लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते.
१) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला.
२) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे.
ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले. त्यातच एका मित्राकडून हा चित्रपट ब्लड डायमंडसवरून उचलल्याचे समजले. आता ब्लड डायमंड वरून उचलला आहे म्हणाल्यावरती एकदा बघायला हरकत नाही असा विचार मनात डोकावला आणि त्यातच ब्लडमनीचे पहिले पोस्टर रिलीज झाले. बघतो तर ते पोस्टर टाइम ट्रॅव्हलर्स वाइफची नक्कल. भट्ट गँग आजकाल चित्रपटच नाही तर पोस्टर्स देखील नक्कल करायला लागले आहेत, हे जीस्म २ पासून उघड झालेले आहेच. असो..
खरेतर चित्रपटगृहाबाहेर पोचल्या पोचल्या समोर एजंट विनोद आणि ब्लड मनी असे दोन पर्याय समोर आले. दोन्हीची तिकिटविक्री काही वेळाने १ तिकिटावरती २ तिकिटे आणि ४ सामोसे फ्री अशा अवस्थेत जाईल अशी होती. पण मी निग्रहाने 'एजंट विनोद' कडे काणाडोळा केला आणि ब्लड मनी कडे धाव घेतली. 'विनाशकाले विपरीत बुद्धी'. ह्या चित्रपटाचे नाव ब्लड मनी का ठेवले असावे ह्याचा उलगडा पहिल्या १० मिनिटातच झाला. दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी.
कुणाल (कुणाल खेमू) हा एक फाटका तरुण, त्याचे आरझू (अम्रिता पुरी) वरती प्रेम असते. पण ह्याच्या फाटक्या चाळ्यांमुळे पोरीच्या घरचे लग्नाच्या विरोधात. मग दोघे पळून जाऊन लग्न करतात. लग्न झाल्याबरोबर कुणाल खेमूच्या हातावरच्या रेषा पुन्हा उजळतात आणि त्याला एकदम केपटाऊनमध्ये डायमंड एक्स्पोर्टचा बिझनेस करणार्या फर्म मध्ये जॉब मिळतो. त्या आधी कुणाल खेमू भारतात पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो म्हणे.
धर्मेश झवेरी (मनीष चौधरी) आणि दिनेश झवेरी ( संदीप सिकंद) हे दोन बंधू ह्या फर्मचे मालक दाखवलेले आहेत. खरेतर चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा धर्मेश झवेरी कोणा एकाचा मार मार मारून, आपण किती कमीने आहोत ह्याचा पाढा वाचून खून करताना दाखवलेला असल्याने, कुणाल कुठे येऊन आदळला आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच कळते. त्यामुळे अंधारात आजूबाजूचे चेहरे न्याहाळण्यासाठी आपल्याला पुढे बराच वेळ मिळून जातो. आल्या आल्या ह्या कुणालला एक लक्झरी बंगला राहायला मिळतो आणि एक ताबडतोब जीवाभावाचा मित्र देखील मिळतो. कंपनीत दाखल झाल्या झाल्या हा कुणाला करोडोंची डिल जी दिनेश झवेरीला करता येत नसते ती अशी चुटकीत करतो आणि धर्मेश तिवारीच्या गळ्यातला ताईत बनून जातो. ती डिल तो इतक्या बालिशपणाने करताना दाखवलेला आहे, की हा चित्रपट कुठल्याही 'झ' दर्जाच्या चित्रपटाची देखील नक्कल असण्याची शक्यता नाही हा अजून एक धक्का आपल्याला बसतो. आता कुणाल हा गळ्यातला ताईत झालेला असल्याने ताबडतोब धर्मेश झवेरी त्याला आपल्या घरी पार्टीला बोलावतो. ह्याच पार्टीत मग दिनेश झवेरी त्याची सेक्रेटरी मिया उएदा हिला कुणालच्या मागावरती सोडतो. ही भवानी संपूर्ण चित्रपटात भडक लिपस्टिक लावणे, आखूड शब्द देखील लांब वाटेल असे कपडे वापरणे आणि जाता येता कुणालच्या अंगचटीला जाणे ह्या शिवाय काहीही काम करताना दाखवलेली नाही. आता कुणालसमोर धर्मेश तिवारी एक पैशाचे जादुई जग उभे करतो, जिथे पैसा, मान मरातब, आलिशान गाड्या, दारू आणि जोडीला ही अवदसा अशी सगळी सुखे हात जोडून उभी असतात. त्यामुळे मग केपटाऊन मध्ये आल्या आल्या फक्त एखादं दोन दिवस बोंबलत हिंडल्यानंतर कुणाल आता आरझूच्या वाटेला येणे बंदच होते. त्याच्या पार्ट्या, त्याच्या रात्र रात्र चालणार्या मीटिंग्ज ह्यामध्ये तो व्यस्त होऊन जातो.
