1

<उगा मारखा>

Primary tabs

रमताराम's picture
रमताराम in जे न देखे रवी...
29 Mar 2012 - 12:55 pm

प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य.

मंद बायका त्या
कडाडती घरी
पती गर्भगळित
सदोदित ।

जसा वनवास
करे हतोत्साही
तसा सहवास
जीवघेणा ।

दुर्लंघ्य सागर
जैसे तुझे मन
भलतेच पैलू
दावितसे ।

तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?

टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.

शृंगारभयानकबिभत्सधोरणसंस्कृतीविडंबनजीवनमानक्रीडा

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Mar 2012 - 1:02 pm | पैसा

तुम्ही पण? आज नक्की मार खाणार तुम्ही!=)) =))

श्रावण मोडक's picture

29 Mar 2012 - 3:23 pm | श्रावण मोडक

तुम्ही पण? आज नक्की मार खाणार तुम्ही!=)) =))

कुणाचा? नाही, सहजच विचारलं.

पैसा's picture

29 Mar 2012 - 3:29 pm | पैसा

दीपकने दिलेली सप्रेम भेट बघा ना! आणि प्रीतमोहर पण मोर्चा घेऊन निघालीच आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2012 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार

विडंबन आवडल्या गेले आहे.

मात्र ह्या प्रकाराचा अनुभव नसल्याने फक्त प्रतिसाद पोच दिली आहे. (मंद बायका, पती गर्भगळीत ह्या सारख्या द्विरुक्त्या टाळल्या असत्या तर पद्य अधिक कसदार झाले असते असे वाटते.)

जाणकारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.

राजेश घासकडवी's picture

29 Mar 2012 - 7:19 pm | राजेश घासकडवी

मात्र ह्या प्रकाराचा अनुभव नसल्याने फक्त प्रतिसाद पोच दिली आहे.

घ्या. आणि हे म्हणे बाया नाचवणारे.

बाकी 'रमताराममामांना रमणींचा मार' यात केवढा अनुप्रास आहे...

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

घ्या. आणि हे म्हणे बाया नाचवणारे.

अहो गुर्जी,
बाया नाचवणे आणि बाया नांदवणे ह्यात किती मोठा फरक आहे हे तुमच्या सारख्या बेरकी माणसाला माहिती नाही काय ?

वपाडाव's picture

30 Mar 2012 - 12:53 pm | वपाडाव

पर्‍या, जरा २ पुस्तकं विक अन आम्हालाही काम करु दे रे... आता काय बसल्या-बसल्या जीव द्यावा का माणसानं?

जेनी...'s picture

30 Mar 2012 - 12:57 pm | जेनी...

सहमत :D

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2012 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा

सध्या फक्त येवढेच... --^--^--^-- ;-)

नंदन's picture

29 Mar 2012 - 1:10 pm | नंदन

तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?

अगागागा, पूर्ण वेणीसंहारच की! विडंबन झक्कास.

बॅटमॅन's picture

29 Mar 2012 - 1:13 pm | बॅटमॅन

आयो...कविता आणि प्रतिसाद वाचून श्लेषमाँगर्सच्या मेळाव्यात आल्याचे सार्थक झाले :) सही!

अन्या दातार's picture

29 Mar 2012 - 1:12 pm | अन्या दातार

हे खरं विडंबन!

सूड's picture

29 Mar 2012 - 4:04 pm | सूड

अगदी, याला तोड नाही.

सहज's picture

29 Mar 2012 - 1:19 pm | सहज

लग्न ठरलं वाटतं!!! नाही वास्तववादी वगैरे म्हणताय म्हणून हो

श्रावण मोडक's picture

29 Mar 2012 - 3:24 pm | श्रावण मोडक

म्हणूनच त्यांनी आधुनिकोत्तर असंही म्हणून ठेवलंय. आधुनिकोत्तरात लग्नाची गरज नसते... :)

सहज's picture

29 Mar 2012 - 3:58 pm | सहज

ते पती वगैरे उल्लेख आला व आम्ही जरासे जुन्या वळणाचे म्हणून लग्न असे समाजमान्य शब्दप्रयोग केले. :-) बाकी आधुनिकोत्तरात बहुदा गरज कसलीच नसते, असलीच तर ती केवळ सोय! जाणकार लोक सोयीचा अर्थ सांगतीलच

रमताराम's picture

29 Mar 2012 - 4:38 pm | रमताराम

दोन परंपराद्वेष्ट्या ज्येष्ठांनी एका वृद्धाची चालवलेली नृशंस थट्टा पाहून 'उठा ले ना रे बाऽबाऽ' असे म्हणावेसे वाटले. तो आकाशातला बाप यांना सद्बुद्धी देवो.

