apr 2012 - 5:05 pm | कुंदन

+१
खरे आहे , लेखाचे नाव वाचुन मला वाटले "पाऊली" हे कोणीतरी भारतीय शास्त्रज्ञ आहेत की काय....

असेच म्हणतो. "वगळ सिद्धांत" वाचून कुठल्यातरी आश्रमात महर्षी वृक(वुल्फ्)गांगेय पाउलिन हे शिष्यांना वस्त्रगाळ पूड वगैरे करायला सांगून सहाणेवर गंध उगाळत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले!!

(तसेही आमच्या प्राचीन ऋषींना सर्व शास्त्रे येतच होती, क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे कोणत्या सूक्तातली ऋचा ;))

यकु's picture

25 Apr 2012 - 5:25 pm | यकु

(तसेही आमच्या प्राचीन ऋषींना सर्व शास्त्रे येतच होती, क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे कोणत्या सूक्तातली ऋचा )

ख्‍या: ख्या: ख्या: !

कणादाने (कणदच ना हो तो? ) तर अणव: अणव: करीत जीव सोडला म्हणे ;-)

कणव(कणाद+अणव) हा शब्द तिथूनच आला काय हो :P

@ गोळेकाका: ह. घ्या. लेख उत्तम विषयावर आहे, अजून विस्तार आवडला असता नक्की.

यकु's picture

25 Apr 2012 - 6:07 pm | यकु

असेल .. असेल... ;-)
तूर्तास मिपासंस्‍थापक तात्यासाहेबांची न्यूटन वरची एक फेसबुक प्रसिद्ध टिप्पणी पुन्यांदा आठवून ख्‍या: ख्या: ख्‍या: हसत आहे ;-)

ती टिप्पणी मीपण वाचली होती आणि वाचायच्या अगोदर एका मित्राने सेम २ सेम शंका बोलून दाखवली होती ;)

वल्ली, कुंदन आणि बॅटमन प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद!

वल्ली,
मराठी शब्द देण्याच्या अट्टाहासापायी भाषा जास्त बोजड बनत आहे. >>>>
बनत नाही आहे. ती आहे तशीच आहे. आपण विसरलो तरी ती कशी बदलेल अचानकच?

त्याऐवजी मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द वापरलेत (उदा. इलेक्ट्रॉन इ.) तर लेख अधिक सुघड होईल.>>>>
फार फार वर्षांपूर्वी गंभीर लेखन संस्कृतात केले जाई. बहुसंख्यांना ते फारसे कळत नसे. मग काही काही लोक असे म्हणू लागले की अस्सल"मागधी" म्हणजे संस्कृत, सगळ्यांना थोडीच समजते? मग अर्धे-मागधीत आणि अर्धे प्राकृतात लिहिले तर सुघड होईल.

अशा रीतीने अर्धमागधी भाषेचा जन्म झाला.

तुम्ही म्हणता तसे केल्यास अर्ध-मराठी भाषेचा जन्म होण्याची चिन्हे मला दिसत आहेत.

प्रचेतस's picture

25 Apr 2012 - 5:43 pm | प्रचेतस

मराठी संस्कृतोद्भव, प्राकृतोद्भव असून फारसी, अरबी, तसेच इतरही अनेक भाषांतील शब्द घेऊन तयार झाली आहे. ज्ञानेश्वरीतील मराठी, शिवकालीन मराठी, स्वातंत्र्यपूर्वकालीन मराठी तसेच आजची मराठी बघितलीत तर भाषा सतत बदलत आली आहे. किंबहुना सतत बदलत असल्यानेच ती आज जिवंत आहे.

भाषा जितकी सोपी होईल तितके चांगले. उगाच क्लिष्ट करण्याचा प्रयत्न कशाला?

असो. चांगल्या लेखात विषयांतर होत असल्याने माझा पूर्णविराम.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2012 - 6:33 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

यकु, प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद! ख्‍या: ख्या: ख्या: !

द्विरुक्ती प्रकाटाआ

गोळे काका,
सरड्यांवरचे प्रात्यक्षिक = विजकांबद्दलचे अनुमान
सरडे जीव असल्याने प्रात्यक्षिक आणि अनुमानातील संबंध कळला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 5:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सरडे जीव असल्याने प्रात्यक्षिक आणि अनुमानातील संबंध कळला नाही.

एक आमिष एकाच सरड्याला (/प्राण्याला) मिळाले त्याप्रमाणेच दोन फर्मिऑन एकाच जागेवर दावा ठोकू शकत नाहीत. एक कक्षा => एकसमान ऊर्जा => एकच इलेक्ट्रॉन (/फर्मिऑन).

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 12:36 pm | नरेंद्र गोळे

सोनारानेच कान टोचले, तर आणखी काय पाहिजे?

एक आमिष एकाच सरड्याला (/प्राण्याला) मिळाले त्याप्रमाणेच दोन फर्मिऑन एकाच जागेवर दावा ठोकू शकत नाहीत. एक कक्षा => एकसमान ऊर्जा => एकच इलेक्ट्रॉन (/फर्मिऑन).

पण फर्मिऑन जीव थोडेच आहेत?

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 7:00 pm | नरेंद्र गोळे

पण फर्मिऑन जीव थोडेच आहेत?>>> तसे कोण म्हणतंय?

तसे कोण म्हणतंय?

कुणी म्हणत नसेल, पण कथा कुणीकडे जातेय ते पहा ना.

माझी अडचण ही आहे की सरड्यांच्या ( जीव) वर्तनावरचे प्रात्यक्षिक फर्मिऑन्स (निर्जीव म्हणू का? ) च्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते?

यकु,
संवादात रुची राखत आहात ही आनंदाची गोष्ट आहे.
निर्जीवांच्या वर्णनाकरता केवळ सजीवांचे रूपक वापरलेले आहे.
त्यांच्या वर्तनाचा अंदाज बांधायचे साधन म्हणून वापर कुठेच केलेला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 7:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सरड्यांच्या ( जीव) वर्तनावरचे प्रात्यक्षिक फर्मिऑन्स (निर्जीव म्हणू का? ) च्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते?

सामान्यतः उपयुक्त नाहीच. म्हणूनच भौतिकशास्त्राच्या पुस्तकात एक्सक्लूजन तत्त्व शिकवताना अशी तुलना देत नाहीत. भौतिकशास्त्राच्या इतिहासाबद्दल लिहीताना या घटनेचा उल्लेख होतो.

