सफर तैवानची-भाग-३-लान्-यू बेट

हंस's picture
हंस in भटकंती
12 Feb 2012 - 5:58 am

सफर तैवानची-भाग-१-व्हालियन आणि माझे विद्यापीठ - http://www.misalpav.com/node/20357
सफर तैवानची-भाग-२-मूलनिवासींची सांस्कृतीक स्थित्यंतरे - http://www.misalpav.com/node/20492
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

२००८ साली लान-यू बेटावर (Lanyu Island) ( ह्याला ऑर्कीड बेट (Orchid Island) ही म्हणतात) ताव (Tao/Yami)जमातीच्या दुर्मिळ अशा नविन बोटीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला त्याचा हा वृत्तांत-

(आंजासा)

मुख्यविषयाकडे वळण्याआधी आपण बेटाचा थोडा इतिहास आणि भूगोल पाहुयात-

लान्-यू बेट तैवानच्या दक्षिण-पूर्वेला आणि फिलीपिन्स जवळ आहे. हे बेट भूगर्भिय हलचालींतून ज्वालामूखीच्या उद्रेकातून निर्माण झाले आहे. या बेटावर मुख्यत्वेकरुन ताव किंवा यामी लो़कांची पूर्वापार वस्ती आहे. असे मानले जाते की ही जमात फिलीपिन्समधुन साधारण ८०० वर्षांपूर्वी या बेटावर स्थलांतरीत झाली. त्यामूळे ह्यांच्या भाषेत आणि खादयातही फिलीपिन्सशी समानता आढळते. बेटाच्या एकुण ४००० लोकसंख्येपैकी साधारण २४०० यामी/ताव जमातीचे तर उर्वरित हान चीनीवंशीय आहेत.
जापानी राजवटीच्या काळात, या बेटावरील अनोखी प्राणीसृष्टी आणि ताव संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे बेट सर्वसामान्यांच्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. पण नंतर कोमिंगतांग राजवटीच्या (वर्तमान सरकार) काळात हा प्रदेश खुला करण्यात आला.
जगातील इतर सरकारांच्या मूलनिवासींच्या संस्क्रुतीच्या संवर्धनाप्रती अनुत्सुक धोरणांचीच रि ओढत ह्या सरकारने बेटाच्या निसर्गसौंदर्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. १९७४ साली तैवानच्या "अणूउर्जा आयोगा"ने आण्विक कचर्याच्या विल्हेवाटीसाठी या बेटावरील जागा तब्यात घेण्याचे ठरवले, आणि ह्यासाठी जागा तब्यात घेताना त्यावेळच्या ताव जमातीच्या मुख्याधिकाराशी, की जो अशिक्षित होता, खोटे बोलून, मासे हवाबंद करण्याचा कारखाना उभारत आहोत असे सांगून जागा ताब्यात घेतली. हा सर्व कारभार सरकारकडून गूपचूप चालू होता जोपर्यंत बेटावरिल मिशनर्यांचे तैवान मुख्यभूमीवरील वर्तमानपत्रांतील बातम्याकडे लक्ष गेले नव्हते. हे सर्व समजल्यानंतर बेटावर जनक्षोभ उसळला, आणि यासर्वातून एक आंदोलन उभारण्यात आले, त्यात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या १) ह्या आण्विक कचरा विल्हेवाट आस्थापनेचे दुसर्या टप्प्यातील काम थांबवन्यात यावे, २) बेटावर आण्विक कचरा आणण्याचे काम त्वरीत थांबवावे, ३) आणि ही आस्थापना जून १९९१ पर्यंत बंद करण्यात यावी. आता पर्यंत यातील पहिल्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत, आणि सरकार ह्या आण्विक कचरा विल्हेवाटीसाठी रशिया, चायना, उत्तर कोरिया, आणि सोलोमन बेटांशी चर्चा करत आहे. असो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कार्यक्रमापूर्वी एका मैत्रिणीने, की जी एका आदिवासी जमातीतील आहे, ह्या सोहळ्याविषयी सांगितले आणि मग हो नाही करता-करता मी, माझा मित्र आणि ती मैत्रिण अशा तिघांनी विमानाने जायचे ठरले (कारण ह्या बेटावर जाण्यासाठी बोटीने २.५ तास लागतात आणि ईतरांना जशी बस लागते तशी मला बोट लागते :) ). पण बेटावरच्या या कार्यक्रमानिमित्त होणार्या गर्दीमूळे विमानाची तिकीटे मिळाली नाही. शेवटी बोटीने जाण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. सकाळी लवकर उठून मैत्रिणीच्या कारने तायतुंग (Taitung) ह्या शहराच्या बंदरावर आलो, आणि तिकीटे काढुन बोटीत चढलो. बोटीत बर्यापैकी गर्दी होती आणि बहुतेक करुन सगळे लान-यूलाच कार्यक्रमासाठी चालले होते. बोट लान-यूला जाताना मुख्य किनार्‍यापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असणार्‍या हिरवी/पाचू बेटांवरुन जाते.