प्रचेतस's picture

29 Mar 2012 - 1:19 pm | प्रचेतस

झकास.

मूकवाचक's picture

29 Mar 2012 - 1:21 pm | मूकवाचक

_/\_

वाचून चर्चा विडंबन
अन तारका मंद चोरून
उगा जीभ उचलून
लाविली टाळ्याला !
पण जमले आहे विडंबन..!

पोरा टोरांनी रमतारामाला गुरू मानुन धडे गिरवावे. ;)

रमताराम's picture

29 Mar 2012 - 1:30 pm | रमताराम

इथे उलट आहे. विडंबन हा आमचा प्रांत नव्हे. आम्हीच पोराटोरांपैकी एकाचा गंडा बांधायचा विचार करतोय. पण पर्याय इतके आहेत की बहुधा अवधूतासारखे चोवीस गुरू करावे लागतील की काय. पर्‍या बहुधा सर्वात शेवटचा (पर्‍याचे नाव पोराटोरांमधे घेतलेले पाहून खुद्द पर्‍याचेच ड्वाले पानावतील हे ठौक आहे.) असेल.

अवांतरः 'रमतारामाला गुरु...' हा शब्दप्रयोग वाचून उगाचच आपल्या खांद्यावर एक धनुष्य आहे नि उग्र चेहर्‍यावरच्या विशाल भालप्रदेशी लाल-केशरी टिळा आहे असा भास झाला.

मेघवेडा's picture

29 Mar 2012 - 1:34 pm | मेघवेडा
पोरा टोरांनी रमतारामाला गुरू मानुन धडे गिरवावे.

असेच म्हणतो. कधी येऊ दीक्षा घ्यायला गुर्जी?

विडंबन फस्क्लास! या रमत्या रामानं पती-पत्नीबद्दलची वास्तववादी कविता लिहिलेली पाहून नि त्यात वनवास, दुर्लंघ्य सागर इ. उल्लेख पाहून त्या प्रभू श्रीरामाचीही या चक्रातून सुटका झाली नसावी की काय असं वाटलं! ;)

रमताराम's picture

30 Mar 2012 - 12:34 pm | रमताराम

त्या बिचार्‍याला तर त्या कांचनमृगापाठी कुठे काट्याकुट्यात भटकावं लागलं. उगाच नाही त्याला पुरुषोत्तम म्हणत.

मी-सौरभ's picture

29 Mar 2012 - 1:26 pm | मी-सौरभ

गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!!
गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!!
गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!!
गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!!
गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!!

(पोरा-टोरांमधे मोजला जाणारा)

सांजसंध्या's picture

29 Mar 2012 - 1:30 pm | सांजसंध्या

:D

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2012 - 3:33 pm | प्रीत-मोहर

आज्जोबांचा त्रिवार निषेध!!!!

तुर्तास इतकेच पोच म्हणुन.. सविस्तर मोर्चा नंतर सवडीने घेउन येउ उगा मारद्या म्हणत

(मिपा महिला आघाडी सदस्या)
प्रीमो

ही आमची फुलाची पाकळी

>
मस्त बायका त्या
नांदवती घरी
तरी रडका तु
सदोदित|

तुझे सहकारी
नित्य आनंदात
जरी तू डोक्याने
जरा उणा|

अंगणीचे कूप
जैसे तुझे मन
तेच्-तेच पैलू
दावितसे|

किंवा

अंगणीचा कूप
जैसे तुझे मन
पाडिन म्हणते
नवे पैलू|

तुझी माझी गाठ
पडे कोण क्षणी
मेंदु ही शिणला
विचारात|

- प्रीमो
*विशेष आभारः ररा गुर्जी :)

पैसा's picture

30 Mar 2012 - 3:38 pm | पैसा

पण आभार ररा ना कशाला! त्याना मार द्यायचाय ना?

आणि एक सुधारणा

अंगणीचा कूप
जैसे तुझे मन
मंडूक त्यातून
फेका आता.

