माझी चित्तरकथा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
16 Mar 2012 - 1:48 pm

माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले. चित्रकलेने देखील माझ्या आयुष्याचे असेच वाभाडे काढले.

माझा नक्की काय पिराब्लेम होता नीटसे सांगता येत नाही पण मला पट्टीच्या सहाय्याने पण साधी एक सरळ रेष कधी नाही काढता आली. म्हणजे सरळ रेष काढायला गेलो की हमखास लिटरभर पहिल्या धारेची चढवौन पेन्सिल हातात धरावी तसा हात वेडावाकडा चालायला लागायचा. वास्तविक मी तसा सरळ वळणाचा पण चित्र काढताना हात मात्र वळवळ वळायचा. अस्मादिकांच्या मातोश्रींनी चित्रकला शिकवायचा सर्वतोपरी प्रयत्न केला. ती चित्रे काढताना असे वाटायचे अर्रे हे तर किती सोप्पे आहे, बैल तर काय कोणीही काढु शकतो झरझर. एक रेष इथुन , एक तिथुन एक अर्धगोल, दोन तिरप्या रेषा, एक आयत, एक त्रिकोण. झाला बैल तयार. मग ते इथुन तिथुन करताना आमचा मिथुन व्हायचा. आय मीन आम्ही चित्रकलेत साफ तोंडघशी आपटायचो. बैल म्हणुन काढायला सुरुवात केलेला तो प्राणी अखेर, कुत्रा, मांजर, घोडा, उंदीर, गांडुळ असे बरेच हेलकावे काढत अखेर कागदावर जे उमटायचे त्यामुळे आमचा प्रचंड मोठा पोपट व्हायचा. हे म्हणजे जसपाल भट्टीच्या फ्लॉप शो मधल्या एका एपिसोड सारखे व्हायचे . त्यात सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेचे बक्षीस घ्यायला गेलेला मालिकेचा दिग्दर्शक म्हणतो "मैने तो हॉरर सिरीयल बनाई थी. ये कॉमेडी कैसे हो गयी". तसे माझे व्हायचे मैने तो बैल बनाया था, ये ----- कैसे हो गया" हा ----- प्रत्येकवेळेस वेगळ्या प्रकारच्या अगम्य प्राण्याच्या नावाने भरता यायचा. आणी गंमत म्हणजे तो एकच प्राणी प्रत्येकाला वेगवेगळा भासायचा.

मला तर जाम शंका आहे की अवतार साठी जेम्स कॅमेरून ने माझ्या त्या जुन्या चित्रांवरुन प्रेरणा घेउनच नवेनवे प्राणी बनवले आहेत. माझ्याही चित्रात असे व्हायचे कधी कधी. घोड्याचे चित्र काढायला घेतल्यावर त्याच्या पाठीवरचा छोटासा बाक काढताना त्याचे रुपांतर पंखात कधी व्हायचे ते कळायचेच नाही आणि मुळात कागदावर जे काही उमटायचे त्याला घोडा म्हणायची प्राज्ञा असणारा माई का लाल अभी इस दुनिया मे पैदाहीच नाही हुआ है.

अर्थात कधीकधी मी बरी चित्रेही काढायचो. पाचवीत असताना माझ्या चित्राला पहिले बक्षीस मिळाले होते. अर्थात त्याचे कारण असे की ५वीत मी ज्या शाळेत होतो तिथल्या मुलांना पाचवीपासून चित्रकला शिकवायचे आणी मी मात्र पहिलीपासून शिकत होतो. तरीही माझ्या चित्रातले फूलपाखरु माशी किंवा गांधीलमाशी किंवा उडणारे गांडुळ असे काहीही म्हणुन खपुन गेले असते.

एकेकाळी परिस्थिती इतकी वाईट होती की चित्रकलेचा तास म्हटल्यावर माझ्या पोटात गोळा यायचा आणि चित्रकलेचा पेपर म्हणजे छात्तीत धडकी भरायची. वास्तविक माझ्या निरागस शालेय आयुष्यात छळवाद मांडण्यासाठी गणित हा विषय पुरेसा होता. अल्फा / बीटा / गामा, कॉसन/ थेटा / टॅन यांनी जीवन आधीच बरबाद केले होते त्यात हा वेगळा छळवाद. त्यातही गणित बरे वाटायचे कारण गणिताची गंमत अशी होती की ते सोडवताना समजायचे नाही की पेपर तपासुन झाल्यानंतर आर्यभट्टाच्या शोधाचा शोध आपल्या उत्तरपत्रिकेवर लागणार आहे. आपल्याक्डे म्हण आहे "भ्रमाचा भोपळा फुटणे". दुर्दैवाने आमच्या उत्तरपत्रिकेवर हे भोपळे तसेच रहायचे आणि आपल्याल गणित जमले होते हा आमचा भ्रम तेवढा फुटायचा. पण किमान पेपर सोडवताना टेंशन नाही यायचे.

