भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532
भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541
(पूर्वसूत्र : सर्रकन काटा आला शिंदेंच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या पूर्वीच्या बैठ्कीचा प्रसंग उभा राहिला. बेळगावातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांची बैठक भरली होती......."मी सांगतो उपाय" शास्त्रीजी म्हणाले, शात्रीजी बोलायला उभे राहिले तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अंगार बरसत होता. अंग घामाने डबडबले होते. ते जी कामगिरी उपाय म्हणून सांगणार होते. त्यामुळे सारेच आवाक झाले होते. बेळगावातल्या एकाही हिंदूने असे क्रुत्य याआधी केलेले न्हवते.)
" सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला." संतापाने थरथरत शास्त्रीजी म्हणाले.
कोयत्याने खीमा बनवतो सगळ्या सय्यदांचा, दात ओठ चावत कृष्णा उत्तरला. " आपली तयारी आहे २० वर्ष तुरुंगात खडी फोडायची. पण धर्माला डाग लागू देणार नाही. "
त्याचा हात ओढत विनोद म्हणाला, " शांत व्हा रे सारे... थंड डोक्यानी काम घ्या. पोरगी तर हातची गेली शास्त्रीजिंच्या. तिला विधवा करून काय मिळवणार आपण?.. थंड म्हणजे षंढ न्हवे. सूड हवाच. पण तो विचार्पूर्वक, योजनाबद्ध आणि त्यांच्या जमातील गारद करणारा असला पाहिजे. ते सय्यद राहतात ते टीपू सुलतान नगर जाळून टाकू. बेघर करू भडव्यांना. हाकलून देउ इथून. येत्या माघी अमावस्येला ही कामगिरी पार पाडू. सरांच्या मतदारसंघात हिरवी कीड नकोच ही. त्यांच्या फुगीर संख्येनेच पडलो आपण मागच्यावेळी. फक्त ४३ मतांनी...".
"तुम्ही येउन जाउन राजकारणच करणार ! " साने बोलला. सदाशिव साने.(स.सा.) १२ इंच छातीचा, २ दात पुढे आलेला सनातन प्रभातचा बेळ्गाव आव्रुत्ती संपादक. त्याच्या बावळट थोबाडावर सणसणीत ठोसा मारून - त्याला डेंटल ट्रीट्मेंट द्यायचा मोह - फार फार वेळा आवरला होता विनोदनं." राजकारण हा तुझ्यासारख्या सशांचा विषय नाही भाड्या. तुम्ही जेंव्हा यज्ञात तूप ओतायच्या पळीची लांबी किती असावी ह्यावर परिसंवाद रंगवत होतात, तेंव्हा आल्लाउद्दीन खिलजि नालंदा जाळत होता." इती विनोद.
सदाशिव साने आतून तंतरला होता पण चाचरत बोलला " धर्माचरण नाही म्हणून मार खातो आपण. कामगिरीला अमावस्येचे मुहूर्त काढणारे... विनोद साहेब -- शिंदे सरांबरोबर स्कॉच पिणार. शिंदेंच्या मुलीबरोबर सुनेत्रा स्टेजवर नाचणार. संस्कार नाहीत धर्माचरण नाही इथे . सिनेमे बघणार्या पोरी पळणारच की मुसलमानांबरोबर.. ..."
शिंदेंची डावी भुवई वर चढली आणी ती खाली होण्याआधी विनोदच्या उजव्या हाताचा ठोसा सशाच्या थोबाडावर बसला होता. कोलमडलंच ते. त्याला पुरता ठेचायला क्रूष्णा धावला.