आरझू ही टिपीकल बायको असल्याने तिला ह्या सगळ्याचा त्रास सुरू होतो. अधे मध्ये कुणाल तिला लाडाने 'झू' वगैरे म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण ती काय ऐकायला तयार नसते. अशातच कुणालला आपला बॉस दिनेश तिवारी हा फ्रॉड करत असल्याचे लक्षात येते आणि तो मग सगळे आपल्या बॉसच्या कानावरती घालतो. अर्थातच बॉस लगेच त्याला एक उंची हॉटेलात जेवायला नेतो आणि एक बालिश लेक्चर आणि उदाहरण देऊन आपल्या कामाशी काम ठेवायचा सल्ला देतो. कुणाल मात्र 'मला सत्य समजलेच पाहिजे' अशी भूमिका घेतो. त्यातून त्याला आपल्या धंद्यात माफियांचा देखील समावेश असल्याचे कळते आणि तो हादरतो. पण पैशाची उब मिळालेला आणि चैनीला हपापलेला कुणाल हे सत्य मान्य करूनही आपल्या कामाला लाथ मारत नाही. उलट अजून जोमाने कार्यरत होतो. पुढे एका रात्री पार्टीत तो भरपूर दारू ढोसून आणि अंमली पदार्थ खाऊन मिया उएदाशी देखील रत होतो. (येवढा एकच प्रसंग जरा थोडा फार डोळे भरून बघण्यासारखा आहे. )
मग त्याच्या प्रगतीवरती जळणारा त्याच्या बॉसचा लहान भाऊ दिनेश त्याला त्याचे आणि मियाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो. उद्ध्वस्त अवस्थेत पोचलेला कुणाल मग आरझू पाशी सत्य काय ते स्वतःच बोलतो. ताबडतोब आरझू उन्मळून + कोसळून पडते आणि भारतात परतण्याचा निर्णय घेते. मधल्या काळात ती कुणालचा मित्र आणि त्याच्या बायकोकडे आश्रयाला जाते. इकडे कुणालला एक डिल डन करत असताना अचानक आपला बॉस दहशतवाद्यांसाठी देखील काम करत असल्याचे कळते. खरंच सांगतो, इतका मतिमंद प्रसंग मी आयुष्यात कधी मराठी सिनेमात किंवा रामसे बंधूंच्या सिनेमात देखील पाहिलेला नाही. हा दहशतवादी सरदार एका हिर्यांच्या खाणी पाशी ह्या कुणालची वाट बघत बसलेला असतो, त्याच्यासाठी पाठवलेल्या पेट्यांमधून बंदुका असल्याचे कुणालला तिथे लगेच तो बॉक्स असा काड्यापेटी सारखा उघडा पडल्याने लगेच समजते. इकडे ह्या दहशतवाद्याला भेटून ५/६ मिनिटात परत येत असतानाच त्याच बंदुका घेऊन ह्या दहशतवाद्याच्या माणसांनी केपटाऊनमध्ये अनेकांची हत्या केल्याची दृश्ये टीव्ही वरती दाखवली जायला लागतात.
इमॅजीन करा, कुणाल खेमू त्याच्या प्रायव्हेट प्लेन मधून केपटाऊन मध्ये पोचण्याच्या आधीच शस्त्रे पोचतात आणि दंगल पण होते.ह्या दंगलीत कुणालचा मित्र देखील मारला जातो. कुणाल पोचेपर्यंत त्याचे दफन देखील झालेले असते. आता देशाभिमान आणि मानवनेते पेटून उठलेला कुणाला आपल्या बॉसच्या विरोधात जातो. अता तो विरोधात जातो म्हणजे नक्की काय माकडचाळे करतो ते पाहायला आणि हो ह्या चित्रपटाचा 'न भूतो न भविष्यती' असा शेवट बघायला म्हणून का होईना तुम्ही थेटरामध्ये जायलाच पाहिजे. गेला बाजार टोरेंट तरी उतरवलेच पाहिजेत.