चित्रकलेचा पेपर म्हणजे मात्र प्रचंड टेंशन. विंबल्डन फायनलच्या आधी नदाल आणि फेडररलाही एवढे टेंशन येत नसेल किंवा रेल्वे बजेट सादर करताना (आणि करुन झाल्यावर) त्रिवेदींना सुद्धा एवढे टेंशन आले नसेल. मी मारुतीला सा़कडे वगैरे घालायचो. सव्वा रुपयाचा नवस बोलायचो. नंतर तो इमानेइतबारे प्रसंगी आई आज्जीकडुन उधारी घेउन वगैरे पुर्ण पण करायचो. वास्तविक त्या हनुमानाचा आणि चित्रकलेचा काही संबंध असण्याचे कारण नाही. चित्रकलेच्या परीक्षेत पास करण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्यात कोणी साकडे घातले असेल असे मला वाटत नाही. पण किमान त्याकाळी तरी मला कुठल्याही देवाचे वाकडे नव्हते. जवळपास मंदिर असले असते तर मी हिडिंबेला सुद्धा त्यासाठी साकडे घातले असते.

एवढे नवससायास करुन सुद्धा अखेर मला पेपअरच्या दिवशी दरदरुन घाम वगैरे फुटायचा. सुदैवाने त्याचे खापर ठाण्याच्या उष्ण दमट हवेवर फोडता यायचे. हात कापायला लागायचे ते बघण्यासाठी शिंचे कोणाला वेळ नसायचा लोक निवांत चित्रे काढत असत. त्यांना काय काय जमायचे. पाणी भरणारी तरूण मुलगी पण त्यांना काढता यायची. आम्हाला माठ काढतानाच घाम फुटायचा. असे वाटायचे की त्याच माठातले गार पाणी काढुन प्यावे. पण त्याचा आकार बघता त्या माठातले पाणी गार होइल अशी अंधुकशी आशादेखील नाही वाटायची. तरूणी तर कागदावर उमटायचीच नाही. मग आजुबाजुच्या मुलींकडे बघुन तरुणीचे चित्र काढायचा यत्न सुरु व्हायचा. नंतरचा वेळ मात्र मग चक्षु चोरण्यात (म्हणजे मुलींकडे बघतो आहे हे इतरांना कळु नये म्हणुन चोरुन चोरुन बघण्यात) मजेत जायचा. त्यातल्या त्यात अंमळ जास्त सुंदर असलेल्या वर्गमित्रांच्या वर्गभगिनींकडे वळुन वळुन बघितले जायचे. निरीक्षणात अंमळ जास्त वेळा लागल्याने नळाविना सुटलेली धार आणि वेडावाकडा चौकोनी - त्रिकोणी माठ यावरच चित्र थांबायचे.

तरी एक गोष्ट चांगली होती की बहुतेकवेळेस परीक्षेत उशीच्या अभ्र्यावरची नक्षी, फ्लॉवरपॉटवरची नक्षी, चादरीवरची नक्षी , असले काहिबाही विषय असायचे. नक्षी कशावरचीही असो आमचा पॅटर्न ठरलेला असायचा. कर्कटक घ्यायचे, त्याला पेन्सिल अडकवाकवा, एक अर्धगोल फराटा उजवीकडुन, एक डावीकडुन असे करत करत फुलाच्या पाकळ्या काढायच्या. त्यातुन फूल तयार व्हायचे. एक पट्टी घेउन महत्प्रयासाने त्याला एक दांडी काढायची . परत कर्कटकाने तसेच ते २ अर्धगोल काढुन २ पाने काढायची की झाली मग आमची नक्षी तयार. त्यात मग मी निळा, चॉकलेटी, बदामी असा कुठलाही रंग भरायचो. बहुतेकवेळेस निळा रंग भरताना माझ्या डोळ्यासमोर सदाफुलीचा रंग असायचा . ती शेड डोंबलाची जमायची नाही. अखेर रंगाचे ३ -४ थर एकावर एक चढवुन त्याचा नेव्ही ब्ल्यु व्हायचा. मग त्याला काळ्या स्केचपेनने बॉर्डर द्यायची. हो गया अपना नक्षी तयार.

