आकाश उजळले होते,,,

अन्नू's picture
अन्नू in जे न देखे रवी...
8 Mar 2012 - 3:47 am

आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली.
s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>

" आकाश उजळले होते "

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

----(गझलसम्राट सुरेश भट)

टीपः- अधिक गझलांसाठी http://www.sureshbhat.in/sbpoetry या वेब साईटवर पहा. भटांच्या अजुन काही गझला तेथे तुंम्हाला भेटतील.
=> गझलवेडा अन्नू Smiley

करुणशांतरससंगीतकवितागझलवाङ्मयमुक्तक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 6:12 am | अत्रुप्त आत्मा

व्वा...व्वा...अन्नू जी,आज अगदी जुन्या अठवणी(आम्च्या बरोबर ;-) ) जाग्याच होण्याचा योग दिसतोय...ज्या मैत्रांच्या कोंडाळ्यात सुरेश भट,ग्रेस यांच्या वरुन रात्र/रात्र जुगलबंदी चालायची त्या मैफिलितली ही पण १गझल आहे... खाली दिलेल्या लिंक बद्दलही धन्यवाद.

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 6:27 pm | वपाडाव

अन्नु,
माफ करा पण एवढ्यासाठी धागा का काढलात हा प्रश्न विचारावा वाटतो? आठवण आली तर आत्म्यांच्या खवत जाउन लिहा... त्यांच्या प्रतिसादाला प्रत्त्युत्तर द्या... पण वेगळा धागा काढणे रुचले नाही, हे सांगतो. हे सर्व इतरत्रही करता आले असते.
असो, आपल्या भावनांचा आदर करतो अन थांबतो.

अन्नू's picture

8 Mar 2012 - 6:49 pm | अन्नू

मी त्यांना व्यक्तीशः खरडवहीत हि लिंक देऊ शकत होतो. पण या धाग्याचा अर्थ फक्त त्यांची आठवण काढणे असा नसून त्यांच्या गझलची लिंक इतरही (म्हणजेच ज्यांना त्याची आवड आहे, किंवा आमच्यासारखे ज्यांना ऑनलाईन साहित्य वाचण्याचे वेड आहे अशा) मान्यवरांना देण्याचा होता. :)