प्रतिक्रिया
5 Apr 2012 - 2:27 pm | अमृत
||१ तिकिटावरती २ तिकिटे आणि ४ सामोसे फ्री
:-) :-) जबर्या परिक्षण. . . गनिमत कु.खे. ला मराठी येत नाही. :-)
बाकी तुमच्या धाडसाला सलाम.
अमृत
5 Apr 2012 - 2:20 pm | पप्पुपेजर
+१
आज जाणार होतोच आता विचार करावा लागेल !!!!!१
5 Apr 2012 - 2:21 pm | स्पा
हो ह्या चित्रपटाचा 'न भूतो न भविष्यती' असा शेवट बघायला म्हणून का होईना तुम्ही थेटरामध्ये जायलाच पाहिजे. गेला बाजार टोरेंट तरी उतरवलेच पाहिजेत.
येडा समजला काय रे....
:D
तुझ नाव दिसल म्हणून परीक्षण तरी वाचायचे कष्ट घेतले
बाकी आम्ही एजंट विनोद बघून.. माती खाऊन आलोच होतो. :D
अवांतर : परीक्षण नेहमीप्रमाणे भन्नाट :)
5 Apr 2012 - 2:30 pm | अन्या दातार
अरे बॉलिवूडचे लोक किती मूर्खपणा करु शकतात यासाठी टॉरेंट्स घ्यायचे रे. सगळंच प्रेक्षणीय आहे म्हणून विकते असं नाही ना ;)
परा, जबरी चिरफाड, आपलं, परीक्षण रे.
5 Apr 2012 - 2:24 pm | प्यारे१
मे द सोल रेस्ट इन पीस..... आमेन!
5 Apr 2012 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
@दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य,
हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी. >>>
5 Apr 2012 - 2:34 pm | पहाटवारा
"हा चित्रपट कुठल्याही 'झ' दर्जाच्या चित्रपटाची देखील नक्कल असण्याची शक्यता नाही"
आम्हाला टुकार चा 'ट' दर्जा माहीत होता बॉ .. पण हे 'झ' दर्जा काय आहे ;)
5 Apr 2012 - 2:35 pm | मन१
दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी.
एकाच वाक्यात सार आलेलं आहे.
5 Apr 2012 - 2:42 pm | यकु
ज्जे ब्बात!!!!
पार थेटराच्या दारापर्यंत जाईपर्यंत थांबलो नाही.
परा'क्षणाच्या 'या' स्टाईलवर आपण फिदा!
5 Apr 2012 - 2:42 pm | कपिलमुनी
परा पासून लांब राहिला पाहिजे ..
5 Apr 2012 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार
मला काय कावळा शिवलाय का काय ?
5 Apr 2012 - 3:55 pm | उपास
पराचा कावळा करतोय रे तो.. :-))
परिक्षण खासंच.. मजा आला.....
5 Apr 2012 - 2:51 pm | प्रीत-मोहर
ह्म्म. येत्या शनवारची टिकीटे काढायची आहेत.लक्षात आहे ना?
" साला माझी संध्याकाळ वेष्ट करुन ठेवलीन होती ह्या पर्यानं . त्यापेक्षा त्या एजंट विनोद मधे डोळे भरुन पहायला मला सैफु आणि पर्याला करिना तरी होती. हलकट्ट साल.... डॉक्याला शॉट लावायला हे पिच्चर पहायला घेउन गेलं न स्वतःबरोबर माझेही पैसे वाया घालवले. तरी मी म्हणत होते चल रे एजंट विनोद ला जाउ.. पण दुसर्याच ऐकेल तर ....." अस माझ्या मनातही आलेल नाही ;)
आक्खं थिएटर पुर्ण पिच्चर संपेपर्यन्त खळखळुन हसत होत. एवढा हा चित्रपट विनोदी होता. आणि अस निखळ कॉमेडी चित्रपट पहायला मी तरी कधीच गेले नसते .केवळ न केवळ पर्यामुळे ह्या महान कलाकृतीचा आस्वाद मी घेउ शकले. म्हणुन त्याचे अभिनंदन आणि आभार!!!!
जय म्हाराष्ट्र.