दुर्दैवाने एकदा कर्कटक वापरुन देखील मला तो फूलाचा आकार जमेना. अखेर अर्धे खोडरबर पावन करुन आणि इतस्तःत पेन्सिलीचे काळे डाग पाडुन अखेर ते फूल मला जमले. पण ते रंगवण्यापुर्वी वेळ संपला. अखेर पहिल्या बेंचपासुन सुरु करुन मास्तर माझ्या बेंचवर येइपर्यंत मी मित्राच्या पॅलेट मधे तयार असलेला नारिंगी रंग फूलाला देउन प्रश्न मिटवला. माझ्या खुप मोठ्या महत्वाकांक्षा कधीच नव्हत्या. बॅटींगला आल्यावर मणिंदरसिंगच्या असायच्या तेवढ्या माफक अपेक्षा असायच्या माझ्या की १० - २० चेंडु तटवले म्हणजे झाले. रन निघोत ना निघोत किमान किंचितसा स्टँड द्यावा. तसे फार नाही पण ५० पैकी २० मार्क्स मिळावेत (मी काही इतकाही कमी महत्वाकांक्षी नव्हतो की अगदी ५० पैकी १८ मिळाले तरी चालतील. अखेर माझीही काही स्वप्ने होती काही अपेक्षा होत्या काही आशा होत्या (त्या सगळ्यांची आता लग्न झाली आहेत). अगदीच काठावर पास नको व्हायला. चित्रकला असली म्हणुन काय झाले? कमी मार्कांमुळे वर्गभगिनींसमोर ( त्यात त्या वर्ग मित्रांच्या वर्गभगिनी. माझ्या नाहीत) इज्जत नको जायला.

तर अश्याप्रकारे तयार झालेले ते नारिंगी रंगाचे फूल मी परीक्षा झाल्याझाल्या विसरुन गेलो होतो. पण पापे अशी विसरुन चालत नाहीत. ती फेडावी लागतात या नियमाला अनुसरुन अखेर एकेदिवशी चित्रकलेचे तपासलेले पेपर देखील वाटण्यात आले. मास्तरने पोरांची खुपच चिरफाड केली होती. एकदोघांना ५० पैकी १७ देउन लटकवलेले देखील होते. ती मुले एक मार्क वाढवुन देण्यासाठी त्यांची मनधरणी करत होती. अखेर एका चित्रापाशी मात्र ते २ मिनिटे थबकले. २ बोटाच्या चिमटीत तपकीर धरावी तसा तो चित्राचा कागद धरुन त्यांनी तो वर्गात फडकवला. आणि मोठ्या आवाजात वर्गाला विचारले "ही पोरं १७च मार्क मिळाली म्हणुन रडताहेत. या चित्राला मी १७ च काय ० मार्क तरी का द्यावेत हे कोणी सांगु शकेल काय"? त्याक्षणी धरणी दुभंगुन मला पोटात घेतले तर किंवा भूकंप होउन आख्खी शाळाच जमीनदोस्त झाली तर किती बरे होइल असे मला वाटायला लागले. कारण ते चित्र माझेच होते. तोंड कुठे लपवू असे झालेले असताना मास्तरने मोठ्या प्रेमाने मला जवळ बोलावूल घेतले आणि १ मार्कासाठी रडणार्‍या दोन बाळांची जाहीर माफी मागून त्यांना १ - १ मार्क वाढवुन देउन मोठ्या उदार मनाने पास केले. हे चित्र बघितल्यावर तुम्हाला १७ मार्क देणे खुप मोठा अन्याय आहे हे मी मान्य करतो असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केल. अखेर ती दोन बाळे जागेवर बसली आणी त्या जागी पास करावे म्हणुन सरांच्या शेजारी उभे राहुन मी विनवण्या करायला लागलो. अखेर मी वर्गात तिसरा आलेलो आहे या वाक्याचा परिणाम झाला असावा कारण मास्तरने चित्र परत सुधारुन दाखवण्याच्या बोलीवर मलादेखील १८ मार्क दिले. मधल्या सुट्टीत एका कलावंत वर्गमित्राकडुन मी ते चित्र सुधारुन घेतले तेव्हा ते कसे सुधारावे यासाठी त्याच्या कपाळावर पण आठ्या पडल्या होत्या. कितीही कुशल सर्जन असला तरी जॉनी लीव्हर ला सुंदर करुन दाखवायला सांगितल्यावर तो जसा वैतागेल तसे थोडेफार भाव त्याच्या चेहर्‍यावर होते. तो मोठा कसबी म्हणायचा कारण त्याने सुधारलेले ते चित्र नंतर मास्तरने न फाडता पास केले.