स्वतःचं शेपूट खाणारा साप स्वप्नात पाहिल्यानंतर केक्यूलेला बेन्झिनच्या रेणूची रचना अशी असू शकते याचा साक्षात्कार झाला. स्वतःचं शेपूट खाणारा साप प्रत्यक्षात कदाचित अस्तित्त्वातही नसेल. संशोधकाला काय पाहून त्याचा संबंध आपल्या डोक्यात सुरू असणार्‍या प्रश्नाशी लावता येईल याचा अंदाज खुद्द संशोधकालाही नसतो.

गोळे काका आणि अदिती,
धन्यवाद !
:)

अन्या दातार's picture

25 Apr 2012 - 6:19 pm | अन्या दातार

काका, अजुनही असेच चांगले लेख येऊद्यात. फक्त मराठीकरणाचा अट्टाहास थोडास्सा कमी करा. किंवा शक्य तिथे कंसात पर्यायी इंग्रजी शब्द तरी लिहित चला.
या लेखाबद्दल बोलायचे झाल्यास, सरड्यांचे उदाहरण पटले नाही. उद्या असेच मुंगीच्या चालण्यावरुन कुणीही काहीही अनुमान काढेल की!

अन्याजी,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

काका, अजुनही असेच चांगले लेख येऊद्यात. >>>> मंजूर आहे!

फक्त मराठीकरणाचा अट्टाहास थोडास्सा कमी करा. >>>
वगळ आणि सिद्धांत हे दोन्हीही मुळात मराठीच शब्द आहेत.

किंवा शक्य तिथे कंसात पर्यायी इंग्रजी शब्द तरी लिहित चला.>>>
मथळाही कंसात दिलेला आहेच की!

या लेखाबद्दल बोलायचे झाल्यास, सरड्यांचे उदाहरण पटले नाही. उद्या असेच मुंगीच्या चालण्यावरुन कुणीही काहीही अनुमान काढेल की!>>>>>
सत्यवचन! उगाच नाही पडत्या सफरचंदाला पाहून न्यूटनला गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला!

उदाहरण पटले नसले तर कदाचित दुसरे उदाहरण देता येऊ शकेलही.
मात्र, अनुवादकाला मूळ लिखाणात बदल कसा करता येईल हो!

स्वानन्द's picture

25 Apr 2012 - 10:06 pm | स्वानन्द

मराठी फारसे बोजड वाटले नाही. पण बर्‍याच जणांना वाटू शकते हे ही पटलं.
यावर, कंसात प्रचलीत इंग्रजी शब्द देण्याचा पर्याय उत्तम वाटतो. एयत्ता नववीपासून मराठी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकात आम्हाला असे इंग्रजीतील पर्यायी शब्द दिलेले असायचे.

मराठी फारसे बोजड वाटले नाही. >>> अत्यंत मोलाचा अभिप्राय आहे आपला. मला आवडला! हार्दिक धन्यवाद!!

पैसा's picture

25 Apr 2012 - 8:14 pm | पैसा

शोधामागची कथा आवडली.

पैसाताई,
धन्यवाद. आपल्याला आवडल्याने लिहिण्याचे चीज झाले. असे मला वाटते आहे.

पैसा पैसा करून रुपया होईल का बघतो आहे!

मराठी_माणूस's picture

25 Apr 2012 - 9:43 pm | मराठी_माणूस

छान लेख. पदार्थ विज्ञानावर अजुन लेख येउ द्यात .
मराठीच्या अट्टाहासाचे स्वागत. वाचताना थोडे कष्ट पडले तरी चालतील पण समजाउन घेण्याचा निश्चित प्रयत्न करु.

मराठीच्या अट्टाहासाचे स्वागत. वाचताना थोडे कष्ट पडले तरी चालतील पण समजाउन घेण्याचा निश्चित प्रयत्न करु.>>>
ये हुई ना बात. वाचक असे असतील तर लेखक हजार मिळतील. माझ्या एकट्याची काय पत्रास!

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2012 - 10:46 pm | पिवळा डांबिस

एन्रिको फर्मी सरडे पकडायचा? कशासाठी?
किमान त्या सरड्यासाठी काय इंग्रजी शब्द दिलाय ते तरी सांगा हो!!!

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 12:21 pm | नरेंद्र गोळे

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

एन्रिको फर्मी सरडे पकडायचा? कशासाठी?>>>>>
हो. फर्मींच्या चरित्राच्या पाचव्या प्रकरणाचे नावच "अह लव्ह, अह लिझार्डस-१९२५-१९२८" असे आहे.
कशाकरता हे समजून घेण्यासाठी मूळ पुस्तक वाचलेत तर बरे.

किमान त्या सरड्यासाठी काय इंग्रजी शब्द दिलाय ते तरी सांगा हो!!!>>> अवश्य.

या उतार्‍याचा मूळ इंग्रजी मसूदा काय असावा ह्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसल्याने तो खाली देत आहे. त्या उत्सुकतेचे मूळ, कदाचित हा अनुवाद बरोबर नसावा आणि मूळ इंग्रजी कळल्यास निदान खरे काय ते तरी समजेल, ह्या विचारात असल्याचे दिसते. तो विचार सफल होवो!

Lately he had been thinking about a recent discovery by Austrian physicist Wolfgang Pauli, a one-time assistant of Max Born’s. Pauli, while studying the movements of atomic electrons around a nucleus, had observed that there was only one electron to each orbit. Put another way, no two electrons followed the same path.

Fermi appreciated that this suggested an additional order inside each atom that had not been recognized before. The atoms of gases were more accessible than those of solid forms, so he zeroed in on the movements of atoms and their particles in gases. A long time ago he had imagined a “perfect” gas, a gas that was stable as real gases subject to erratic outside forces are not. Such a perfect gas would be the ideal environment in which to study the behavior of atoms and electrons. The energy given off by radiation could be observed and measured. But what laws would govern such a gas? What would be the connection between them and Pauli’s discovery?

The young men had reached the marshland. They had brought with them two long rods, each with a silk noose hanging from its tip. Now they baited the tips of these rods with small insects, much as one might bait a fishing pole. They stretched out at the edge of a muddy pond with their poles extended and waited for hungry geckos to take the bail.

“Gecko dead ahead, sir,” hissed Rasetti. “Proceeding north easterly direction. Speed point-oh-one-seven knots.”

Fermi spied something Rasetti had not yet noticed. A second, small lizard was making for the bait on a path parallel to that of the larger one. They made the final jump at the same moment. The larger gecko took the bait; Rasetti jerked his line, tightened the noose and caught him. But the leaping smaller lizard had fallen short and now it scampered away.

Of course! That was it! No two electrons followed the same orbit because no two electrons were in the same quantum state. In other words, they were not the same size, or not the same temperature, or not charged with the same amount of electrical energy-or all three. These were some of the factors that determined an electron’s orbit.