शिंदेनी हाताच्या इशार्याने त्याला थांबवलं, आणी शांतपणे म्हणाले " राजकारण ही शिवी नाही साने. हिंदूचा राजकीय जय म्हणजेच हिंदुत्व. आणी सुनेत्रा ही बेळगावातली एकच केस नाही.... इंजिनिअरिंग कॉले़जच्या १० -१२ पोरींना फूस लावून पळवलय लांड्यांनी. लव्ह जिहाद म्हणतात ते त्याला. त्यासाठी बकायदा मशीदीतून प्रोत्साहन दिलं जात, आणी मक्केशा ट्रस्ट मार्फत पैसा पुरवला जातो.लोकसंख्या वाढवून राजकीय ताकद वाढवण्याचा डाव आहे हा. त्यांच आक्रमण राजकीय अन धार्मिक आहे. त्यामुळे त्याला उत्तरही तसंच आहे. असलं पाहिजे. यापुढे बैठ़कीला तुला आमंत्रण नाही. क्रिष्णा बाहेर काढ याला.... "
मान खाली घालून साने निघाला; जाताना पुटपुटला " संस्कार नाही.... धर्माचरण नाही... सत्संग नाही .. सनातन धर्मशास्त्राचा मुहूर्त...."
तेव्हढ्यात विनोद ने मागुन आवाज दिला " ए सशा अमावस्येच्या अंधार्या रात्री लढाया मारून स्वराज्य उभारलं महाराजानी.. तेंव्हाही तुझ्यासारखे भुस्कट ज्योतीशी बकतच होते .. हो चालता... .आणी ऐका सर्वानी ....टीपू सुल्तान नगर पेटवा .. ह्या माघी अमावस्येला अंधाराचा फायदा घेत तिथे घुसायचं.. शिमगा करायचा.... आणी येत्या शिवरात्रीला विजयादशमी साजरी करायची. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा की........ जाळावा | धर्मसंस्थापनेसाठी || "
शास्त्रीजी कडाडले. " काय फरक पडेल त्याने ? त्यांनी माझी पोरगी नुस्ती पळवली नाही. तिला बाटवली. धर्मानी... शरीरानी... आणी मनानी पण. बापाचा हात तोड्णार्या सय्यदांच्या घरात सुखानी नांदतीय अवदसा. जशास - तसे. तरच तो खरा सूड. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" || सयदांच्या घरची पोरगी पळवा. तिला हिंदू करा. लग्न करून नांदवा.. आणी ती फक्त सुरवात असू द्या... मी देतो प्रोत्साहन हिंदू तरूणांना... प्रत्यकाने मुस्लीम पोरींशी लग्न करून धर्म वाढवा.. १ महिन्यात घाबरून शरण येतील हरामखोर सय्यद. भित्री जमातआहे त्यांची. एकही हिंदू पोरगी बाट्णार नाही त्यापुढे......." एव्हाना शिंदेंतला मुत्सद्दी राजकारणी जागा झाला होता आणी याची राजकीय गणीते बांधू लागला होता. हे क्रुत्य करणारा तरूण -- शास्त्रींसाठी हळहळणार्या -- सार्या बेळगावचा हिरो बनणार हे निश्चित होतं.
पण आग लावण्यासाठी सळसणारे कार्यकर्ते, अग्निप्रदक्षिणेसाठी मात्र तयार होत न्हवते. कारण उघड होतं - जात बुडण्याची भीती! जातीशिवाय हिंदू नसतोच! किंवा जातीचा कुळाचार त्यातली कर्मकांडे, सण वार हाच हिंदूचा धर्म असतो. आपण मुसलमानिणीशी लग्न केलं तर.. तर, पै पाव्हणे वाळीतच टाकतील की! आपल्या बहिणींशी लग्न कोण करेल मग ? परंपरेचा अभिमान बाळगणार्यांना ती परंपराच हतबल बनवत होती. षंढ बनवत होती. धर्माभिमान्यांना धर्मच पंगू बनवत होता.ओळखलं ते शिंदेंनी. विनोदच्याही लक्षात आलं . मगाशी डरकाळ्या फोडणारा वाघ गाय झाला होता. दबक्या आवाजात तो म्हणाला, " शास्त्रीजी पण त्या उस्मान च्या बहिणीशी सूत नाही जमलेलं आपल्यापैकी कुणाचं ."