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे नुकतेच मी एक चित्र काढले ते काढुन माझा चित्रकार चुलत भाऊ पण भारावुन गेला. (माझ्याकडुन त्याला एवढ्या अपेक्षा कधीच नव्हत्या), आईला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना, बहिणीला चष्म्याचा नंबर वाढल्याचा भास होउ लागला. चित्र खुप भारी नाही आहे पण उद्या सोनिया गांधीनी अस्खलित हिंदीत भाषण केले तर प्रियांका आणि राहुल आश्चर्यचकित आणी खुष होणार नाहीत काय? मी स्वत: माझ्या चित्रावर बेहद्द खुष आहे. असंख्य टोमणे ऐकल्यावर कलीनने एकदा शेन वॉर्नचा वार परतवल्यावर* त्याला जेवढा आनंद झाला असेल तसा आनंद मला झाला आहे. ( *एकदा तब्बल २ वर्षांनी वॉर्न आणि कलीनन आमनेसामने आले तेव्हा वॉर्नने त्याला परत खिजवले. त्याला बघितल्यावर शेलकी कुजकट कुत्सित हास्य करत तो म्हणाला " वा वा. भेटलास का परत. चला बरेच झाले. मी २ वर्षांपासुन तुझी वाट बघत होतो." कलीनन एव्हाना तयार झाला होता. वॉर्न च्या वाढलेल्या वजनाकडे बघत तो म्हणाला "ही २ वर्षे तु खाण्यातच घालवलेली दिसताहेत.") तर त्या आनंदाप्रीत्यर्थ माझे ते ऐतिहासिक चित्र मी आज तुमच्या समोर पेश करत्यो आहे:

जय हिंद. जय महाराष्ट्र.

कलाविनोदजीवनमानमौजमजारेखाटनस्थिरचित्रप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 2:00 pm | शैलेन्द्र

मस्त..

प्रमोद्_पुणे's picture

16 Mar 2012 - 2:00 pm | प्रमोद्_पुणे

छान, खुसखुशीत लिहिलय..:)

पिंगू's picture

16 Mar 2012 - 2:03 pm | पिंगू

शेवटी तुला जमलचं रे.. पण माझ्यासारख्या चित्रकलेत ढ असणार्‍याचं काय रे?

मला तेव्हा फक्त पिंगूच काढता आला. त्याचीच आठवण म्हणून पिंगू आयडी वापरतोय.. :)

- (ढ चित्रकार) पिंगू

एकदम खुसखुशीत झालाय लेख.
बाकी तुझ्यातल्या चित्रकाराची झलक चेपूवर पाहिलीच आहे. :)

तुम्ही एवढा प्रयत्न तरी केलात, आमची एवढी मानसिक तयारी सुध्धा होत नाही

कवितानागेश's picture

16 Mar 2012 - 2:22 pm | कवितानागेश

छान लेख.
चित्र नैनीतालमध्ये काढले का? :)

मन१'s picture

16 Mar 2012 - 2:23 pm | मन१

"वर्गमित्रांच्या वर्गभगिनी" हे उत्तमच.

आम्ही एक मोर व त्याचे लहान पिलू ह्यांचे काढलेले चित्र हत्ती आणि रानडुकराची टक्कर म्हणून गाजले होते ते आठवले.

आम्ही एक मोर व त्याचे लहान पिलू ह्यांचे काढलेले चित्र हत्ती आणि रानडुकराची टक्कर म्हणून गाजले होते ते आठवले.