Fermi’s mind raced. Already he was thinking in terms of that perfect gas he had dubbed monoatomic gas and how the orbiting electrons of its atoms might behave. Back in Firenze, he immediately began work on a paper entitled “On the quantization of a Perfect Monoatomic Gas.”

The conclusions reached in that paper are still followed by metallurgists and engineers today. Among other things, it presented guidelines to determine how well or badly various metals conduct heat or electricity. Fermi’s calculations were –and are- valid. Not only that, but another scientist, Paul Dirac, had independently come up with the same figures. These formulas are still known as the “Fermi-Dirac Statistics”, and the particles of gas which follow their laws are called “fermions.”

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2012 - 11:18 pm | पिवळा डांबिस

शंकासमाधानाबद्दल धन्यवाद गोळेसाहेब!!

पण काय कमाल आहे बघा! इतका मोठा सायंटिश्ट, पण सरडे पकडायचा!!!
आम्ही लहानपणी एकदाच पावसाळ्यात गटारीतली खेकड्याची पिल्लं काय पकडली, सणकून मार खाल्लाय तीर्थरूपांचा!!!
नाहीतर कदाचित आम्हीपण सायंटिश्ट झालो असतो की!
च्यायला, मोठ्यांचं सगळंच मोठं म्हणतात ते काय खोटं नाही!!!!
:(

माझे पण असेच झाले .
मी डॉक्टर होणार होतो.

पाउलीज एक्स्क्लुजन प्रिन्सिपल आठवी-नववी च्या पुस्तकात शिकवलंच होतं.

मराठीत ते समजावून सांगणं हा जर उद्देश असेल तर ज्या शास्त्रीय संकल्पना वापरल्या आहेत त्यांचं साध्या, समजेल अश्या बोली-मराठी भाषेत स्प्ष्टीकरण देणं उचित ठरलं असतं.

म्हणजे, विजक = ऋणभार असलेला अणू-घटक (= इलेक्ट्रॉन).
एकल, परिपूर्ण वायू म्हणजे काय? हे सांगितलं नाही तर लेख कळतच नाही.

एक,

लेखाचा उद्देश फर्मिऑन्स ह्या संकल्पनेचा जन्मदाता फर्मी, पाऊली यांच्या वगळ सिद्धांताकडे कसे कसे पाहत होता, त्यापाठची कथा समोर आणणे हा होता.

पाउलीज एक्स्क्लुजन प्रिन्सिपल आठवी-नववी च्या पुस्तकात शिकवलंच होतं.>>>
असेल. त्यामुळे समजायला सोपे होईल.

मराठीत ते समजावून सांगणं हा जर उद्देश असेल तर ज्या शास्त्रीय संकल्पना वापरल्या आहेत त्यांचं साध्या, समजेल अश्या बोली-मराठी भाषेत स्प्ष्टीकरण देणं उचित ठरलं असतं.>>>> तसा उद्देश नाही.

म्हणजे, विजक = ऋणभार असलेला अणू-घटक (= इलेक्ट्रॉन).
एकल, परिपूर्ण वायू म्हणजे काय? हे सांगितलं नाही तर लेख कळतच नाही.>>>>
तुम्हाला कसे काय कळले, न सांगताही?

रामपुरी's picture

25 Apr 2012 - 11:23 pm | रामपुरी

मराठी प्रतिशब्द शोधण्याचा उपक्रम स्तुत्य असला तरी जे मराठी शब्द अगोदरच प्रचलित आहेत ते बदलण्याचा उद्देश समजला नाही.

रामपुरी,
कोणत्या शब्दांबद्दल आपण बोलत आहात? कृपया सांगाल का?

उपयोग काय? काही कळलं नाही. मी तर भाषेचा उपयोग अर्थ पोहोचवणं इतकाच मानतो. भाषा माध्यम आहे, साध्य नाही.

तुम्हाला हा सिद्धांत उपयोगी आणि महत्त्वाचा वाटत असेल तर तो कृपया सरळ ,साध्या आणि सोप्या भाषेत लिहा.

रामपुरी's picture

26 Apr 2012 - 5:01 am | रामपुरी

हा सिद्धांत निरुपयोगी आणि बिनमहत्वाचा मुळीच नाही आणि दुर्बोध असणं तर शक्यच नाही... सरळ साध्या सोप्या भाषेतच लिहिला आहे. परत वाचून बघा आत्ताच समजेल. तरीही समजलं नाही तर पुन्हा प्रयत्न करा. यात अवघड काहीच नाही.

हा जर पाऊलीचा शोध असेल तर त्याचा रोजच्या जगण्यात, किंवा ते सोपं करण्यात कसा उपयोग झालाय?

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2012 - 5:59 pm | राजेश घासकडवी

इत्यादी कुठच्याही विजकीय (इलेक्ट्रॉनिक) गोष्टी तुम्ही वापरता का? या शोधाशिवाय त्या बनवता आल्या नसत्या.

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 7:15 pm | नरेंद्र गोळे

राजेशजी,
समर्थनाखातर धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश, इलेक्ट्रॉनिक गोष्टी वापरण्यासाठी त्या आतून माहित असण्याची गरज नसते. टीव्ही बघण्यासाठी एलीडी आणि एल्सीडी तंत्रज्ञान काय हे माहित असणे आवश्यक नाही. रिमोट कसा वापरायचा हे समजणं महत्त्वाचं आहे. ;-)

पण काही लोकांना आपण कोण आहोत, कसे आहोत, असेच का आहोत असे प्रश्न पडतात. असे प्रश्न कोण्या बाबा-बुवा-मातांना विचारण्याऐवजी काही लोकं हे प्रश्न स्वतःला विचारतात. उत्त्तर शोधण्यासाठी विज्ञान हे साधन म्हणून वापरतात. मी, माझं घर, माझा संसार, माझा नवरा/बायको, माझं बचत खातं यापुढेही काही जग आहे याची या लोकांना जाणीव असते आणि त्याबद्दल कुतूहलही असतं. अशा सर्व लोकांना पावलीचे एक्सक्लूजन तत्त्व काय, डिरॅकला हे कसं सुचलं असेल अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायला आवडतात. बाहेरच्या जगाची जाणीव नसणार्‍या आणि/किंवा त्याबद्दल कुतूहल नसणार्‍यांसाठी आणि/किंवा बाबा-बुवा-मातांचे शब्द शेवटचा शब्द म्हणून मान्य करणार्‍यांसाठी हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं निरर्थक आहेत.

दादा कोंडके's picture

26 Apr 2012 - 10:41 pm | दादा कोंडके

प्रतिसाद आवडला! :)

मूकवाचक's picture

27 Apr 2012 - 9:13 am | मूकवाचक

प्रतिसाद आवडला.