अवांतरः परा काउंट २ झाल्या गेला आहे... विंटेज कार्स + रक्त्-पैसा!!!! च्यायला धम्या , डान्याला पण प्ल्यान मधे घेतल पायजेल राव..वसुलीला तेव्हढच बर पडतं
5 Apr 2012 - 3:09 pm | स्पा
परासोबत चित्रपट पहिला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न
5 Apr 2012 - 3:18 pm | प्रीत-मोहर
पर्या सोबत पिच्चर बघितला तर काय? big deal. तो काही Robert Pattinson नाही की ज्याच्यासोबत पिच्चर बघितला तर मी ते जगजाहिर करेन, "ए मी Robert Pattinson सोबत पिच्चर बगितला" .पर्या सोबत पिच्चर बघितला हे कुणाला सांगण्याची मला मुळीच्च गरज नाही मि. म. फे.
फक्त हा कसा डॉक्याला शॉट लावतो ते मला सांगायचे आहे.
6 Apr 2012 - 1:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
१००% सहमत !!!
अरे मन्या, तो प्रयत्न आपण परासोबत चित्रपट पहिला हे सांगण्याचा नसून पराने आपल्याबरोबर चित्रपट पाहिला हे सांगण्याचा आहे.
(आणि वरून तिकीट आपले आपल्याला काढायला लावले याचा हुशारीने उल्लेख करून ठेवला आहे, तो वेगळा)
मोठा हो रे मन्या, रीडिंग बिटविन द लाईन्स कर ;-)
6 Apr 2012 - 8:59 am | शिल्पा ब
तिकीटं कोणी काढली ? का डच पद्धत?
इंटरव्हलात काय काय खाल्ले प्याले?
5 Apr 2012 - 2:53 pm | विसुनाना
काय कळ्ळी नाय ईस्टोरी. आजकाल विग्रजी पिच्चरपेक्षा हिंदी पिच्चरच बाऊन्सर जात्यात.
हेच्यात कोणतरी 'जोमाने कार्यरत' अस्तो इक्तं कळ्ळं.
5 Apr 2012 - 3:15 pm | स्मिता.
ग्रह फिरले की अशी दुर्बुद्धी सुचते, बाकी काही नाही!! आम्ही 'गायब', '१-२-३', इ. इ. सिनेमे मल्टिप्लेक्स थेटरात पाहिले तेव्हा आमचेही ग्रह फिरलेले होते हे नंतर कळलं.
5 Apr 2012 - 3:18 pm | Dhananjay Borgaonkar
पण मी निग्रहाने 'एजंट विनोद' कडे काणाडोळा केला आणि ब्लड मनी कडे धाव घेतली
तुमच्या या निर्णयाचे या ठिकाणी मी कौतुक करु इच्छितो.
अतिशय दळ्भद्री कॅटेगिरीमधे मोडणारा असा तो एजंट विनोद आहे. आईचा घो त्या सैफ च्या...
5 Apr 2012 - 5:46 pm | ५० फक्त
आईचा घो त्या सैफ च्या... - अरे अरे एखाद्या मृत व्यक्तीला सुद्धा शिव्या द्याव्या लागतील एवढा वाईट चित्रपट असावा असं वाटलं नव्हतं.
5 Apr 2012 - 3:30 pm | मृत्युन्जय
एका महान विनोदी चित्रपटाला तुझ्यामुळे मुकणार मी. बाजारात ५० रुपयाची डीव्हीडी येइल तेव्हाच बघेन म्हणतो आता.
बाकी चित्रपट बराच जन्नत सारखाच वाटतो आहे नाही? भट्टांनी आपल्याच पिक्चरची कॉपी केली की काय? नव्या वेष्टनात जुनीच ष्टोरी.
5 Apr 2012 - 5:07 pm | मी-सौरभ
चित्रपट पाहिल्याबद्दल हबिणंदन ;) अन् परीक्षण लिहील्याबद्दल आभार :)
5 Apr 2012 - 5:09 pm | मुक्त विहारि
माझा वेळ वाचवलात त्याबद्दल मनापासुन धन्यवाद....
5 Apr 2012 - 5:20 pm | राजघराणं
भंगार चित्रपट
5 Apr 2012 - 5:35 pm | प्रचेतस
छप्परफाड परीक्षण रे परा.
5 Apr 2012 - 5:44 pm | गणपा
एक व्यनी धाडुन टोरेंट वरुन उतरवण्याचे कष्ट वाचवा आमचे. :)
5 Apr 2012 - 5:46 pm | ५० फक्त
धन्यवाद वेळ आणि पैसे वाचवल्याबद्द.
5 Apr 2012 - 5:52 pm | इरसाल
फुकटात मिळाला तर बघावा काय ? की ते ही नको ?