देवा... कहर... :)

वाचता वाचता शाळेतले अनेक असे प्रसन्ग आठवले ... :) छान लिहिलय .... आवडल .. शेवटचे चित्र तर सुरेख .. :)

मी-सौरभ's picture

16 Mar 2012 - 2:48 pm | मी-सौरभ

चित्रकला हा मलाही सर्वाधिक टेन्शन देणारा पेपर असे. चांगली गोष्ट एवढीच की आमचे चित्रकलेचे मास्तर सगळ्यांना पास करत असत :)

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 2:56 pm | गोंधळी

लेख विषेश आवडला.

कारण परिस्थितीत बरेचसे साम्य वाटले.

मस्तच लिहील आहेस रे.. मजा आली :)
चित्र पण झकास

भार्रिये :)

( बर्यापैकी चित्रे काढ्णारी पियु ) ;)

चाणक्य's picture

16 Mar 2012 - 4:33 pm | चाणक्य

लिहीलय. माझी पण चित्रकलेत पार वाट लागायची. अगदी तुम्ही वर्णन केले आहे तशीच अवस्था व्हायची.

स्पंदना's picture

16 Mar 2012 - 4:55 pm | स्पंदना

नक्की कशाला छान म्हणाव बर? १०० नंबरी लिखाणाला की सर सर उमटलेल्या रेषांना?
चित्र अन लेख दोनो भाये ।

गवि's picture

16 Mar 2012 - 6:11 pm | गवि

मस्त लेख.... :)

मालोजीराव's picture

16 Mar 2012 - 6:13 pm | मालोजीराव

वाह....जबराट लेख !
मला पण शाळेत असताना आमच्या चित्रकलेच्या मास्तरांनी चित्रकला वहीवर फाइव स्टार दिले होते !
(ज्याच्या वहीवर 0 स्टार तो उत्कृष्ठ विद्यार्थी, फाइव स्टार म्हणजे बैल काढायला गेला आणि गाढव प्रकट झाला ;) )

-(गंडलेला चित्रकार) मालोजीराव

निशदे's picture

16 Mar 2012 - 7:16 pm | निशदे

एकदम हलकाफुलका.........आवडला
पुलेशु........ :)

पैसा's picture

16 Mar 2012 - 7:21 pm | पैसा

एकदम खुसखुशीत लेख!

रेवती's picture

16 Mar 2012 - 8:26 pm | रेवती

लेखन आवडले.

जाई.'s picture

16 Mar 2012 - 8:34 pm | जाई.

मस्त लिहीलत
आवडलं

पुष्करिणी's picture

16 Mar 2012 - 9:48 pm | पुष्करिणी

छान लेख, चित्रही छान आलय

मीही चित्रकलेत कायम १०० पैकी ३५ कॅटेगिरीतली,
मला ३ च चित्र काढता यायची

देखावा- यांत डोंगर सुद्धा पट्टीनं त्रिकोणी त्रिकोणी, मग एका त्रिकोणातून उगम पावलेली नदी, खाली येइपर्यंत नदीत एक बोट आणि मासा ( दुसर्‍यांना मासा ओळखायला फार त्रास व्हायचा ), डोंगरातून उगवणारा अर्धगोलागार सूर्य, आणि ४ ४ ४..म्हण्जे पक्षी, हे पक्षी काढायला मला फार्फार आवडायचं म्हणून खूप पक्षी. सूर्य नारिंगी, नदी निळी, बोट तपकीरी, पक्षी काळे

नक्षी- तुमच्यासारखीच, करकटकान गोल आणि त्यात पाकळ्या पाकळ्यांच फूल , प्रत्येक पाकळीला वेगळा रंग

वस्तूचित्र -आयत काढून त्यात बादली, घागर, तांब्या ( प्रत्येक वस्तूखाली तिचं नाव लिहित जा असं सांगून उपमर्द झालेला आहे, मीही त्यानंतर जनहितार्थ चित्र काढून त्याखाली वस्तूचे नाव लिहित असे )

चित्रकलेच्या पेपरात कोणताही प्रश्न असला तरी मी वर्षानुवर्षे हीच ३ चित्रं काढली आहेत

सर्वसाक्षी's picture

17 Mar 2012 - 12:34 am | सर्वसाक्षी

माझा अनुभव असाच. कशाला हे विषय ठेवतात?

झकास लेख, अनेकांना आपले शाळेतले दिवस आठवयला लावणारा.

