उभ्या उभ्या विनोद.

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
5 Apr 2012 - 8:13 am

मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपला मिपाकर मित्र संदीप चित्रेची इमेल आली. त्यात तो आणि त्याचे मित्रमंडळ शिकागो महाराष्ट्र मंडळासाठी 'उभ्या उभ्या विनोद' (उउवि) हा कार्यक्रम सादर करणार असल्याबद्दल लिहिले होते. निमित्त होते गुढी पाडव्याचे. ३१ मार्चच्या कार्यक्रमाला जाण्याचे नक्की करून आम्ही ऑनलाईन नावनोंदणी केली. ते ठिकाण आमच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर वॉरनव्हिल येथे होते. संदीपचा कार्यक्रम बघायला मिळणार होता, शिवाय त्याला व्य. नि. करून आमच्याबरोबर घरी येण्याचे आमंत्रण दिले. मंडळात त्या दिवशी सत्यनारायण पूजा, गुढीपाडव्यावर आधारीत लहान मुलांनी केलेले एक नाटुकले आणि दोन तासांचा हसवणारा कार्यक्रम होता. कार्यक्रमाआधी संदीप आणि त्याचे मित्र विनय देसाई यांनी भेटून गप्पा मारल्या.

DSC04060

संदीपबरोबरच शुभदा कामेरकर, विनय देसाई आणि कौस्तुभ सोमण हेही सादरीकरणात सामिल झालेले होते.

DSC04066

नंतर त्यांच्या यावेळी भाग न घेतलेल्या कलाकारांबद्दल संदीप बोलत होता. २००६ साली उउवि कार्यक्रम सुरु केला असल्याचे समजले. आतापर्यंत अनेक मराठी मंडळांमध्ये या मंडळींना सादरीकरणासाठी आमंत्रणे आलेली आहेत. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात व इतर ठिकाणीही उउवि हा कार्यक्रम लोकप्रीय झालेला आहे तो केवळ सर्व कलाकारांच्या वेगवेगळ्या शैलीतील सादरीकरणामुळेच. विविध वयोगटातील प्रेक्षकांना सतत हसवत ठेवण्याचे काम तशाच विविध वयातील हे कलाकार करत असतात. कौस्तुभ सोमण यांचे लग्न ठरवणे ते शुभदाताईंच्या लग्नाला झालेली पंचवीस वर्षे असा सगळा काळ या कार्यक्रमाने 'कव्हर' केला आहे. कौस्तुभ यांनी प्रेयसीने प्रियकराला बोलावताना असलेल्या मराठी आणि हिंदी गाण्यांची उदाहरणे देत मजा आणली. बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो. "अभी ना जाओ छोडकर" हे गाणं आणि "असा बेभान हा वारा...........कशी येऊ" आणि "त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियाचे झोपडे" (म्हणजे मी उठून तिथे जाणार नाही या अर्थी.) अशा गाण्यांची उदाहरणे दिल्यावर सगळेजण खी खी करून हसत होते. आपल्याला ही तुलना कधी करावी अशी कल्पनाही मनात आली नाही हे मी आणि माझ्या नवर्‍याने कबूल करून टाकले. संदीपने त्याच्या उउवि मध्ये लग्नकार्यात बेसनाचा टाळूला चिकटलेला लाडू बोटाने सोडवताना व्हिडीओग्राफर नेमका त्याचवेळी येतो असे म्हटल्याबरोबर माझ्या मागे बसलेले एक महाशय हसण्याचे थांबेचनात. मला त्यावेळी ऐकू न आलेले विनोद संदीपने पुन्हा ऐकवावेत असे त्याला सांगणे आहे. शुभदाताईंनी त्यांच्या सादरीकरणात कोटी करताना मैत्रिणी या नणंदेसारख्या असतात, लगेच पार्टी बदलतात असे म्हटले. माझ्या मेंदूला त्याचा नक्की अर्थ समजून हसेपर्यंत माझ्या समोरच्या रांगेत बसलेल्या दोघी नणंदा-भावजया (त्यांच्या) पोटात दुखेपर्यंत हसत होत्या, इतके की मला त्यांच्याकडे पाहूनच हसू यायला लागले. विनय देसाईंनी गाडी चालवतानाचे त्यांचे व इतरांचे किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली. लहान मोठ्यांना दोन तास सलग हसवणार्‍या या चमूला पुढील अनेक कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

कलासंस्कृतीविनोदसमाजमौजमजाप्रकटनबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Apr 2012 - 9:48 am | मदनबाण

अरे वा... :) कार्यक्रम सुंदर झालेला दिसतोय ! :)
या कार्यक्रमाचा इडियो असेल तर त्यांचा दुवा द्या की हिथ.

जाता- जाता :- माझ्या मेंदूला त्याचा नक्की अर्थ समजून हसेपर्यंत माझ्या समोरच्या रांगेत बसलेल्या दोघी नणंदा-भावजया (त्यांच्या) पोटात दुखेपर्यंत हसत होत्या, इतके की मला त्यांच्याकडे पाहूनच हसू यायला लागले.
आज्जेच खरचं वय झालेल दिसतय बरं ! ;)

>>>>बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो. "अभी ना जाओ छोडकर" हे गाणं आणि "असा बेभान हा वारा...........कशी येऊ" आणि "त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियाचे झोपडे" (म्हणजे मी उठून तिथे जाणार नाही या अर्थी.)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अमेरिकेत झालेल्या विनोदावर भारतात हसण्‍यात आले आहे रेवतीआजी.
बाकी रेवतीआजी (आणि अर्थातच श्रीयुत आजोबांचाही ) नी त्यांचा फोटो न टाकल्याबद्दल निषेध!
संबोधन एकदा बदलून घ्यावं म्हणतो.