"हिजड्यानो" शास्त्री ओरडले. अंग घामानी थबथबलंवतं त्याचं. त्यांचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळले " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? काय लागतं पोरगी पटवायला ? जे उस्मान कडे आहे आणी तुमच्याकडे नाही ते ? कळू तरी द्या मला. आणी नसेलच पुरुषार्थ तुमच्यात तर सांगतो बेळगावातल्या सगळ्या मुलींना... जा सय्यदांकडे नाहितर शेखांकडे नांदायला. आहे काय त्या उस्मान कडे ? जरासा बरा चेहरा आणी गुलुगुलु भाषा"
शांतता. फुलपाखराचा पंख फड्फड्ला असता तरी कानठळ्या बसल्या असत्या अशी शांतता.
कोणीच पूढे येत नाही असे पाहून शिंदे दुखावले. म्हणाले " काम होइल शास्त्रीजी.. फक्त कोणीतरी सुरवात केली पाहिजे. एकदा सुरवात झाली की प्रथाच पाडू बेळगावात... अशा लग्नांची . मक्केशा ट्र्स्ट्च्या आयला ! मी दीन आर्थीक मदत आपल्या पोराना."
जातीपातीपलीकडे पोचलेला आणी चळवळीसाठी घर दार सोडलेला एक कार्यकर्ता होता त्यांच्याकडे. त्यांच्या त्या मानसपुत्राला खासदारकीसाठी लाँच करायची हीच नामी संधी होती...तो दिसायलाही उजवा होता. बोलायलाही चतुर होता. त्यांनी आपली नजर विनोद कडे वळवली. त्यांच्या नजरेत आशा होती , विश्वास होता आणी आज्ञा होती.
त्यावेळी नाही म्हणायची छाती न्हवती विनोद्ची. आणी त्याचं आणी नियतीचं प्रेम प्रकरण सरांना सांगायची ती वेळ ही न्हवती. तो मानेनेच हो म्हणाला. शिंदेंचा उर दाटला.
****************************************************************************************************
झर्रकन सारा प्रसंग अॅडवकेट शींदेंच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आज शास्त्रीजींचा तुटका हात पाहून सारं पुन्हा आठवलं. आज नियतीला स्थळ म्हणून दाखवायचं होतं त्यासाठीच शास्त्रीजींना बोलावल होत. भावी जावयशी आजच नीट ओळख होणार होती. पहिल्या भेटीत उद्दाम वाटला होता तो शींदेना. पण पदर जुळलेलं खानदानी ९६ कुळी मराठ्याच घर. शिंदेना स्वत:चं तारुण्य आठवलं. उद्दाम बेदरकार स्वभाव. उंच हँडसम पर्सनॅलिटी. समोरची बाजू कितीही मोठी असली तरी - भीक घालणार नाही. अशी ताठ तत्वनिष्ठा. इंन्स्पे़क्टर राजवीर पाटील.
राजवीर आणी एसीपी चौगुले काही मिनिटातच पोचणार होते. आपल्याला चौगुले साहेब कुठे नेतायत ते राजवीरला माहित न्हवतं.
सच्या सत्यशोधकी परंपरेतला राजवीर शास्त्री आणी पत्रिका पाहून काय प्रतिक्रिया देइल ? याचाही अंदाज शिंदेनाही न्हवता.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
3 Feb 2012 - 8:32 pm | मी-सौरभ
हा भाग पण छान जमलाय..
आता लिंक तोडू नका.
4 Feb 2012 - 8:51 pm | राजघराणं
पहातो प्रयत्न करून
3 Feb 2012 - 9:29 pm | पैसा
पुढचा भाग असाच रंगतदार येऊ द्या!