स्वातीविशु's picture

17 Mar 2012 - 10:48 am | स्वातीविशु

प्रथम तुमचे चित्र छान आले आहे असे नमूद करते. :)

तुमची चित्तरकथा वाचून मला आमचा चित्रकलेचा तास आठवला. आमचे कुंभार सर तासाला आले की आम्ही खुष असायचो, कारण आमच्या डोक्याला गॄह्पाठाची वही, घरचा अभ्यास,असले काहीही त्रास न देता फळ्यावर चित्र काढण्यात मग्न व्हायचे आणि विविधभारतीला लागतात तशी छान गाणी गुणगुणायचे. मग आम्हीही खाली माना घालून विविधभारती एकत छान छान चित्रे काढायचो. :)
बहुतेक यामुळे आम्ही चित्रे चांगली काढायला लागलो आणि पुढे याचा उपयोग जीवशास्त्र, वगैरे विषयात झाला.

एकदा बायोच्या आठ्ल्ये मॅडम आम्हाला प्रयोगशाळेत प्रयोग सांगून आमची जर्नल्स तपासत होत्या. मधेच मोरेला ओरडून आवाज दिला. ती तिकडे धड्पडत गेली. मॅड्म तिच्यावर चित्कारल्या, "अगं हे काय किडन्यांची आकॄती अशी काढतात का? दोन्ही किडन्या माणसाच्या शरीराच्या बाहेर गेल्यात अशा काढल्यात......." ;)

आम्ही आपले माना खाली घालून, तिने मॅडमच्या किडन्यांची आकृती काढली असेल म्हणून तोंड न उघडता विचकत होतो. (त्यांना ती नीलकमलची खुर्ची जेमतेम पुरत असे, उठताना आम्हाला नेहमी शंका यायची, मॅडम खुर्चीत अडकणार नाहीत ना??) ;)

रणजित चितळे's picture

17 Mar 2012 - 12:13 pm | रणजित चितळे

छान लिहिलाय. चित्र पण आवडले.
मी सातवित होतो तेव्हा आम्हाला मोराचे चित्र काढायला सांगितले होते. माझ्या शेजारच्या मित्राने त्याला चार पाय काढले होते ते आठवले.

ही चित्तरकथा पुन्हा वर काहाडत हाये!!!!

सुहास..'s picture

29 Nov 2013 - 3:23 pm | सुहास..

व्वा !!

हा कसा काय मिस केला कोण जाणे !!

चित्तरकथा आवडली आणि चित्र ही ...बस एक गडबड आहे ..बबडीची हाईट ( अर्थात जर ती बबडी असेल तर ...) ..बबड्यापेक्षा जास्त वाटते आहे ;) ( अर्थात तुला अपेक्षा असेलच ;) )

भर वर्गात पॅरॅलिसीस झालेला गणपती काढुन झाल्यावर मास्तराकडुन कानाखाली गणपती काढुन घेणारा
वाश्या

पॅरॅलिसिस झालेला गणपती =)) =)) =))

अवांतरः डाव्या शेपटीचा मारुती आठवला.

भर वर्गात पॅरॅलिसीस झालेला गणपती काढुन झाल्यावर मास्तराकडुन कानाखाली गणपती काढुन घेणारा

- :D :D :D

लेख भारी आहे!!! शाळेतला चित्रकलेचा तास आठवला!! चित्रं काढायला जमायची कशीबशी पण रंगवताना त्या चित्राची पुरती वाट लावायचो.

ग्रेटथिन्कर's picture

29 Nov 2013 - 4:09 pm | ग्रेटथिन्कर

झ्फ्ब्झ्ब्व्ह्ब ह्व

अनिल तापकीर's picture

29 Nov 2013 - 4:21 pm | अनिल तापकीर

सुंदर

खुसखुशीत शैलीतला भन्नाट लेख!
बाकी चित्र पाहून वरच्या लेखात अतिशयोक्ती वापरली असावी अशी शंका येण्याइतपत सुधारणा आहे.
गळ्यात गळा घातलेले दोघे : 'आपण दोघे भाऊ भाऊ मिळून मिळून चणे खाऊ' म्हणणारे खुशालचेंडू वाटत आहेत.
मस्तच!
लेख वर काढल्याबद्दल वाघुळमाणसाचे आभार!

वडापाव's picture

30 Nov 2013 - 12:33 pm | वडापाव

वाघुळमाणसाचे आभार! - =))

जे.पी.मॉर्गन's picture

30 Nov 2013 - 3:22 pm | जे.पी.मॉर्गन

आधी वाचला नव्हता. आमची पण कथा फार वेगळी नाही.