रक्तार्थ
रक्तपैसा
रक्ताळलेला पैसा
रक्तरुपये
रक्ताचा रुपया
रुपयाचे रक्त
5 Apr 2012 - 6:27 pm | तिमा
आम्ही 'कहानी' हा सिनेमा बघायला गेलो होतो तेंव्हा या 'ब्लड मनी' आणि 'एजंट विनोद' चे ट्रेलर बघितले. तेच इतके भयानक आणि शॉक देणारे होते की बघायला जाणे शक्यच नव्हते. एनी वे, काही अपवाद सोडले तर हिंदी चित्रपटांशी माझा संबंध हल्ली फक्त मुंबई-पुणे प्रवासातच येतो. तेंव्हाही मी दोन्ही कानांत साऊंड प्रुफ रबरी पुंगळ्या कोंबलेल्या असतात.
5 Apr 2012 - 7:02 pm | किसन शिंदे
ह्ये नाव बोर्डावर पाहून एवढ्या टुकार चित्रपटाचं परिक्शन पराने का लिहलं असावं असा प्रश्न पडला होता.:D
5 Apr 2012 - 8:16 pm | रेवती
बरं झालं बै. एका परिक्षणात दोन शिनेमे समजले.
ब्लड मनी आणि एजंट विनोद हे फुकट दाखवले तरी पाहणार नाही.
वेळ वाचला.
कुणाल खेमू त्याच्या प्रायव्हेट प्लेन मधून केपटाऊन मध्ये पोचण्याच्या आधीच
अग्ग्गग. वाईट्ट. लोकांना वेडं समजतात काय हे दिग्दर्शक?
6 Apr 2012 - 8:15 am | चौकटराजा
बर झालं बॉ पैसे गेले पराचे आणि आपले वाचले.
हाडाचा एकारान्त चित्पा...... शुक्रवारी पिच्चर कधीच बघत नाही . पस्तावलेला बघितला की तो रविवारी " आपले पैसे" वाचले म्हणून
मिसळपाव खाऊन सेलेब्रेट करतो.
5 Apr 2012 - 8:38 pm | पैसा
प्रीतमोहरचेही पैसे फुकट घालवल्याबद्दल पराला "एजंट विनोद" पहायची शिक्षा फर्मावण्यात येत आहे. भले त्याचं परीक्षण प्रीतमोहर लिहील नंतर कोकणीत.
6 Apr 2012 - 1:04 am | चिंतामणी
आँ.
ही शिक्षा कोणाला आहे?????????
6 Apr 2012 - 7:46 am | पैसा
तिकिटाचे पैसे त्याने खर्च करायचे हे गृहितच आहे! कोकणीत परीक्षण लिहायचं ही आम्हाला शिक्षा मुळीच नाही वाटत!
6 Apr 2012 - 11:09 am | प्रीत-मोहर
पराकडुन तिकिटाचे पैसे मी कशीही वसुल करेन . परीक्षण लिहायलाही पृओब्लेम नाही. पण त्यासाठी एजम्ट विनोदच का?
6 Apr 2012 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद अंमळ अश्लील वाटला.
असो..
6 Apr 2012 - 2:55 pm | प्रीत-मोहर
जशी दृष्टी तशी सृष्टी असे काहीसे म्हणतात ते आठवले.!!
6 Apr 2012 - 11:13 am | पैसा
ब्लड मनी बघितल्याबद्दल तुला शिक्षा नको? :D
5 Apr 2012 - 9:39 pm | एक
नाही विचारायचं कारण त्याच्या इतर पिक्चर्स च्या मानाने फ्रेममधे बराच प्रकाश दिसतो आहे.
एरवी त्याचे पिक्चर अंधारात शुट केल्या सारखे दिसतात. यावेळी पैसे मिळालेले दिसतात.
बादवे. पृथ्वीतलावरचे या जन्मीचे भोग भोगून संपवल्याबद्द्ल अभिनंदन.! :)
5 Apr 2012 - 9:42 pm | मृगनयनी
कुणाल खेमू आणि रणबीरसिन्ग ला पाहिलं.. की डोक्यात मुंग्या येतात. :|
"कुणाल खेमू" कुठल्यातरी चायनीज पिक्चरातल्या साईड हिरोसारखा वाटतो... सोहा अली खान ने काय पाहिलं असेल त्याच्यात.... :| मला तर तो "राजा हिन्दुस्तानी"मध्येच बरा वाटला होता.. ;)
आणि "रणबीरसिंग" कितीही साजशृंगार केला..आणि 'एवि एवि' केलं.. तरी कुठल्याही अॅन्गलने तो.पक्का झोपडपट्टीतलाच वाटतो... आणि त्याच्या बरोबर ती या कानापासून त्या कानापर्यन्त जबडा फाकवून हसणारी अनुष्का शर्मा पाहिली.. अक्षरशः डोक्यात जातं ते प्रकरण!