रमताराम's picture

30 Mar 2012 - 9:29 pm | रमताराम

शिकवणीकडे नीट लक्ष न दिल्याचा परिणाम पहा.

तुझी सहचरी
नित्य आनंदात
जरी तू डोक्याने
जरा उणा|

सहकारी आनंदात असण्याचा नि पतीच्या डोक्याने उणा असल्याचा काय संबंध. डोक्याने उणा पती असूनही सहचरी आनंदी राहू शकते हे श्रेय सांगण्याजोगे. छ्या: हल्लीचे विद्यार्थी अजिबात वर्गात लक्ष देत नाहीत बॉ.

पैसा's picture

30 Mar 2012 - 9:34 pm | पैसा

असल्यामुळेच आनंदात असेल कदाचित!

रमताराम's picture

30 Mar 2012 - 9:47 pm | रमताराम

.

श्रावण मोडक's picture

30 Mar 2012 - 9:51 pm | श्रावण मोडक

खिक्... काय दिवस आलेत ररावर!

दिपक's picture

29 Mar 2012 - 3:01 pm | दिपक

तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?

हा हा हा ! सहीच.

हे घ्या आता प्रोटेक्श्नसाठी ;)

रमताराम's picture

29 Mar 2012 - 4:35 pm | रमताराम

असे एकमेका साह्य करत राहिलो तर अशा वादळांना तोंड देऊनही हा भवसागर तरुन जाणे अवघड नाही.

सुहास झेले's picture

29 Mar 2012 - 5:30 pm | सुहास झेले

हा हा हा हा ... ररा एकदम जोरदार विडंबन :) :)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Mar 2012 - 6:05 pm | llपुण्याचे पेशवेll

नवकाव्य चांगले आहे.

५० फक्त's picture

29 Mar 2012 - 6:17 pm | ५० फक्त

जाम भारी रे, या आगीत होरपळत असल्यानं प्रत्येक शब्दाची धग जाणवली, कटुता जीभेवर आली अन काटे टोचले, टोचायचे तिथं.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Mar 2012 - 7:40 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! लै भारी!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2012 - 5:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"पती गर्भगळित" यात फाऊल विनोद असला तरी मात्रा जमत नाहीयेत. "पती घाबरती" चालेल का?

आणि शेवटचा चरणः

तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?

या ऐवजी
तुझी-माझी गाठ
डोक्यालाही शॉट
वेणीफणी आता
ऐनवेळी?

चालेल का? मीटरात मावतंय म्हणून विचारलं.

बाकी तुमचा घाऊक स्त्री-द्वेष चालू द्या. तुम्ही पाजलेल्या लिंबूपाण्याला जागून मी काही बोलत नाहीये.

तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?

मला तरी हेच परफेक्ट वाटतय गं आदिती :(

धन्या's picture

30 Mar 2012 - 10:51 am | धन्या

निन्ने येना कंडु..मोट्टो मोट्टो शिरुने कंडु..वातिलोमाका निरे निरे वंडु ...निरुलोमा शिरुलोमा शिरुने कंडु...!!

हा कंडु कन्नडमधला का? तेलुगू आणि तमिळ वाटत नाही.

ररा, खुप दिवसांनी "क्वालिटी" विडंबन वाचायला मिळालं. हल्लीची विडंबने वाचली की केसुगुर्जींची विडंबने आठवून उसासे निघतात.

असो. (आता इथून पळावे नाहीतर लोक टल्ली होऊन एखादया अतृप्त आत्म्यासारखे मागे लागतील ;) )

रमताराम's picture

30 Mar 2012 - 12:31 pm | रमताराम

'मात्रा' स्त्रिलिंगी असल्याने घाऊक द्वेषाला स्मरून त्यांना फाट्यावर मारले आहे.

(पळा आता नायतर इथेच 'रराचा खिमा' असा नवा पदार्थ मेन्यू कार्डावर दिसायला लागेल.)

निनाद's picture

30 Mar 2012 - 6:37 am | निनाद

आवडली. टीपही आवडली.
जसा वनवास
करे हतोत्साही
तसा सहवास
जीवघेणा ।

दुर्लंघ्य सागर
जैसे तुझे मन
भलतेच पैलू
दावितसे ।
दोन्ही कडवी आशय घन आहेत...