मी काढलेली "दहिहंडी" आणि "विहिरीवर धुणं धुणार्‍या बायका" ही चित्र पॅरीसमधल्या लुव्र की कुठल्याश्या म्यूझियम मध्ये लिओनार्डो दा विंची *हा एक बर्‍यापैकी चित्रकार होता म्हणे) च्या मोनालिसा आणि लास्ट सपरच्या रांगेत ठेवण्याच्या लायकीची चित्रं आहेत असं आमच्या देशपांडे मिसचं म्हणणं होतं. २ वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेला त्यांनीच माझ्या (आणि पर्यायाने माझ्या चित्रकलेसमोर अक्षरशः हात जोडले होते.

आपण सगळे भाई भाई!

जे.पी.

मृत्युन्जय's picture

30 Jan 2016 - 1:04 pm | मृत्युन्जय

लेखातले पहिले चित्र काढल्यावर अजुन काही चित्रे काढुन बघितली. चित्रकलेत मला हात नाही हे माहिती आहे पण शाळेतली चित्रकला बघता आता किमान काय काढले आहे हे समजण्या इतपत प्रगती आहे. फार काही भारी चित्रे नाहित हे माहिती असुनही इथे डकवण्याचा मोह आवरत नाही :)

Flowers 1

flower 2

flower 3

House 1

Farm House

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 1:12 pm | यशोधरा

भारीच की! कॅला लिली आणि देखावे आवडले. हा लेख मी कसा पाहिला नाही?

हायला मृत्युंजयराव तुम्ही पण एक तुमची चित्तरकथा पाडली होती व्हय आधीच?
तरीच माझ्या चित्तरकथेला जास्त प्रतिसाद मिळाले नैत ;)
प्रगती उत्तम आहे. चालू ठेवणे ;)

काय मस्त लेख आहे.ज्याने वर काढला त्याचे आभार.चित्र मात्र छान दिसून वेगळीच चित्तरकथा सांगत आहेत !

माझे तर ड्वाले पाणावले.किती किती प्रगती.
लगे रहो.

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 4:30 pm | यशोधरा

=)) प्रोत्साहन द्यायचे बाजूलाच!

इशा१२३'s picture

30 Jan 2016 - 7:46 pm | इशा१२३

कशाला ते.. ...रिकामे उद्योग
हापिसात काम नाहित का त्याना?

असूदे गो. :) कधी कधी बरे असते.
मला पण मीटींगमध्ये बसले की कोणी लंबी चौडी फेकत असेल खूप वेळ तर डूडलींग करायची सवय आहे! =))

इशा१२३'s picture

30 Jan 2016 - 8:44 pm | इशा१२३

ती सवय बरी गो. आसो .

चित्तरकथावाले
आता जरा परत फुलपाखरु अन बैल काढा बघु.

Rahul D's picture

30 Jan 2016 - 5:28 pm | Rahul D

लय भारी मित्रा.आमचे चित्रकलेचे सर आठवले. भितीने पोटात गोळा आला.

चितरकथा आणि चित्रे आवडली!

एक एकटा एकटाच's picture

1 Feb 2016 - 8:54 am | एक एकटा एकटाच

लेख आवडला

अभिजीत अवलिया's picture

3 Feb 2016 - 8:58 pm | अभिजीत अवलिया

फक्कड जमलाय लेख.
मला देखील चित्रकला कधीच जमली नाही/जमत नाही ह्याचे खूप दुख:ख होते आता. पूर्ण शालेय जीवनात निसर्ग देखावा सोडून काहीच जमले नाही. दोन डोंगर, मधून उगवणारा सूर्य, डोंगरासामोरून वाहणारे नदी, किनार्यावर एक झोपडी आणी उडणारे ४ पक्षी. एकदम सोपे काढायला.
ज्या गोष्टी आयुष्यात नक्की शिकायच्या आहेत त्यात चित्रकला देखील आहे.

मृत्युन्जय's picture

12 Jan 2017 - 5:31 pm | मृत्युन्जय

काही दिवसांपुर्वी हे अजुन एक चित्र काढले. आधीच्या चित्रांप्रमाणेच हे काही खुप भारी वगैरे नाही आहे. पण स्वानंदासाठी उत्तम :)

Rose 1