सफर तैवानची-भाग-१-व्हालियन आणि माझे विद्यापीठ

हंस's picture
हंस in भटकंती
8 Jan 2012 - 11:51 pm

मित्रांनो आज मी तैवानसारख्या बर्याचजणांना अपरिचित आणि अनवट अश्या भूप्रदेशाची (किंवा देशाची) ओळख करुन देणार आहे. तैवानमधल्या ५ वर्षांच्या वास्तव्यामध्ये तिथे पाहिलेल्या अनेक ठिकाणांची प्रचिंद्वारे ओळख करुन देण्याचा प्रयत्न राहील.
तैवान म्हटले कि आपल्याला आठवतो तो चीन, कारण चीन आणि जगातले बरेच देश तैवानला चीनचाच एक भाग मानतात. भारताच्याही अधिक्रुत धोरणानुसार हा चीनचाच एक भाग आहे. पण खरेपाहता चीनचा तैवानवर कोणत्याहीप्रकारे अंमल नाही. तैवानचे स्वत:चे सैन्यदल आहे, स्वत:चे करंसी आहे, स्वतंत्र सरकार आहे. बर्याच जणांचा गोंधळ होतो तो तैवानच्या नावाने, तैवानचे अधिक्रुत नाव आहे "रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा ROC आणि चीनचे "पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा PRC. कम्युनिस्ट क्रांतीनंतर चीनचा नेता चैंग काय शेक च्या नेत्रुत्वाखाली तैवान मध्ये लोकशाही सरकारची स्थापना करण्यात आली आणि तैवानला खरा चीन घोषित करण्यात आले. अगदी १९७१ पर्यंत संयुक्त राष्ट्रांमध्ये तैवान चीनचे प्रतिनीधित्व करत होता, पण नंतर चीनच्या (तैवानमध्ये चीनला Main land china म्ह्णतात) वाढत्या प्रभावामुळे तैवानला ती जागा सोडावी लागली.

जगाच्या नकाशावर अगदी ठिपक्याप्रमाणे आणि पानाच्या आकाराचा हा देश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. एकुण लोकसंख्या 23,061,689 असून त्याची राजधानी तैपेई (तेथल्या उच्चारांनुसार "थायपेई"), एक अतिशय सुंदर आणि आधुनिक शहर आहे. चाईनिज ही तेथील सरकारी कामकाजाची भाषा असूनसुध्दा Main land china ची चाईनिज आणि येथील चाईनिजमध्ये खूप फरक आहे जसे की, उच्चार, कांजी.

माझे वास्तव्य हे "व्हालियन" (Hualien) नावाच्या तैवानमधील सर्वात मोठ्या परगण्यात होते. व्हालियन हे शहर पूर्व किनार्यावरील सर्वात मोठे शहर आहे, पण पश्चिम किनार्यावरील ईतर शहरांच्यामानाने थोडेसे अविकसित आहे. कदाचित शहराला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचू नये म्हणून हा निर्णय घेतला गेला असावा. व्हालियनला तैवानचे "स्वित्झर्लंड" म्हणतात (जरी इथे बर्फ पडत नसलातरीही), आणि हे कमी की काय म्हणुन आमचे विद्यापीठ ही तैवानचे सगळ्यात सुंदर विद्यापीठ म्हणुन गणले जाते. विस्तीर्ण अशा ५०० एकरवर हे विद्यापीठ पसरलेले आहे, चोहोबाजुंनी डोंगराने वेढलेला विद्यापीठाचा परिसर, वैशिष्ठयपूर्ण इमारती, मुबलकप्रमाणात हिरवळ आणि असलेले तळं ह्यामुळे विद्यापीठाच्या सौदर्यात भरच घातली आहे.
तर जास्त वर्णन न करता आता आपण प्रचि पाहुयात-
व्हालियन
व्हालियन रेल्वे स्थानक

शहरात मांडलेले अतरंगी बाकडी

शहराचा समुद्रकिनारा

माझे विद्यापीठ- विद्यापीठाची कार्यालयीन इमारत

विद्यापीठाचे ग्रंथालय-

काही माहिती आणि प्रचि जालावरुन साभार.........