बाकी परा'चे परीक्षण नेहमीसारखेच चित्तवेधक!!! :)
'एजन्ट विनोद'चे "मजनू बना दे" गाणं कुठल्याश्या बांग्लादेशी माणसाचं ढापलेलं आहे.. की विकत घेतलेले आहे.... --- असे ऐकीवात आलेले आहे. "सैफ अली खान"चा ट्रेलर मधला लूक तरी फारसा इम्प्रेसीव्ह वाटत नाही.. कुठल्याश्या पेट्रोलपम्पावरचा ड्रन्कार्ड वाटतो... ... एकन्दर निराशाच पदरी पडते.... :|
5 Apr 2012 - 10:33 pm | सोत्रि
हे हे हे तिच्यातरी काय आहे पहण्यासारखे? :D
अॅक्चुली त्या दोघांनाही आपल्यात, दोघांच्यात, काही बघण्यासारखे काही नाही हे कळले असावे :)
- (कोणात 'काय' पहावे हे कळणारा) सोकाजी
5 Apr 2012 - 10:38 pm | जेनी...
कुणाल खेमू" कुठल्यातरी चायनीज पिक्चरातल्या साईड हिरोसारखा वाटतो...
रणबीरसिंग" कितीही साजशृंगार केला..आणि 'एवि एवि' केलं.. तरी कुठल्याही अॅन्गलने तो.पक्का झोपडपट्टीतलाच वाटतो... आणि त्याच्या बरोबर ती या कानापासून त्या कानापर्यन्त जबडा फाकवून हसणारी अनुष्का शर्मा पाहिली
सैफ अली खान"चा ट्रेलर मधला लूक तरी फारसा इम्प्रेसीव्ह वाटत नाही.. कुठल्याश्या पेट्रोलपम्पावरचा ड्रन्कार्ड वाटतो... ...
******************************************************
आमच्याकडुन ह्या वाक्यांसाठी हार ,तुर्रे आणि फुलांचा स्विकार करावा :D
5 Apr 2012 - 10:36 pm | सोत्रि
फक्त ह्या 'त्रिकालाबाधित सत्या'ची उकल केल्याबद्दल पराभाऊ तुम्हाला माफ केले ;)
- ('उजळ' हाताचा) सोकाजी
5 Apr 2012 - 10:51 pm | श्रीरंग
अत्यंत महागड्या चित्रपटग्रुहात "हऊसफुल्ल - २" पहा.. ब्लड मनी पाहिल्याचं दु:ख वाटेनासं होईल.
5 Apr 2012 - 11:36 pm | सुहास..
ही ही ही
6 Apr 2012 - 2:37 am | पिवळा डांबिस
आम्ही आमचे परममित्र श्री. परा याची चित्रपट परीक्षणे नित्यनियमाने वाचतो...
कारण ते स्वतः दिडक्या खर्च करून आम्ही काय बघू नये हे सुचवतात आणि आमच्या कोवळ्या मनाला वाईट परिणाम होण्यापासून वाचवतात.
म्हणून पुनःश्च धन्यवाद....
आता पराच्या परीक्षणाचं परीक्षण!! :)
बघतो तर ते पोस्टर टाइम ट्रॅव्हलर्स वाइफची नक्कल. भट्ट गँग आजकाल चित्रपटच नाही तर पोस्टर्स देखील नक्कल करायला लागले आहेत
कशावरून? प्रेयसीच्या पाठीवर डोकं ठेऊन झोपा काढायच्या हा काही फिरंग्याचाच हक्क नाहिये. त्यातही तो गोरा नायक चक्क डोळे मिटून खरंच झोपल्यासारखा वाटतोय. आमचा देशी नायक बघा, डोळे टक्क उघडे ठेवून सावधपणे पडलाय...
||अंगी नसे सावधपण, तया पोरगी गावणे कठीण ||
त्याला एकदम केपटाऊनमध्ये डायमंड एक्स्पोर्टचा बिझनेस करणार्या फर्म मध्ये जॉब मिळतो. त्या आधी कुणाल खेमू भारतात पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो म्हणे.
