अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

यकु's picture
यकु in जे न देखे रवी...
15 Mar 2012 - 2:55 am

कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो. या सीमारेषेबाहेर त्याचे सतत पाऊल पडते असे नाही, ज्यांचे पडते ते लोक रविंद्रनाथांसारखे महाकवी होतात, थोड्याफार फरकानं ऋषिच होतात म्हटले तरी चालेल. काहीतरी जाणवतंय पण पूर्णपणे पकडताही येत नाही, आणि नजरेतून पूर्णपणे सुटतही नाही अशा विचित्र वेदना कवीला सहन कराव्या लागतात. या ‍कवितेमध्‍ये रविंद्रनाथांचा असाच एक अनुभव कैद आहे.

मराठीत, इंग्रजीत अनुवादित झालेल्या रविंद्रनाथांच्या कविता आजवर वाचल्या होत्या. एक इंग्रजी कविताही अभ्यासाला होती. पण गेयतेच्या, रविंद्रनाथांना होणार्‍या जाणिवेच्या प्रदेशात वाचकालाही घेऊन जाण्याइतपत भाववाहकता अनुवादकांना पकडता आली नसावी. वाचायला त्या बर्‍या होत्या, पण त्या कवितेच्या वाचनातून सर्वांचं कल्याण होवो, सर्व जग सुखी असो असला सर्वकल्याणकारी (आणि काहीसा बोजड) आशय बाहेर पडत होता.

पण इथे अनुवादक पुलं आहेत, त्यामुळं जास्त बोलण्याची काही गरज नाही. मी तर म्हणेन पुलंनी मूळ कवितेतील सूक्ष्म रिकाम्या जागाही मराठीत अनुवाद करताना अगदी मूर्तीकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवतो तेवढ्या सफाईनं भरुन काढल्या आहेत, त्यामुळं कवितेचं रसग्रहण टाळतो.

अजि ये प्रोभाते - आज पहाटे ‍रविकर आला

अजी ये प्रोभाते रोबिर कोर
केमोने पोशिलो प्राणेर पोर
केमोने पोशिलो गुहार अधारे प्रोभातपाकीर गान
ना जानी केनोरे अतोडिन पोरे जागिया उठिलो प्राण
जागिया उठेचे प्राण
ओरे उठोली उठेचे बारी
ओरे प्राणेर बाशोना प्राणेर अबेग रुधिया राखिते नारी
थोर थोर कोरी कापिचे भूधोर
शिला राशी राशी पोरिचे खोशे
फुलिया फुलिया फेनिल शोलिल
गोरोजी उठिचे दारुन रोशे
हेथाय होथाय पागोलेर प्राय
घुरिया घुरिया मातीया बेराय
बहिरिते छाय, देखिते ना पाय कोथाय कारार दार
केनो रे बिधाता पाशान हेनो
चारी दिके तर बधोन केनो!
भंग रे रिधोय, भंग रे बधोन
शध रे ‍अजिके प्राणेर शधोन
लौहोरीर पोरे लौहोरी तुलिया
अघातेर पोरे अघात कोर
मातीया जोखोन उठेचे पोरान
किशेर आधार, किशेर पाशान!
उठोली जोखोन उठेचे बाशोना
जागोते तोखोन किशेर दोर!

अमी धालिबो कोरुनाधारा
अमी भंगिबो पाशानकारा
अमी जोगोत प्लाबीया बेराबो गहिया
अकुल पागोल-पारा.
केश इलैया, फुल कुरैया
रामधोनू-अका पाखा उरैया
रोबिर किरोने हशी छोरिया दिबो रे पोरान धाली
सिखोर होईते शिखोरे छुटिबो
बुधोर होईते बुधोरे लुटिबो
हेशे खोलखोल गेये कोलकोल
ताले ताले दिबो ताली
एतो कोठा आछे, एतो गान आछे, एतो प्राण आछे मोर,
एतो शुख आछे, एतो शध आछे - प्राण होये आछे भोर
की जानी की होलो आजी, जागीया उठिलो प्राण
दूर होते शुनी जेनो मोहाशगोरेर गान
ओरे छारी डिके मोर - ए की कारागार घोर
भांग भांग भांग कारा, अघाते अघात कोर
ओरे आज की गान गायेचे पाखी
एशेचे रोबिर कोर