प्रतिक्रिया

छान फोटो आहेत आणि तैवान बद्दल चांगली माहिती मिळतेय.

फोटोंसोबत जरा विस्तृत माहिती दिल्यास उत्तम होईल.

- पिंगू

सुनील's picture

9 Jan 2012 - 5:34 am | सुनील

फोटो सुंदरच. माहिती थोडी जास्त दिलीत तर उत्तम.

तैवानची मस्त सफर घडवलीत. फोटो थोडे मोठे करून अजून जास्त माहिती हवीच.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jan 2012 - 10:19 am | प्रभाकर पेठकर

तैवानची मस्त छायाचित्रं. छायाचित्रांची संख्या थोडी कमी करून आकार वाढविला तर अधिक परिणामकारक होतील असे वाटते. अभिनंदन.

हेच म्हणतो..

आणी त्याबरोबर अजुन थोडी माहीती पण लिहिली तर वाचायला पण मजा येईल, आणी नवीन गोष्टी कळतील.

--टुकुल

मृत्युन्जय's picture

9 Jan 2012 - 11:16 am | मृत्युन्जय

छायाचित्रे मोठी हवीत हंसा.

शिवाय प्रत्येक छायाचित्राच्या अनुषंगाने तु तुझी थोडीफार माहिती तिथली एखादी छोटीशी गंमत थोडाफार इतिहास आदि सांगु शकतोस. त्यामुळे लेखाच्या सौंदर्यात भर पडेल.

एकुण तैवान आवडले. छायाचित्रेही उत्तम. लेखनही छान फक्त थोडे जास्त हवे.

हंस's picture

9 Jan 2012 - 12:50 pm | हंस

प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद! ह्या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आवश्यक ती काळजी घेण्यात येईल.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jan 2012 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय उत्तम प्रकाशचित्रे! आवडली आहेतच.

तैवान पहिल्यांदा समोर आला तो पुलंचं पूर्वरंग वाचताना 'फॉर्मोसा'च्या रूपात. हे तैवानचे पाश्चात्य / त्यावेळचे नाव. मात्र या लेखमालेच्या निमित्ताने तैवानबद्दल नुसतीच सहजी उपलब्ध असलेली माहिती समोर न येता अजूनही काही पदर उलगडावेत ही इच्छा आहे. उदा. यादवी युद्धानंतर जेव्हा मेनलँड मधले लोक तिथे आले तेव्हा तौवानमधल्या मूलनिवासींची झालेली स्थिती / परवड किंवा आज तैवानी आणि मेनलँड चिनी समाजांची तुलना आणि परस्परातले संबंध इ. इ.

हंस's picture

9 Jan 2012 - 10:42 pm | हंस

बिपिनदा नक्कीच! माझा त्याविषयावर पण लिहीण्याचा विचार आहे, कदाचित पुढच्या भागात!

फोटो आवडले, मस्त आहेत. थोडीशी माहिती असती तर खुप मस्त वाटलं असतं.

मेघवेडा's picture

9 Jan 2012 - 7:42 pm | मेघवेडा

मस्तच फोटो आहेत! सफर आवडली!

मदनबाण's picture

9 Jan 2012 - 8:03 pm | मदनबाण

मस्त... :)
असेच लिहीत रहा... तुमचे अनुभव,तुम्ही अनुभवलेले प्रसंग इथे जरुर द्या.
वरती अनेकांनी सुचना केल्या आहेत,त्या लक्षात ठेवुन पुढचा भाग लिहा.
वाट पाहतो आहे...

सुंदर!!
फोटो खाली कॅप्शन्स आणि थोडी आणखी माहिती येऊद्या.