तायतुंग (Taitung) बंदर

आमची बोट

जसा जसा मुख्यभूमीचा किनारा दूर जात होता तस-तसे आम्ही एका वेगळ्याच दुनियेत जाणार होतो

बोटीच्या प्रवासाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती, उलट्यांनी आणि त्यानंतर जाणवनार्‍या अशक्तपणाने (आधीच आम्ही पाप्याचे पितर!) मी बेजार झालो. पोहोचल्यानंतर थोडे खाऊन आणि केलेल्या आरामाने थोडी तरतरी आली मग त्यानंतर मित्राबरोबर समुद्रावर थोडे फिरुन आलो. पण ह्या झालेल्या त्रासामुळे त्यादिवशी काही खास पाहता नाही आले. पुढचे दोन दिवस हे सोहळ्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. पहील्यादिवशी बोटीची साग्रसंगीत पुजा केली जाते, ह्या निमित्ताने संपूर्ण गावाला जेवणावळीचे यजमानातर्फे आग्रहाचे निमंत्रण असते, तसेच संपूर्ण गावही घरातील कार्य असल्याप्रमाणे यजमानाच्या कार्यात राबत असते. दुसर्या दिवशी मिरवणुकीने बोटीच्या जलावतरणाचा कार्यक्रम केला जातो.

बेटाचा पहिला-वहीला नजारा

तैवानमधील इतक्यावर्षांच्या वास्तव्यात मला एकही बकरी/बोकड दिसली/दिसला नाही पण ह्या बेटावर आल्यानंतर सुरुवातीलाच महाराजांचे दर्शन झाले.

दुसर्यादिवशी सकाळी लवकरच भटकंती करायला निघालो. येथे दुचाकी भाडयाने मिळतात, तेव्हा मी आणि माझा मित्र दोघांत एक दुचाकी घेऊन स्वारी भटकायला तयार झाली. सगळा मार्ग हा समुद्र्किनार्‍याने आहे त्यामुळे एका बाजुला निळा अथांग समुद्र आणि दुसर्‍याबाजुला उंच डोंगर या द्वयीने साकार केलेल्या अनोख्या विश्वाचा अस्वाद घेत आपण जात असतो.

मध्ये भेटणारी ही भली मोठी गुहा

किनार्‍यावर सापडलेली ही वेगवेगळ्या प्रकाराची प्रवाळं

किनार्‍यावर नांगरुन ठेवलेल्या यामी लोकांच्या वैशिष्ट्यपूर्ण बोटी/होडया

आता आपण मुख्यविषयाकडे वळुयात. पहिल्या दिवशी बोटीच्या पूजेसाठी गावातील सर्व घरांतून कंदमूळे (ह्याचे नाव माहीत नाही) पाठवली जातात. ह्यांचे बोटीच्या पूजेसाठी विशेष महत्व असते.

गावातुन पूजेसाठी कंदमूळे वाहुन आणताना बच्चेकंपनी त्यांच्या पारंपारीक पोषाखात

नंतर ती बोट कंदमूळांनी अशाप्रकारे भरुन टाकली जाते

कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रेक्षक आणि या जमातीचा अभ्यास करणारे जगभरातून आलेले अभ्यासक

याठिकाणी प्रथमच गोगलगायींची (Snail) भाजी खाल्ली, चवीला एकदम छान होती.

एक यामी स्त्री तिच्या पारंपारीक पोषाखात

फिलीपिन्सच्या ज्याभागातून यामी स्थलांतरीत झाले त्याभागातील जेष्ठांना सन्मानपूर्वक या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येते.

फिलीपिनो पाहुण्यांचे आगमन होताना

यजमान आणि इतर गावकरी त्यांच्या पारंपारीक पोषाखात

गावतील आणि आसपासच्या इतर गावांतील जेष्ठ मान्यवर मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना

इतर जमातीतील आदिवासीही ह्या सोहळ्यासाठी आले होते

त्यादिवशी रात्री पाहुण्यांसाठी आदिवासी संस्कृतीदर्शनाचा कार्यक्रम ठेवन्यात आल होता. कार्यक्रमाचा समारोप फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आला.