अर्धवटराव's picture

7 May 2012 - 7:33 am | अर्धवटराव

वैज्ञानीक शोधांच्या कथा, त्यामागचे संशोधकांनी लावलेले तर्क/परिक्षणे/प्रयोग, त्यांची धडपड आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळं जाणुन घेण्याचा "कीडा".. हे सगळं इतकं इंटरेस्टींग आहे कि मनाला/बुद्धीला मेजवानी. तिचा उपभोग घेणे हाच त्यामागचा सर्वात मोठा उपयोग !!

अर्धवटराव

संजयजी,

सिद्धांत आध्यात्मिक असता तर कळला न कळला असा भेदभाव संभवू शकतो.
सिद्धांत साधा सोपा आणि विज्ञानास समजून घेण्यास आवश्यक आहे असे लोक मानतात.

आपल्याला निरुपयोगी वाटत असल्यास दुर्लक्ष करावे ही विनंती.

मी सिद्धांत निरूपयोगी आहे असं कुठं म्हटलंय? माझा प्रश्न साधा आहे:

`हा जर पाऊलीचा शोध असेल तर त्याचा रोजच्या जगण्यात, किंवा ते सोपं करण्यात कसा उपयोग झालाय'?

याचं उत्तर हे कसं असं शकेल?

>आपल्याला निरुपयोगी वाटत असल्यास दुर्लक्ष करावे ही विनंती.

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 7:13 pm | नरेंद्र गोळे

`हा जर पाऊलीचा शोध असेल तर त्याचा रोजच्या जगण्यात, किंवा ते सोपं करण्यात कसा उपयोग झालाय'?>>>>
पाऊलीच्या सिद्धांताने त्या काळपर्यंत अनाकलनीय असलेले विजकांचे वर्तन आकलनीय झाले. त्याबाबतचे पूर्वानुमान आणि भाकीतेही खरी ठरू लागली. म्हणजेच त्यांच्या वापराची दारे मोकळी झाली. नंतर राजेश घासकडवींनी म्हटल्यानुसार विजकीय उपायोजनांची अनंत आविष्करणे झाली. त्यांपकी आज तुमच्या वापरात अनेक वस्तू आहेत. हा त्या सिद्धांताचा तुम्हाला झालेला अप्रत्यक्ष उपयोग आहे.

तुम्ही जर भौतिक विज्ञान स्नातक असाल तर तुम्हाला त्या सिद्धांताचा प्रत्यक्ष उपयोगही होऊ शकला असेल.

हे उत्तर आपल्याला समाधानकारक वाटत आहे काय?

वाटतंय आणि ते मला जास्त महत्त्वाचय.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा

कुणी काही वाईट साईट म्हटले तरी आपण आपले कार्य चालू ठेवा अशी विनंती.
प्रचलित इंग्रजी शब्द तसेच्या तसे मराठीत वापरणे ही एक सोयिस्कर कुबडी आहे. स्वप्रतिभेने नवे शब्द बनवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तशी प्रतिभा सगळ्यांकडेच असते असे नाही. नवे शब्द यशस्वी होतात की नाही ते काळच ठरवेल पण अशी नवी निर्मिती, असे प्रयोग झाल्याशिवाय भाषेत नवे शब्द निर्माण होत नाहीत, रुळत नाहीत. सावरकर वगैरे लोकांनी असेच प्रयोग केले त्यातील कित्येक शब्द आज व्यवस्थित रुळलेले आहेत. ते यायच्या आधी सर्रास इंग्रजी शब्द वापरले जायचे. जसे संपादक, महापौर, स्तंभ (वर्तमानपत्रातील कॉलम या अर्थी).
सावरकरांनाही लोकांनी नाके मुरडली. त्यांचे सगळेच शब्द लोकांनी स्वीकारले नाहीत. पण त्यांच्यामुळे काही नवे, उत्तम मराठी शब्द भाषेला मिळाले हे खरे.
तुमचेही शब्द मायमराठीत रुळोत अशी शुभेच्छा.

मूकवाचक's picture

26 Apr 2012 - 10:23 am | मूकवाचक

+१

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 12:29 pm | नरेंद्र गोळे

हुप्प्या, बोला जय बजरंग!
आपल्या “हौसला अफजाईने” नवी उमेद निर्माण झालेली आहे. आपला अभिप्राय आवडला.
आपल्या शुभेच्छांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 5:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाऊली यांचा वगळ सिद्धांत
(अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)

सिद्धांत हा शब्द theory साठी वापरला जातो. सैद्धांतिक भौतिकशास्त्र म्हणजे theoretical physics असं अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. तत्त्व हा शब्द principleसाठी अधिक योग्य वाटतो.

कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात.

दोन इलेक्ट्रॉन एकाच कक्षेत असू शकत नाहीत हे वाक्य मान्य आहे. पण या पुढे पुंज स्थितीचा उल्लेख येतो. पुंज स्थिती हा शब्द इलेक्ट्रॉनची कक्षा, ग्रहांचं परिवलन वगैरे म्हणण्याएवढा सामान्य वापरात नाही. त्यामुळे पुंज स्थिती सारखी नसते हे वाक्य quantum states are not the same यापेक्षा फार वेगळं नाही. या वाक्याचं निदान काही स्पष्टीकरण आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनचे तापमान शक्यतो सांगत नाहीत, इलेक्ट्रॉनच्या गटाचं तापमान सांगितलं जातं. एका अणूतल्या दोन इलेक्ट्रॉनची ऊर्जा समान नसते असं सोप्या आणि स्पष्ट शब्दांत सांगता येईल.

त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो

इलेक्ट्रॉनवरील विद्युतभार हे नैसर्गिक एकक म्हणून वापरण्यात येते. किंवा इलेक्ट्रॉनचा विद्युतभार अतिशय प्रिसीजन (मराठी शब्द?)पूर्वक मोजलेला आहे. त्यामुळे हे वाक्य अजिबातच समजलं नाही.

किंबहुना पॉलीचे एक्सक्लूजन तत्त्व इलेक्ट्रॉनसंदर्भात सांगताना इलेक्ट्रॉनच्या कक्षा आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा यांचे स्पष्टीकरण टाळणे अशक्य आहे*. या कक्षांमधला सर्वात आतला पदर म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्पिन हा असतो. स्पिनचं विद्युत अधिभार हे भाषांतर असल्यास अयोग्य आणि अग्राह्य आहे. (नसल्यास आधीचं वाक्य रद्द समजावं.) इलेक्ट्रॉनचा स्पिन त्याच्या कोनीय संवेगाशी संबंधित असतो. कोनीय संवेग म्हणजे angular momentum. सरळ रेषेत न फिरणार्‍या कोणत्याही वस्तूचा कोनीय संवेग त्याचे वस्तूमान, वेग आणि कक्षेच्या त्रिज्जेवर अवलंबून असतो. (याचे अधिक स्पष्टीकरण इथे आणि/किंवा मराठीत देणं माझ्या आवाक्याबाहेरचं काम आहे.)

