बडवा (७)

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
2 Mar 2012 - 11:40 am

भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532
भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541
भाग ७ - http://www.misalpav.com/node/20603

नियतीने पायात घुंगरू बांधले. ता तै तम धित तै तम. भारतीय शास्त्रीय न्रुत्यप्रकार पाच. प्रत्येक पंचतत्वाच्या नावाने एकेक. त्यातले भरतनाट्यम म्हणजे अग्निनृत्य. ता तै तम धित तै तम. सूत्रल अदवू चा पदन्यास सुरू झाला.त्यात चार हस्तमुद्रा वापरतात. पाची बोटे एकत्र असलेली पताका, दुसरी अलपद्म् , तिसरी अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी बनवलेले हरणाचे तोंड - कटकमुख आणी चौथी मुद्रा शिखरमुद्रा . ता तै तम धित तै तम. नियतीने नमस्कारम करून दोन्ही हाताच्या पताका उंचावल्या. दोन्ही पताका डोक्यावर इकडून तिकडे फिरू लागल्या. झेंडे.. झेंडे ...झेंडे... झेंडे. ता तै तम धित तै तम. मग नियतीच्या उजव्या हाताच्या पताकेचे उमललेल्या कमळात - अलपद्मात रूपांतर झाले. चारी बोटे बाहेर ताणलेली अन करंगळी मनगटाजवळ आलेली. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥

नियतीच्या दोन्ही हातांची कमळे डोक्यावर उधळली गेली. पावसाच्या सरींप्रमाणे कमळे अंगावर कोसळू लागली. त्या लाडीक सुखाने, सुवासाने नियतीचा चेहरा सुखाचे प्रसन्न भाव दाखवत होता. ता तै तम धित तै तम. पितृप्रेमाचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा, फुलेच फुले होती माझ्या आयुष्यात. पण मधेच उपटले हे - दोन्ही हाताच्या पताका आभाळात फेकत नियतीने दाखवले - झेंडे.. . अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥

मूठ बंद अंगठा सरळ ताठ वर - दोन्ही हाताच्या शिखरमुद्रा नियतीने समोरासमोर धरल्या. कल्प्नेतला राजमुकुट शिखरमुद्रांनी डोक्यावर चढवला. विचारले -राजकारणाचे झेंडे ? पताका परत आभाळात फेकत विचारले - जातीचे झेंडे ? धर्माचे झेंडे ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे राजकारण ? कोणाचा धर्म ? कोणाच्या जाती ? ता तै तम धित तै तम ॥

पित्याचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा अंगावर पडायचा थांबला. कारण मधेच उपटले हे - झेंडे.. शिखरमुद्रा नियतीने उलटी धरली. अंगठ्याने कपाळावर उभे गंध रेखाटले. आणी दाखवला - पुरुष..... पुरुषांची आडनावे. पुरुषांची वंशशुद्धी, पुरुषांच्या जाती, पुरुषांचे धर्म, पुरुषांचे राजकारण. झेंडे.. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ? ता तै तम धित तै तम॥

अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी नियतीने हरणाचे तोंड तयार केले. करांगुली आणी अनामिकेचे दोन कान झाले. कटकमुद्रा अवकाशातले कण तोंडाने वेचू लागली. नीयतीच्या आयुश्यातले क्षण होते ते. पित्याने डोक्यावर उचलून ज्योतिबाला नेले तो क्षण, मातृहीन मुलीला घास भरवले ते क्षण, मुक्या मुलीला व्यक्त होता यावे म्हणून भरतनाट्यम शिकवले ते क्षण. प्रियकराने कंबरेवर हात ठेवला तेंव्हा उठलेला थरार, त्याची अमोघ भाषणे ऐकताना अंगावर उठलेला रोमांच, त्याच्या ओठांच्या स्पर्षातली जादू. कटकमुद्रा सारे क्षण सार्‍या भावना टिपत होती. ते सारे आता पुन्हा का मिळणार नाही ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ? ता तै तम धित तै तम॥

शिखरमुद्रांनी उचलून नियतीने राजमुकुट फेकून दिला. प्रियकर काय निवडेल ? राजमुकुट की मोगरा ? पिता काय निवडेल झेंडा की जास्वंद ? ता तै तम धित तै तम. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. नियतीने फेर धरला. नाहीतरी पुरुषांच्या या महान भारतीय नाट्यात मुकी नियती काय करू शकणार होती? नियतीचे अग्नीनृत्य पेटत चालले, फेर्यांचा वेग वाढत राहिला. ता तै तम धित तै तम, ता तै तम धित तै तम ॥

*****************************************************************************************************

शिंदे सर जरासे उखडले होते. राजवीर सोबतची बैठक विषेश जमली न्हवती पण अजून आशेला वाव होता. नियती सुंदर असली तरी मुकी होती. तिला चांगल्या घरी उजवायला थोडेबहुत कष्ट पडणारच. आज बरेच विषय मार्गी लागायला हवे होते. पत्रकाची केस, टीपू सुल्तान नगरची कारवाई, हे घरगुती विषय, विनोदचा राजकारण प्रवेश. सगळ्या विषयांवर विनोद्शी सविस्तर बोलणे आवश्यक होते.

पेग पहीला

(क्रमशः)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

2 Mar 2012 - 11:53 am | आदिजोशी

पोपट केलात राव. मजा येतेय वाचायला तोवर एकाच स्क्रोल मधे संपला पण भाग.

नक्की.

मी-सौरभ's picture

2 Mar 2012 - 6:30 pm | मी-सौरभ

जम्या नै डाक्तरसाब

किसन शिंदे's picture

2 Mar 2012 - 6:47 pm | किसन शिंदे

बर्याच दिवसांनी हा भाग आला त्यामुळे लिंक थोडिशी तुटली होती. उद्याच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय.

sneharani's picture

3 Mar 2012 - 10:57 am | sneharani

वाचतेय, पण भाग जरा मोठे लिहा!

राजघराणं's picture

3 Mar 2012 - 3:17 pm | राजघराणं

अवश्य

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा

हा भाग म्हणजे=२५ ते ४० ओव्हरमधला संयमित धिम्या गतीचा खेळ ;-)

शित्रेउमेश's picture

10 Mar 2012 - 11:22 pm | शित्रेउमेश

अहो, पुढ्चा भाग लवकर येवुदेत....
आम्हि आवर्जून वाट बघतोय.