आदिवासी आपली कला सादर करताना

दुसर्‍यादिवशी बोटीची पूजाकरून मिरवणुकीने तिचे जलावतरण करण्यात येते, यावेळी बोट सगळेजण उचलुन नेतात व मध्ये मध्ये हवेत उंच फेकून झेलतातही.

ह्या प्रचिमध्ये यांनी जे चित्रविचित्र हावभाव केले आहेत तो बोटीची भुत पिशाच्चा पासुन रक्षण करण्याचा विधी आहे ज्याच्या चलचित्रफिती आपण खाली दिलेल्या दुव्यांवर टिचकी मारुन बघू शकता

१) http://www.youtube.com/watch?v=FSgBOSt5jOk&feature=related
२) http://www.youtube.com/watch?v=tQUaV2rRquQ&feature=related
३) http://www.youtube.com/watch?v=wqK7D5hju2s&feature=related
४) http://www.youtube.com/watch?v=PBh5cic_Ri8&feature=related
५) http://www.youtube.com/watch?v=nK2iRl6vrlI&feature=related

नंतर गावातील जेष्ठ मंडळी होडीमधुन एक फेरी मारुन यजमानाला आशिर्वाद देतात

त्यादिवशीच्या दुपारच्या जेवणाचे एके ठिकाणी आमंत्रण होते त्यात त्यांच्या पारंपारीक खाद्यपदार्थांचा समावेश होता.

हे एका आदिवासीचे घर आहे. बसतोय का विश्वास? आर्थिक संपन्नता येउनही त्यांनी आपले रितीरिवाज आणि संस्कृतीची कास सोडली नाहीये.

परतीच्या प्रवासासाठी लान-यू बंदरातून दिसलेले हे दृश्य

आणि आता ह्या शांत निरपेक्ष विश्वातून पुन्हा रोजच्या रहाटगाडग्याला जुंपण्यासाठी परतत होतो

परतताना बोटीत ह्या आजीबाई वेड्या होत्या का अजुन उतरली नव्हती, पण त्या स्वतःशीच बडबडत होत्या मोठ्याने गाने गात होत्या आणि नाचतही होत्या. बाईंनी चांगले मनोरंजन मात्र केले.

पुढच्या भागात थारोको अभयारण्य आणि लियू लेक.....................

क्रमशः

प्रतिक्रिया

छान सफर घडवलीत लान-यु बेटाची, विशेषतः तो बोकड एखाद्या चिंतनात असल्यासारखा वाट्ला..
गोगल्गायीच कालवण आंगावर शिंग घेउन आल.... ;) पण भारी सफर झाली तुम्ची.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2012 - 6:51 pm | बिपिन कार्यकर्ते

रोचक माहिती! उत्तम प्रकाशचित्रं! :)

इरसाल's picture

13 Feb 2012 - 1:11 pm | इरसाल

छान माहिती दिलीत.वर्णन आवडले.

५० फक्त's picture

13 Feb 2012 - 2:54 pm | ५० फक्त

मस्त रे लई भारी लिवलंय अन दाखवलंय. धन्वयाद.

हंस's picture

14 Feb 2012 - 9:44 am | हंस

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

गणेशा's picture

14 Feb 2012 - 6:07 pm | गणेशा

अप्रतिम ...

आमच्या साठी असणार्‍या अनोख्या प्रदेशाचे हे दर्शन खुप खुप आवडले ..
तुमची लेखमाला तेथील संस्कृतीपुर्ण वर्णनांनी अशीच चालु राहुद्या ..
छान वाटले वाचुन ..

आर्थिक संपन्नता येउनही त्यांनी आपले रितीरिवाज आणि संस्कृतीची कास सोडली नाहीये.

म्हणुनच तर खुप छान वाटले..
शिवाय फक्त ४००० लोक्स त्यामुळे प्रत्येक सन उत्सव म्हणजे ४००० लोकांना एकत्रीत येण्याचे छान कारण ही आहे..

पूर्णपणे अपिरिचित जगाचं मस्त वर्णन.
आदिवासी म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याच्याशी अत्यंत विसंगत असे आदिवासी बघून आपल्या देशाला अजून कित्येक मैल वाटचाल करायची आहे याची जाणीव होतेय.

सुनील's picture

15 Feb 2012 - 8:21 am | सुनील

एका अनोख्या जमातीची ओळख आवडली. फोटोदेखिल छान.

गोगलगायीची भाजी टेम्टींग!

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 7:14 pm | वपाडाव

आवडलं... वेगळी सफर...