आज पहाटे रविकर आला
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला
प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला आणि जाहला अंधार्‍या या गव्हरात मज
स्पर्श आज त्या पहाट पक्षाच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनी नकळे माझा प्राण ऐसा जागूनी उठला
जागूनी उठला प्राण अरे आन उसळून आले नीर
प्राण वासना रोधू न शकली मत्प्राणांचा धीर
थरथर थरथर कंपित भूधर शीळाखंड कोसळून पडले
फुलूनफुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापून उठले
इथेतिथे मग वेड्यापरी जल मत्त भिंगर्‍या मारीत सुटले
शोधू लागले तरी न दिसले बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणाच्या कशास येथे राशी पडल्या
चहूदिशांना कशास त्यांच्या उंचउंच या भिंती घडल्या
ह्रदया आता सर्व बंधने तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी मने जोड ही
लाटेवरती उसळून लाटा आघातावर कर आघाता
मत्त होऊनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळूनी उठता सर्व वासना
जगती कोणाचेही भय ना
करुणाधारा आता घालीन
पाषाणाच्या कारा फोडीन
बुडोनी सारे जग हे टाकीन
चहूदिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाईन गाणी
केस पिंजूनी फुले उधळूनी
इंद्रधनूने रंगवलेले पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकीन पंच:प्राण उधळूनी
या शिखरातून त्या शिखरातून देईन झोकून
या खडकातून त्या खडकातून घेईन लोळण
हसेन खळखळ गाईन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत उर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले नकळे
कानी माझ्या महारणवाचे गाणे आले
चहूदिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारागृह ते वज्राघाते
पहाटपक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शूनी गेला
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला

(मूळ बंगाली रचना: रविंद्रनाथ टागोर, मराठी अनुवाद: पु. ल. देशपांडे) माझ्या एका धाग्यात गविंशी आणि नंतर पैसा यांनी दिलेल्या दुव्यात पुलंचा उल्लेख आला. त्या दुव्यावरुन दुसर्‍या एका वर पुलं या कवितेचा मराठी अनुवाद म्हणताना दिसले. तो तसाच टंकला आहे आणि मूळ बंगाली कवितेचा इंग्रजी‍ लिपीतून मराठीत लिप्यंतरण केले आहे.

अद्भुतरसरौद्ररसकलावाङ्मयकवितामुक्तकभाषाव्युत्पत्तीसाहित्यिक

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

15 Mar 2012 - 6:14 am | सांजसंध्या

अनुवाद वाचतांना हरवूनच गेले.
रविंद्रनाथांच्या कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद.. क्या बात !

गवि's picture

15 Mar 2012 - 6:47 am | गवि

सुंदर .. धन्यवाद.

सुंदर अनुवाद.
मूळ बंगाली रचना इथे दिल्याने त्या भाषेचाही गोडवा मस्त चाखता आला. :)

प्यारे१'s picture

15 Mar 2012 - 2:19 pm | प्यारे१

अगदी हेच म्हणायचे असल्याने इथे 'घुसलो'
;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2012 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली. धन्स.

-दिलीप बिरुटे

तर्री's picture

15 Mar 2012 - 8:40 am | तर्री

<कानी माझ्या महारणवाचे गाणे आले >
महारणवाचे गाणे म्हणजे काय ते समजले नाही.

बाकी सुंदरच !

महा + अर्णव = महासागर
उच्चारी महारणव असे आले आहे
संधि होताना आ + र = महार्णव असे व्हायला हवे होते

तर्री's picture

15 Mar 2012 - 8:54 am | तर्री

वाह ! आता अर्थ पूर्ण लागला , अती मजा आला !!

कवितानागेश's picture

15 Mar 2012 - 10:11 am | कवितानागेश

वाचनीय. :)
अजून येउ दे.

प्रीत-मोहर's picture

15 Mar 2012 - 11:46 am | प्रीत-मोहर

मस्तच ...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Mar 2012 - 12:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एका महान कवीच्या कवितेला एका संवेदनशील मनाने दिलेली हि पोच आहे यकु.
वंगचित्रे या पुस्तकात पुलंनी हि कविता दिली आहे. त्याच पुस्तकात अजुनही इतर काही रचनांचे अनुवाद आहेत.
अगदी लहान मुलांसाठी रविंद्रनाथांनी लिहीलेल्या कविता सुद्धा जेव्हा पुलंच्या लेखणीच्या फिल्टर मधुन समोर येतात, तेव्हा दोन गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवतात,
१. मुळ कवितेत मांडलेली कल्पना अत्यंत उच्च कोटीची आहे.
२. बंगालीतून मराठीत येतांना, त्या रचनेची गुणवत्ता, कच्च्या खड्याला पैलू पाडून लखाखणारा हिरा तयार व्हावा तशी उजळली आहे.