Franco Rasetti या नावाचा त्याच्या मातृभाषेतला उच्चार देवनागरी लिपीत लिहीताना फ्रान्को रासेत्ती याच्या (फ्रॅङ्को रासेट्टी नव्हे! फ्रॅङ्को रासेट्टी हा साधारण अ‍ॅंग्लिकन किंवा इंग्रजाळलेला उच्चार आहे.) जवळ जाणारा असेल. चुभूदेघे.

तळटीपा:
*अथवा वाचकांना अणूरचना, इलेक्ट्रॉनच्या कक्षा, त्यांचा इलेक्ट्रॉनच्या उर्जेशी असणारा संबंध हे माहित आहे असे गृहीत धरावे लागते. मराठी संस्थळांवरच्या किती वाचकांना या गोष्टी माहित असतील किंवा आता आठवत असतील याबाबतीत मला शंका आहे. अशा सोप्या गोष्टीही समजून सांगितल्यास वाचकांना संज्ञा आणि संकल्पना व्यवस्थित समजतात.

१. मराठी पाठ्यपुस्तकांमधे इलेक्ट्रॉन हा शब्द वापरलेला असतो. सबब, टेबल, पेन, बटाटा, फरक, हालहवाल, अशा आयात केलेल्या आणि आता मराठी गणल्या जाणार्‍या शब्दांप्रमाणेच इलेक्ट्रॉन हा ही मराठी शब्दच आहे असं मानणारा बराच मोठा वर्ग अस्तित्त्वात आहे.
१अ. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांमधे विजक हा शब्द अशुद्ध मानावा का? अंत्याक्षर दीर्घ नाही, उपान्त अक्षरही दीर्घ नाही आणि उप-उपान्त्य अक्षरही दीर्घ नाही; जिथे मूळ मराठी शब्द वीज असा आहे तर वीजक (यातल्या ज चा उच्चार जमा किंवा जमीन किंवा जहाज मधे असल्यासारखा सॉफ्ट, विभाजकमधल्या ज सारखा नाही) असा नको का?

२. एक्सक्लूजनचं भाषांतर वगळपेक्षा अधिक चांगलं झालं असतं तर कदाचित स्वीकारार्ह वाटलं असतं. क्रियापद आणि आडनाव म्हणूनही वापरला जाणारा शब्द नाम म्हणून रूचला नाही.

३. पॉलीचं तत्त्व एका प्रणालीत बद्ध असणार्‍या सर्व फर्मिऑन्सना लागू पडतं. इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, कार्बन-१३ ही फर्मिऑन्सची काही उदाहरणं आहेत.

४. पॉलीचं हे तत्त्व ज्या तार्‍यांचे मृत्युसमयी वस्तूमान सूर्याच्या १.४४ पटीपेक्षा अधिक असते तिथे इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत मोडते. हे दाखवून देण्याबद्दल सुब्रमण्यन चंद्रशेखर यांना आधी हेटाळणी सहन करावी लागली. आणि मृत्युसमयाच्या काही काळ आधीच नोबेल पुरस्कारही मिळाला. एका एक्स-रे दुर्बीणीला याच चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ चंद्रा असे नाव दिलेले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती,

असे म्हणतात की “सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम” त्यानुसार आपला प्रतिसाद मला मोलाचा वाटतो आहे.

इलेक्ट्रॉनवरील विद्युतभार हे नैसर्गिक एकक म्हणून वापरण्यात येते.>>>
ह्या आपल्या विधानाशी मी शतप्रतिशत सहमत आहे.

नावांच्या उच्चारांबाबतही आपल्या सूचनांची मी दखल घेतली आहे. योग्य उच्चार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रज पुण्याला ’पूना’ म्हणोत, आपण मात्र ब्रिटिशांना ’ब्रिटिस’ म्हणता नये!

स्पिन म्हणजे फिरत. प्रिसाईझ म्हणजे नेमका.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 7:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधीच्या इतर आक्षेपांबद्दल, विशेषतः वैज्ञानिक माहितीमधल्या त्रुटी आणि चुकांबद्दल तुमचं म्हणणं समजल्यास आवडेल. त्याशिवाय,

कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.

अशा प्रकारच्या वाक्यांनी गैरसमज होऊ शकते. इलेक्ट्रॉन्सना स्वतःची काही इच्छा असते असा काही या वाक्याचा अर्थ निघतो आहे. No two electrons are in the same orbit अशा प्रकारच्या वाक्यांचे शब्दशः भाषांतर चांगल्या मराठीत करत नाहीत. प्रस्तुत वाक्याच्या ठिकाणी "कोणत्याही दोन इलेक्ट्रॉन्सची कक्षा एकसमान नसते" अशा प्रकारची वाक्यरचना शास्त्रीय लिखाणात आढळते.

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 9:23 pm | नरेंद्र गोळे

अदिती,

हजाराहून जास्त वाचने आणि सत्तराहून अधिक प्रतिसाद झाल्यानंतर गुणवत्तेवर आधारित आक्षेपांना उत्तर देण्यास उसंत मिळते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सुदैव इतकेच की प्रत्यक्षात ती वेळ आली.

अनुवाद यथातथ्य झाला नाही असे होऊ शकते. तसे आढळल्यास ती माझी चूक मी नक्कीच पदरात घेईन.

अनुवादातील त्रुटी उघड व्हाव्यात म्हणूनच तर मी मूळ उताराही एका प्रतिसादात दिलेला आहे.

"कोणत्याही दोन विजकांची कक्षा एकसमान नसते" ही आपण सुचवलेली शब्दयोजना जास्त समर्पक आणि निस्संदिग्ध आहे. मला ती मंजूर आहे.

अग्यावेताळ's picture

26 Apr 2012 - 9:58 pm | अग्यावेताळ

>>>सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम”

ह्याचे मराठीकरण नाहि केलेत हो? ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह आणि जे टीकेचे ते काय कावळे काय?

>>>सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम”
ह्याचे मराठीकरण नाहि केलेत हो? >>>>
अरेच्चा राहिलेच की! सरशोभा एक हंस वाढवी, लाख काक कुचकाम

ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह आणि जे टीकेचे ते काय कावळे काय?>>>>
नाही हो. अग्या वेताळही आहेतच की.

ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह, कावळ्यांची काव काव आणि अग्या वेताळांची लावालाव ह्यांचीही वाह वाह.
असेच करण्याचे दिवस आलेले आहेत. कालाय तस्मै नमः

उत्तम माहितीपूर्ण लेख आहे नेहमीप्रमाणेच. यापूर्वीही खूप वेगवेगळे विज्ञानविषय श्री. गोळे यांनी मांडले आहेत आणि हा मराठीतला स्तुत्य उपक्रम आहे. शुभेच्छा.

बाकी मराठीच्या मूलगामी रुपाविषयी. कोणत्याच क्षेत्रात मूलतत्त्ववादी, मूलनिवासी, अस्मिताधारक असू नये असं आपलं आमचं एक वैयक्तिक मत. या चार्तीन गोष्टींमुळे जगात निम्म्या समस्या उभ्या राहतात.

समजणं महत्त्वाचं. नवे मराठी शब्द रुढ केले पाहिजेत असं वाटत असेल तर आजच्या काळात पचतील असे हलके शब्द बनवावे. एक उदाहरण देतो. कै. डॉ. विवेक परांजपे या निसर्गप्रेमी अभ्यासक डॉक्टरांनी ऐंशीच्या दशकात "आपली सृष्टी-आपले धन" नावाची मराठीत प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई आणि मजकूर असलेली ग्रंथमालिका बनवली होती. त्यात यच्चयावत प्राणीसृष्टीचा (सूक्ष्मजंतूंपासून, पक्षी ते सस्तन प्राण्यांपर्यंत सर्व) मराठी नामसंग्रह होता. प्रत्येक फोटोला मराठी नाव (प्रचलित असेल तर कष्टाने शोधून किंवा नसेल तर तयार करुन..) पण ही तयार केलेली नावं इतकी सुलभ होती की एक आदर्श उदाहरण म्हणून त्याचा अभ्यास करावा. वॅगटेल या पक्ष्याचे भाषांतर शेपूट वरखाली हलवणारा पक्षी , "पुच्छहलव्या" किंवा "पॅरेडाईज फ्लायकॅचर"चे रुपांतर "नंदनवनातील मक्षिकाभक्षक" असे न करता त्यांनी उदा. धोबी, वटवट्या, सातभाई, शेकाट्या अशी प्रचलित नावं शोधून दिली होती आणि जिथे तशी नव्हती तिथे याच चालीवरची सोपी सुटसुटीत नावं बनवली होती..

जुनी भाषा काही असो, आजरोजी सर्वांना वाचताना आनंद मिळणंही गरजेचं आहेच. फक्त विज्ञानच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात अशा भाषेत परिच्छेद आले की वाचक अर्ध्यात सोडून जाण्याची आणि अर्थात त्यामुळे मूळ सत्त्व त्याच्यापर्यंत न पोचण्याची भीती राहते. उदा.

व्यष्टी आणि समष्टी यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य काढण्याची सर्वसमावेशक क्रिया समाजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे का आणि असल्यास तिचे व्यष्टी अंगाने संदर्भघनत्व किती आणि समष्टीच्या अंगाने किती याचा ताळमेळ प्राधान्याने गरजेचा आहे. विविध सामाजिक, आर्थिक, पारंपरिक आणि अपारंपरिक व्यष्टी एकमेकींना छेद देत आणि तरीही समांतर राहून समाजउर्जेची एकूण परिमिती आणि भूमिती आपल्याला दाखवतात. दुर्दैवाने या भूमितीमागचे बीजगणित अध्याहृतच राहते. अनंत अंतरावर एकमेकांशी संलग्न होणा-या या समाजरेषा आपल्या वाटेच्या दोन्ही बाजूंना एक उर्जास्रोत स्त्रवत जातात आणि उजव्या आणि डाव्या विचारसरणी जन्माला येत जातात.

काळजी नको.. पूर्वी एका ठिकाणी हे मीच लिहिलंय. ;) कोणीही यापूर्वी वाचलं असण्याची शक्यता नाही.. ;)

कै. डॉ. विवेक परांजपे या निसर्गप्रेमी अभ्यासक डॉक्टरांनी ऐंशीच्या दशकात "आपली सृष्टी-आपले धन" नावाची मराठीत प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई आणि मजकूर असलेली ग्रंथमालिका बनवली होती. त्यात यच्चयावत प्राणीसृष्टीचा (सूक्ष्मजंतूंपासून, पक्षी ते सस्तन प्राण्यांपर्यंत सर्व) मराठी नामसंग्रह होता.>>>
मीही हे सर्व खंड वाचले आहेत. मला ते बेहद्द आवडलेली आहेत.

अजूनही मिळतात का हो त्याच्या प्रती? माझ्या चार खंडांपैकी दोन विविध लोकांनी वाचायला म्हणून नेऊन गायब केले. मनस्ताप वाटतो या गोष्टीचा.. :(

पाचवा खंड दुर्दैवाने निघूच शकला नाही अशी माझी समजूत आहे, कारण एकदाच रक्कम भरा स्वरुपाच्या योजनेत ८५ सालच्या सुमारास पैसे भरुन ते खंड ऑर्डर केले होते. पहिल्या खंडाच्या वेळेसच डॉ. परांजपेंचं निधन झालं आणि सगळा प्रकल्प आर्थिक संकटात सापडला. मग अनामत रक्कम परत करु नका असं सांगून चाहत्यांनी तो प्रोजेक्ट जगवला. त्यांच्या मित्रांनी चिकाटीने चार खंड काढले. पाचवा बहुधा नाही जमू शकला असं मला वाटलं होतं कारण तो खंड कधीच आला नाही.

याविषयी वेगळी काही माहिती आहे का?

त्या प्रती नितांतसुंदर होत्या, मिळाल्या तर मलाही हव्याच आहेत!

कवितानागेश's picture

26 Apr 2012 - 1:11 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर खंड आहेत. आणि भाषा अत्यंत सोपी आहे.
पाचवा खंड मात्र निघाला नाही. मी काही वर्षांपूर्वी चौकशी केली होती.

पाऊली नावावरून मस्त "हेट स्टोरी" असेल असे वाटले... पण अंमळ निराशा झाली... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

फारच उत्सुकतेने धागा उघडला, मात्र निराशा झाली.

हेटस्टोरीचे परिक्षण असावेसे वाटले होते.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

फारच उत्सुकतेने धागा उघडला, मात्र निराशा झाली.

निराशा होत असेल तर असे धागे उघडावेच कशाला ? वरच्या तद्दन फालतु प्रतिक्रियेचे कारण कळालेले नाही.

सुस्त बंदर

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

ख्या ख्या ख्या

भिक्कु

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार

येवढ्या गंभीर सिद्धांताच्या धाग्यावरती भिक्कुला दात काढायला काय झाले ते समजले नाही.