मराठमोळा's picture

10 Jan 2012 - 4:23 am | मराठमोळा

फोटु आवडले.. :)
तैवान सारख्या छोट्या देशात ईतके चांगले रस्ते, व्यवस्थितपणा, नीट नेतकेपणा पाहून आपल्याकडे कधी असे होईल असाही एक प्रश्न मनाला स्पर्श करुन गेला. :)

ममो, छोटा देश हाच त्यांचा USP आहे, आणि कदाचित त्यामुळेच तेथे चांगले रस्ते, नीटनेटकेपणा आहे. अर्थातच राजकीय ईच्छाशक्ति आणि स्वयंशिस्त हाही महत्वाचा भाग आहे म्हणा!

एक तारा's picture

12 Jan 2012 - 4:33 pm | एक तारा

एव्हढ्याश्या तैवानची एव्हढी प्रगती पाहुन डोळे पाणावले. ऐकलं होतं, आज पाहण्यात आलं.

तैवानविषयी सहसा जास्त काही वाचण्या ऐकण्यात येत नाही. मस्त लेख..

वैशाली माने's picture

10 Jan 2012 - 11:58 am | वैशाली माने

मस्त फोटो. फोटोंवरुन तरी स्वच्छ, निटनेटका प्रदेश वाटतोय. आपल्या कडेही असेच असावे अशी आशा आहे.

तैवान असाच पहायला आणि वाचायला ही आवडेल

पैसा's picture

10 Jan 2012 - 9:32 pm | पैसा

आणखी वाचायला आवडेल!

फोटू आवडले. अजून येउद्या. आणि अजून थोडे लेखनही.

स्वाती दिनेश's picture

11 Jan 2012 - 5:58 pm | स्वाती दिनेश

फोटू आवडले. अजून येउद्या. आणि अजून थोडे लेखनही.
असेच म्हणते,
स्वाती

विलासराव's picture

12 Jan 2012 - 10:09 pm | विलासराव

आहे हे व्हालीयान.
मी सप्टेबरला तैवानला होतो. शिंच्यु , तैपई , अलिशान, सन-मुन लेक असा प्रवास झाला. वन -ओ-वन पण पाहीली.
पण हे व्हालीयान ठरवुनही राहीलेच पहायचे. ते तुमच्या लेखामुळे पहायला मिळेल.

लेख छानच.
तैवान बद्दल अजून थोडे:-
पारंपरिक दृष्टीने, सांकृतिक दृष्टीने व बहुतांश वेला राजकिय दृष्टीनेही तैवान हा इतिहासात चीनी सम्राटाच्या ताब्यात होता.
अगदि २०व्या शतकापर्यंत कधी सलगपणे तर कधी विस्कळित रुपात चीनी सम्राटाची तिथे सत्ता असे.
१४९८ला वास्को-द्-गामा ह्याने "हिंद"ला यायचा सागरी मार्ग शोधला.ही घटना जागतिक इतिहासात महत्वाची होती.
युरोपिअन व्यापारी व वसाहतवाद्यांना आता आशियातील नवनवीन ठिकाणे व जुनीच व्यापारी केंद्रे साद घालू लागली. पुढच्या तीनेक शतकात युरोपिअनांनी (डच्,पोर्तुगिज्,स्पॅनिश्,ब्रिटिश्,फ्रेंच) आफ्रिका,अमेरिका,आशिया,ऑस्ट्रेलिया ह्या सर्वच भूभागांची आपसात "वाटणी " करून टाकली. त्यात आख्खा भारतीय उपखंड ब्रिटिशांनी एकहाती घेतला.इंडोनेशिया वगैरे फ्रान्स्-डच(हॉलंड) ह्यांच्या ताब्यात गेले. तेव्हाच आख्खा चीन कुणालाच जिंकता आला नाही. किंवा त्यांनी चीनमधील सर्वाधिक सुपीक किंवा मोक्याची ठिकाणे तेव्हढी ठेउन घेतली. मोक्याची ठिकाणे साहजिकच किनारपट्टीच्या जवळ होती. खोलवर आत मुख्य चेनी भूभागात स्थानिक चीनी सत्तेचे वर्चस्व होते.
म्हणजेच ह्याच सुमारास तैवान्/फार्मोसा इथे कधी पोर्तुगिज तर कधी फ्रान्स ह्यांनी आपले पाय रोवले. जवळचे सिंगापूर व हाँगकाँग ब्रिटिशांनी घेतले. हे सर्व १८५० ते १८९९९ दरम्यान होत होते. काही काळापुरते युरोपिअनांकडून चीनने ते परत जिंकले खरे, पण पुन्हा एकदा एका वसाहतवादी, आधुनिक सत्तेने तैवान त्यांच्याकडून जिंकून घेतले.फक्त तो "आधुनिक" देश युरोप्पिअन नव्हता, तर त्यांनाही वरचढ थरणारा आशियायी महासत्ता म्हणजे होता जपान!