त्या द्रष्ट्या महाकवीला आणि त्या संवेदनशील मनाला, मनापासून सलाम!! __/\__

चैतन्य दीक्षित's picture

15 Mar 2012 - 2:25 pm | चैतन्य दीक्षित

हा लेख लिहिल्याबद्दल तुम्हाला लाख लाख दुवा !
तुम्ही -दुसर्‍या एका वर पुलं या कवितेचा मराठी अनुवाद म्हणताना दिसले. असे लिहिले आहेत.
तो दुवा देता का? पु.ल. ही कविता सादर करताना पहायला/ऐकायला मिळालं तर कोटी कोटी दुवा देऊ :)

-चैतन्य

हारुन शेख's picture

15 Mar 2012 - 2:46 pm | हारुन शेख

खूपच सुंदर संकलन ! या कवितेचे नाव ' निर्झरेर स्वप्नभंग' असे आहे. निद्रिस्त आणि स्वप्नात गुंग असलेलेल्या निर्झाराला एके दिवशी अचानक रविकराच्या (सूर्यकिरणासाठी रविकर हा शब्द, क्या बात है.) स्पर्शाने स्वत्वाची जाणीव होते आणि तो मुक्त कडे कपारी फोडत प्रवाहस्थ होतो अशी कवीची कल्पना. केवळ अप्रतिम आणि पुलंचा अनुवादही सरस उतरलाय. तुम्ही मूळ बंगाली कविता हि दिलीय त्याबद्दल आभार. अशाच अजून कविताही येऊ देत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमोल केळकर's picture

15 Mar 2012 - 2:59 pm | अमोल केळकर

सुंदर , सुंदर :)

अमोल केळकर

सर्वांचेच आभार व्यक्त करतो.

मिसळलेला काव्यप्रेमीचे विशेष आभार - ही कविता 'वंगचित्रे' या पुस्तकातली आहे हे सांगितले
त्याबद्दल
हारुन शेख यांचेही विशेष आभार - या कवितेचे मूळ नाव सांगितले त्याबद्दल

चैतन्य दिक्षित - तुम्ही खरडवही पहाता ना? ‍दुवा घेतलाय

आणि काही माहिती असेल या अनुवादाबद्दल, तर जरुर शेअर करा अशी विनंती

यशवंत साहेब, अप्रतिम संकलन.

खर तर हिमालय हा एकच आहे. परंतु आपण ह्या धाग्यातुन दोन दोन हिमालया एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना एकत्र आणल आहात.

लाख लाख धन्यवाद तुम्हाला.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 7:02 pm | अत्रुप्त आत्मा

मि.का.शी सहमत.. आणी यक्कूशेठना विनंती की त्यांनी या सदरात नेहमी लेखन करावे... ---^---

पैसा's picture

15 Mar 2012 - 7:02 pm | पैसा

कितीही वेळा वाचलं तरी समाधान होत नाहीये! एक लक्षात आलं, ही बंगाली तशी आपल्याला थोडी थोडी कळते बारकाईने वाचलं तर!

प्राजु's picture

16 Mar 2012 - 2:01 am | प्राजु

सुंदर!

चित्रा's picture

17 Mar 2012 - 3:59 am | चित्रा

धन्यवाद.

ही कविता वाचली नव्हती असे वाटते. वंगचित्रे वाचले तेव्हा ही कविता बहुतेक डोक्यावरून गेली म्हणून सोडून दिली असावी.

अवांतर

"नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला"

ह्याला "गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला" ची चाल आहे असे वाटले!

मला वाटते यात निरर्थकपणे रूढीत परंपरांमधे बंदिस्त झालेल्या एका जीवाला सारी बंधने तोडून खरे जगणे जगायचे आहे. बागडायचे आहे.माणसामाणसातील बंदिस्तता देखील त्याला खटकत असावी. हे सुंदर व चपखल शब्दांत रविंद्र नाथानी मांडले व मग प्यीयेल यांना अर्थवाही
अनुवादास स्फुरण चढले तर नवल ते काय ? उपहार , काबुलीवाला ई कथा लिहिणार्‍या सिद्धहस्त कविची ही रचना केवळ क्लास !