अल्पा ढ

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार

अल्पा ढ ह्यांच्याशी सहमत होण्यावाचून गत्यंतर दिसत नाही. परा मोठा हो !

हलकट मोदक

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

खरच मोठे होण्याची गरज आहे.
मुळात माणसाने काय लिहिले आहे ते वाचावे, माणासावरुन लिखाणाची पारख करू नये.

लपून वारकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार

लेख मलादेखी बोजड आणि कंटळवाणा वाटला. अर्थात तो हेटस्टोरीचे परिक्षण नाही या करणाने नाही, तर त्यात काही विदा उपलब्ध करून दिला नसल्याने तो रटाळ वाटला. वाचता वाचता 'सिद्धांत ज्वलन' असे विडंबन देखील सुचले.

व्यर्थेश कळबडवी

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

सरड्याचे ठिक आहे पण हा सिद्धांत विहिरीतले बेडूक आणि समुद्रातले देव माशे ह्यांच्या बाबतीत काय सांगतो ?

खारे दाणे

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

पण माझा मुद्दा वेगळाच आहे.

संपादित

कृपया स्वत:च्या लेखनावरती एका मागोमाग एक प्रतिसाद देऊन आपले भिकार लिखाण उगीच गाजवून सोडू नये अशी परा ह्यांना तंबी देण्यात येत आहे.

चंपादक

काय पराषेठ, महाभारतातलं कोणतं पात्र संचारलंय अंगात?
पार सगळ्यांच्याच रथाचे घोडे उधळून लावलेत..

=)) =) =)) =)) =) =)) =))
=) =)) =)) =) =))
=) =)) =))
=) =))
=))
सिद्धांत ज्वलन वर जीव जाई पर्यंत हसलो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Apr 2012 - 12:30 am | विश्वनाथ मेहेंदळे

"खिसियानी बिल्ली खंबा नोचे" अशी काहीशी म्हण आठवली. ;-)
(ह घ्या हो ....)

बॅटमॅन's picture

7 May 2012 - 12:12 pm | बॅटमॅन

खिसियानी म्हंजे वो काय?

येवढ्या गंभीर सिद्धांताच्या धाग्यावरती भिक्कुला दात काढायला काय झाले ते समजले नाही

"काय" नाही हो.. "कै" लिहावं..
"नाय" नाही हो .. "नै" लिहावं..

षुद्धलेखनाकडे लक्ष द्या..

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. गवि

असे म्हणतात की “सौ सोनार की एक लोहार की” त्यानुसार आपला प्रतिसाद मला मोलाचा वाटतो आहे.

प्यारे१'s picture

27 Apr 2012 - 10:43 am | प्यारे१

मायला, गविंचं एक बारीक लक्ष हो ' लोकां'च्या लिखाणाच्या ष्टाईल कडं????

बाकी , पर्‍याचा 'या' विषयावरचा 'तो' अभ्यास दांडगा असल्यानं नि त्याचा 'ह्या'त हातखंडा असल्यानं परानं अधिकाराचा वापर केला एवढंच!
च्यामारी धरुन फट्याक! ___/\___ :)

इरसाल's picture

26 Apr 2012 - 2:22 pm | इरसाल

उत्तम प्रकारे समजावून दिले.
आताशा बहुसंख्य मराठी शब्द विसरले गेले आहेत असे मला स्वतःला जाणवत आहे.

नरेंद्र गोळे's picture

26 Apr 2012 - 7:18 pm | नरेंद्र गोळे

आताशा बहुसंख्य मराठी शब्द विसरले गेले आहेत असे मला स्वतःला जाणवत आहे.>>>>
खरंय! लोकांना आपल्या भाषेतले साधेच शब्द बोजड वाटत आहेत आणि इंग्रजीतले सज्जड भारी शब्द सहजसुंदर वाटत आहेत. ही आपल्या मायबोलीची प्रगती समजायची की अधोगती?

गोळे साहेबांनी हा लेख लिहीण्यास चांगला दिवस निवडला असे म्हणतो.

रामदासजी,

हो. खरंय! २५ ला पाऊली ह्यांचा जन्मदिवस होता.

हे शोधून काढून इथे जाहीर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

26 Apr 2012 - 10:49 pm | जयंत कुलकर्णी

विजकवर्ज सिद्धांत हे कसे वाटते ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Apr 2012 - 12:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या शब्दाचे अर्थ, डिक्शनरी.कॉमवर दिल्याप्रमाणे
1. an act or instance of excluding.
2. the state of being excluded.
3. Physiology . a keeping apart; blocking of an entrance.
मेरियम-वेबस्टरवर exclude या क्रियापदाचा अर्थ हा आहे:
transitive verb
1 a : to prevent or restrict the entrance of
b : to bar from participation, consideration, or inclusion
2 : to expel or bar especially from a place or position previously occupied

मुळात विज्ञान लक्षात घेता वगळणे अथवा वर्ज असणे यात जी अर्थछटा आहे, त्याने योग्य अर्थबोध होत नाही. डिक्शनरीवरचा तिसरा अर्थ आणि मेरियम वेबस्टरवरचा दुसरा अर्थ इथे चपखल लागू आहे. आधीपासून उपयोगात आल्यामुळे वगळणे, निरूपयोगी ठरणे अशा काही अर्थाचा मराठी शब्द (मला सुचलेला नाही) इथे आवश्यक आहे. 'वगळ' या क्रियापदापेक्षा 'वर्ज' हे नाम अधिक चपखल वाटले.

पारिभाषिक कोषात exclusion साठी अपवर्जन (हे उगाच up-version असं वाटलं.) हा शब्द वापरलेला आहे. अपवर्जन हा शब्द मला माहित नव्हता. मूळ शब्द/क्रियापद वर्ज यावरून तो आला असावा. इतर अर्थाने वापरात असलेली अर्थछटा या शब्दातून व्यक्त होत नाही, त्यामुळे तो प्रथमदर्शनी पटण्यासारखा वाटतो.

Pauli exclusion principle याचं भाषांतर पॉली अपवर्जन तत्त्व (अपवर्जन तत्त्व) असे केले आहे. (यापेक्षा Pauli's किंवा पॉलीचे अपवर्जन तत्त्व अधिक ग्राह्य वाटते. किंवा Heigenberg's uncertainty principle) मुळात पॉली/पावलीचे तत्त्व हे फक्त इलेक्ट्रॉनसंदर्भात नसून संपूर्ण फर्मिऑन या कणांच्या गटासंदर्भात आहे. त्यामुळे नावात इलेक्ट्रॉन्सचा उल्लेख करणे अशास्त्रीय वाटते. करायचाच असल्यास फर्मिऑन्स किंवा spin-half/अर्ध-आभ्रामी कणांचा करता येईल.