3 Feb 2012 - 11:17 pm | ५० फक्त
छान चाललंय,
4 Feb 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
हा भाग मात्र मला पूर्ण पणे असाच अपेक्षित होता,,आणी तो तसा आलाही. लव्ह जिहादला...जशास तसे उत्तर ही नीती या भागात प्रकट होणार याचा तर निश्चित अंदाज होता,,,पण त्याच बरोबर इतर महत्वाच्या धार्मिक मुद्यांनाही अतिशय उत्तमपणे स्पर्श झालाय या भागात...
१)काही काही वाक्य तर अत्यंत आशादायक आणी हृदयस्पर्शी आहेत...ती खाली नोंदवतो---
@हिंदूचा राजकीय जय म्हणजेच हिंदुत्व.
@थंड म्हणजे षंढ न्हवे. सूड हवाच. पण तो विचार्पूर्वक, योजनाबद्ध
@त्यांच आक्रमण राजकीय अन धार्मिक आहे. त्यामुळे त्याला उत्तरही तसंच आहे. असलं पाहिजे.
२)हे खाली नोंदवलेले दाखले तर आता वारंवार द्यावे लागणार आहेत-
@तुम्ही जेंव्हा यज्ञात तूप ओतायच्या पळीची लांबी किती असावी ह्यावर परिसंवाद रंगवत होतात, तेंव्हा आल्लाउद्दीन खिलजि नालंदा जाळत होता."
@" ए सशा अमावस्येच्या अंधार्या रात्री लढाया मारून स्वराज्य उभारलं महाराजानी.. तेंव्हाही तुझ्यासारखे भुस्कट ज्योतीशी बकतच होते ..
@परंपरेचा अभिमान बाळगणार्यांना ती परंपराच हतबल बनवत होती. षंढ बनवत होती. धर्माभिमान्यांना धर्मच पंगू बनवत होता
मागचे सर्व भाग उत्तम झालेतच,पण आजच्या या भागाकरिता डॉक्टर तुंम्हाला सादर प्रणाम...
6 Feb 2012 - 11:48 am | राजघराणं
पण शेवट तुम्हाला अपेक्षित नसेल
6 Feb 2012 - 11:57 am | प्रचेतस
हो ना.
तो तुम्हाला अपेक्षित असाच होणार की. ;)
6 Feb 2012 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा
पण शेवट तुम्हाला अपेक्षित नसेल>>> बघू ना काय होतो ते...पण आम्च्या(ही) मनात दोन प्रकारचे शेवट काऊंट झालेले आहेत...
१)सर्वसामान्य जनविरोधी शेवट
२)मनाला त्रास होणारं जळजळीत वास्तव चितारणारा शेवट
या कादंबरीचा शेवट स्वप्नाळू आणी गो-गोड्ड असूच शकत नाही,,,याची मात्र पूर्ण खात्री आहे... ;-)
8 Feb 2012 - 1:57 pm | राजघराणं
यापैकी नाही
9 Feb 2012 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा
@यापैकी नाही...ऐसी बात है...तो फिर देखना(ही) पडेगा... आने के बाद ;-)
4 Feb 2012 - 10:00 am | अप्पा जोगळेकर
सदर लिखाणावर 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकातील विचारांचा प्रभाव असावा असे वाटून गेले. एनीवे चांगल जमतंय.
4 Feb 2012 - 11:34 am | जाई.
उत्सुकता वाढतेय
पुभाप्र
4 Feb 2012 - 11:57 am | चावटमेला
हा भागही छान जमलाय.
पुलेशु
7 Feb 2012 - 2:40 pm | राजघराणं
३ दिवसांनी
9 Feb 2012 - 1:49 pm | गणेशा
मस्त येवुद्या अजुन
9 Feb 2012 - 2:19 pm | किसन शिंदे
पुढचा भाग कधी?
10 Feb 2012 - 11:48 am | राजघराणं
अजून २-३ दिवस तरी लागतील .. थोडा कामात आहे.
13 Feb 2012 - 7:35 pm | शित्रेउमेश
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय...
लवकर येऊ देत.