अवांतर: विस्तवावर कुणीतरी पाणी टाका.
पश्चिमवाहिनी नद्यांचं सर्वात उत्तम! ;-)

भडकमकर मास्तर's picture

5 Apr 2012 - 1:20 pm | भडकमकर मास्तर

बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो.
हे लैच भारी :)

विजुभाऊ's picture

5 Apr 2012 - 7:03 pm | विजुभाऊ

अभी ना जाओ छोडकर : मला जाउ द्या ना घरी

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

@बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो. >>> :-D --^--^--^--

स्मिता.'s picture

5 Apr 2012 - 1:30 pm | स्मिता.

एका छानश्या कार्यक्रमाचे थोडक्यात वर्णन आवडले.

बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो.
मैत्रिणी या नणंदेसारख्या असतात, लगेच पार्टी बदलतात

हे पंचेस मस्तच.

दादा कोंडके's picture

5 Apr 2012 - 10:44 pm | दादा कोंडके

श्री आग्यावेताळ यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय! :)

दादा कोंडके's picture

5 Apr 2012 - 10:54 pm | दादा कोंडके

श्री आग्यावेताळ यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय! :)

जाई.'s picture

5 Apr 2012 - 1:34 pm | जाई.

मस्त वृत्तांत

मन१'s picture

5 Apr 2012 - 1:49 pm | मन१

खुसखुसीत झालेला दिसतोय.
सादरकर्ते कधी भारतातही येणार असतील तर अवश्य कलवा.
नक्की हजेरी लावली जाइल.

पहाटवारा's picture

5 Apr 2012 - 1:54 pm | पहाटवारा

हा कार्यक्रम "हूज लाइन इज इट एनीवे " सारखा आहे काय ? वर्णनावरून थोडासा वाटला तसा.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Apr 2012 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

कार्यक्रमाचा वृतांत आवडला एकदम.

श्री. व सौ. रंगाचारी ह्यांचा फोटो न टाकल्याचा निषेध !

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 4:44 pm | मी-सौरभ

लेख आवडला.

स्वत्:चे फोटो नाय टाकलेस ते बरचं आहे.
रेवती आज्जी अन चतुरंग काका यातली एक ईमेज तरी खोटी ठरली असती. ;)

छान वृत्तांत आज्जे !!

चित्रा's picture

5 Apr 2012 - 6:20 pm | चित्रा

तुमच्या शुभदाताई म्हणजे आमच्याही ताईच की त्या. :-)

वृत्तांत सुंदरच!! मराठी गाण्यांबद्दलचे निरीक्षण झक्कास!

पैसा's picture

5 Apr 2012 - 8:31 pm | पैसा

एकदम खुसखुशीत! गाण्यातला फरक, नणंद भावजयीचे विनोद वगैरे सॉलिड धमाल आहे! वर्णन आवडलं पण बाकीचे फोटो कुठेत?

मराठी_माणूस's picture

5 Apr 2012 - 8:51 pm | मराठी_माणूस

"अभी ना जाओ छोडकर" हे प्रेयसीला थांबवण्याचे गाणे आहे प्रियकराला नव्हे

खरच की! मग तुम्ही सुचवा दुसरं कोणतं तरी.

मराठी_माणूस's picture

5 Apr 2012 - 9:17 pm | मराठी_माणूस

रात अकेली है बुझ गए दिये , आके मेरे पास ........

हां, बरोबर.
त्यांनी बहुतेक न जाओ सैंय्या चे उदाहरण दिले होते.

स्मिता.'s picture

5 Apr 2012 - 10:56 pm | स्मिता.

त्यांनी बहुतेक न जाओ सैंय्या चे उदाहरण दिले होते.

रेवतीआज्जी, वयोमानाने न आठवलेले विनोद स्वतःच बनवलेत की काय? :P ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2012 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांताबद्द आभार.

-दिलीप बिरुटे

जयवी's picture

6 Apr 2012 - 6:29 pm | जयवी

वा...... कार्यक्रम जबरी झालेला दिसतोय.
मस्त लिहिला आहेस वृत्तांत :)

स्वाती दिनेश's picture

6 Apr 2012 - 6:42 pm | स्वाती दिनेश

छान, कार्यक्रम + मिनी कट्टा मस्त झालेला दिसतो आहे,
स्वाती

संदीप चित्रे's picture

7 Apr 2012 - 1:02 am | संदीप चित्रे

कार्यक्रमाच्या वृत्तांताबद्दल मनापासून धन्स, रेवती.
आम्हाला सगळ्यांनाही कार्यक्रम सादर करायला खूप मजा आली.

मी कार्यक्रमासाठी येतोय सांगितल्यावर लगेल रंगाशेठ आणि रेवतीने त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यात रेवतीने घरी आल्यावर भेळ करून देईन असे सांगितल्यावर तर मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता ;) मग तर मला वाटायला लागलं की ही भेळ करणार आहे म्हणून आपण शिकागोला चाललोच आहोत तर मग 'उभ्या उभ्या विनोद'चा कार्यक्रमही करून यावं ;)

कार्यक्रमावरच्या प्रतिक्रियांसाठीही मिपाकर मित्र - मैत्रिणींना धन्स!
तुमच्या गावात कार्यक्रम ठरवला की नक्की भेटूच :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2012 - 1:59 am | निनाद मुक्काम प...

झकास.

कार्यक्रमाची एखादी झलक तू नळीवर असेल तर दुधाची तहान ताकावर भागेल.

सुधीर मुतालीक's picture

7 Apr 2012 - 11:59 pm | सुधीर मुतालीक

चित्रेंचा कार्यक्रम ऐकण्याची आता जबरदस्त इच्छा आहे. छान केलयं रिपोर्टिंग.