बघा, बघा, हे खेमूलोकं (खेमू म्हणजे सिंधी की पंजाबी की बंगाली, देव जाणे!!) पिझ्झ्यावरून थेट डायमंड एक्सपोर्ट करायला लागले. ते ही थेट केपटाऊनमधे!! याला म्हणतात जिगर...
नायतर नुसती आपली पेठ सोडून डेक्कनवर जाऊन पिझ्झा खायचा म्हंटलं तर जिवावर येतं तुमच्या!!!!
(बाकी त्या केपटाऊनचे जे कोणी राज ठाकरे असतील त्यांनी एकदा "खळ्ळ्...फट्याक!" केलं की समजेल त्या खेमूला!!)
धर्मेश झवेरी (मनीष चौधरी) आणि दिनेश झवेरी ( संदीप सिकंद) हे दोन बंधू ह्या फर्मचे मालक दाखवलेले आहेत.
मग? जर झवेरी आडनांव दाखवलं नसतं तर मग ते हिर्यांचे व्यापारी आहेत की कोबीचे हे तुम्हाला कसं कळलं असतं? आणि गोडबोले वगैरे नांव द्यायला महेश भट्ट म्हणजे काय आपले रामदास आहेत?
आरझू ही टिपीकल बायको असल्याने तिला ह्या सगळ्याचा त्रास सुरू होतो.
झाऽऽलं!! इथे मिपावरच्या सगळ्या विवाहेच्छू मुलांच्या तोंडून लाळ गळायला लागली....
टिपिकल? आयला, आपल्यात कुणाची रे बायको हे असले कपडे घालून आणि हातात हात घालून (आणि चक्क हसत!!) नवर्याबरोबर फिरते? मिपावरील अनुभवी (आणि प्रामाणिक) नवर्यांनी जाहीर कबूल करावं, आपला चायलेंज आहे!!!
अधे मध्ये कुणाल तिला लाडाने 'झू' वगैरे म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण ती काय ऐकायला तयार नसते.
खुळाच आहे, बायकोला झू म्हणतो? अरे लगीन करून पोरंबाळं झाल्यावर घराचं जे काही होतं त्याला झू म्हणतात...
आणि नवरा त्या झूमधला गोरिल्ला!!!
ही भवानी संपूर्ण चित्रपटात भडक लिपस्टिक लावणे, आखूड शब्द देखील लांब वाटेल असे कपडे वापरणे आणि जाता येता कुणालच्या अंगचटीला जाणे ह्या शिवाय काहीही काम करताना दाखवलेली नाही.
मग तिचा एखादा तसा फोटो टाकायला काय धाड भरली होती? मिपावरचे चार काका लोकं तरी बिचारे खूष झाले असते!!!
ज्येष्ठांची काही कदरच नाही तुम्हाला!!!
खरं तर ह्या एवढया एकाच कारणासाठी हे परीक्षण बाद ठरवायला पाहिजे!!
काय प्रभूमास्तर, खरां की खोटां?
:)
असो. मी चिरफाड करून आता दमलो!!
परीक्षण तसं बरं आहे, पण त्यात शुद्धलेखनाच्या चुका कमी पडल्या असं वाटतं....
आणि (हिन्दी पिच्चर असल्याकारणाने!!) खालचा सा पकडता आला नाहिये हेही जाणवतं!! ;)
तरी पुढल्या वेळेस काळजी घ्यावी. तुमच्यावर मिपाचं श्टांडर टिकवायची जबाबदारी आहे हे बजावून मी आपली रजा घेतो...
:)
6 Apr 2012 - 5:07 am | नंदन
हाण्ण!
हीच ती हिंदी पिच्चरांमधली प्रसिद्ध सूचकता किंवा सटल्टी असावी :)
=)) =))
और ये लगा (और एक) सिक्सर! :)
6 Apr 2012 - 11:33 am | मी-सौरभ
पूर्ण सहमत टू नंदन अॅण्ड प्यारे१
काका: आमचाही _/\_ घ्यावा
6 Apr 2012 - 1:58 pm | सुहास..
कशावरून? प्रेयसीच्या पाठीवर डोकं ठेऊन झोपा काढायच्या हा काही फिरंग्याचाच हक्क नाहिये. त्यातही तो गोरा नायक चक्क डोळे मिटून खरंच झोपल्यासारखा वाटतोय. आमचा देशी नायक बघा, डोळे टक्क उघडे ठेवून सावधपणे पडलाय...
||अंगी नसे सावधपण, तया पोरगी गावणे कठीण || >>>>>
ख प लो !!!