१८९५ ते१९४५ अशी सलग पन्नासेक वर्षे तैवानमध्ये जपानी सत्ता होती. दरम्यान खुद्द चीनमध्येच सन्-यत्-सेन् ह्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती होउन १९११ Republic of China (ROC)अस्तित्वात आले. हे लोकशाहीवादी बनवण्याचे सन्-यत-सेन ह्यांचे स्वप्न होते. पण पूर्ण चीन एकसंध त्यांना कधीच ताब्यात घेता आला नाही, कित्येक ठिकाणी स्थानिक warlords,फुटीर नेतृत्व होते.समांतर व्यवस्था होती. अशातच संपत्तीची वाटणी अधिकच विषम होत चालल्याने गरिब चीनी शेतकर्‍यांचा व कष्टकर्‍यांचा असंतोष वाढिस लागला. ह्यातूनच communist party of china ह्या सुरुवातीला लहान वाटणार्‍या चळवळीला पाठिंबा मिळाला. त्यांनी अशिक्षित शेतकर्‍यांचे व आपणास येउन मिळणार्‍या सैन्याच्या तुकड्यांचे स्वतंत्र सैन्य उभारून झपाट्याने चीनी भूभाग ताब्यात घेण्यास प्रारंभ केला. स्वप्न होते चीनच्या एकीकरणाचे,बृहद चीन किंवा "अखंड चीन" स्थापण्याचे. पुढील दोनेक दशके अशाच सत्तास्पर्धेत व अराजकात गेली.१९३० य्चा दशकाच्या मध्यापर्यंत चीनच्या तुरलक भागात, मुख्यतः उत्तरेत कम्युनिस्टांनी पाया मजबूत केला व सतत सरकारशी लढाया सुरु ठेवल्या.

१९३७मध्ये अचानक जपानने चीनवर तुफान हल्ला केला तेव्हा ROC(तेव्हाचे सरकार) व कम्युनिस्ट एकत्र आले व जपान्यांना प्रतिकार सुरु झाला. पण तरीही जपानने चढाई सुरु ठेवत जवळपास तीन चतुर्थांश चीनवर कब्जा मिळवला. काही दुर्गम भाग तेव्हढे ह्या युतीच्या ताब्यात राहिले. सप्टेंबर १९४५ च्या अणूहल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली तशी पुन्हा लगेच युती तुटली. पुन्हा पूर्ण चीनवर हक्क कुनाचा ह्यासाठी घमासान युद्ध सुरु झाले. इकडे तैवानवरील जपानी सत्तेचे पकडही ढिली झाल्याने ROCने त्यावर कब्जा मिळवला. त्यावेळेस ROC चा प्रमुख होता चँग कै शेक , कम्युनिस्टांचा नेता होता माओ. ROC ला पाठिंबा होता अमेरिका-ब्रिटन वगैरे दोस्त राष्ट्रांचा तर माओच्या मागे होता स्टॅलिन व रशिया! १९४५ ते १९४९ अशा चाललेल्या यादवी युद्धाचा शेवट झाला माओच्या सुप्रसिद्ध "long march"ने . मुख्य भूमीवर पराभव झालेल्या चँग कै शेक ह्याने जमेल तित्की संपत्ती, तंत्रज्ञान व तंत्रज्ञ गोळा करत मुक्काम तैवानला हलवला.