===

इतरत्र electron spin यातल्या spin साठी आभ्राम अशा (पुन्हा माहित/प्रचलित नसलेला) शब्द वापरलेला आहे. तो रसायनशास्त्राच्या गटात टाकलेला आहे, पण मुळात antiparallel spin असा शब्दप्रयोग अणूरचनेत, इलेक्ट्रॉनच्या संदर्भातच वापरला जातो. अणूरचनेसंदर्भात मिळालेले काही नोबेल पुरस्कारही रसायनशास्त्राचे म्हणून दिलेले आहेत. हे शास्त्रज्ञ स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ म्हणवत. तेव्हा रसायनशास्त्र का भौतिकशास्त्र या वादात न शिरणंच इष्ट.

याच पारिभाषिक कोषात इलेक्ट्रॉन हा शब्द इलेक्ट्रॉन असाच वापरलेला आहे. "bunches of electrons" याचे भाषांतर इलेक्ट्रॉनांचे गुच्छ असे करताना इलेक्ट्रॉन या शब्दाचे इलेक्ट्रॉनां असे सामान्य रूप करून इलेक्ट्रॉनला "आपला" बनवून टाकला आहे. तीच गोष्ट प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची.

इतरत्र काही चर्चेत पारिभाषिक कोषाची लिंक दिल्याबद्दल धनंजय यांचे आभार.

नरेंद्र गोळे's picture

27 Apr 2012 - 9:09 am | नरेंद्र गोळे

अदिती,

जाणीवपूर्वक आणि सातत्याने, सविस्तर प्रतिसाद देऊन मोलाच्या चर्चेत महत्त्वाचे योगदान दिल्याखातर अनेकानेक धन्यवाद.

प्रिन्सिपलला तत्त्व आणि थिअरीला सिद्धांत म्हणावे हे आपले म्हणणे सयुक्तिक असून मला पटलेले आहे.

इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे शब्द मराठी नाहीत. त्यांना सशक्त पर्याय असायलाच हवेत.
मी त्यांकरता विजक, धनक आणि विरक्तक हे पर्याय सुचवले आहेत.

यात ऑन करता क हा उपसर्ग शब्दाशेवटी वापरलेला असल्याने फर्मिऑन्स करता फर्मिक हा शब्द मी सुचवत आहे.

क्रिटिकल म्हणजे क्रांतिक ह्या शब्दाला उप आणि अप हे उपसर्ग लावून सब-क्रिटिकल म्हणजे उप-क्रांतिक आणि सुपर-क्रिटिकल म्हणजे अप-क्रांतिक (अति-क्रांतिक) हे शब्द वापरात आहेत. यात अप चा अर्थ अति अशासारखा होत असल्याने अपवर्जन ऐवजी नुसताच वर्जन शब्द सयुक्तिक ठरेल. सबब अवस्था-वर्जन-तत्त्व असा एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा उल्लेख करता येऊ शकेल. आपण काय म्हणता?

भ्रम भ्रामयति क्रियापदावरून आभ्राम शब्द आला असावा. आभ्राम शब्दाची आणखी चिकित्सा व्हायला हवी. फिरत हा मी सुचवलेला शब्द आपल्या कसा वाटतो?

पारिभाषिक कोष प्राथमिक आणि नवा आहे. त्यापाठी पुरेसा अभ्यास असावा अशी स्थिती दिसत नाही. त्याचा या बाबतीत विशेष विचार करण्याची आवश्यकता नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Apr 2012 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुचवलेला शब्द आपल्या कसा वाटतो?

आभ्राम आणि फिरत हे दोन्ही शब्द मला समजत नाहीत. भाषांच्या शब्दखेळात हरवण्यापेक्षा मला त्यातलं विज्ञान अधिक महत्त्वाचं वाटतं. भाषा काल होती तशी आज नाही, आज आहे तशी उद्या रहाणार नाही. पावलीचं एक्सक्लूजन प्रिन्सिपल होतं तसंच रहाणार. शाश्वत गोष्टींबद्दल मला ममत्व आहे.

व्यवहारात, मी फार जास्त मराठी लोकांशी भौतिकशास्त्राबद्दल बोलत नाही; किंबहुना भाषेमुळे मला माझी कोणत्याच विषयातली समज, जाणीव मर्यादित ठेवायची इच्छा नाही.

टेबल, बटाटा, अननस, पेन वगैरे शब्दांप्रमाणे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा स्पिन, वगैरे शब्द मराठीतही आहेत. गुरू, पक्का, जंगल, वोक, लिची, जिनसेंग, फेंगशुई, टायफून, त्सुनामी असे अनेक शब्द स्वीकारले जातात म्हणूनही मला इंग्लिश भाषा आवडते. "मला बी जत्रंला येऊ द्या की रं" किंवा "आंगळू धवूला गेला आहा" ही बोलीभाषा माझ्या वापरातली नसली तरीही मराठीची शुद्ध बोलीभाषा म्हणून मला मान्य आहे. माझी आणि इतर अनेकांची बोलीभाषा इतरांनी अशुद्ध किंवा अमराठी मानली तरी पर्वा इल्ले.

नवीन शब्द शब्दकोषातून लोकांच्या वापरात येत नाहीत; लोकांच्या वापरातून शब्दकोषात जातात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा स्पिन, वगैरे शब्द मराठी मानून वापरणार्‍यांचं प्रमाण माझ्या माहितीत प्रचंड जास्त आहे. आजूबाजूला पहाता भविष्यातल्या शब्दकोषांमधे हेच शब्द रूजणार. 'सही' या मराठी शब्दाचा आज शब्दकोषातला अर्थ फक्त स्वाक्षरी, हस्ताक्षर (हिंदी), signature असा असेल तर अद्ययावत शब्दकोषात बोलीभाषेतला वापर या अर्थाने झकास, उत्तम, इ. असेही अर्थ असायला हवेत. नसतील तर मराठी शब्दकोष काळाच्या मागे पडले आहेत. मराठीतली अर्बन डिक्शनरी सुरू करण्यास चिक्कार वाव आहे.

जयंतराव,

आपणही ह्या चर्चेत रस घेत असल्याचे पाहून आनंद झाला.
पाऊली ह्यांचे तत्त्व विजकांना विवक्षित अवस्था धारण करण्यापासून वर्जित ठरवत असल्याने

अवस्था-वर्जन-तत्त्व असे ह्या तत्त्वास म्हणावे असे मी आपल्या सूचनेचा वापर करून सुचवित आहे. आपले काय मत आहे?