6 Apr 2012 - 9:13 am | प्यारे१
___/\___
पिडां काका ,
कृ शि सा न वि वि
क लो अ.
पुतण्या प्यारे
6 Apr 2012 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
पुढच्या वेळी नक्की काळजी घेतली जाईल, तसेच काही नयनरम्य + मनमोहक फटू टाकण्याची देखील सोय केली जाईल.
6 Apr 2012 - 6:45 pm | सूड
>>||अंगी नसे सावधपण, तया पोरगी गावणे कठीण ||
बघा, बघा, हे खेमूलोकं (खेमू म्हणजे सिंधी की पंजाबी की बंगाली, देव जाणे!!) पिझ्झ्यावरून थेट डायमंड एक्सपोर्ट करायला लागले. ते ही थेट केपटाऊनमधे!! याला म्हणतात जिगर...
नायतर नुसती आपली पेठ सोडून डेक्कनवर जाऊन पिझ्झा खायचा म्हंटलं तर जिवावर येतं तुमच्या!!!!
(बाकी त्या केपटाऊनचे जे कोणी राज ठाकरे असतील त्यांनी एकदा "खळ्ळ्...फट्याक!" केलं की समजेल त्या खेमूला!!)
ह्या वाक्यांना खपल्या गेलो आहे. :D :D
6 Apr 2012 - 10:07 am | इरसाल
परा, मृगनयनी आणि पिडांकाका,
तुमच्या ताटात ढीगभर मिसळ. (किंवा आपापल्या मनोराज्यानुसार वस्तु कल्पावी)
कं लिवलय कं लिवलय !! (एकही मारा पर क्या सॉलीड माराच्या चालीवर)
6 Apr 2012 - 2:10 pm | अमोल केळकर
सुपर परिक्षण :)
अमोल
6 Apr 2012 - 3:47 pm | दिपक
तो मित्र कसा आहे आता ?
बाकी पिडांकाकाचा तुफ्फान प्रतिसाद वाचायला मिळाला. त्यासाठी "ब्लड मनीचे" आणि पराचे अभिनंदन. :-)
6 Apr 2012 - 5:33 pm | स्वाती दिनेश
परीक्षण कम चिरफाड एकदम भारी..
स्वाती
6 Apr 2012 - 6:25 pm | जयवी
पिडा.......त्वाडा जवाब नही :)
परा........ अरे तुला हा सिनेमा बघायला कां जावंसं वाटलं हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. असं काय घडलं तुझ्या आयुष्यात की हा असा निर्णय तू घेतलास ......... (विचारमग्न बाहुली )
6 Apr 2012 - 6:41 pm | जाई.
परीक्षणाबद्दल आणि पर्यायाने पैसे वाचवल्याबद्दल पराचे आभार
6 Apr 2012 - 8:35 pm | निनाद मुक्काम प...
परा
मागे देशद्रोही तू टीवीवर फुकट पहिला. व त्याची चिरफाड केली. आता त्याच श्रेणीतील हा सिनेमा चक्क पैसे देऊन पहिला. वेळ, पैसा दोन्ही वाया गेले असे मी मात्र म्हणणार नाही. कारण एखाद्या गोष्टीला नाव ठेवण्यासाठी का होईना तू सिनेमा पाहतो. मागे रेड्डी असाच पहिला.
तेव्हा डॉन्या साहेबांनी हाच प्रश्न विचारला कि नेमक्या कोणत्या अपेक्षेने हा सिनेमे पहिला?
. ( ह्यालाच चंगळवाद .....) त्यामुळे भट नवीन जोमाने परत सिनेमे काढतो.
पान सिंग तोमर सारख्या सिनेमावर तुझ्या सिध्द्धास्त लेखणीतून वाचायला आवडेल.
बाकी आशियायी हॉरर सिनेमांवर लिहित जा. चांगली माहिती मिळते ( वेळेचा सदुपयोग ) आम्ही दोघे हि हॉरर चे भयानक चाहते आहोत.
7 Apr 2012 - 12:21 am | चिंतामणी
>>>पान सिंग तोमर सारख्या सिनेमावर तुझ्या सिध्द्धास्त लेखणीतून वाचायला आवडेल.
लौकर येउ देत परीक्षण.