१९४५ नंतर United nations स्थापन झाली व त्यात दुसर्‍अय महायुद्धातील जेत्यांना काही खास अधिकार देत सुरक्षा परिषद स्थापन झाली. रशिया,अमेरिका,ब्रिटन्,फ्रान्स ह्यांच्या सोबतीने चीनलाही सभासदत्व मिळाले. पण चीनमध्ये तर यादवी सुरु होती! मग सदस्य होते त्यातले तत्कालिन सर्कार ROC, म्हणजेच चँग कै शेकचे सरकार. तो तैवानला गेल्यावरही "अधिकृत चीन" म्हणून ROC सरकारलाच मान्यता होती. कम्युनिस्टांना नाही.

१९७१ काही नाट्यमय घडामोडी घडल्या. एकेकाळी रशियाच्या सह्याने क्रांती केलेल्या कम्युनिस्ट चीनचे त्याच र्शियाशी वैर उद्भवले, सीमावादातही समस्या आल्या. त्यजोडले.कम्युनिस्ट चीनने थेट अमेरिकेशीच सख्य जोडले. रशियाच्या कंपूतील सर्वात मोठा देश असा अमेरिकेने तोडून दाखवला! वर दोस्तीचा नजराणा म्हणून ROC/तैवानमधील चीनी सरकारची मान्य्ता काढून चीन "कम्युनिस्ट चीन"लाच अधिकृत मान्यता दिली. आपसूकच सुरक्षा परिषदेतील जागाही अलगदपणे त्यांच्या गळ्यात पडली.

१९४९ ला तैवानला मोठया संपत्ती,तंत्रज्ञान व तंत्रज्ञांसह चँग आल्याने तो देश हळूहळू पुढारलेला होउ लागला. १९६०-७० च्या दशकात झपाट्याने(७.५टक्क्याहून अधिक वेगाने) आर्थिक प्रगती करणार्या miracle economies/asian tigers मध्ये त्यांचा समावेश झाला.(इतर देश हाँगकाँग्,सिंगापूर्,द कोरिया व बहुदा जपान). १९७१ नंतरही ही आर्थिक घोडदौड रुरुच राहिली.

आज जगातील एक सुस्थित मध्यमवर्ग तैवानमध्ये आहे, राहणीमानाचा दर्जा पाश्चात्त्य देशांसारखाच सुधारलेला आहे. स्वच्छ मोठे रस्ते, आधुनिक कार, आधुनिक वेशभूषा,पंचतारांकित हॉटेल्स तिथे आहेत. कम्युनिस्ट चीनची प्रबळ इच्छा आहे ती म्हणजे जसे मागच्या दीड दश्कात पोर्तुगिजांकडून मकाउ बेटे , ब्रिटिशांकडून हाँगकाँग परत घेतले, तसेच तैवानही गट्टम करावेयेतैवान स्वातंत्र्य सोडाण्यास तयार नाही. सागरातील कित्येक बेटांवरून तैवान, जपान,द कोरिया,चीन ह्यांचे आपसात वाद आहेत, चीन त्याचेच निमित्त करून काही हालचाल करता येइल का ह्याची चाचपणी करत आहे.....

हंस's picture

13 Jan 2012 - 1:41 pm | हंस

मनोबा खुपच छान माहीती दिलीत! खरतर मी पुढच्या भागात हा विषय मांडणार होतो, पण बरे झाले तुम्ही ती माहिती इथेच दिलीत.
<१९६०-७० च्या दशकात झपाट्याने(७.५टक्क्याहून अधिक वेगाने) आर्थिक प्रगती करणार्या miracle economies/asian tigers मध्ये त्यांचा समावेश झाला.(इतर देश हाँगकाँग्,सिंगापूर्,द कोरिया व बहुदा जपान).>
बहुदा जपान नसावा, asian tigers मध्ये हाँगकाँग्,सिंगापूर्,द कोरिया आणि तैवान ह्या चार देशांचा समावेश होतो, कदाचित जपान हा आधी पासुनच (म्हणजे हे चार देशांची अर्थसुधारणा होण्यापूर्वीपासुनच) सधन नी विकसित अर्थव्यवस्था होती.